कोणतही शिवकाव्य येथे शोधा

रायगड जिल्हा (कुलाबा जिल्हा) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रायगड जिल्हा (कुलाबा जिल्हा) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

|| किल्ले सागरगड ||


  

किल्ले सागरगड (खेडदूर्ग)




 किल्ल्याची ऊंची : १३५७  मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
 डोंगररांग : डोंगररांग नाही
 श्रेणी : मध्यम
जिल्हा :  रायगड 
मुंबईहून कोणत्याही ऋतूत एका दिवसात करण्यासारखा किल्ला म्हणजे सागरगड उर्फ खेडदूर्ग. अलिबागच्या समुद्र किनार्‍यावर आणि धरमतरच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. छ. शिवाजी महाराजांसारख्या दुरदृष्टीच्या राजाने सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी खांदेरी, कुलाबा, सर्जेकोट या किल्ल्यांची निर्मिती करेपर्यंत सागरगडावरच अलिबाग पट्यातील समुद्र किनार्‍याच्या रक्षणाची भिस्त होती. या किल्ल्याचे नाव सागरगड असले तरी समुद्रकिनार्‍यापासून हा किल्ला ५ मैल दूर आहे.

इतिहास :
सागरगड कोणी व केव्हा बांधला हे अज्ञात आहे. इ.स १६६० शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. त्यावेळी महाराजांनी गडावरुन खांदेरी - उंदेरी ही बेटे पाहिली व इंग्रज व सिध्दी यांच्यावर वचक बसविण्यासाठी खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याची योजना आखली. इ.स. १६६५ मध्ये शिवाजी राजांनी मोगलांबरोबर केलेल्या पुरंदरच्या तहात जे २३ किल्ले मोगलांना दिले त्यात सागरगडचा (खेडदूर्ग) समावेश होता. आग्र्‍याहून सुटका झाल्यावर महाराजांनी सागरगड पुन्हा स्वराज्यात आणला.
संभाजीच्या मृत्यूनंतर माजलेल्या अंदाधुंदीत सागरगड सिध्दीने ताब्यात घेतला. पण कान्होजी आंग्रे, कुलाब्याचे भिवाजी गुजर, आरमार प्रमुख सिधोजी यांनी १६९८ साली सिध्दीकडून किल्ला जिंकून घेतला.
छत्रपती शाहू महाराज व ताराराणी यांच्या वादात कान्होजी आंग्रे ताराराणीच्या बाजूस होते. पण १७१३ मध्ये बाळजी विश्वनाथ पेशवे यांनी मुसद्देगिरीने छ. शाहू व कान्होजी आंग्रे यांच्यात समेट घडवून आणला. त्यावेळी १६ किल्ले कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यात सागरगडचा समावेश होता. कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर सागरगडचा ताबा येसाजीकडे गेला. मानाजी आंग्रे व यसाजी आंग्रे या भावांच्या भांडणात पोर्तुगिजांनी मानाजीची बाजू घेतली, मानाजीने येसाजीचा पराभव केला. त्यावेळी सागरगडाचा ताबा त्यांच्याकडे आला. इ.स. १७३८ मध्ये संभाजी आंग्रेने सागरगड मानाजी कडून जिंकून घेतला. इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इथला रम्य निसर्ग व अल्हाददायक वातावरण पाहून जनरल फूलर व काही इंग्रज अधिकार्‍यांनी येथे विश्रामधामे बांधली होती.

गडावरील पहाण्याची ठिकाणे :
सागरगडवर जाण्यासाठी आपल्याला एक डोंगर व पठार पार करुन जावे लागते. खंडाळे गावातून डोंगराकडे जाताना पावसाळ्यात दोन टप्प्यात पडणारा ‘‘धोंदाणे’’ धबधबा आपल्याला प्रथमदर्शनी दिसतो. या धबधब्याच्यावर सिध्देश्वर मंदिर व मठ आहे.
सागरगडाचे प्रवेशद्वार उध्वस्त झालेले आहे. सागरगडाचा आकार इंग्रजी ‘वाय’ अक्षरासारखा आहे. याच्या दोन सोंडापैकी डाव्या हाताच्या सोंडेपुढे काही अंतर सोडून वर आलेला एक उत्तुंग सुळका दिसतो. या सुळक्याला ‘वानरटोक’ म्हणतात.
किल्ल्यावरील उंचवट्याला ४ मीटर उंचीची तटबंदी व ५ बुरुज बांधून बालेकिल्ला बनवण्यात आला आहे. बालेकिल्ल्याच्या पुर्वेकडील तटबंदी समोर खोदलेला खंदक आता बुजलेला आहे. येथेच बालेकिल्ल्याचा चोर दरवाजा व ढासळलेली तटबंदी आहे. या ढासळलेल्या तटबंदीवर चढाई करुन बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो. बालेकिल्ल्यात उंचवट्यावर पत्र्याचे देऊळ आहे. त्यात महिषासूरमर्दिनी, गणपती व शिवलींग यांच्या दगडात कोरलेल्या मुर्त्या आहेत. मंदिराच्या खालच्या बाजूला कड्याच्या टोकाला पाण्याचे कुंड आहे. या कुंडातील गोमुखातून नितळ पाण्याची संततधार पडत असते.
कुंडाच्या पुढे किल्ल्याच्या दोन सोंडा दोन बाजूला जातात. उजव्याबाजूच्या सोंडेवर एक समाधी आहे. त्याला सतीचा माळ म्हणतात. डाव्या बाजूच्या सोंडेवर इंग्रजांनी बांधलेल्या विश्रामधामाचे अवशेष आहेत. किल्ल्यावरुन खांदेरी- उंदेरी हे किल्ले, अलिबागथळचा समुद्रकिनारा, धरमतरची खाडी, माथेरान, प्रबळगड हे किल्ले, चौलची खाडी असा मोठा परिसर दृष्टीक्षेपात येतो.

गडावर पोहोचण्याच्या वाटा :
गडावर जाण्याची मुख्य वाट मुंबई - अलिबाग रस्त्यावरील खंडाळे गावातून आहे. मुंबईहून अलिबागला जाताना कार्ला खिंड ओलांडल्यावर अलिबागच्या अलिकडे ४ किमी अंतरावर खंडाळे गाव लागते. या गावात (अलिबाग कडे जाताना डाव्या हाताला) जाणारा रस्ता एका डोंगराच्या पायथ्याशी जातो. या डोंगरामागे सागरगड लपलेला आहे. या डोंगराच्या पायथ्याशी जाणारी सडक अर्धी कच्ची आहे, त्यामुळे पावसाळा सोडल्यास गाडी पायथ्यापर्यंत नेते येते, डोंगराच्या पायथ्याशी ओढा आहे. ओढा ओलांडल्यावर बांधीव पायर्‍यांची वाट डोंगरावर जाते. उभ्या चढणाची ही वाट अर्धा तास चढल्यावर आपल्याला २ वाटा लागतात. त्यातील उजव्या हाताच्या वाटेने आपण २ मिनीटात एका टेपावर येतो. तेथून समोरच दोन टप्प्यात पडणार्‍या धबधब्याचे विहंगम दृश्य दिसते. परत मुळ वाटेवर आल्यावर अर्ध्या तासात आपण सिध्देश्वर मंदिरात येतो.
सिध्देश्वर मंदिराच्या अलिकडे असलेली वाट डोंगर पठारावरील सागरगड माची गावात अर्ध्यातासात नेते. याच वाटेने गावातून पुढे गेल्यावर व डोंगराला वळसा घातल्यावर सागरगडाची तटबंदी दिसू लागते. अजून अर्ध्यातासात आपण कोसळलेली तटबंदी चढून बाले किल्ल्यात प्रवेश करतो.
सागरगड माची गावातून सागरगडाकडे जाताना ठिकठिकाणी दगडावर बाणांच्या खुणा केल्या आहेत, त्या पाहूनच पुढे जाणे. विशेषत: पावसाळ्यात धुक्यामुळे वाट चुकण्याचा संभव असतो. याशिवाय गडावर पोयनाडहून वाघोली मार्गे जाता येते. तसेच वडवली गावातून गडावर जाता येते.

