कोणतही शिवकाव्य येथे शोधा

अकोला जिल्हा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अकोला जिल्हा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

वारी भैरवगड


वारी भैरवगड तेल्हारा तालुका अकोला जिल्ह्याच्या उत्तर – पूर्वेस आहे. तेल्हारा तालुक्याचे सर्वात उत्तर-पूर्वेचं टोक म्हणजे वारी भैरवगड स्थान.
येथे वान या पूर्णा नदीच्या दक्षिण वाहिनी वान नावाच्या उपनदीवर धरण बांधण्यात आले आहे. या धरणामुळे तेल्हारा, अकोट आणि बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव व संग्रामपूर तालुक्यांतील शेतीस जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत.
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले वारी हे तसे फार पुरातन ठिकाण. येथे हनुमान मंदिर आहे. या मारुतीची स्थापना रामदास स्वामींनी केल्याचे बोलले जाते.वान व वानची उपनदी यांच्या संगमावर उंचावर पर्वतपायथ्याशी मंदिर आहे. मंदिराचे व्यवस्थापन शिस्तबद्ध असल्यामुळे मंदिर व मंदिर परिसर स्वच्छ असतो. मंदिरात मारोतीची १५ फुटी उभी मूर्ती आहे. अत्यंत सुंदर आणि विलोभनीय मूर्तीच्या पायाशी राक्षस असून हातावर द्रोणागीरी पर्वत आहे. या ठिकाणी हनुमान जयंती ला विशेष यात्रा असते. तसेच सोमवती अमावास्येला येथील संगमावर स्नान करून मारुतीचे दर्शन करायला भाविक येतात.
येथेच जवळ भैरवगड नावची अत्यंत जिर्णावस्थेतील गढीवजा इमारत आहे. या जागी पूर्वी गोंड राजांचा किल्ला असल्याचं बोललं जातं. आणि तो किल्ला नरनाळ्याचा उपविभाग म्हणून कार्यरत असल्याचं सांगतात. या किल्ल्याच्या बाबतीत अनेक जन आख्यायिका प्रसिद्ध आहेत.
एका दिवसाच्या सहलीसाठी उत्तम असे हे ठिकाण असून, तेल्हाऱ्याला नोंद करून परवानगी घेतल्यास तुम्ही वान प्रकल्प सुद्धा पाहू शकता. वान धरणाच्या भिंतीवर उभे राहून, दोन डोंगराच्या मधे पसरलेला तो विस्तीर्ण जलाशय पाहताना मन थक्क होतं. येथे लवकरच छोटा जलविद्युत प्रकल्प होण्याचं प्रस्तावित आहे.
पोहोचाण्यासाठीचे अंतर
तेल्हाऱ्यापासून ३० किमी, अकोट पासून ३५ किमी, अकोल्यापासून ७५ किमी.
varibhairavgad

बाळापूर किल्ला


बाळापूर किल्ला विदर्भातील अकोला जिल्ह्यात असून या जिल्ह्यामध्ये बाळापूर हे तालुक्याचे ठिकाण आहे. मान आणि महीषी या नद्यांच्या संगमावर बाळापूर वसलेले आहे. जळगाव ते अकोला या राष्ट्रीय महामार्गावर बाळापूर असून ते बुलढाणा तसेच वाशिम या जिल्ह्यांच्या ठिकाणांना गाडीमार्गाने जोडलेले आहे.
मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर असलेल्या छोट्याश्या उंचवट्यावर बाळापूरचा प्रसिद्ध किल्ला बांधलेला आहे. बाळापूरच्या किल्ल्याला दुहेरी बांधणीची भक्कम तटबंदी आहे. या तटबंदीला जागोजाग बलदंड बुरुज बांधून संरक्षणाची सिद्धता केलेली आहे.
बाळापूर किल्ल्याचा प्रवेशमार्ग उत्तरेकडून आहे. या प्रवेशमार्गावर तीन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा चौरस अशा भक्कम बुरुजामध्ये आहे. या उत्तराभिमुख दरवाजातून आत गेल्यावर दुसरा दरवाजा असून तो पश्चिमेकडे तोंड करून आहे. याचे लाकडी दरवाजे अजूनही पहायला मिळतात. दारावरच्या कमानीवर महीरप आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूला तटबंदी असून समोर उत्तराभिमुख तिसरा दरवाजा आहे. यालाही महीरप केलेले आहे.
या तिसर्या दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्यामध्ये आपला प्रवेश होतो. आतल्या इमारती जुन्या असून त्यांची जुजबी दुरुस्ती करून त्यामध्ये सध्या काही सरकारी कार्यालये केलेली आहेत.
तटबंदीवर चढण्यासाठी जागोजाग पायऱ्या केलेल्या दिसतात. या पायऱ्यांवरुन चढून प्रशस्त रुंदीच्या तटावर पोहोचता येते. तटावरुन किल्ल्याला फेरी मारता येते. या तटबंदीवरुन बाहेरील तटबंदीचेही दर्शन होते. बलदंड बुरुजांनी वेढलेली तटबंदी किल्ल्याच्या बेलागपणाची जाणीव करून देतात.
गडावरील ठिकाणे
प्रवेशमार्गावर तीन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा चौरस अशा भक्कम बुरुजामध्ये आहे. या उत्तराभिमुख दरवाजातून आत गेल्यावर दुसरा दरवाजा असून तो पश्चिमेकडे तोंड करून आहे. याचे लाकडी दरवाजे अजूनही पहायला मिळतात. दारावरच्या कमानीवर महीरप आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूला तटबंदी असून समोर उत्तराभिमुख तिसरा दरवाजा आहे बाळापूर गावाच्या दक्षिणेकडे नदीकाठावर मोगली सरदार मिर्झाराजे जयसिंग यांनी बांधलेली छत्री आहे. बाळापूरच्या किल्ल्याच्या भ्रमंतीमध्ये ही छत्रीही आवर्जुन पहावी अशीच आहे.
मुख्य जागा
आजूबाजूच्या सपाट प्रदेशामुळे तसेच लहानश्या उंचवट्यावर बांधलेल्या किल्ल्यामुळे दूरपर्यंतच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे सोपे जाते. पावसाळ्यात किल्ल्याच्या तिन्ही बाजुंनी नद्यांच्या पाण्याचा विळखा पडतो. २००० साली नद्यांना आलेल्या महापुरात तटबंदीचा काही भाग ढासळला आहे.balapur

