कोणतही शिवकाव्य येथे शोधा

धुळे जिल्हा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
धुळे जिल्हा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोनगिर किल्ला


उंची: १००० फूटप्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: गाळणा टेकडया
चढाईची श्रेणी: सोपी
जवळचे गाव: शहादा, शिरपूर, धोंधाई,
सोनगिर गावमध्ययुगीन काळात महत्त्व पावलेला सोनगीर किल्ला धुळ्याच्या उत्तरेला २० कि.मी. अंतरावर आहे. धुळे शहर हे खानदेशामध्ये असून ते मुंबई ते आग्रा तसेच नागपूर ते सूरत या महामार्गावर वसलेले आहे. धुळ्यामधून जाणारा आग्रा महामार्ग हा महामार्ग क्रमांक ३ म्हणूनही ओळखला जातो. या महामार्गावर सोनगीर गावालगतच सोनगीरचा किल्ला आहे.सोनगीर किल्ल्याचा माथा समुद्रसपाटीपासून ३०४ मीटर उंच आहे.इतिहासअतिशय मोक्याच्या जागी असलेला सोनगीर किल्ला कोणी नेमका बांधला याची इतिहासात नोंद नाही. इ.स. १३७० मध्ये हिंदू सरदाराकडून हा किल्ला महत्त्वाच्या आणि मोक्याच्या जागी असल्यामुळे फारुखी सुलतानांनी त्यावर आपली पकड कायम ठेवली. पुढे मोगल बादशहा अकबराने आपली सत्ता खानदेशात प्रस्थापीत केल्यावर सोनगीर त्यांच्या ताब्यात गेला. औरंगजेबानंतर हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात आला. इ.स. १८१८ मध्ये तो ब्रिटिशांनी जिंकून घेतला.इतिहासातील अनेक राजवटीचा आणि घटनांचा साक्षीदार असलेला सोनगीरचा किल्ला आज मात्र उपेक्षीत ठरला आहे.गडावरील पहाण्यासारखी ठिकाणेसोनगीर गावात विठ्ठल-रुक्मीनी मंदिर आहे.या मंदिराच्या दारामध्ये एक मोडकी तोफ बेवारस पडलेली आहे. मंदिराच्या बाजूलाच तीस फूट उंचीचा बालाजीचा लाकडी रथ ठेवलेला आहे. या लाकडी रथाचे नक्षीकाम पाहून आपण किल्ल्याकडे निघतो. किल्ल्याच्या पूर्व पायथ्याला घरांची लांबलचक रांग आहे. समोरच्या घरांच्या रांगांमध्ये मधून मधून मागे जाण्यासाठी बोळ ठेवलेल्या आहेत. त्यातील एखाद्या बोळातून घरांच्या मागच्या बाजूला आपल्याला पोहोचावे लागते. किल्ल्याचा पुर्वउतार या घरांपर्यंत येवून पोहोचलेला आहे. हा परिसर अतिशय अस्वच्छ आहे. आठ-दहा मीटर चढल्यावर आपल्याला किल्ल्याच्या डावीकडे जाणारी मळलेली वाट लागते. या वाटेच्या टोकावर सोनगीर किल्ल्याचा कसाबसा तग धरुन उभा असलेला एकमेव दरवाजा दिसतो. पायथ्यापासून या दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी पुरेसा आहे. दरवाजावर सध्या कसलेच नक्षीकाम किंवा शिल्पांकन नाही. येथे पुर्वी एक शिलालेख लावलेला होता असा उल्लेख आहे. या शिलालेखाचा दगड प्रवेशद्वारावरुन खाली निखळून पडला. २७ इंच लांब आणि ९ इंच रुंद असलेला या शिलालेखाचा दगड येथून उचलून धुळे येथील राजवाडे संशोधन मंडळात नेवून ठेवलेला आहे. त्यावर संस्कृत भाषेतील ओळी कोरलेल्या आहेत.