गडावर राहाण्याची सोय : गडावर रहाण्याची सोय नाही, सिध्देश्वर मंदिरात किंवा सागरगडमाचीवरील शाळेत रहाण्याची सोय होऊ शकेल. खंडाळे गावातील समाजमंदिरात रात्री पथारी पसरता येईल.
जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही, परंतू सिध्देश्वर मठात चहा मिळू शकतो.
पाण्याची सोय : गडावर पाण्याची सोय आहे.

गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ : खंडाळे गावातून २ तास लागतात.

मृगगड किल्ला

मृगगड किल्ला

किल्ल्याची ऊंची : 1750
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: लोणावळा
जिल्हा : रायगड 
श्रेणी : मध्यम

खंडाळा - लोणावळा घाट परिसर प्रसिध्द आहे तेथील वातावरणामुळे, पावसाळ्यात येथे पर्यटकांची झुंबड उडालेली असते. भुशी डॅम हा येथील सर्वात प्रसिध्द स्थळ. या भुशी धरणाकडे जातांना उजवीकडे एक दरी लागते, याला ‘टायगर व्हॅली’ असे म्हणतात. या ‘टायगर व्हॅली’ मध्ये एक अनोखे दुर्गरत्न आहे. त्याचे नाव ‘मृगगड.’

पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्यावर जातांना खोबण्यांच्या बाजूला एक छोटीशी गुहा आहे. तिथ पर्यंत जरा सांभाळून जावे लागते. मृगगडाचा माथा फारच लहान आहे. चढून गेल्यावर समोरच सपाटी सारखा भाग आहे. यावर पाण्याची टाकी आहेत. एक छोटेसे तळे ही आहे. एक दोन टाकी मातीच्या ढिगार्‍यामुळे गाडली गेलेली आहेत. समोरच टेकाडासारखा भाग दिसतो. यावर चढून गेल्यावर पाण्याची टाकी दिसतात. काही वाड्यांचे अवशेष दिसतात. या गडाचा उपयोग केवळ चौकी पहार्‍यासाठी होत असावा. स्थान एकदम मोक्याचे याच्या एका बाजूला उंबरखिंड तर एका बाजूला वाघदरी, असा सर्व परिसर येथून दिसतो. संपूर्ण किल्ला फिरायला १ तास लागतो.

पोहोचण्याच्या वाटा :
मृगगडावर जाण्यासाठी खोपोलीला जायचे. पाली - खोपोली रस्त्यावर खोपोली पासून २० किमी वर परळी नावाचे गाव आहे. या ‘परळी’ गावातून सहा आसनी रिक्षेने ‘भेलिव’ नावाच्या गावात जायचे. भेलीव हेच पायथ्याचे गाव आहे. स्थानिक लोक या किल्ल्याला ‘भेलिवचा किल्ला’ असेही म्हणतात. भेलीव गावाच्याच मागे तीन सुळक्यांसारखे डोंगर दिसतात. त्यापैकी मधला डोंगर म्हणजे मृगगड. गावाच्या मागून एक वाट किल्ल्यावर जाते. जाण्याची वाट जंगला मधून असल्याने उन्हाचा त्रास बिलकूल होत नाही. किल्ला आणि त्याच्या पुढे असणारा तिसरा डोंगर यांच्या मध्ये एक खिंड आहे. त्या खिंडी मधूनच वाट किल्ल्यावर जाते. वरती थोडी कातळचढाई असल्यामुळे जरा जपूनच चढावे लागते. भेलिवमधून किल्ल्यावर जाण्यास १ तास पुरतो.

