कोणतही शिवकाव्य येथे शोधा

पेशवा बाजीराव

।।महाराष्ट्राला,महाराष्ट्राबाहेर नेणारा अजिंक्य सेनापती।।
 
पहिल्या बाजीरावाचा जन्म ऑगस्ट १८,१७०० रोजी झाला.थोरले बाजीराव हे जगातील मोजक्या अपराजित सेनापतींपैकी एक होते.अत्यंत पराक्रमी असलेल्या बाजीरावाने मराठी साम्राज्याला उत्तर भारतात विस्तारले.चाळीस वर्षांच्या आयुष्यात तो एकदाही युध्द हरला नाही.त्यापैकी धर,माळवा,पालखेड,अहमदाबाद,उदयपूर,दिल्ली आदि लढाया प्रसिध्द आहेत.त्याचे अर्धे आयुष्य घोड्यावर गेले.बाजीराव आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत छत्रपती शाहू महाराजांशी प्रामाणिक राहिला.

बाजीराव पहिल्यापासून पराक्रमी होता.१७१८ साली दिल्लीला सय्यद बंधूंच्या मदतीसाठी तो वडिलासोबत गेला होता.बाळाजी विश्वनाथ वारल्यानंतर,छत्रपती शाहू महाराजांनी १७ एप्रिल १७२० रोजी बाजीरावास पेशवे पदाची वस्त्रे दिली.६ मार्च १७२८ रोजी निजामाचा पराभव करून दख्खनच्या सहा सुभ्यातून चौथ-सरदेशमुखीचे हक्क बाजीरावाने मिळविले.

याच सुमारास बाजीरावाने बुंदेलखंडात राजा छत्रसाल यांस सहाय्य करून मोघल सुभेदार मुहम्मद शाह बंगश याचा पराभव केला.बाजीरावाच्या पराक्रमाने खुश होऊन छत्रसालने बत्तिस लाखाचे वार्षिक उत्पन्न असलेला मुलुख बाजीरावास भेट दिला तसेच आपल्या मुलगीचे मस्तानीचे लग्न बाजीरावसोबत लावले.

 सन १७३३ साली छत्रपती शाहूंनी पेशव्यांना जंजिरा किल्ला जिंकावयास पाठविले.बाजीरावाने सिद्दीचा बराचसा मुलूख काबीज केला पण जंजिरा किल्ला जिंकता आला नाही.शेवटी दोघांत तह होऊन सिद्दीचा निम्मा मुलूख शाहूंना मिळाला.१२ मे १७३७ रोजी चिमाजी आप्पांने वसई किल्ला जिंकून पोर्तुगीजांना महाराष्ट्रातून हुसकावून लावले.
बाजीरावाला पराक्रमाला होळकर, शिंदे, पवार, गायकवाड आदि सरदारांनी मोठी साथ दिली व मराठी साम्राज्य इंदोर,ग्वाल्हेर,देवास,बडोदा आदि ठिकाणी विस्तारले.बाजीराव सोबत त्याच्या धाकट्या बंधूने चिमाजी अप्पाने मोठा पराक्रम गाजविला.चिमाजी अप्पाने पोर्तुगिजां विरूध्द जिंकलेली वसईची लढाई इतिहासात प्रसिध्द आहे.

अशा महान सेनानीचा उत्तरेतील मोहिमेवर असताना,२८ एप्रिल १७४० रोजी नर्मदा तीरावरील रावेरखेडी या गावी विषमज्वराने मृत्यु झाला.बाजीराव आयुष्याच्या शेवटपर्यंत छत्रपती शाहू महाराजांशी प्रामाणिक राहिला.बाजीरावानंतर त्यांचे पुत्र नानासाहेब पेशवे झाले.पुढे नानासाहेब पेशवे व मराठ्यांचे आरमार प्रमुख आंग्रे यांच्यात बेबनाव झाला.नानासाहेबानी इंग्रजाच्या मदतीने आंग्रेचा पराभव केला.त्यामुळे इंग्रजाना भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पाय पसरण्यास मदत झाली.

नानासाहेबांची हीच चुक पुढे महाग पडून इंग्रजाचे साम्राज्य बलाढ्य झाले.नानासाहेब पेशव्यास विश्वासराव, माधवराव व नारायणराव असे तीन पुत्र होते.पानिपतच्या लढाईत विश्वासराव पेशवे व चिमाजीअप्पांचे पुत्र सदाशिवराव भाऊ पडल्यामुळे माधवरावास पेशवाईची वस्त्रे मिळाली.माधवराव पेशवे यांनी पानिपतचे अपयश धुऊन काढून मराठा साम्राज्याची घडी ठीक केली पण दुदैवाने इ.स.१७७२ मध्ये हैदरावरील स्वारीत असतानाच माधवराव आजारी पडले.पुढे ते दुखणे क्षयावर जाऊन त्यातच त्यांचा अंत झाला.मरणसमयी त्यांचे वय अवघे २८ वर्षाचे होते.

माधवराव पेशव्यानंतर पेशवे बनलेल्या नारायणरावास,चिमाजीअप्पांचे दुसरे पुत्र रघुनाथराव पेशवे यांनी गारद्यांकरवी मारले व स्वत: पेशवे बनले.शनिवार वाड्याचे रक्षक म्हणून गारदी लोकांची नेमणूक माधवराव पेशव्यांनी त्यांचा पानिपतावरील पराक्रम पाहून केली होती.रघुनाथरावांच्या कारस्थानामुळे मराठा साम्राज्य डळमळीत झाले.पण शिंदे,होळकर आदि पराक्रमी सेनानीमुळे ते टिकून राहिले.पण कालांतराने पेशव्यांचे वर्चस्व कमी होऊन धर्ममार्तंडांचे राज्यात महत्त्व वाढले.प्रजेमध्ये उच्च व कनिष्ठ असे जातीनुसार वर्ग तयार झाले.जे मराठे शिवरायांच्या काळात एकत्र होते.ते जाती-पातीत विभागले गेले.परिणामत: एकसंध मराठ्यांचे राज्य लयास गेले.