दरवाजातून आत शिरल्यावर माथ्यावर जाणाऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या सुरवातीलाच दरवाजाला लागून एक कबर आहे. येथून पंधरा-वीस पायऱ्या चढून आपण गडमाथ्यावर पोहोचतो.सोनगीर किल्ल्याचा माथा समुद्रसपाटीपासून ३०४ मीटर उंच आहे. पायथ्यापासून आपण २० मिनिटांमध्ये माथा गाठू शकतो. सोनगीरचा किल्ला रुंदीला कमी असून तो लांबीने जास्त आहे. माथ्यावरील पठारावर आज उल्लेखनीय एकही वास्तू नाही. इ.स. १८५४ साली इंग्रजांनी या किल्ल्याची पहाणी केली होती. त्यावेळी गडावर थोड्या वास्तू असल्याची नोंद त्यांनी केलेली आहे.सोनगीरचा माथा दक्षिणोत्तर पसरलेला आहे. याची तटबंदी रचिव दगडाची आहे. ती तटबंदीही मधून मधून खाली ढासळलेली आहे. उत्तरेकडील तटबंदीवर असलेल्या बुरुजांचे तुरळक अवशेष आपल्याला पहायला मिळतात. जमिनीखाली हौदासारखी वास्तू बांधून त्यामध्ये तेल व तुप साठवित असल्याचे दिसते. या जागांना तेल टाके, तुप टाके असे म्हणतात. गडावर पाण्याची सोय व्हावी म्हणून एक मोठे पण खोल असे टाके खडकात कोरलेले आहे. पाणी पाझरु नये म्हणून ते चारही बाजूने गिलावा देऊन सुरक्षीत केलेले आहे. या विहीरीतून खाली गावातही पाणी पुरवठा होत असे.या विहीरीतून पाणी काढण्यासाठी अंबाडीच्या दोरासाठी साडेतीन रु. खर्च झाल्याची १८०६-०७ मधील एक नोंद जमाखर्चात आहे.
राहाण्याची सोय: गडावर राहण्याची सोय नाही
जेवणाची सोय: सोनगिर फाट्यावरील हॉटेल मध्ये जेवणाची सोय होऊ शकते
पाण्याची सोय: गडावर पिण्याचे पाणी नाहीsongir_fort

थाळनेर किल्ला


उंची: १०० मीटर
प्रकार: गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी: सोपी
जवळचे गाव: थाळनेर
धुळे जिल्ह्यातील थाळनेरचा किल्ला हा इतिहासप्रसिद्ध किल्ला असून तो धुळ्याच्या ईशान्य दिशेला आहे. तापी नदीच्या काठावर वसलेल्या थाळनेर गावालगतच थाळनेरचा किल्ला आहे.इतिहासथाळनेर बद्दल एक दंतकथाही प्रसिद्ध आहे. मलिकरवान हा लष्करी सेवेतील एक सैनिक होता. ता काही कारणाने या परिसरामध्ये आला असताना त्याने येथे एक विचित्र दृष्य पाहील. तो गावात पोहोचला असताना त्याला एक कुत्रा एका सश्याच्या मागे धावताना दिसला. कुत्रा सशाचा पाठलाग करीत असताना पुढे धावणारा ससा अचानक थांबला आणि त्याने कुत्र्यावर आक्रमण केले. सशाच्या या पावित्र्याने कुत्रा माघारी पळू लागला आणि ससा त्याचा पाठलाग करु लागला. असे अनोखे दृष्य पाहून मलिकखान एकदम चकीत झाला. त्याने विचार केला की ‘ज्या भूमीमध्ये ससा कुत्र्याला पळवू शकतो ती भूमी निश्चीतपणे शौर्याची भूमी असली पाहीजे.’ या भूमीमध्ये जर आपण वास्तव्य केले तर निश्चितच आपल्या हातून पराक्रम घडेल व आपल्याला उर्जितावस्था प्राप्त होईल. म्हणून मलिकखान याने तेथील वतनदाराला ही घटना सांगून तेथे रहाण्याची परवानगी मागितली. वतनदाराने या गोष्टीला नकार दिला. मलिकखान तडक दिल्लीला गेला. दिल्लीमध्ये त्यावेळी सुलतान घराण्याची सत्ता होती. फिरोजशहा तुघलग हा त्यावेळी सुलतान होता.या सुलतानाकडून मलिकखान याने थाळनेर व करवंद हे परगणे जहागीर म्हणून मिळवले आणि तो थाळनेरला परतला. थाळनेर ताब्यात घेवून त्याने फारुखी घराण्याची सत्ता तेथे स्थापित केली.इ.स. १३७० मध्ये फिरोजशहा तुघलक याने हा प्रदेश जिंकून घेतला आणि मलिकराजा फारुकी याला दक्षिण गुजरातची सुभेदारी बहाल केली. मलिकने थाळनेरला आपली राजधानी बनविली. पुढच्याच वर्षी गुजरातच्या सुलतानाने मलिकवर हल्ला करुन त्याचा प्रदेश हिसकावून घेतला, मलिक थाळनेरच्या आश्रयाला जाऊन राहीला. इ.स.१३९९ मध्ये मलिक मेल्यावर त्याने आपल्या दुसर्या मुलाला थाळनेरचा ताबा दिला. त्यामुळे चिडलेल्या पहिल्या मुलाने माळव्याच्या सुलतानाच्या मदतीने थाळनेरवर हल्ला करुन त्याचा ताबा घेतला.इ.स. १४९८ मध्ये गुजरातचा सुलतान मो. बेगाडा याने थाळनेर जिंकून आजूबाजूच्या प्रदेशात लुटालुट केली. १५११ मध्ये मो. बेगाडाने अर्धा खानदेश आपला वजिर मलिक हसनुद्दीन याला बहाल केला. पण पुढच्याच वर्षी त्याचा खुन झाला. गुजरातचा सुलतान चंगेज खानने इ.स. १५६६ मध्ये खानदेशचा राजा मिरान मुहम्मद खान याचा पराभव केला. इ.स. १६०० मध्ये थाळनेरचा ताबा अकबराकडे गेला, त्यावेळी सुरत – बुऱ्हाणपूर या व्यापारी मार्गावर असलेला हा किल्ला अतिशय मजबूत व संपन्न होता. १७५० मध्ये थाळनेरचा ताबा पेशव्यांकडे गेल्यावर त्यांनी तो होळकरांना दिला. १८०० मध्ये होळकरांनी तो निंबाळकरांना दिला, पण पुढच्याच वर्षी परत आपल्या ताब्यात घेतला.इ.स. १८१८ मध्ये ब्रिटीश जनरल सर थॉमस हिसॉप जेव्हा थाळनेरचा किल्ला घेण्यासाठी गेला, त्यावेळी खानदेशच्या इतिहासातील सर्वात रक्तरंजित प्रतिकार त्याला इथे झाला. यात मराठ्यांचे २५० लोक तर इंग्रजांचे २५ जण ठार झाले.पहाण्याची ठिकाणेतापी नदी थाळनेर गावाजवळ नालेच्या यु (U) आकाराचे वळण घेते. तेथे असलेल्या १०० मीटर उंच टेकडीवर थाळनेरचा किल्ला वसलेला आहे. आज दुदैवाने किल्ल्याची पाताळेश्वर मंदीराच्या बाजूची ६० फूट उंच भाजलेल्या विटांमध्ये बांधलेली भिंत व २ बुरुज उभे आहेत. बाकी सर्व बाजूच्या भिंती व बुरुज नष्ट झालेले आहेत. किल्ल्यावर दोन छोट्या देवळ्या आहेत. एकात सप्तशृंगी देवीची अलिकडची मुर्ती आहे व दुसरे देऊळ रिकामे आहे.किल्ल्यात फारसे काही बघण्यासारखे नसले तरी गावात दोन ठिकाणे पहाण्यासारखी आहेत.
