भळभळत्या जखमावर मिठ चोळले ..
फितुरीच्या अग्नित शरिर पोळले ..
काळा समोर झुकला नाही शिवपुञं ..
तरी
उतरल्या डोळ्यातुन रक्ताच्या धारा ..
जरी
भिजल्या असतील
सह्याद्रीच्या कणखर शिळा ..
रुसला असेल येसुबाईच्या
कपाळाचा क्षणभर टिळा ..
निखळ्या का नाही
साखळदंडाच्या साखळ्या ..
का नाही घेतल्या धरणीतुन
ज्वालामुखीने उकाळ्या ..
का झाला बधीर आसमंत
का सलते काळजात मराठ्यांच्या
फितुरीच्या खंत ..
रणशिंगी स्वातंञ्याचा बडवुन गेला ..
रणागनात विजयी रंग उडवुन गेला ..
मोगली सैतानाच्या टोळ्या उडवुन गेला ..
स्वराज्याचे स्वप्न काळजात दडवुन गेला ..
जाता जाता कायमचा रडवुन गेला ..
सह्याद्रीच्या दरीखोऱ्यातुन
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन
निनांदतो साद तुझाच ..
पराक्रमांचा काळजातुन
विसरलो नाहीत अजुन
तुळापुरचा इतिहास
चाळीस दिवसाच्या प्रचंड वेदना
अन् शंभुचा अखेराचा श्वास ..
विसरलो नाहीत अजुन
काळजातला स्वराज्याचा ध्यास
अन् शिवरायांच्या शंभुवरचा विश्वास ..
जिथे इतिहासही निशब्द झाला
ब्रम्हांड स्तब्ध झाला ..
जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभुराजे
फितुरीच्या अग्नित शरिर पोळले ..
काळा समोर झुकला नाही शिवपुञं ..
तरी
उतरल्या डोळ्यातुन रक्ताच्या धारा ..
जरी
भिजल्या असतील
सह्याद्रीच्या कणखर शिळा ..
रुसला असेल येसुबाईच्या
कपाळाचा क्षणभर टिळा ..
निखळ्या का नाही
साखळदंडाच्या साखळ्या ..
का नाही घेतल्या धरणीतुन
ज्वालामुखीने उकाळ्या ..
का झाला बधीर आसमंत
का सलते काळजात मराठ्यांच्या
फितुरीच्या खंत ..
रणशिंगी स्वातंञ्याचा बडवुन गेला ..
रणागनात विजयी रंग उडवुन गेला ..
मोगली सैतानाच्या टोळ्या उडवुन गेला ..
स्वराज्याचे स्वप्न काळजात दडवुन गेला ..
जाता जाता कायमचा रडवुन गेला ..
सह्याद्रीच्या दरीखोऱ्यातुन
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन
निनांदतो साद तुझाच ..
पराक्रमांचा काळजातुन
विसरलो नाहीत अजुन
तुळापुरचा इतिहास
चाळीस दिवसाच्या प्रचंड वेदना
अन् शंभुचा अखेराचा श्वास ..
विसरलो नाहीत अजुन
काळजातला स्वराज्याचा ध्यास
अन् शिवरायांच्या शंभुवरचा विश्वास ..
जिथे इतिहासही निशब्द झाला
ब्रम्हांड स्तब्ध झाला ..
जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभुराजे