कोणतही शिवकाव्य येथे शोधा

शिवाजी महाराज कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिवाजी महाराज कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

इतिहास घडविणारे आम्ही मावळे ऐसे जन्मीले ना कोठे

इतिहास घडविणारे आम्ही मावळे
ऐसे जन्मीले ना कोठे
झुकविले त्या हिमालया
पुजतो आम्ही फक्त शिवरायांना
सहण होत नाही आम्हाला स्वराज्याशी फरेब
छातित धडकतात आऊसाहेब …
अजुनही शरीरावर त्याच जखमा उभळतात
शंभूराजे आठवले कि डोळ्यातले अश्रृ आपोआप ढळतात
विसरलो नाहीत त्यालाखो मावळ्यांचे बलिदान
आजही वाटतो त्यांचा अभिमान
जिथे पडती पाऊल आमचे त्याच
इतिहासाच्या वाटा वाकत तर नाहीच पण मोडणार
हि नाही आता मावळा
चमकतात तेज तलवारीच्या धारा
दिशा बदलतो पाहुन आम्हाला वादळी वारा
मावळा आम्ही शिवरायांचे जगने आमचे ताठ आहे
आडवे जाण्याआधी विचार करा या मावळ्याशी गाठ आहे
राजमाता जिजाऊनचा विजय असो
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधी श्वर,
महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजीमहाराज की जय
क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर
आद्य मराठा राजपुत्र महापराक्रमी
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय…!
बोला हरहर महादेव …..।।।

ll आमचा स्वाभिमान भगवा..ll

अभिमान भगवा..ll
आमचे कुळ भगवे..ll
मुळ भगवे..ll
आमचा हर्ष भगवा..ll
स्पर्श भगवा..ll
आमची जात भगवी..ll
कात भगवी..ll
आमचे धर्म भगवे..ll
कर्म भगवे..ll
आमच्या भावना भगव्या..ll
संवेदना भगव्या..ll
आमचा विचार भगवा..ll
प्रचार भगवा ..ll
आमची छाती भगवी..ll
माती भगवी..ll
आमचे तन
भगवे..ll
मन भगवे..ll
आमचा मान भगवा..ll
हिंदुस्थान भगवा..ll
आमचे रक्त भगवे..ll
तख्त भगवे..ll
आमचा उच्चार भगवा..ll
आचार भगवा..ll
आमचे वस्त्र भगवे..ll
शस्त्र भगवे..ll
आमचा श्वास भगवा..ll
ईतिहास भगवा..ll
आमचे कपाळ भगवे..ll
आभाळ भगवे..ll
आमचा सन्मान भगवा..ll
निशान भगवा..ll
आमचा महाराष्ट्र भगवा..ll
सर्वश्रेष्ठ भगवा..ll
काळजात भगव्याच्या दाटती कळा..ll
सांगती दुनियेस हज्जार वेळा..ll
नका ठेऊ आम्हावर तिरका डोळा..ll
नाहीतर आमचा नांद लयी खुळा..ll
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||
|| जय शंभु राजे||

रायगडाच्या माथ्यावरुन कडाडला छावा..

रायगडाच्या माथ्यावरुन कडाडला छावा..
जणु सह्यांद्रिच्या छातीत उसळला लाव्हा..
हैरान करी औरंग्याला त्याचा गनिमी कावा..
बलदंड ताकदीचा विर ऐसा ना कळले देवा..
घायाळ होई युध्दभुमी ऐसी तळपली तलवार..
थरथर कापे गनिम असा त्या नजेरेचा वार..
रक्त पाजे रणांगना होऊन शत्रुवर स्वार..
वार घेई छातिवर बोथट होई तलवारीची धार..
स्वराज्यासाठी रुळली ईथे बलिदानाची प्रथा..
झुकेल कसा छावा ज्याचा शिवछत्रपति पिता..
पत्करीतो शरण मृत्यु टेकवि माथा..
अजिंक्य पराक्रामाची जगी एकच हि कथा..
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभु राजे

समशेर हाती घेताच लोपत होत्या चंद्र तारका… असा हा सिंहाचा छावा मराठ्यांचा होता सखा ॥

