कोणतही शिवकाव्य येथे शोधा

शिवकालीन महाराष्ट्र ( सन सन १५९९ ते सन १६८० ) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिवकालीन महाराष्ट्र ( सन सन १५९९ ते सन १६८० ) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शिवकालीन महाराष्ट्र सन १६६० भाग १८८


सिद्दी विजापूरहून कूच करतो
सांभार : मराठा साम्राज्यकोश

सिद्दी जोहरने उत्साहात व धूमधडाक्यात विजापूर सोडले. जंजिरेकर सिद्दींसारखा किंवा निजामशाहीतील मलिक अंबर सारखा हा देखील हबशी होता. त्याला सलाबतखान ही पदवी दिली गेली व आदिलशाही दरबारात त्याचा मोठा सत्कार झाला. त्याच्या सैन्यात घोडदळ व पायदळ मिळून सुमारे पसतीस हजार लोक होते. त्याच्या हाताखाली बरेच नावाजलेले सरदारही होते. आदिलशाहने रुस्तुमेजमान, सादतखान, सिद्दी मसूद, बाजी घोरपडे, मुधोळकर, भाईखान व इतर अनेकांना सिद्दीला सामिल होण्याचा आदेश दिला होता.
सिद्दीने शिवरायांना पकडण्याचा निश्चय केला होता. विजापूरहून तो आधी मिरजेकडे निघाला. तो तिथे पोहोचतो तोवर शिवरायांनी मिरजेचा वेढा उठवून पन्हाळगडाकडे कूच केले होते. सिद्दीने तोच मार्ग घेत पन्हाळगड गाठला. त्याच्या लक्षात आले की पन्हाळगड काही आक्रमण करुन एका दमात जिंकता येणार नाही.
त्याने वेढा घालून गडाचा पुरवठा बंद करायचा विचार केला होता. सिद्दी ज्या दिवशी पायथ्यापाशी पोहोचला त्याच दिवशी गडाभोवती पहारे लावण्यात आले. शिवरायांना जखडण्याची त्याने पूर्ण योजना केला होता.
आदिलशाहने कोकातल्या व मावळ्यातल्या वतनदारांना सिद्दीला मदत करण्याचे आदेश दिले होते. मोसे खोऱ्यातील गोंडाजी पासलकरने आदिलशाही सैन्याला मदत केल्याबद्दल त्याला काही भागातली जमीन दिली गेली. केदारजी खोपडेनेही आदिलशाहकडे अशीच विनंती केली. आदिलशाहनेही ती लगेच मान्य केली.
इथे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की रुस्तुमेजमानने वतनाची देखभाल करायची आहे ह्या निमित्ताखाली सिद्दीला मदत करण्याचे टाळले. कदाचित त्याने शिवरायांना अप्रत्यक्ष मदत केली असावी. राजापूरहून सुरतच्या वखारीला पाठवलेल्या काही इंग्रज पत्रांमधेही असा उल्लेख आहे. पण ही पत्रे सोडली तर इतर साधनांमधे त्याची पुष्टी होत नाही.
संदर्भग्रंथ
राजा शिवछत्रपती, पृष्ठ २७५-२७८
No automatic alt text available.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६६० भाग १८७


शाहिस्तेखानची मोहिम
सांभार : मराठा साम्राज्यकोश

पण्डिता रायबाघन
रायबाघन, एक ब्राह्मण स्त्री मोघल फौजेत सामिल झाली होती, तीचे खरे नाव होते, सावित्रीबाई, वऱ्हाडातील माहुरच्या राजे उद्धवराव देशमुखांच्या पत्नी. उद्धवराजांनी आमरण मोघलांची सेवा केली. त्यांचा पुत्र जगजीवनराव सुद्धा मोघल साम्राज्याकरता बळी पडला. घराण्यात पुरुष राज्यकर्ता कुणीच न राहिल्याने सावित्रीबाईने आपल्या एकटीच्या अधिपत्याखाली वऱ्हाड प्रांताचे परकिय आक्रमणापासुन संरक्षण केले, वऱ्हाड मोघली प्रांतातच राहिले. औरंगजेब बादशहाने खुश होऊन सावित्रीबाईला ’पंडिता’ आणि ’रायबाघन’ असे किताब बहाल केले. रायबाघन, राजव्याघ्रीण, वाघिणीसारखी शुर, चपळ, आपल्या भक्षाचा अचुक लचका तोडणारी.
Image may contain: one or more people