जमादार वाडा: गावातून पाताळेश्वर शंकर मंदीराकडे जाताना एक गढी आपले लक्ष वेधून घेते. त्याला स्थानिक लोक ‘‘जमादार वाडा’’ म्हणतात. या गढीत आजमितीला अनेक कुटुंब रहातात. वाड्याच्या ४ टोकांना विटांनी बांधलेले १२ फुटी बुरुज आहेत. प्रवेशद्वार २० फुट उंच असून त्यावर अणकुचीदार खिळे बसविलेले आहेत. वाड्याचे प्रवेशद्वार, त्यावरील सज्जा लाकडी असून त्यावर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. वाड्याच्या आतील भागातील घरांच्या दारा खिडक्यावरही सुंदर नक्षीकाम आहे. घरातील साध्या खुंट्या, कोनाडे यांच्यावरचे नक्षीकाम गढी बांधणार्यांच्या रसिकतेची कल्पना देते. गढीला तळघर व त्यात उतरण्यासाठी जिना आहे. या दोन मजली गढीत सध्या अनेक कुटुंबे रहातात ते आस्थेने गढी दाखवतात, पण त्याच्या इतिहासाबद्दल व पूर्वजांच्या कर्तृत्वाबद्दल ते अनभिज्ञ आहेत. गढीच्या प्रवेशद्वाराशेजारी रामसिंग व गुमान सिंग ही नावे लिहीलेली दिसतात.१०
कबरी: थाळनेरवर राज्य करणार्या फारुकी घराण्यातील राजांच्या व महत्त्वाच्या व्यक्तींच्या कबरी थाळनेर गावात आहेत. त्यातील एक मोठी कबर अष्टकोनी असून त्यावर अरेबिक भाषेतील शिलालेख आहे. बाकीच्या कबरी साधारण एकाच मापाच्या (११ फूट x ११ फूट) व आकाराच्या आहेत. त्या कबरीपैकी चार ज्ञात राजांच्या कबरी पुढीलप्रमाणे,१) मलिक राजा (१३९६)२) मलिक नसिर (१४३७)३) मिरान अदील शहा (१४४१)४) मिरान मुबारक खान (१४५७)पोहोचण्याच्या वाटाथाळनेर गाव धुळे शहरापासून ईशान्य दिशेला ४८ किमी वर आहे.
राहाण्याची सोय: गडावर किंवा गावात राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय: गडावर किंवा गावात राहण्याची सोय नाही.
पाण्याची सोय: गडावर पाण्याची सोय नाही.