समशेर हाती घेताच लोपत होत्या चंद्र तारका… असा हा सिंहाचा छावा मराठ्यांचा होता सखा ॥

 

मरणाला कधी न भिणारी आम्ही मराठ्याची पोरं
शाहिर सुद्धा सांगुन गेलंही होती सर्वांच्या म्होरं ॥
हातात भगवा घेउन पुढे खंडोबाचा मळवट भाळी
एकदाची स्वारी निघाली ठोकुन त्वेषाने आरोळी ।
येतो आम्ही काळजी नसावी, जिंकण्याची हौस डोळी
निघतो एकदाचा शुर तो, चिखलकाटे पायदळी ॥
झुंजविले ज्याने औरंगजेबालाही, म् रुत्यु त्याच्यापुढे फिका
कुशाग्र शक्तिशाली शंभु जिंकण्यास ना शत्रुस कधी मोका ।
समशेर हाती घेताच लोपत होत्या चंद्र तारका
असा हा सिंहाचा छावा मराठ्यांचा होता सखा ॥
बलिदान जाईल वाया त्याचे केले जर दुर्लक्ष
रक्त सांडलय मराठयांसाठी नेहमीच होता दक्ष ।
पन घात केला काळाने डाव एकदाचा साधला
जगदंबा जगदंबा शेवटचे बोल मुखावाटे वदला ॥
नेहमीच असायचा पुढे जरी होता तोराजा
मैदान सोडायचा नाही कधी उडविल्याशिवाय शत्रुचा फ़ज्जा ।
सात वर्षे नाही ठेवुन दिला कुणामायभुमीत पाय
एकदातरी शंभुराजे साकारायचाय माघार घेणार नाय ।।
हिंदवी स्वराज्याच्या जन्म भूमीवर,
क्षात्रवीर कट्टर संभाजी राजे भेटणारनाही.
हिंदू-मरा ठा जात आमची, धर्माँतर आम्हां पटणार नाही.
टोपली वळून पोट भरु, पण कोणाखाली झुकणार नाही.
उपाशी पोटी मेलो तरी चालेल पण कोणाखाली वाकणारनाही.
जातीसाठी माती खाऊ याचीच आम्हाला जाण आहे.
नसानसात ‘शिव भक्ति’ आमच्या,
हिंदवी स्वराज्याचा अभिमान आहे.
॥ जय हिँद ॥ ॥ जय महाराष्ट्र ॥

मी मर्द मराठा आहे जातीचा…

हा गंध महाराष्ट्राच्या मातीचा
मी मर्द मराठा आहे जातीचा…
सह्याद्रीच्या दरी खोऱ्यात
गर्जतो हा नाद मराठ्यांचा …
सांडले रक्त इथे मराठ्याचे
पावन झाली हि धरणी माय ….
स्वराज्याच्या रक्षणासाठी
अर्पण करतो प्राण मराठा …
आजही डौलात डोलतो आहे
हा भगवा झेंडा मराठ्यांचा…
करितोललकार हा मराठा
जयजयकार हा शिवरायांचा .

माझ्याही शिवबांच एक राज्य होत

माझ्याही शिवबांच एक राज्य होत 
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत…
सुख शांती समाधान नांदत जिथे
अस ते एक हिंदवी स्वराज्य होत…
जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता…
न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल
पण अन्याय कुणावर झाला नव्हता…
राज्यांचा राज्य कारभार असा होता
गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती…
स्वतःसाठी सारेच जगतात या जगी
रयतेसाठी जगणारे शिवराय होते…
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी….
कितीही गुणगान केले तरी कमीच
असे अमुचे छत्रपती शिवराय होते…

गर्जे हर हर महादेव गर्जना..