शिवकालीन महाराष्ट्र सन १६६० भाग १८६


शाहिस्तेखानची मोहिम

सांभार : मराठा साम्राज्यकोश

शाहिस्तेखान औरंगाबाद सोडतो
२८ जानेवारी १६६० ला शाहिस्तेखान औरंगाबादेहून निघाला. त्याच्याकडे भले मोठे मुघल सैन्य दिले होते. शिवाजीने जिंकलेला मुलुख पुन्हा जिंकून घेणे हे त्याचे मुख्य काम होते. शमसखान पठाण, नामदारखान, घियासुद्दीन खान, हसन मुनीम, सुल्तान मिर्जा, कारतलबखान, भावसिंह, किशोरसिंह, शामसिंह, राजसिंह गौड असे इतर अनेक सरदार त्याच्या सैन्यात होते.
सुरजी गायकवाड, दिनकरराव काकडे, रंभाजी पवार, सर्जेराव घाटगे, कमळोजीराव कोकाटे असे मराठा सरदारही त्याच्याबरोबर होते. ह्या सैन्यात आणखी एक असामी होती ती म्हणजे सरदार पण्डिता रायबाघन नावाची एक बाई. तिचे खरे नाव सावित्रीबाई देशमुख असे होते व औरंगजेबने तिला पण्डिता रायबाघन ही पदवी दिली होती. वऱ्हाड प्रांतातील उदाराम देशमुखची ही विधवा होती.
मुघल सैन्यात सत्तर हजार घोडदळ, तीस हजार पायदळ, चारशे हत्ती व असंख्य दारुगोळा होता. ह्या लवाजम्यात मुदपाकखान्याचे सामान वाहून नेण्यासाठी शंभर उंट होते ह्यावरुन ह्या मोहिमेची भव्यता समजू शकते. मुघलांच्या किंवा आदिलशाहीच्याही तुलनेने शिवाजीकडे अगदी छोटा भाग होता तरीही औरंगजेबाने शिवरायांना कमी लेखले नव्हते. त्याने शिवरायांच्या हालचालींवर पायबंद घालण्यासाठीच इतकी मोठी मोहीम खुद्द त्याचा मामा, शाहिस्तेखानच्या हाती दिली होती.
संदर्भग्रंथ
राजा शिवछत्रपती, पृष्ठ ३०३-३२०
Image may contain: 1 person, beard

शिवकालीन महाराष्ट्र सन १६६० भाग १८४


शाहिस्तेखानची मोहिम

सांभार : मराठा साम्राज्यकोश

शाहिस्तेखानचे मूळ नाव अबू तालिब. तो इराणी होता. मिर्झा अमीर उल् उमरा हैबतजंग नबाब शाहिस्तेखान अबू तालिब हे त्याचं पदव्यासकट नाव होते. तो मुघल सम्राट औरंगजेबाचा मामा होता
शाहिस्तेखानची मोहिम ही शिवाजी राजा व मुघलांमधली पहिली मोठी मोहिम होती. औरंगजेबला शिवरायांच्या वाढत्या बळाची व आवाक्याची किती काळजी वाटत होती हेच त्यातून दिसते. शिवरायांचा स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न लवकरात लवकर मोडून काढायला पाहिजे हे त्याला कळून चुकले होते. मुघलांच्या दृष्टीने ह्या मोहिमेची वेळही अतिशय सुयोग्यपण निवडली होती. शिवरायांचे लक्ष आदिलशाही आघाडीवर लागले असताना शाहिस्तेखानने उत्तरेकडून आक्रमण केले होते. त्यामुळे ह्या दोन्ही सैन्यांना वेगळे ठेवणे हे शिवाजी राजा समोर सगळ्यात मोठे आव्हान होते. त्याने हे केलेच पण त्याबरोबर काही किल्लेही जिंकुन घेतले.
Image may contain: drawing

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १८२


आदिलशाही फौजा पन्हाळगडाजवळ पराभूत
शिवरायांनी पन्हाळगड जिंकला तोवर प्रतापगडावरुन पळालेले आदिलशाही सरदार विजापुरास पोहोचले. आदिलशाहने लगेच रुस्तुमेजमानला शिवरायांना रोखण्यासाठी पाठवले. विजापूर सोडल्यावर रुस्तुमेजमानला पन्हाळा पडल्याचे कळले.
रुस्तुमेजमानबद्दल कळल्यावर शिवाजी राजा पन्हाळ्याहून निघाले व २८ डिसेंबर १६५९ रोजी कोल्हापूरजवळ दोन्ही सैन्य समोरासमोर आली. जेधे शकावली सांगते की शिवरायांना ह्या युद्धात बारा हत्ती व दोन हजार घोडे मिळाले. आदिलशाही सैन्याला पळ काढून विजापुरास जावे लागले. दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दहा हजाराचे सैन्य असावे असे अनुमान आहे.
शिवाजीसाठी आदिलशाहीविरुद्ध खुल्या मैदानात झालेल्या युद्धात हा अत्यंत महत्वाचा विजय होता. ह्या विजयानंतर शिवरायांनी नेताजीला आदिलशाही भागात कर वसूल करायला धाडले व राजे परत पन्हाळगडावर गेले .
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९४९-९६०
Image may contain: one or more people

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १८१


सांभार : मराठा साम्राज्यकोश

अफझलवधानंतरच्या शिवरायांच्या मोहिमेचा आढावा
शिवरायांच्या हाती अफजलखानाचा मृत्यू व त्यानंतर त्याच्या सैन्याची झालेली वाताहत ह्या गोष्टी भारतातील राज्यकर्त्यांना धक्कादायक होत्या. सर्वात महत्वाचे म्हणजे आदिलशाहीच्या दख्खनवरील अधिपत्यावर बसलेली ही सणसणीत चपराक होती. ह्या धक्क्यातून आदिलशाही सावरण्यापूर्वी शिवरायांनी त्यावर जबरदस्त प्रत्याक्रमण केले.
शिवरायांच्या सैन्याचा त्रिशूळ आदिलशाही मुलुखात घुसला. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की अफजलखानाला मारल्या दिवशीच शिवरायांच्या मावळ्यांनी सुपे शिरवळ व सासवड परत मिळविले होते. म्हणजे प्रतापगडावर काहीही झाले तरी ह्या तीन जागा घेण्याचे आदेश आधीच सुटले होते व त्याहून महत्वाचे म्हणजे ते आदेश पाळले गेले होते.
अफजलखान वाईला आला तेव्हा प्रतापगड हा शिवरायांच्या राज्याच्या दक्षिण सीमेवर होता. तिथून ते पन्हाळगडाचा भाग शिवरायांनी अफजलवधानंतर केवळ १८ दिवसात मिळवला. हा पराक्रम अतुलनीयच म्हटला पाहिजे पण त्यापुढे जाऊन शिस्तबद्ध योजनेशिवाय अशक्य होता असेही म्हणावे लागेल.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९५४-९५८
महाराष्ट्रातील खराखुरा इतिहास's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १८०