सूचना:धुळ्याहून सकाळी लवकर निघून २१ किमी वरील सोनगिर, २७ किमी वरील थाळनेर पाहून धुळ्याला परत येता येते. अथवा तसेच पुढे जाऊन (४० किमी) वरील अंमळनेर, (२० किमी) पारोळा, (८ किमी) बहादरपूर हे किल्ले पाहून धुळ्याला परत येता येते.thalner_fort

रायकोट किल्ला


किल्ल्याची ऊंची: १६४० फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
श्रेणी: मध्यम
सुरत – बुर्हाणपूर या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी कोंडाईबारी घाटात रायकोट किल्ला बांधण्यात आला. तीन बाजूंनी तासलेले कडे व रायकोट गावाच्या बाजूने असलेला नैसर्गिक खंदक यामुळे रायकोटचा किल्ला नैसर्गिकरित्याच बळकट व अभेद्य आहे.इतिहासरायकोट हा छोटेखानी किल्ला मुख्यत: व्यापारी मार्गावर टेहाळणी करण्यासाठी बांधण्यात आला होता. अहिर राजांनी हा किल्ला बांधला. या किल्ल्याचा आकार व घेर पाहाता यावर फारशी शिबंदी नसावी. या किल्ल्याचा इतिहास उपलब्ध नाही.पहाण्याची ठिकाणेरायकोट गावातून किल्ल्यावर जाताना दोन डोंगरामध्ये तयार झालेल्या नैसर्गिक खंदकांच्यावर तटबंदीचे अवशेष दिसतात. किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते, त्यामुळे अनेक अवशेष नष्ट झालेले आहेत. किल्ल्याच्या पठारावर एक बुरुज व तलाव पहायला मिळतो. किल्ल्याच्या तीन बाजूंना खोल दर्या व तासलेले उभे कडे आहेत. या दरीला माकडदरी म्हणतात.मोरकरंज गावातून किल्ल्यावर जाणार्या वाटेवर दगडात खोदून काढलेल्या पायर्या आहेत. पायर्यांजवळच १० फूट * २० फूट आकाराची गुहा आहे, पण ती रहाण्यास योग्य नाही. गडावरुन माकडदरीचे अप्रतिम दृश्य दिसते.पोहोचण्याच्या वाटाधुळे – सुरत रस्त्यावर कोंडाईबारी घाट आहे. धुळ्याहून सूरतला जाताना घाटाच्या सुरुवातीला कोंडाईबारी गाव लागते, तर घाटाच्या शेवटी मोरकरंज गाव लागते. या दोन्ही गावातून रायकोटला जाता येते.कोंडाईबारी मार्गे धुळे – सुरत रस्त्यावर धुळ्यापासून ७० किमी अंतरावर कोंडाईबारी गाव आहे. या गावातून नंदूरबारला जाणार्या रस्त्याने ३ किमी गेल्यावर डाव्या हाताला रायकोटला जाणारा फाटा लागतो. तेथून (४ किमी) – नवागाव (२ किमी) – लगडवाड (२ किमी) – रायकोट या मार्गे आपण रायकोट गावात पोहोचतो. गावाबाहेरील हनुमान मंदीराच्या बाजूने कच्चा रस्ता जातो. या रस्त्याने जीप सारखे वहान जाऊ शकते. रस्ता जिथे संपतो, तिथे पायवाट सुरु होते. ही पायवाट आपल्याला दोन डोंगरांमध्ये असलेल्या नैसर्गिक खंदकात घेऊन जाते. हा खंदक चढून गेल्यावर आपण किल्ल्यात प्रवेश करतो. या पूर्ण वाटचालीत आपण किल्ल्याच्याच उंचीवर असल्यामुळे, ट्रेक अतिशय सोपा आहे.मोरकरंज मार्गे मोरकरंज गावातून माकडदरीमार्गे पायवाट व पुढे किल्ल्याच्या वरच्या बाजूस असलेल्या दगडातून खोदून काढलेल्या पायर्या चढून किल्ल्यावर प्रवेश करावा लागतो. या वाटचालीत आपण पायथ्यापासून किल्ला चढून जातो.
राहाण्याची सोय: गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय: गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय: गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ:रायकोट गावातून १ तास लागतो. मोरकरंज गावातून २ तास लागतात.