गर्जे हर हर महादेव गर्जना..
जोश नभाचा चढे रणांगना..
छातित उसळे दर्या शिवभक्तिचा..
थरथर कापे गनिम असा जरब शिवशक्तिचा..
जातिशी कुणाच्या द्वेश नव्हता..
सत्तेसाठी माजलेला तो आवेश नव्हता..
गगनभेदी रन किलकाऱ्या तोफांना फुटे घाम..
रणांगनात मावळे उधळी विजयी रंग..
नाचे तलवारी हातात होई दंग..
पेटती रणांगने आम्हा पुढे येती शरण..
लढला मराठा त्वेशाने आले जरी मरण..
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभु राजे

मौत डरी थी देखकर उसे ये खुद मौत का दावा है..ll

मौत डरी थी देखकर उसे ये खुद मौत का दावा है..ll
धरती को नाज उसपर ऐसा एक हि शेर शिवबा का छावा है..ll
कड कड करती बिजली गीरी रण मैदान मे..ll
एक सितारा आज भी चमकता है मरहठ्ठोकि शान मे..ll
तुफान मे पला वो आँखो से बरसता अंगारा..ll
देख के जलवा उसका पुकारे लहु लहु जंजिरा..ll
मुगलो का फाड सीना खुन कि नदियो कि मजधार था..ll
खतरोसे खेलनेवाले मरहठ्ठो का सरदार था..ll
राजा था धरती का प्रजा ने उसे पुकारा था..ll
डरता कहा था किसीसे खुद मौत को ललकारा था..ll
जलजला है ऐसा खुदा का वो नही खुदा उसका बंदा है..ll
दहेकता हुआ मरहठ्ठो के सीनो मे वो आज भी जिंदा है..”ll
जय जिजाऊ. . . .
जय शिवराय. . . .
जय शंभूराजे. . . . .

जिथे इतिहासही निशब्द झाला

भळभळत्या जखमावर मिठ चोळले ..
फितुरीच्या अग्नित शरिर पोळले ..
काळा समोर झुकला नाही शिवपुञं ..
तरी
उतरल्या डोळ्यातुन रक्ताच्या धारा ..
जरी
भिजल्या असतील
सह्याद्रीच्या कणखर शिळा ..
रुसला असेल येसुबाईच्या
कपाळाचा क्षणभर टिळा ..
निखळ्या का नाही
साखळदंडाच्या साखळ्या ..
का नाही घेतल्या धरणीतुन
ज्वालामुखीने उकाळ्या ..
का झाला बधीर आसमंत
का सलते काळजात मराठ्यांच्या
फितुरीच्या खंत ..
रणशिंगी स्वातंञ्याचा बडवुन गेला ..
रणागनात विजयी रंग उडवुन गेला ..
मोगली सैतानाच्या टोळ्या उडवुन गेला ..
स्वराज्याचे स्वप्न काळजात दडवुन गेला ..
जाता जाता कायमचा रडवुन गेला ..
सह्याद्रीच्या दरीखोऱ्यातुन
महाराष्ट्राच्या ­ कानाकोपऱ्यातुन
निनांदतो साद तुझाच ..
पराक्रमांचा काळजातुन
विसरलो नाहीत अजुन
तुळापुरचा इतिहास
चाळीस दिवसाच्या प्रचंड वेदना
अन् शंभुचा अखेराचा श्वास ..
विसरलो नाहीत अजुन
काळजातला स्वराज्याचा ध्यास
अन् शिवरायांच्या शंभुवरचा विश्वास ..
जिथे इतिहासही निशब्द झाला
ब्रम्हांड स्तब्ध झाला ..
जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभुराजे

नाव होतं त्याचं ”छत्रपती शिवाजी

महाराष्ट्र माझा होता अंधारात
औरंगजेबरूपी अजगराच्या विळख्यात

अडकली होती भवानीमाता माझी
गुलामरूपी साखळदंडांच्या बेड्यांत
तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म
शिवनेरीही झाला धन्य
होते त्याच्यावर जिजाऊचे संस्कार
आणि पाठीवर दादोजींचा हात
डोक्यावर जिरेटोप व हाती भवानी तलवार
घातला स्वराज्याचा पाया छातीवर शोषून वार
होता तो सिंहाचा छावा
खेळून गनिमी कावा
माजवून रणदुदुंभी रणांगणात
खेचून आणला विजय त्यानं आपल्या अंगणात
जिंकून घेतलं आकाश त्यानं
जिंकून घेतले दुर्ग
विशाल सागरालाही पायबंध घातला त्यानं
बांधून सिंधुदुर्ग
नजर त्याची गरूडापरी
पडली सिद्दिच्या जंजिरावरी
केली त्यानं नऊवेळा स्वारी
तरीही पडलं अपयश पदरी
असेल का दुःख यापरी
म्हणून थांबला नाही तो
झुकला नाही तो
पेटून उठला तो मर्दमराठा
भिडला थेट मुघलांना
दिलं त्यानं आव्हान डच, पोर्तुगीजांना
घेतलं अंगावर त्यानं ब्रिटिशांना
शेवटी मराठ्यांचा राजाच तो
पुरून उरला सगळ्यांना
बसून त्यानं दख्खनच्या भूमीं…त
हालवलं त्यानं दिल्लीचे तख्त
उडवली त्यानं दाणादाण औरंगजेबाची
नाव होतं त्याचं ”छत्रपती शिवाजी