राहाण्याची सोय : मृगगडावर राहण्याची सोय नाही.

जेवणाची सोय : जेवणाची सोय आपणं स्वत: करावी.

पाण्याची सोय : पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत, मात्र गडावर उन्ह्याळ्यात पाणी नसते.

जाण्यासाठी लागणारा वेळ : भेलिवमार्गे १ तास लागतो.

|| किल्ले पद्मदुर्ग ||


कासा किल्ला उर्फ पद्मदुर्ग

 किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग
जिल्हा :
रायगड
श्रेणी :  मध्यम

कासा उर्फ पद्मदुर्ग हा जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला कासा किल्ला मुरुड गावाजवळील समुद्रात आहे. मुरुड हे गावतालुक्याचे असून ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे. मुरुड हे जंजिरा या जलदुर्गामुळे प्रसिध्दच आहे. या मुरुड गावाजवळ जंजिरा, सामराजगड आणि कासा उर्फ पद्मदुर्ग असे किल्ले आहेत.
इतिहास:
जवळ असलेल्या जंजिरा किल्ल्याच्या सहाय्याने सिद्दी अतिशय प्रबळ झाला होता. त्याच्या आरमारी सामर्थ्याने त्याने किनारपट्टीवर धाक जमवला होता. सामान्य रयतेची पिळवणूक होत होती. त्यामुळे सिद्दीच्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठीशिवा जी राजांनी मुरुडच्या सागरात असलेल्या कासवाच्या आकाराच्या बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार कासा उर्फ पद्मदुर्ग हा जलदुर्ग बांधला. त्याबद्दल महाराजांनी उद्गार काढले, पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजापुरी उभी केली आहे. कासा किल्ल्यामुळे जंजिर्‍याच्या सिद्दीला चांगलाचपायबंद बसला.

गडावर पहाण्यासारखी ठिकाणे :
 कासा किल्ल्याचे दोन भाग आहेत. एकमुख्य किल्ला आणि त्यासमोरील पडकोट. पडकोट मोठय़ा प्रमाणावर नामशेष होत आला आहे परंतु मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही उत्तमपैकी शाबूत आहे. मुख्य दारासमोरील मोठा बुरुज तग धरुन उभा आहे. या बुरुजाच्या चर्चा कमळाच्या पाकळ्याप्रमाणे फुललेल्या आकाराच्या आहेत. म्हणूनच याला पद्मदुर्ग असे नाव दिले गेले असावे.

कासा उर्फ पद्मदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचे एक वैशिष्ठ येथे पहावयाला मिळते. तटबंदीच्या दोन दगडांमधे सिमेंटिंग म्हणून चुना वापरलेला आह. गेल्या साडेतीनशे वर्षामधे सागराच्या लाटांच्या तडाख्याने आणि खार्‍या पाण्यामुळे तटबंदीचा दगड झिजून गेला आहे. या दगडाची झीज पाच ते दहा से.मी.एवढी झाली आहे. तरीही दोन दगडांमधला चुना अजूनही शाबूत आहे. शिवकालीन बांधकामाचे हे वैशिष्ट्य आपल्याला चकित करते. पडकोटामधील चौकोनी विहीर, तोफा, इमारतींचे अवशेष असे पाहून आपण मुख्य किल्ल्याकडे निघायचे पडकोट आणि मुख्य किल्ला या मधील खडकावर समुद्रामधून वाहून आलेल्या शंख शिंपल्यांचा ढीग साचलेला आहे.