सूचना : पावसाळ्यानंतर लगेच आल्यास रायकोट गावाच्या माळावर व किल्ल्यात असंख्य फुलपाखरे पहायला मिळतात. तसेच कोंडाईबारी ते रायकोटच्या प्रवासात निसर्गाची विविध रुप दृष्टीस पडतात. धुळ्याहून भामेर व रायकोट हे किल्ले एका दिवसात पाहाता येतात.raykot_fort

भामेर / भामगिरी किल्ला


किल्ल्याची ऊंची: २५०० फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: साक्री, धुळे
श्रेणी: मध्यम
जिल्हा: धुळे
धुळे जिल्ह्यात असणार्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात सुंदर किल्ला म्हणजे भामगिरी अथवा भामेर. एकेकाळी अहीर राजांची राजधानी असलेला हा किल्ला, भामेर गावाभोवती नालेच्या आकारात (U) पसरलेला आहे. या किल्ल्याने गावाला ३ बाजूंनी कवेत घेतल्यामुळे गावाला नैसर्गिक संरक्षण लाभलेल आहे. उरलेल्या चौथ्या बाजूला तटबंदी व प्रवेशद्वार बांधून, त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी गावाला पूर्ण संरक्षित केले आहे. असा हा नितांत सुंदर किल्ला (आणि गाव) प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच पाहिजे असा आहे. बैल पोळ्याच्या दुसर्या दिवशी गडावर यात्रा भरते.इतिहासभामेर गावाचा इतिहास अतिप्राचीन आहे. प्राचिन काळी येथे भद्रवती नगर होते, तेथे युवनाश्व नावाचा राजा राज्य करीत होता. त्याची मुलगी भद्रावती हिच्या नावाचा अपभ्रंश म्हणजे ‘भामेर’ होय.प्राचीनकाळी सुरत – बुर्हाणपूर मार्गावरील वैभवशाली व संपन्न शहर म्हणून भामेर ओळखले जाइ. नाशिकला जाणारा व्यापारी मार्गही या शहरावरुन जात असे.अहिर घराण्याच्या ताब्यात हा किल्ला काही काळ होता. किल्ल्यावरील १८४ लेणी (गुंफा) याच काळात खोदल्या गेल्या असाव्या. आजही स्थानिक लोक या गुफांना अहिर राजाची घरे म्हणून ओळखतात.पहाण्याची ठिकाणेआपण धुळे – सुरत रस्त्यावरुन जसजसे भामेर कडे येऊ लागतो, तसतसे आपल्याला भामेर किल्ल्याच्या ३ डोंगरापैकी एका डोंगरावर एकाच ठराविक उंचीवर कोरलेली लेणी दिसायला लागतात. या डोंगरांना वळसा घालून आपण भामेर गावात प्रवेश करतो, आपल्या डाव्या बाजूस २० फूट उंच प्रवेशद्वार आपले स्वागत करते या प्रवेशद्वाराच्या खांबावर नक्षी कोरलेली आहे. प्रवेशद्वाराच्या बाजूला विहीर आहे विहीरीचे पाणी पोहर्याने काढून चरांमधून हौदात खेळवलेले आहे. त्याकाळी या हौदातील पाण्याचा उपयोग वाटसरुंची तहान भागवण्याकरीता होत असावा. आजही ही व्यवस्था कार्यान्वयित आहे गावातील माणसे हौद भरतात, पण आज हे पाणी गावातील गुरे पिण्यासाठी वापरतात.प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या हाताला ४ फूट उंच दगडी जोत्यावर अखंड दगडात घडवलेले १२ फूटी गोल खांब उभे असलेले दिसतात. पेशव्यांच्या काळात या ठिकाणी त्यांचे कार्यालय होते. गावातून फिरताना ठिकठिकाणी, घरांच्या पायथ्यात, भिंतीत पुरातन कलाकुसर केलेल्या दगडी खांबांचे अवशेष दृष्टीस पडतात. गावातील नंदी गल्लीत २.