सांभार : मराठा साम्राज्यकोश

नेताजीच्या वादळी हलचाली
कोल्हापूरच्या युद्धानंतर नेताजीने आदिलशाही भागात खोलवर छापे घातले. अनपेक्षित असलेल्या ह्या आक्रमणांने आदिलशाहीला स्तंभित केले. नेताजीला थांबवू शकणारा कुठलाही सरदार ते पुढे करु शकले नाहीत. नेताजीने कर्नाटकातील महत्वाची व्यापारी नगरे लुटली. जास्तीजास्त लूट कशी मिळवता येईल हे त्याच्या छाप्याचे मुख्य लक्ष्य होते. स्वराज्य प्राप्तीसाठी हा उपक्रमही अत्यंत महत्वाचा होता.
नेताजीने मिरज, सांगली, गोकक, गदग, दुदवाड, कुरुंदवाड, रायबाग, हुकेरी, अथणी, धारवाड व अशी छत्तीस नगरे लुटली. विजापुरापासून फक्त तीस किमीवर असलेले तिकोटा देखिल त्याने लुटून फस्त केले. अत्यंत वेगवान व कमी वेळात केलेल्या ह्या छाप्यात दक्षिणेत त्याने थेट लक्षमेश्वरपर्यंत धडक मारली.
त्याच्या हालचाली इतक्या वेगवान होत्या की आदिलशाही सैन्याला त्याचा पाठलाग करणे अवघड होते. तिकोट्यावरचा हल्लातर दख्खनमधील आदिलशाहीच्या अधिपत्यावर झालेला मोठ्या आघात होता. छाप्यानंतर नेताजी पुन्हा पन्हाळ्यावर शिवरायांना भेटायला गेला. त्याला फक्त तेरदळ परगण्यात थोडा प्रतिकार झाला. तिथे त्याला कृष्णगौडा देसाई पुढे माघार घ्यावी लागली.
ह्या महत्वाकाक्षी पण यशस्वी धाडींनी आदिलशाही भागात प्रचंड खळबळ माजविली. शिवाजी राजा हा आदिलशाहीच्या सामर्थ्यासमोर एका मोठ्या प्रश्नचिन्हासारखा उभा राहिला.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९५४-९५८
शिवभक्त विनोद जाधव's photo.
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १७९


सांभार : मराठा साम्राज्यकोश

दौलोजीची कोकणावर चाल
जेव्हा शिवाजी राजे प्रतापगड - वाई - सातारा - कोल्हापूर भागातल्या आदिलशाही चौक्या जिंकत होते तेव्हा त्यांचा सरदार दौलोजी तळ कोकणातून थेट राजापूर पर्यंत गेला होता असे इंग्रज व वलंदेज (Dutch) साधनांमधून दिसते. राजापूरच्या इंग्रजांच्या वखारीतून त्यांच्या सुरतेच्या वखारीला ९ डिसेंबर १६५९ ला लिहीलेल्या पत्रात हा उल्लेख सापडतो.
अफजलवधाच्या धक्क्यातून सावरायला वेळ मिळायच्या आत झालेल्या ह्या अकस्मिक हल्ल्याने आदिलशाहीचे सगळे अधिकारी व सरदार हदरले. इंग्रजांच्या पत्रावरुन हे स्पष्ट आहे की १० डिसेंबर पर्यंत दौलोजी राजापूरला पोहोचला नव्हता. दाभोळच्या बंदरात अफजलखानची तीन जहाजे उभी होती. ह्याची माहिती शिवाजी राजाला होती व त्यांनी दौलोजीला ती जप्त करायला सांगितले होते. पण दौलोजी तिथे पोहोचायच्या आत महमूद शरीफने ती तेथून हलवली व राजापूरला पिटाळली.
राजापूरला आदिलशाही अधिकारी अब्दुल करीम ह्याला ही जहाजे सुपूर्त करण्यात आली. जेव्हा त्याला रुस्तुमेजमानच्या २८ डिसेंबर १६५९ च्या पराभवाबद्दल कळले तेव्हा त्याने राजापूरहून पळ काढला. १२ जानेवारी १६६० ला शिवरायांनी पाचशे मावळे राजापूरला व आणखी दोनशे जैतापूरला पोहोचले.
अब्दुल करीम, महमूद शरीफ व इतर काहींनी जहाजांनी वेंगुर्ल्याला पळ काढला. जैतापूरला काही इंग्रजांनी शिवरायांच्या लोकांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यात फिलिप गिफ्फार्डला अटक झाली. १५ जानेवारी १६६० ला त्यांनी राजापूर सोडले व खारेपाटणला गेले. त्यांनी खारेपाटणच्या कोट घेतला व फिलिप गिफ्फार्डला त्यात बंदी बनविले.
५ मे १६६० च्या एका वलंदेजी पत्रात शिवरायांच्या चपळ हलचालींमुळे आदिलशाही अधिकाऱ्यांची उडालेली तारांबळ दिसून येते. शिवरायांनी कोकणात कुडाळपर्यंत सर्व भाग जिंकून घेतला असेही त्यात म्हटले आहे. ४ फेब्रुवारी १६६० ला दाभोळही शिवरायांकडे आले व १५ फेब्रुवारी १६६० च्या सुमारास कुडाळचा किल्लाही त्यांनी जिंकला.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९५४-९५८
राजा शिवछत्रपती, पृष्ठ २६७
शिवभक्त विनोद जाधव's photo.
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १७८