नरनाळा अकोट


उंची: ३१६१ फूट
प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: सातपुडा
चढाईची श्रेणी: सोपी
जवळचे गाव: शहानुर,अकोट
जिल्हा: अकोला
अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण २४ कि.मी. वर सातपुड्याच्या उंच डोंगरावर तो पसरलेला आहे.अकोल्यापासून याचे अंतर ६६ कि.मी. आहे. गडाच्या खाली शहानुर नावाचे गाव आहे. गडाच्या पायथ्यापासून मेळघाट व्याघ्रप्रकल्प सुरू होतो. पायथ्या पासुन गडावर जाण्याकरिता आता गाडीवाट आहे. तरीही कित्येक दुर्गप्रेमी पायीच गड चढणे पसंत करतात. पायथ्याशी वन विभागाच्या चौकीवर जाता येता नोंद करावी लागते, गडावर मुक्कामास परवानगी नाही.
भौगोलिक माहिती
गड ३१६१ फुट उंच आहे. गडाचा विस्तार हा ३८२ एकर असून गडाच्या कोटाची (तटबंदी) लांबी २४ मैल आहे. एकूण दोन लहान व एक मोठा असा मोठा पसारा असणारा हा बहुदा महाराष्ट्रातील सर्वात विर्स्तीण गिरीदुर्ग असावा. मुख्य गड नरनाळा या नावाने ओळखल्या जात असून तेलीयागड आणि जाफराबाद नावाचे दोन उपदुर्ग पूर्व-पश्चिमेला आहेत.
गडाच्या प्रवेशाला ५ दरवाजे लागतात त्यांवरून या गडाच्या सुरक्षा व्यवस्थेची कल्पना यावी. सर्वात आधी शहानुर दरवाजा, मग मोंढा दरवाजा, त्यानंतर अत्यंत सुरेख कलाकुसर असलेला महाकाली दरवाजा, असे करीत आपण गडावर पोहचतो. गडाच्या मध्यावर सक्कर तलाव नावाचा विर्स्तीण जलाशय आहे. याला बारमाही पाणी असते. हा तलाव याच्या औषधी गुणांकरिता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कुणाला कुत्रा चावल्यास त्याने या तलावात स्नान करून येथील दर्ग्यावर गुळफुटाने वाहावे व तडक गड उतरावा. तसेच गड उतरताना मागे वळून पाहू नये, असे मानतात.
पाहण्यासारखी ठिकाणे
गडावर आजही राणी महाल व बाजूची मस्जिद अस्तित्वात आहे. त्या समोरचा सभामंडप आता नसला तरी त्याचे स्तंभ त्याच्या विस्ताराचे भान करून देतात. सरळ पुढे गेल्यास तेला- तूपाचे टाके लागतात. खोल टाक्या असून त्यात विभागणी केलेली आहे; आणि त्यांना युद्धकाळात तेल-तूप साठवण्यासाठी वापरल्या जात असे.
गडाच्या तटाच्या बाजूने फिरत गेल्यास थोड्या अंतरावर ‘नऊगजी तोफ’ दिसते. ही तोफ अष्टधातुची असून इमादशहाच्या काळात गडावर आणल्या गेल्याचे बोलले जाते. तोफेवर पारशीत लेख कोरलेला आहे. तोफेचे तोंड गडपायथ्याच्या शहानुर गावाकडे रोखलेले आपणास लक्षात येते. बाजूला खूप खोल असे चंदन खोरे आहे. या खोऱ्यात चंदन व साग झाडांची फार दाट पसरण आहे.
ऐतिहासिक महत्त्व
गड नेमका कुणी आणि कोणत्या काळात बांधला या बाबत नक्की माहिती नाही पण स्थापत्य व ऐतिहासिक पुराव्या वरून हा गड ‘गोंड राजांनी’ बांधला असल्याचे बोलले जाते. गडावर नागपूरकर भोसले कालीन तुळशी वृंदावन व हनुमान मंदिर आहे. गडावर राम तलाव व धोबी तलाव यांसहित २२ तलाव आहेत. गडाला ६४ बुरूज आहेत. भक्कम तटबंदी व दुर्गम पहाडी यांच्या सहित हा दुर्ग सातपुड्याच्या दारावर उभा राहून उत्तरेकडून विशेषतः माळव्यातुन येणाऱ्या आक्रमणांना तोंड देत झुंजला असेल. या गडावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.
narnala

अकोला शहर किल्ला


निजामशाहीच्या काळात हैद्राबाद संस्थानमध्ये समाविष्ट असणारे अकोला हे शहर ब्रिटिश काळात १९व्या शतकात बेरार प्रांतात आले.
अकोला जिल्ह्यातील आकोट येथे ब्रिटिशांची नागपूरकर भोसल्यांशी लढाई झाली होती. जुन्या किल्ल्यांचे अवशेष आजही अकोल्यात दिसतात.
असदगड, नरनाळा हे त्यापैकीच होत. नरनाळा किल्ला आणि तेथील वन्यजीव अभयारण्य अकोल्याच्या प्रेक्षणीय ठिकाणे आहेत.akolacityfort