कासा किल्ल्याच्या महाद्वारामध्ये प्रवेश करण्यासाठी चार पाच पायर्‍या चढाव्या लागतात. दाराच्या आतल्याबाजूला पहारेकर्‍याच्या साठी केलेल्या देवडय़ा आहेत. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायर्‍यांचा मार्गही आहे. मधल्याभागामधे नव्या जुन्या वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात. काही काळ भारतातील कस्टम ऑफिसचे एक कार्यालय येथे थाटलेले होते. हे चौकीवजा कार्यालय येथून हलल्यावर या सगळ्या वास्तूचा ताबा निसर्गाकडे आला त्यामुळे सगळ्या वास्तूंची रयाच गेलेली दिसते. चारही बाजुंनी खारे पाणी असताना आतमधे गोडय़ा पाण्याची चारटाकी केलेली दिसतात.
किल्ल्याचा दर्या दरवाजा आणि त्याचे स्थापत्य पाहून परत फिरायचे. तटबंदीवरुन जंजिरा आणि सामराजगड किल्ले दिसतात. मुरुडचाकिनाराही उत्तम दिसतो.
गडावर पोहोचण्याच्या वाटा :
मुरुडला जाण्यासाठी अलिबाग रेवदंडा मुरुड असा एक गाडी मार्ग आहे. मुंबई-पणजी महामार्गावरील नागोठणे अथवा कोलाड येथून रोहे गाठावे रोह-चणेरे बिरवाडी मार्गेमुरुडला जाता येते. तसेच मुंबई-पणजी महामार्गावरील इंदापूर येथून तळा-भालगाव मार्गेही मुरुडगाठता येते. मुरुड गावातून राजपुरीकडे जाणारा गाडी रस्ता आहे. या रस्त्यावरच्या खाडीलगत एकदरा गाव आहे. याच्या किनार्‍यावर अनेक मच्छीमारी नावा उभ्या असतात. या मच्छीमारी नौकावाल्याकडे चौकशी केल्यास यातील एखादी नौका आपल्याला कासा किल्ल्याकडे घेवून जावू शकते आपणसंख्येने जास्त असल्यास फारसा आर्थिक भार पडत नाही. 
सूचना : सागराची आणि हवामानाची परिस्थिती पाहूनच हे मच्छीमार कासाकडे येण्यासाठी तयार होतात. आपण आगावू चौकशी करुनकिंवा आदल्या दिवशी जर नौका ठरवली तर वेळेची बचत होऊन गैरसोय टळू शकते.


 पाण्याची व जेवण्याची सोय:- आपण स्वतः करावी. 

।। किल्ले माणिकगड ।।


 
 किल्ल्याची उंची: ----
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांगः कर्जत
 श्रेणी: मध्यम  
जिल्हा: रायगड

मुंबई - पुणे हमरस्त्यावरुन जातांना अनेक किल्ले आपल्याला दिसतात. प्रबळगड, ईरशाळ, चंदेरी, माथेरान, कर्नाळा, लोहगड, विसापूर आणि यांच्या संगतीतच एक किल्ला आहे, त्याचे नावं माणिकगङ. कर्नाळा, सांकशी, माणिकगड हे या रांगेतील तीन भाऊ. माणिकगडाच्या आजुबाजुचा सर्व प्रदेश सधन असला तरी येथील लोकांचे राहणीमान मात्र साधेच आहे. शेती हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. 
 गडावर पहाण्याची ठिकाणे :  
 किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच तटबंदी दिसते. ही तटबंदी अनेक ठिकाणी तुटलेली आहे. तटबंदीमधन आत शिरल्यावर समोरच देऊळ दिसते आणि पुढे दोन कोठ्या दिसतात. कोठ्यांची दारे अजूनही शाबूत आहेत. तटबंदीतून पहिल्या सपाटीवर उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. येथून थोडे पुढे गेल्यावर पाण्याची टाकी आढळतात. त्याच्या समोरच जोत्याचे अवशेष दिसतात. येथून डावीकडे फुटणार्‍या वाटेने पुढे गेल्यावर आणखी ४ टाक्या दिसतात. यात मे महिन्य़ापर्यंत पाणी असते. टाक्यांच्या समोरच शंकराची पिंड आहे, पुढे गेल्यावर दोन चांगले बाधलेले बुरुज आढळतात. येथून पुन्हा गड जिथून पाहयाला सुरवात केली त्या जागेपाशी येऊन पोहचतो. किल्ल्यावरून प्रबळगड, इरशाळगड, कर्नाळा आणि सांकशीच किल्ला हा परिसर दिसतो. संपूर्ण गडफेरीस अर्धा तास पुरतो. 
गडावर जाण्याच्या वाटा :   
पनवेल किंवा खोपोली मार्गे यायचे झाल्यास आपटे फाट्यामार्गे रसायनीकडे वळावे - रसायनीमधून वाशिवली गावात यावे. वाशिवली गावातून वडगाव गावात यावे. वडगाव किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. पनवेलहून वडगाव पर्यंत येण्यास दीड तास लागतो. वडगाव हे बर्‍यापैकी मोठे गाव आहे. माणिकगडाची एक सोंड गावातच उतरलेली आहे. या सोंडेच्या साह्याने समोरच्या डोंगरधारेवर चढत जावे. वडगाव पासून डोंगराच्या माथ्यावर जाण्यास अर्धा तास पुरतो. या डोंगराच्या माथ्याचर कातरवाडी वसलेली आहे. या वाडीतून गड समोरच दिसतो. गडाच्या दिशेने चालत निघाल्यावर अर्ध्या तासातच आपण एका जंगलात शिरतो. येथून पुढे जाण्यासाठी दोन वाटा फुटतात.