सांभार : मराठा साम्राज्यकोश

अफझलवधानंतर शिवरायांची वेगवान चाल
अफजलखानाला प्रतापगडावर मारल्यावर शिवरायांनी आदिलशाही भागात आक्रमण केले. ११ नोव्हेंबर १६५९ ला ते वाईला पोहोचले व नेताजीला भेटले . नेताजीला त्यांनी आदिलशाही भागात खोलवर जाऊन छापे घालण्यास सांगितले. नाईकजी पांढरे, नाईकजी खराटे, कल्याणजी जाधव व सिद्दी हिलाल हे आदिलशाहीतून फुटलेले सरदार त्याला मिळाले.
दख्खनच्या पठारावरुन दक्षिणेकडे जात त्यांनी वाटेतील आदिलशाही ठाणी जिंकून घेतली. चंदन-वंदन गडांना वेढा पडला. मग राजे खटाव, मायणी, अष्टी, मासूर, कऱ्हाड, सुपे, पाली, नेरले व अशी इतर गावे जिंकत कोल्हापूरला धडकले .
कोल्हापूरही सहजपणे जिंकून घेतले व राजे पन्हाळ्याकडे वळले . गडावर वेढ्याची काहीच तयारी केली नव्हती. बहुदा त्यांना शिवरायांच्या मृत्यूची किंवा फारतर तहाची अपेक्षा होती. अफजलखानचा मृत्यू व नंतरच्या शिवरायांच्या चालीने गडावरचे लोक गलितगात्र झाले.
केवळ दोन दिवसात पन्हाळगडासारखा मोठा गड शिवरायांनी जिंकून घेतला. शिवभारत सांगते की आतील सैन्याने तोफांनी, बाणांनी व छोट्या हत्यारांनी प्रतिकार केला. पण शिवरायांचे लोक तटापर्यंत पोहोचले व दोऱ्या लावून तटावरुन आत गेले. २८ नोव्हेंबर १६५९ ला शिवरायांनी पन्हाळगड घेतला. तेव्हा अफजलखानाच्या वधाला फक्त आठरा दिवस झाले होते.
इतक्या कमी वेळात शिवरायांनी प्रतापगडापासून पन्हाळगडापर्यंतची ठाणी जिंकून घेतली. इथे हेही सांगणे आवश्यक आहे की जेव्हा अफजलखानाने आक्रमण केले होते त्यावेळी प्रतापगड हा शिवरायांच्या मुलुखाच्या सीमेवर होता. आदिलशाही वावटळापासून त्यांना त्याच्या रयतेचे रक्षण करायचे होते हे त्यातून स्पष्ट होते.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९४३-९४७
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १७७


सांभार : मराठा साम्राज्यकोश

सुपे, शिरवळ व सासवड परत शिवरायांकडे
१० नोव्हेंबर १६५९ ला शिवरायांनी प्रतापगडावर अफजलखानाचा वध केला. त्याच दिवशी शिवरायांच्या मावळ्यांनी सुपे, शिरवळ व सासवड जिंकले. प्रतापगडापासून ह्या ठिकाणांचे अंतर पाहता ही आक्रमणे निर्धारित योजनेनुसार केली गेली होती व ती शिवाजीराजा -अफजलखान भेटीच्या परिणामावर अवलंबून नव्हती.
ह्या प्रकरणात शिवरायांनी आदिलशाही सैन्य व विशेषकरुन अफजलखानला ज्या प्रकारे भुलविले ते अभ्यास करण्याजोगे आहे. शिरवळ, सुपे व सासवड परत जिंकून घेणे ही निश्चितच आक्रमक चाल होती. भेटीच्या योजनेच्या सफलतेवर शिवरायांना किती दृढ विश्वास होता हे त्यातून दिसते. जरी अफजलखानला मारता आले नसते तरी ह्या तीन जागा घेतल्याने त्याला एक कणखर संदेश मिळाला असता.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९०६-९१२
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १७६


सांभार : मराठा साम्राज्यकोश

अफझलवधानंतर शिवरायांची चढाई
अफजलखानला मारण्याआधीच शिवरायांची पुढची मोहीम सुरू झाली होती. त्यांच्या हालचाली अतिशय नियोजनबद्ध व अचूक होत्या. आदिलशाही मोहीमेत गेलेली सर्व ठाणी त्यांनी परत मिळविली. इतकेच नव्हे तर नवीन आदिलशाही मुलूखही त्यांनी स्वतःच्या नियंत्रणाखाली आणला. शिरवळ, सासवड व सुपे ही ठाणी अफझलवधाच्या दुस-या दिवशीच शिवरायांच्या सैनिकांनी जिंकून घेतली. ह्या ठिकाणांची अंतरे बघता असे दिसते की प्रतापगडावर च्या निकालावर हे अवलंबून नव्हते. शिवाजी राजा , नेताजी व दौलोजी त्रिशूळासारखे तिन दिशांनी बाहेर पडले आणि आदिलशाही मुलूखात घुसले.
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १७५