५ फूटी नंदीची तुकतुकीत दगडाची मुर्ती रस्त्यावर उघड्या आभाळाखाली पडलेली आहे. त्यांच्या जवळ दोन ६ फूटी कोरीव काम केलेले खांब व काही मुर्त्या पडल्या आहेत. या खांबांचा जाता येता त्रास होतो म्हणून गावकर्यांनी हे खांब मातीची भर घालून पुरले आहेत. नंदीला सुध्दा रस्त्यातून हटवण्याचा त्यांचा विचार आहे, पण मुर्ती जड असल्यामुळे ते अजून शक्य झालेले नाही.गाव पार केल्यावर गावामागील ३ डोंगरांच्या आपण समोर येतो. यातील उजव्या हाताच्या डोंगरावर एक छोटी पांढरी मस्जिद आहे. समोरच्या डोंगरावर कोरीव लेणी किंवा गुंफा आहेत, तर डाव्या होताच्या डोंगरावर भामेर गडाचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याच्या खाली डोंगरात एक मानवनिर्मित मोठी खाच आहे, ती गावातूनही दिसते पण तीचे प्रयोजन त्याजागी गेल्यावरच कळते आणि आपण थक्क होतो.गावामागून उजव्या हाताला असलेल्या डोंगरावर एक मळलेली पायवाट दिसते, त्या वाटेने १० मिनीटात आपण भग्न प्रवेशद्वारापाशी येतो. येथे काटकोनात २ प्रवेशद्वारे असून त्या बाजूचा बुरुज कसाबसा तग धरुन उभा आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर उजव्या हाताला मस्जिदीचा डोंगर, समोर गुंफांचा डोंगर व डाव्या हाताला बालेकिल्ल्याचा डोंगर दिसतो. प्रथम उजव्या हाताच्या डोंगरावर चढून गेल्यावर आपल्याला प्रवेशद्वाराच्या स्थानाचे महत्त्व कळते या किल्ल्यात प्रवेशद्वार अशा ठिकाणी बांधले आहे की, प्रवेशद्वाराकडे येणारा शत्रू बालेकिल्ल्यातून व उजव्या बाजूच्या डोंगरावरुन सहज टप्प्यात येइल. त्याला कुठलाही आडोसा मिळणार नाही. उजव्या हाताच्या डोंगरावर छोटासा दगडांचा टप्पा आहे. तो चढून गेल्यावर आपण मशिदीपाशी पोहचतो. तिथून खाली उतरुन परत प्रवेशद्वारापाशी येऊन मग छोटेसे मैदान / पठार पार करुन आपण लेण्यांच्या डोंगरापाशी येतो. या डोंगराला सर्व बाजूंनी एकाला एक लागुन लेणी खोदलेली आहेत. एकूण १८४ लेण्यांपैकी १० लेणीच आपल्याला पाहता येतात १० x १० फूट ते २५ x १० फूट अशी लांबी रुंदी असलेली लेणी प्राथमिक अवस्थेतील आहेत. त्यात कोरीव काम, खांब अथवा मुर्त्या नाहीत. १० लेण्यांपुढील कडा कोसळल्यामुळे पुढील लेणी पाहता येत नाही. गव्हर्नमेंट गॅझिटीयर प्रमाणे डोंगराच्या मागील बाजूस असलेल्या लेण्यांमध्ये जैन मुर्त्या आहेत लेण्यांमध्ये पाणी व गाळ साठलेला आहे.लेण्या पाहून झाल्यावर आपण खडकात खोदलेल्या पायर्यांनी डाव्या हाताच्या डोंगरावर चढाइ सुरु करायची. या चढाइ दरम्यान किल्ल्याचे प्रवेशद्वार आपल्याला सतत खालच्या अंगाला दिसत रहाते पायर्या संपल्यावर पहिल्या टप्प्यावर परत काही गुंफा आहेत. तिथून थोडे वर चढून गेल्यावर ३ कोरीव गुंफा लागतात. या गुंफांच्या दाराच्या पट्टीवर मधोमध गणपतीची मुर्ती कोरलेली आहे. गुफांच्या दारावर नक्षी काढलेली आहे, तसेच भालदार चोपदार स्त्री पुरुषांच्या मुर्ती व बदकांच्या जोडी सुध्दा दरवाजावर कोरलेली आहे. गुफां २४ चौ मीटर असून चार दगडी खांबांवर त्याचे छत तोललेले आहे. गुंफांना दगडात कोरलेल्या खिडक्या आहेत. शेवटच्या गुंफेच्या पलिकडे ६ मी x ६ मी व २० फूट खोल गुंफा आहे. याचे तोंड कोरीव गुंफांच्या वरच्या बाजूला आहे. या कोरीव गुंफांचा वापर कचेरीसाठी केला जात होता.