पाण्याची सोय : किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे. 

जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत: करावी. 

राहाण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ : वडगावमार्गे ३ तास लागतात.

चांभारगड


किल्ल्याची उंची : १२०० फूट
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः रायगड
जिल्हा : रायगड
श्रेणी : मध्यम
रायगडाच्या आजूबाजूला असणा-या डोंगररांगावर अनेक किल्ले आहेत. यांत प्रामुख्याने लिंगाणा, काळदुर्ग,
सोनगड व चांभारगड यांचा समावेश होतो.यांचा उपयोग केवळ घाटमथ्यावर नजर ठेवण्यासाठी व टेहेळणीसाठी होत असावा.
चांभारगड हा महाडपासून हाकेच्या अंतरावर आहे.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे गडमाथा म्हणजे एक छोटेसे पठारच आहे. पठारावर थोडेफार घरांचे
अवशेष आहेत तर पठाराच्या खालच्या डोंगराच्या पट्टीवर पाण्याची एक दोन टाकी आहेत.
या टाक्यांच्या बांधणीवरुन हा गड फार पुरातन असावा असा अंदाज बांधता येतो.
याखेरीज गडावर पाहण्याजोगे काहीच नाही.अर्ध्या तासात संपूर्ण गडफेरी आटपते गडावर
जाण्याच्या वाटा :
गडावर जाण्यासाठी महाड गाठावे.महाड-पोलादपूर हायवे ओलांडून पायथ्याच्या चांभारखेड गावात पोहोचावे.
महाड एस.टी. स्थानकापासून येथे जाण्यास २० मिनिटे लागतात.
या खिंडीतून पाऊण तासाच्या चालीनंतर आपण माथ्याच्या
कातळकडापाशी पोहोचतो.कातळकडा डावीकडे ठेवून थोडे पुढे जावे.नंतर वर जाणारी वाट पकडून १५ मिनितांत गडमाथा गाठता येतो.
राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय : किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.जाण्यासाठी लागणारा वेळ : महाड गावातून एक तास

किल्ले खांदेरी



इतिहास
इ.स.१६७९ च्या ऑगस्ट महिन्यात छत्रपती शिवरायांनी मायनाक भंडारीला मुंबईच्या जवळ असलेल्या बेटांवर धाडून खांदेरी-उंदेरी किल्ल्याची उभारणी केली.मुंबईच्या समोरच असलेल्या या दुर्गामुळे इंग्रजांना कोकणात हालचाल करणे दुरापास्त झाले.