सांभार : मराठा साम्राज्यकोश

आदिलशाही फौजा पन्हाळगडाजवळ पराभूत
शिवरायांनी पन्हाळगड जिंकला तोवर प्रतापगडावरुन पळालेले आदिलशाही सरदार विजापुरास पोहोचले. आदिलशाहने लगेच रुस्तुमेजमानला शिवरायांना रोखण्यासाठी पाठवले. विजापूर सोडल्यावर रुस्तुमेजमानला पन्हाळा पडल्याचे कळले.
रुस्तुमेजमानबद्दल कळल्यावर शिवाजी राजे पन्हाळ्याहून निघाले व २८ डिसेंबर १६५९ रोजी कोल्हापूरजवळ दोन्ही सैन्य समोरासमोर आली. जेधे शकावली सांगते की शिवरायांना ह्या युद्धात बारा हत्ती व दोन हजार घोडे मिळाले. आदिलशाही सैन्याला पळ काढून विजापुरास जावे लागले. दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दहा हजाराचे सैन्य असावे असे अनुमान आहे.
शिवरायांसाठी आदिलशाहीविरुद्ध खुल्या मैदानात झालेल्या युद्धात हा अत्यंत महत्वाचा विजय होता. ह्या विजयानंतर शिवरायांनी नेताजीला आदिलशाही भागात कर वसूल करायला धाडले व तो परत पन्हाळगडावर गेला.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९४९-९६०
शिवभक्त विनोद जाधव's photo.
शिवभक्त विनोद जाधव's photo.
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १७४


सांभार : मराठा साम्राज्यकोश

अफझलखानच्या मोहिमेचे सार
सैनिकी धोरण व युद्ध ह्याचे एक उत्तम उदाहरण म्हणून शिवाजी राजा व अफजलखान मधल्या लढाईकडे पाहता येईल. शिवरायांनी त्याला अनुरुप अशा भागात अफजलखानाला कसे ओढले हे त्यातून दिसून येते. शिवरायांना स्वतःच्या कमतरतांची जाणीव होतीच पण त्याबरोबर त्याच्या प्रतिस्पर्धीच्या उणीवांचीही चांगली माहिती होती. आदिलशाही फौजेला जावळीसारख्या धनदाट जंगलात घेऊन जाणे हा निव्वळ वेडेपणा होता.
अफजलखानने मे १६५९ मधे विजापूर सोडले व तो १० नोव्हेंबर १६५९ ला मारला गेला. म्हणजे तो पूर्ण पावसाळ्यात प्रवास करत वाईला पोहोचला आणि पावसाळ्यानंतर शिवरायांना भेटायला प्रतापगडाशी गेला. आजही महाबळेश्वरच्या भागातून वाईहून निघून प्रतापगड किंवा जावळी गाठणे महाकठीण जाते. इथले अरण्य इतके दाट आहे की वाट चुकणे किंवा जंगली श्वापदांचा उपद्रव होणे अगदी सहज शक्य आहे. त्यामुळे अफजलखानाला भुलविण्यात शिवाजी राजा किती सफल झाला होता हेच दिसते.
शिवरायांनी घाबरण्याचा आव आणून अफजलखानाला पूर्णपणे गाफिल ठेवले. ज्यावेळी अफजलखानाने प्रतापगडास जायचे ठरविले तेव्हाच ह्या युद्धाचे पारडे शिवरायांच्या बाजूने पूरते झुकले. आदिलशाही सैन्यालातर हे सगळ्या पळवाटा संपल्यासमानच होते.
जगातील इतर युद्धांप्रमाणेच ह्या युद्धात सैनिकांच्या मनोधैर्याने कलाटणी घडविली. मराठ्यांकडे अफजलखानापेक्षा कित्येक कमी लोक व दारूगोळा होता. पण त्यांच्याकडे अफजलखानाशी भिडायला तयार असलेला एक शूर व निर्धारी सेनापती होता. ह्या एका माणसाच्या उपस्थितीने मराठी सैन्याचे मनोधैर्य जणू प्रचंड उंचावले असावे. ह्यानंतर शिवरायांनी अफजलखानाला मारले ही बातमी वणव्यासारखी सगळ्या सैन्यात पसरली असावी. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी विखुरलेल्या व बेसावध अशा आदिलशाही सैन्याची वाताहत केली.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ८८३-८८५
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १७३