गुंफांपासून वर चढत गेल्यावर आपल्याला समोर बुरुज व त्यामागे किल्ल्याचे सर्वोच्च टोक दिसते, तर उजव्या हाताला दगडात खोदलेली प्रचंड खाच, जी आपल्याला पायथ्यापासून दिसत असते. शत्रूला फसविण्यासाठी ही मानव निर्मित खाच दगडात बनविण्यात आली आहे. १५ फूट x ३० फूट खाचेच्या दोन्हीं बाजूंना उंचावर बुरुज आहेत तर समोरच्या बाजूला खोल दरी ही खाच किल्ल्याच्या पायथ्यापासून दिसत असल्यामुळे तिथेच बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार आहे असा शत्रूचा गैरसमज होत असे, अरुंद पायर्यांवरुन शत्रु ह्या खाचेत आल्यावर दोन्ही बुरुजांवरुन त्यांच्यावर मारा करणे सहज शक्य होते. समोरच्या बाजूला खोल दरी व मागिल बाजूस असलेल्या अरुंद पायर्यांमुळे शत्रुची कोंडी होत असे, त्याच्या हालचालींवर मर्यादा येत असे. तसेच शत्रुने बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यास बुरुजावरुन दोर टाकून या खाचेत उतरुन पोबारा करणे सहज शक्य होते.दगडाचा थोडासा टप्पा चढून गेल्यावर आपण खाचेच्या बाजूवरील डोंगरात पोहचतो इथून आजूबाजूच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य दिसते. खाचेतून उतरुन बालेकिल्ल्याकडे चढत गेल्यावर आपल्याला बुरुज व तटबंदीचे अवशेष दिसतात. तिथून पुढे गेल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाक लागते. भामेर किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर जाण्यासाठी पुन्हा एक दगडी टप्पा चढावा लागतो. वर ३० फूट रुंद व लांबवर पसरलेले पठार आहे. या पठारावर एक छोटे मंदिर व त्याच्या बाजूला २० x २० फूटी पिण्याच्या पाण्याचे टाक आहे. या ठिकाणी आल्यावर आपला संपूर्ण किल्ला पाहून होतो. भामेर किल्ल्यावरुन पूर्वेकडे दोन जोड शिखरे दिसतात. ती राव्या – जाव्या या नावाने प्रसिध्द आहेत. त्याबद्दल दंतकथाही या भागात सांगितली जातेपोहोचण्याच्या वाटाभामेर किल्ला, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात येतो. धुळे – सुरत महामार्गावर धुळ्यापासून ४८ किमी अंतरावर व साक्रीच्या अलिकडे ३ किमी अंतरावर नंदूरबारला जाणारा फाटा लागतो. या फाट्यावरुन ७ किमी अंतरावर भामेर गाव आहे
राहाण्याची सोय: गडावर असलेल्या खाचेत १० जणांची उघड्यावर झोपण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय: गडावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत: करावी .पाण्याची सोय: गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ: संपूर्ण गड व गावातील महत्त्वाची ठिकाणे पहाण्यासाठी ४ तास लागतात.
सूचना : गड पश्चिमाभिमुख असल्यामुळे सकाळी लवकर गड चढण्यास सुरुवात करावी म्हणजे गड चढताना ऊन लागत नाही. गड पाहून झाल्यावर गावातील प्रेक्षणीय ठिकाणे पहावीत. बलसाणे लेणी ही जैन लेणी साक्री – नंदूरबार रस्त्यावर भामेरपासून २० किमीवर आहेत. भामेर व रायकोट हे किल्ले एका दिवसात पाहून होतात.bhamer_fort