धन्य तू शिवराया…. स्त्री जातीचा मान राखुनी तूच शिकविले जगाया….!!!

काबीज करता कल्याण-भिवंडी
अमाप आला हाती खजिना…
वेळ न दवडिता सरदारांनी
सादर केला एक नजराणा…
कल्याण सुभेदाराची
स्नुषा विलक्षण सुंदर…
उभी होती राजांपुढती
झुकुवूनी घाबरी नजर…
धीमी पाऊले टाकीत राजे
तिज जवळी आले…
रूप पाहुनी विलक्षण सुंदर
राजे पुढे वदले….
जर का आमच्या मांसाहेब
इतक्या सुंदर असत्या…..
आम्ही तयांचे पुत्र लाडके
असेच सुंदर निपजलो असतो….
वंदन तुजला शतदा करतो
धन्य तू शिवराया….
स्त्री जातीचा मान राखुनी
तूच शिकविले जगाया….!!!
जय शिवराय…जय महाराष्ट्र…!!!

हमने सारा हिंदुस्तान जीता … पार इन मराठो को जीत नाही सके

औरंगजेब म्हणतो….,
”अरे काय जादु आहे
शिवाजीची आणि संभाजीची इथल्या मु
व लोकावर अरे राजा कैद झाला…!!!
”सेनापति मारला गेला तरी हे
मराठे शरण येत नाहीत
कोणत्या मातीचा स्वाभिमान
यांच्या रक्तात भरला आहे.
”संभाजीची धिंड काढली प्रचंड
अपमान केला तरीही मराठे
चालुन आले नाहीत
कि महाराणी येसुबाई
कुंकवाची भीक मागायला रायगड
सोडत नाहीत.
”हमने तो सोचा था गिडगिडाके
आयेगी वो लेकीन वोतो शेरणी के
जैसे गुर्राती है…!!!
हमने सारा हिंदुस्तान जीता …
पार इन मराठो को जीत नाही सके

संभाजीराजे म्हणजे अवघे विश्व आपल्या तलवारीच्या पात्यावर पेलून धरणारा राजा

ll मृत्यू सुद्धा थरथरत
होता स्वराज्याच्या धाकल्या छत्रपतीला
संभाजीराजे म्हणजे
वाघासारखी डरकाळी फोडणारा ,
संभाजीराजे म्हणजे हरणासारखा दौँडत
पळणारा,
संभाजीराजे म्हणजे चित्यांसारखाचपळ
असणारा ,
संभाजीराजे म्हणजे वादळासारखे तुफान
काळजावर घेऊन फिरणारा ,
संभाजीराजे म्हणजे संघर्षाँची अनुभूती हर
क्षणी घेणारा ,
संभाजीराजे म्हणजे अवघे विश्व
आपल्या तलवारीच्या पात्यावर पेलून
धरणारा ..राजा
!!जय शंभुराजे!!

तुमचा बाजीप्रभु काय लढला हो तुमच्यासाठी

तुमचा बाजीप्रभु काय लढला हो तुमच्यासाठी
झाले जरी ३५० वर्ष
एक स्वामी निष्ठेचा आदर्श ठेऊन गेला आमच्यासाठी
आता एकच मागने तुमच्या पायी
या भगव्यासाठी मलाही असच मरण याव
राजे….
अस वाटतं
एखाद्या घोड खिंडिला पावन करुन जावं
विर बाजीप्रभुंना व ३०० बांदल शुर मावळ्यांच्या पराक्रमाला
मुजरा
मानाचा त्रिवार मुजरा
।। एक आवाज एकच पर्याय ।।
।।जय जिजाऊ जय शिवराय।।
..ණ गजानन बोरकर