सांभार : मराठा साम्राज्यकोश

अफझलखानच्या वधानंतरचे युद्ध
अफजलखानाला मारल्यानंतर गडावरून ठरलेला इशारा केला गेला. झाडात लपलेले मराठी सैन्य बेसावध आदिलशाही सैन्यावर तुटून पडले. पळण्याचे सर्व मार्ग आधीच रोखले होते.
नारायण नावाच्या एका ब्राह्मणाकडे पाच हजार लोक दिले होते. ही पूर्ण फळी आदिलशाही सैन्यावर बरसली. कमळोजी साळुंखे, येसाजी कंक, तानाजी मालुसरे, कोंडाजी वडखले आणि रामजी पांगरे ह्यांनी प्रत्येकी एक हजार मावळांनी वेगवेगळ्या बाजूने आक्रमण केले. सेनापती नसलेल्या आदिलशाही सैन्याची दयनीय अवस्था झाली होती. माघार घेण्यासाठीही जागा उरली नव्हती.
मुसाखानने मराठ्यांच्या पहिल्या फळीचा हल्ला थोपवून धरला. हसनखान, याकुतखान, अंकुशखान व इतर काहींनी त्याला मदत केली. आदिलशाहीच्या घोडदळापुढे शिवाजीच्या पायदळाला त्या घनदाट अरण्याचा पुरेपूर फायदा होत होता. मुसाखानचा हा प्रयत्न मावळ्यांनी हाणून पाडला व त्याला माघार घेत अरण्यात जावे लागले.
आदिलशाही सैन्यात पूर्ण गोंधळ उडाला होता व त्यांची निर्णायक हार झाली. त्यांचे कित्येक लोक मारले गेले व सर्व युद्धसाहित्य-दारूगोळा वगैरे शिवरायांना मिळाले. शाहजीचा चुलतभाऊ मंबाजी भोसले हा आदिलशाहीकडून लढताना मारला गेला. अफजलखानाची दोन मुले, रणदुल्लाखान (दुसरा), अंबरखान, राजाजी घाटगे व इतर काही सरदार पकडले गेले.
मुसाखान, हसनखान, याकुतखान, अंकुशखान व अफजलखानचा थोरला मुलगा फजलखान कसेबसे त्या जंगलात लपून रातोरात वाईला पोहोचले. शिवाजीने नेताजी पालकरला त्याच वेळी वाईवर चालून जायला सांगितले होते पण तो वेळेत पोहोचू शकला नाही.
अफजलखानचे सैन्य जणू जावळीचा अरण्यात इतिहासजमा झाले. आदिलशाहीसाठी हा एक जणू विजेचा आघात होता. विजापुरास ही बातमी जायच्या आधीच शिवाजी राजे प्रतापगडाहून निघाले व वाईला पोहोचले . निर्णायक वेळी प्रतिस्पर्ध्यावर आघात करायची त्याची क्षमता अतुलनीय होती.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९३८-९४२
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १७२


सांभार : मराठा साम्राज्यकोश

शिवाजी राजा -अफझलखान भेट
भेटीचा दिवस ठरला - १० नोव्हेंबर १६५९. शिवभारतात ह्या घटनेचे तपशीलवार वर्णन मिळते. शिवरायांनी अंगरख्याखाली चिलखत, मंदिलाखाली शिरस्त्राण अशी आवश्यक ती सर्व सुरक्षा घेतली होती. कमरेला तलवार व दांडपट्टाही होताच. शिवाजी राजे भेटीच्या जागी पोहोचले तेव्हा अफजलखान तिथे आधीच पोहोचला होता.
जसा शिवाजी राजा शामियान्याजवळ गेला तसे अफजलखानने हात पुढे करत त्याचे स्वागत केले. शिवाजी राजे साधारण पाच फुट पाच इंच उंचीचा असल्याने त्या धिप्पाड अफजल समोर खुजा भासत होते . त्याने शिवरायांना सर्व चिंता सोडून आदिलशाहीत येण्याचे आमंत्रण दिले. भोळेपणाचा आव आणत स्वतःची तलवारही त्याने बाजूला ठेवली.
पुढे येत त्याने शिवरायांना आलिंगन दिले व एकदम त्याच्या डाव्या हाताने शिवरायांची मान दाबत त्यांना धरले. उजव्या हाताने खंजीर उपसून त्याने शिवरायांच्या शिवरायांनी चटकन वाघनखीने अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला.
शिवरायांच्या वाराने अफजल कळवळून ओरडला व झोकांड्या देत शामियान्यातून बाहेर पडला. तेवढ्यात अफजलखानाचा वकील कृष्णाजी भास्करने शिवाजीवर तलवारीने वार केला. शिवरायांनी तो परतवून लावला. काही साधनांमधे असे म्हटले आहे की कृष्णाजी ब्राह्मण असल्याने शिवरायांनी त्याला मारले नाही. काहीत असे म्हटले आहे की शिवरायांचा अंगरक्षक जीवा महाला ह्याने मधे पडून कृष्णाजीला मारले.
तोवर दोन्ही बाजूंचे अंगरक्षक तिथे आले. अफजलखानाच्या दहा बारा अंगरक्षकांना शिवरायांच्या लोकांनी यमसदनी धाडले. सैयद बंडानेही शिवाजीवर वार केला पण जीवा महालाने तो स्वतःवर घेतला आणि दंडपट्ट्याच्या दुसऱ्या घावात त्याला पाडले.
हा सर्व प्रकार बहुदा दहा बारा मिनीटात संपला असावा. शिवरायांनी त्याच्यापेक्षा कितीतरी बलाढ्या शत्रूला चतुरतेने व शेवटी शस्त्रबळाने पस्त केले. ह्या घटनेचे महत्व किती होते ते ब्रिटनमधल्या वर्तमानपत्रातील त्याच्या उल्लेखाने दिसून येते.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९०६-९१२
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १७१