   
इंग्रजांनी मायनाक भंडारीला किल्ला बांधत असताना अटकाव करण्याचा प्रयत्न केला.नामांकित अश्या सागरी सेनानींना खांदेरी-उंदेरी वर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले.पण मायनाक भंडारी व दौलतखानाच्या आरमारापुढे इंग्रजांची मात्रा चालली नाही.
 
 Khanderi4   


  Khanderi9        
सिद्दी आणि मुंबईकर इंग्रज यांच्या बरोबर मध्ये उभारल्या गेलेल्या या जलदुर्गामुळे सिद्दी आणि इंग्रज या दोघांचीही कोंडी झाली. सिद्दीला मुंबईकर इंग्रजांच्या आश्रयाला जाण्यापासून रोखले गेले,तर मुंबईकर इंग्रजांवर मराठ्यांची टांगती तलवार राहिली.खांदेरीच्या किल्यात वेताळ मंदिर, हनुमान मंदिर, बुद्ध मंदिर अशी अनेक श्रद्धास्थाने आहेत.


गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था

अलिबागच्या उत्तरेला पाच - सहा कि.मी. अंतरावर सागरकिनारी थळ या लहानश्या गावातून खांदेरी आणि उंदेरीला जाता येते. थळ पासून खांदेरी-उंदेरी किल्ल्यावर जाण्यासाठी स्थानिक मच्छीमारांच्या होड्या उपलब्ध आहेत.गडावर राहण्या-खाण्याची व्यवस्था नाही.खांदेरीवर पिण्याचे पाण्याचे टाके आहे.
Khanderi15
 

किल्ले कोलई / कोरलई



इतिहास
कोरलाईच्या किल्ल्याची बांधणी पोर्तुगिजांनी केलेली आहे.सन १६८३ साली छत्रपती संभाजी राजेंनी किल्ल्यावर चाल केली होती,पण किल्ला ताब्यात घेण्यात त्यांना अपयश आले.चिमाजी आप्पा यांनी काढलेल्या मोहिमेमध्ये सुभानजी माणकर यांनी पोर्तुगीजांशी झुंजून कोरलाईवर ताबा मिळवला होता.

   koralai3     
किल्ल्याच्या पश्चिमेला अथांग पसरलेला अरबी समुद्र आहे, तर पूर्वेला कुंडलिका नदीची खाडी आहे.किल्ल्यावर पोर्तुगीज बांधणीच्या चर्चचे अवशेष आहेत. किल्ल्याच्या बुरुजावर ठिकठिकाणी तोफा आहेत,या किल्ल्यामुळे सागर आणि कुंडलिका नदीची खाडी या परिसरावर ताबा ठेवणे सोपे होते.
 


 
किल्ल्याच्या पश्चिमेकडून दिंडी दरवाजा जाता येते,तर पूर्वेकडून दर्या दरवाजाकडे जाता येते.दिंडी दरवाजातून बाहेर पडल्यानंतर सागर किनाऱ्याने दीपगृहाकडे जाता येते.दीपगृहाच्या परिसरातून किल्ल्याची तटबंदीचे खूप चांगल्या रीतिने न्याहळता येते.
    
koralai5    


गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था

कोरलाई गाव हे अलिबाग-मुरुड या गाडी रस्त्यावर,अलिबाग पासून अंदाजे २२ कि.मी.अंतरावर आहे.किल्यावर राहण्याची तसेच जेवणाची सोय नाही,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था किल्यावर उपलब्ध आहे.
koralai12
 

किल्ले उंदेरी



इतिहास
 
इ.स.१६७९ च्या ऑगस्ट महिन्यात छत्रपती शिवरायांनी मायनाक भंडारीला मुंबईच्या जवळ असलेल्या बेटांवर धाडून खांदेरी-उंदेरी किल्ल्याची उभारणी केली.मुंबईच्या समोरच असलेल्या या दुर्गामुळे इंग्रजांना कोकणात हालचाल करणे दुरापास्त झाले.