शिवरायांचा इतिहास इतका आहे

शिवरायांचा इतिहास इतका आहे कि आपण
तो फक्त वाचू शकतो तो आचरणात आणू शकत
नाही कोणी कोणी वाचला पण नसेल कारण
आणि वाचला असेल तर तो पण तेवढ्या पुरतेच
असेच मला आज काल वाटत आहे कारण आपण
कधी……………………………….
स्वराज्या साठी झटलोच नाही ना आपण
कधी उपाशी राहिलोच नाही कधी कोणाची गुलाम
गिरी केलीच नाही कारण
आपल्याला शिवरायांनी स्वराज दिले आहे
ह्याचा विचार कधी केला आहे कोणामुळे आपण
आज मान ताठ करून चालतो हे माहित आहे
का……..
अरे ज्या शिवरायांचा कृपेने तुम्ही हे
दिवस पाहताय त्यांनाच तुम्ही विसरत चालला आहे
कधी कधी त्यांचे नाव पण आपण शिवाजी असे
घेतो आणि आपल्या बापाला आदराने
बोलवतो……..
बापाला आदराने
बोलवता चागली गोष्ट आहे
आपली संस्कृती विसरली नाही पाहिजे ………….
पण कोणामुळे त्याच शिवरायांच्या मुळे ना अरे जर
ते नसते तर आज तुम्ही आम्ही पण
नसतो या जगात याचा कधी विचार
केला आहे ……..
नाही ना………
आपल्या डोक्यात काय आहे
आपल्या साठी स्वराज आहे आपण काही हि करू
शकतो हेच ना
अरे कधी कधी असा विचार
केला का त्यांनी आपल्या साठी दिलेलं स्वराज
त्या साठी सांडलेल पाण्या सारखे रक्त
या माती साठी दिलेल्या मावळ्यांचा बलिदानाचा
या माती साठी केलेल्या रक्ताच्या अभिषेकचा……
कधी असा विचार करा कि हे राज्ज
माझ्या शिवरायंचे आहे आणि ते
राखण्या साठी जन्माला आलेला माझ्या शिवरायांचा
मर्द मावळा आहे येतील किती हि वादळे
मला फरक नाही पडत त्या वादळना हि शांत
करण्याची शक्ती मला शिवरायांनी दिली आहे
कारण मी शिवरायांचा मर्द मावळा आहे
शिवरायांच्या कृपेने या मराठी मातीत
जन्माला आलो याचा मला अभिमान नाही तर गर्व
आहे
आणि जगा जय शिवराय बोलून ताठ मानेने
तुम्हाला अडवणारा कधीच कोणी या जगात असणार
नाही…..

मर्द मराठा तो शंभु नावाचा वाघच होता..

मर्द मराठा तो शंभु नावाचा
वाघच होता..
कापत सुटला मोगलाना तरी
औरंग्या नुसता
बघत होता..
पराक्रम ऐसा नजर
फिरली ती विजयाची दिशा होती..
रयतेच्या सुखासाठी त्याला
सत्तेची नशाहोती..
ज्याच्या पराक्रमाने फाटले आभाळ..
औरंग्याच्या काळजात केला जाळ..
भासला ऐसा महाकाळ..
करुन गेला मृत्युलाही
घायाळ.. गाजवीली रणांगने
ऐसा दिमाखदार होता..
वचनाला जागलेला वतनाचा
वतनदार होता..
गर्जला मराठा छावा..
वाटला देवाला हेवा.. जय
जिजाऊ….
जय शिवराय….
जय शंभु राजे….
जय महाराष्ट्र….