सांभार : मराठा साम्राज्यकोश

अफझलखान भेटीची तयारी
उपलब्ध साधनांतून असे दिसते की शिवरायांचा अफजलखानच्या दुर्हेतूबद्दल जराही शंका नव्हती. त्यांनी स्वतःला व त्याच्या मावळ्यांना कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार केले होते. महत्वाची गोष्ट म्हणजे चुकून जर शिवाजी राजा मारला गेला तरी अफजलखानाला सोडायचे नाही असेच त्याच्या सरदारांना सांगितले होते.
तेव्हा अंतःस्ते विचार कान्होजी जेधे व सरकारकडून बैसोन राजश्री स्वामींनी विचार केला की मुसलमान बेभान आहे. बांदलांचा जमाव जाउलीस व पाराच्या रानात राहणे. कदाश्चित भेटीचे समई त्याणे बेईमानी केली तरी त्याचे लस्कर पारात आहे ते डोंगरास चढू न देणे आणि निवडक माणूस घेऊन आपली मदत करणे. कदाश्चित श्री अंबेच्या वरदे अफजलखान मृत्यू पावला तरी इशारतीचे आवाज गडावरी होतील तेव्हा पारावरी चालून घेऊन अगदी लस्कर बुडवणे. हैबतराऊ व बाळाजी नाईक सिलिंबकर जमावानिसी बोचेघोळीचे घाटी ठेविले आहेत. ते घाट लस्करास चढू देणार नाहीत. यैसा अंतःस्ते विचार जाला आणि बंदोबस्ती केली.
जेधे शकावली
अफजलखान जावळीत पोहोचल्यानंतर शिवरायांनी परतीचे ठरलेल्या मार्गांवर आपली माणसे जंगलात दडवून ठेवली. अफजलखानाच्या सैन्यापासून व हेरांपासून सावध राहण्याचे आदेश त्यांना दिले होते. बांदलांना त्यांची माणसे घेऊन पार गाव व जावळीजवळ पार घाट रोखून धरायला सांगितले होते. हैबतराव व बाळाजी नाईक सिलिमकरांना बोचेघोळीचा घाट आडवायला सांगितले होते. शिवरायांना काही अपाय होता आदिलशाही सैन्याला घाट चढून वर न जाऊ देणे असेच आदेश होते.
गडावरून तोफेचा इशारा होताच आदिलशाही सैन्यावर हल्ला करण्याचा आदेश होता. जावळीहून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या सर्व वाटा शिवरायांनी बंद केल्या होत्या. अफजलखानला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल काहीच कल्पना नसावी. तो शिवरायांच्या फासात अगदी बेसावधपणे फसला होता.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९०६-९१२
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १७०


सांभार : मराठा साम्राज्यकोश

अफझलखान जावळीस पोहोचतो
सध्याचा पाचगणी मार्गे जाणारा पसरणीचा घाट तेव्हा वापरत नसत. त्यावेळी आदिलशाही सैन्याने तायघाटातून वर येत महाबळेश्वर गाठले व रडतोंडीच्या घाटाने प्रतापगडाकडे वळले. हा सगळा परिसर आजही पूर्ण जंगलमय आहे त्यामुळे तेव्हा काय परिस्थिती असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. आदिलशाही सैन्याला त्यांच्या तोफा, हत्ती व सामान-सुमान नेताना अनंत हाल झाले असणार हे निश्चित.
अफजलखानाला त्या दिव्यातून जात शेवटी जावळीला पोहोचल्यावर निश्चितच आनंद झाला असेल. त्याने जावळीतून वाहणाऱ्या कोयनेच्या बाजूला तळ ठोकला. शिवरायांनी त्याच्याकडे वकील पाठवला व औपचारीक चौकशी केली. अफजलखाननेही त्याला प्रतिसाद दिला. बहुदा ह्या वेळेपर्यंत आपण न लढताच जावळी घेतली अशी त्याची समज झाली असावी.
मग शिवरायांनी आदिलशाहच्या सैन्यातील जवाहिऱ्यांना बोलावणे धाडले. त्यांच्याकडील दाग-दागीने विकत घेऊन अफजलखानाच्या सरदारांना नजराणे देण्यासाठी हा खटाटोप असावा असे समजून ते जवाहिर प्रतापगडावर गेले. शिवरायांनी त्यांना सगळा माल विकत घेण्याचे आश्वासन दिले व गडावरच त्यांची राहायची सोय केली.
त्या बिचाऱ्या जवाहिऱ्यांना स्वप्नातही जाणवले नसेल की ते घनदाट अरण्याने वेढलेल्या एका कडेकोट अशा गडावर बंदिस्त झाले होते. त्यानंतर भेटीचा दिवस व वेळ ठरली - १० नोव्हेंबर १६५९.
अफजलखान त्याच्या दोन-तीन अंगरक्षकांसमवेत भटीच्या जागी पोहोचेल असे ठरले. त्याचे दहा सैनिक भेटीच्या जागेपासून बाणाच्या अंतरावर थांबतील असेही ठरले. शिवरायांना तेच नियम होते फरक इतकाच की ते भेटीच्या जागी गडावरून खाली येणार होते .
उपलब्ध साधनातून असे दिसते की दख्खनमधल्या लहान-मोठ्या अशा सर्व लोकांचे लक्ष शिवाजी राजा - अफजलखाना युद्धाकडे होते.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९२१-९२७
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १६९


सांभार : मराठा साम्राज्यकोश

अफझलखानची मोहिम
अफजलखानाची मोहिम ही बहुदा शिवरायांच्या आयुष्यातली सगळ्यात प्रसिद्ध व बऱ्याच साधनांमधे दिलेली घटना असेल. दोन जुने पोवाडे, जेधे शकावली, शिवभारत, तारीख-ए-अली, अलीनामा व इतर काही तत्कालीन साधनांमधे ह्या घटनेचा तपशील किंवा उल्लेख सापडतो. अफजलखानाचा वध हा आदिलशाहीसाठी फार मोठा हादरा होता. ह्या घटनेनंतर शिवरायांच्या नावानेच त्याच्या शत्रुंमधे जरब बसली.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १६८


सांभार : मराठा साम्राज्यकोश

अफझलखान व शिवरायांचा पत्रव्यवहार
अफजलखान जेव्हा वाईला पोहोचला तेव्हा शिवाजी राजे प्रतापगडावर होते . वाईचा हवालदार कृष्णाजी भास्कर ह्याला अफजलखानचा वकील म्हणून नेमण्यात आले. शिवरायांच्या बाजूने गोपीनाथपंताने वकीलीचे काम केले. आदिलशाहीविरुद्ध त्याच्या कारवायांची आठवण करून देणारे पत्र अफजलखानने शिवरायांना लिहीले.
शिवरायांनी त्याला मनापासून क्षमायाचना करणारे उत्तर लिहीले. अफजलखान जर त्याला भेटायला प्रतापगडावर आला तर मिळविलेले सर्व भाग व किल्ले आदिलशाहीला सुपूर्त करण्याचे त्याने मान्य केले. अफजलखानाबद्दल नितांत आदर व्यक्त करत शिवरायांनी त्याच्या थोर पराक्रमांचे कौतुकही केले.
उपलब्ध साधनांतून असे दिसते की अफजलखानने शिवरायांना त्याने मिळवलेले भाग आदिलशाहीकडून जाहगीर म्हणून मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्याने शिवरायांना वाईला भेटायचा आदेशही दिला. शिवरायांनी अफजलखानला पुन्हा लिहीले की वाईला त्याला भेटण्याची भिती वाटत असल्याने अफजलखानने प्रतापगडावर येऊन त्याला भेटावे.
शिवरायांच्या कळकळीच्या विनंत्या व त्याने व्यक्त केलेली भिती ह्यामुळे शेवटी अफजलखानने जावळीस जाऊन शिवरायांची भेट घेण्याचे मान्य केले. त्याच्या काही सरदारांनी अफजलखानला ह्या आत्मघातकी निर्णयापासून परावृत करण्याचा प्रयत्नही केला. शिवरायांचा हेतु स्वच्छ असेल तर तो स्वतः वाईला येऊन अफजलखानची भेट का घेत नाही असे त्यांचे म्हणणे होते. त्याबरोबरच शिवाजी राजा जर अफजलखानाला जावळीत बोलावतो आहे तर त्यामागे त्याचा काहीतरी मोठा डाव असावा हे सुद्धा त्यांनी ताडले.
जावळीचा भाग दाट अरण्याचा होता व हत्ती-घोडे व तोफा घेऊन तिथून जाणे म्हणजे महामुश्किल होते. पण तरीही अफजलखानने त्याचा निर्णय बदलला नाही. त्याने काही हत्ती, घोडे व काही मुल्यवान वस्तू वाईलाच मागे ठेवायचे ठरविले.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९२१-९२७
शिवभक्त विनोद जाधव's photo.
शिवभक्त विनोद जाधव's photo.

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १६७


सांभार : मराठा साम्राज्यकोश

अफझलखान वाईत पोहोचतो
मे १६५९ मधे अफजलखानने वाजत-गाजत विजापूर सोडले. त्याने घेतलेली नेमकी वाट साधनांमधे उपलब्ध नाही. पण अज्ञानदासाचा एक पोवाडा सांगतो की त्याने तुळजापूरचे मंदिर पाडले. नकाशावर बघितल्यावर लक्षात येते की तुळजापूर काही विजापूर ते वाई ह्या वाटेवर येत नाही.
त्यामुळे त्याने कोणालातरी तुळजापूरला पाठवून ते मंदिर पाडले अशी शक्यता नाकारता येत नाही. दुसरी शक्यता अशी आहे की ही मोहीम सुरू होण्यापूर्वी कधीतरी त्याने हे मंदिर उध्वस्त केले. पण ह्यात शंका नाही की त्याच्या सांगण्यावरून तुळजापूरच्या मंदिराला इजा झाली होती.
त्यानंतर तो पंढरपूरास आला व विठ्ठल मंदिरावर गदा आणली. सभासद बखरीत, अज्ञानदासाच्या पोवाड्यात व शिवभारतात ह्याचा उल्लेख आहे. २० जानेवारी १६६८ च्या एका महजरातही ह्या घटनेचा उल्लेख मिळतो. अफजलखानने वाईकडे जाताना पंढरपूर मंदिराची नासधूस केली हे उघड आहे.
ही दोन्ही मंदिरे हिंदूंना वंद्य होती. तुळजापूरचे मंदिर तर शिवरायांच्या घराण्याचे आराध्यदैवत होते. शिवरायांना चिथवून मोकळ्या मैदानात आणायचा त्याचा हा डाव असावा. कारण कोणतेही असो, त्या निमित्ते त्याने महाराष्ट्राचा दोन आराध्य दैवतांवर हात उगारला हे खरे.
सन १६४९ पासून वाई परगणा अफजलखानकडे होता. शिवभारतातही अफजलखानने वाईला तळ का ठोकला ते दिले आहे. जेव्हा शिवरायांनी चंद्ररावकडून जावळी घेतली त्यावेळी त्याचा भाऊ प्रतापराव तेथून निसटला व आदिलशाहीत गेला. जावळीची चांगली माहिती असल्याने नंतर त्याला अफजलखानाबरोबर पाठविण्यात आले.
त्याने अफजलखानाला सावध करायच्या ऐवजी असे सांगितले की जर जावळी काबीज झाली तर शिवरायांचे इतर भाग सहज घेता येतील. वाई जावळीच्या जवळच असल्याने व तो भाग त्याच्याकडे असल्याने अफजलखानने तिथे तळ ठोकला. ह्यातून असे दिसते की प्रतापरावाला अफजलखानाच्या मोहीमेपेक्षा जावळी परत मिळविण्यामधे जास्त रस होता.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९०६-९१२
शिवभक्त विनोद जाधव's photo.
शिवभक्त विनोद जाधव's photo.