सह्याद्रीच्या कड्यावरुनी छातीसाठी ढाल घ्यावी किल्ल्याच्या तटकटावरुनि इतिहासाची साक्ष घ्यावी

देणा-याने देत जावे
देणा-याने देत जावे
घेणा-याने घेत जावे
एकांडा फिरणाऱ्या पाखराकडून
आभाळाची सीमा घ्यावी
काळ्याकसदार मातीकाडूनी
पोसण्याची ताकद घ्यावी
सह्याद्रीच्या कड्यावरुनी
छातीसाठी ढाल घ्यावी
किल्ल्याच्या तटकटावरुनि
इतिहासाची साक्ष घ्यावी
बहरलेल्या वृक्षाकडूनी
मायेची सावली घ्यावी
ओसाड झालेल्या वृक्षाकडुनी
बहरण्याची उमेद घ्यावी
उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी
आणि माझ्या राजाकडून
स्वातंत्र्याची धमक घ्यावी

हे काव्य झोपलेल्या हिंदू सुपुत्रांसाठी….

हे काव्य झोपलेल्या हिंदू सुपुत्रांसाठी….
“उठा पुन्हा सज्ज व्हा !”
कसे पांग फेडू तुझे । कशी रक्षु मातृभूमी
कसा लढू फितुरांशी । कशी गाजवु रणभूमी
लाख लढाया लढतो आजही । गनीम कापितो घावासरशी
तळहातावर घेवून प्राण । तुम्हा स्मरतो जीवापाशी
जीवा, शिवा, ताना, बाजी । होते वीर तुम्हा संगती
आज नाही राहिले मर्द । जे स्वराज्यास मानिती प्राणज्योती
माय भगिनी पुन्हा बाटल्या । कापली कसायाने गाय
नाही उरला वाली कोणी । जो सदा खडा रक्षणाय 
कर्मभ्रष्ट झाले सगळे । धर्म वाऱ्यावर सोडून
हिंदू बाटतो रात्रंदिन । माय रडे हाय मोकलून
घ्या  अवतार पुन्हा शिवराया । फाडा  पुन्हा अफजल्या
वाचवा तुम्हीच तुमच्या विठूराया अन  तुळजाभवानीला
जगदंबेचा घालून गोंधळ । उडवा शीर गनिमाचे
आम्ही मावळे होवू पुन्हा । तोरण बांधू स्वराज्याचे…

निघाला शेर शिवबा स्वराज्य विस्ताराला...

Featured image
अफजल्याला फाडून
उभा चिरून…
निघाला शेर शिवबा
स्वराज्य विस्ताराला
अद्दल घडली विजापूरला
यवन मातीत गाडला
संपवले अत्याचाराला
वंदून आई भवानीला
मिठीत नृसिंह गेला
दगा दिसताच सावध झाला
कोतळ्यात खंजीर खुपसला
बोकडाचा बळी चढवला
अफजल्या धरणी पडला
अवघा मराठा पेटून उठला
हजारो हत्तींच बळ अंगाला
हर हर महादेव गरजला
ललकारीत रणी धावला
शत्रूचा फडशा उडविला
सार्थ केलं स्वराज्याला
वादळ उठलं जावळी खोऱ्याला
जिंकून मुलुख घेतला
पन्हाळ्यास आपला केला
मुक्त केलं गोर गरीबाला
आनंद झाला रयतेला
मराठ्यांचा राजा अवतरला
स्वराज्याचा वाली आला
जिंकून यवनी संकटाला
शिवशाहीचा विजय झाला.

अनेक झाले पुढेही होतील अगणित ह्या भुमीवरती

अनेक झाले पुढेही होतील
अगणित ह्या भुमीवरती
जाणता राजा एकची झाला
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। १ ।।
धर्म मराठा अभय मिळाले
सर्व समानभान नित्य आचरले
भगवा झेंडा घेऊन हाती
केली चहूकडे जनजागृती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। २ ।।
जिजाऊ माऊली दिव्य प्रेरणा
गुरू तुकाराम देऊ ज्ञाना
धाडसी मावळे भवानी सोबती
म्हणे हरहर महादेव गर्जती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ३ ।।
स्वारी केली किल्ले घेऊनी
काही जिंकुन काही बाधून
मोगल नमले शिकस्त संपली
भल्याभल्यांची झोप उडवीली
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ४ ।।
रयतेचं राज्य स्थापनेसाठी
मावळे जमले विजयासाठी
ऐक्यासाठी दिली आहुती
मिळाली ज्यांना विरगती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ५ ।।
मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ६ ।।
|| जय जिजाऊ ||...|| जय शिवराय ||....|| जय शंभुराजे||