 
इंग्रजांनी मायनाक भंडारीला किल्ला बांधत असताना अटकाव करण्याचा प्रयत्न केला.नामांकित अश्या सागरी सेनानींना खांदेरी-उंदेरी वर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले.पण मायनाक भंडारी व दौलतखानाच्या आरमारापुढे इंग्रजांची मात्रा चालली नाही.
    
 underi5    


  underi1        
उंदेरी किल्ल्यावर अंदाजे १५ ते १६ तोफा आहेत.किल्ल्यावर तीन पाण्याची टाकी असली तरी त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज मजबूत आहेत.
 


गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था

अलिबागच्या उत्तरेला पाच - सहा कि.मी. अंतरावर सागरकिनारी थळ या लहानश्या गावातून खांदेरी आणि उंदेरीला जाता येते. थळ पासून खांदेरी-उंदेरी किल्ल्याला जाण्यासाठी स्थानिक मच्छीमारांच्या होड्या उपलब्ध आहेत.गडावर राहण्या-खाण्याची व्यवस्था नाही.उंदेरीवर पिण्याचे पाणी उपलब्ध नाही.
underi
 

किल्ले कुलाबा



इतिहास
 
कुलाबा किल्लाच्या बांधकामाच्या कालखंडाविषयी वादविवाद आहेत, ग्रॅण्ट डफ या इंग्रज इतिहासकाराने लिहिलेल्या ‘मराठाज्’ या ग्रंथातील (पान क्र. ८५) नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला १६६२ च्या सुमारास नव्याने बांधून मजबूत केला तर रियासतकारांच्या मते या किल्ल्याचे बांधकाम छत्रपती शिवरायांच्या अखेरच्या काळात सुरू होऊन त्यांच्या मृत्यूआधी काही दिवस पूर्ण झाले.

     
सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी कुलाबा किल्ल्याची आपली राजधानी म्हणून निवड केली होती.कुलाबा किल्ल्यावर गडदेवता भवानी देवीचे मंदिर आहे.गडदेवता भवानी देवीच्या देवळातच गणेश आणि वेताळ यांच्याही मूर्ति आहेत.देवळासमोरच साडेसात मीटर उंचीचा दीपस्तंभही आहे,आंग्रे मोहिमेवर निघण्यापूर्वी भवानी देवीचा कौल घेत असत.
 
  kulaba   


 kulaba2                
आंग्रेच्या कौल मिळालेल्या सर्व मोहिमा यशस्वी झाल्याचा इतिहास असल्यामुळे आजचे कोळी बांधव दर्यात मासळी पकडण्यास जाण्यापूर्वी भवानी देवीचा कौल घेतात.किल्ल्यात ओहोटीच्या वेळी चालत जाता येते आणि भरतीच्या वेळी बोटीतून जाता येते त्यामुळे भरती-ओहटीच्या वेळा लक्षात ठेवाव्या
   
गडाच्या तटबंदीवरून चालत गड पाहता येतो.बुरूजावर लोखंडी चाकाच्या दोन मोठ्या तोफा आढळतात.बुरूजावरून खांदेरी-उंदेरी किल्ल्याचे दर्शन होते.
     
        kulaba6


गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था
कुलाबा किल्ला अलिबागच्या समुद्रकिनार्‍यापासून तीनशे मीटरवर आहे.गडावरील गणेश मंदिरात राहण्याची व्यवस्था होऊ शकते,गडावर पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.जेवणाची सोय स्वत: करावी.
kulaba13
 

मुरुड-जंजिरा


महाराष्ट्राला मोठा सागर किनारा लाभला आहे. सृष्टिसौंदर्याने नटलेल्या या सागर किनाऱ्याजवळ अनेक प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक घटनांना उजाळा देणारी अनेक स्थळे आहेत. या किनाऱ्यावर असलेल्या जलदुर्गांमध्ये रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिम अंगाला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडच्यापुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुडपासून राजपुरी चार पाच किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड-जंजिरा आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे.
जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रुढ झालेला आहे. अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरुन तो आलेला आहे. जझीरा म्हणजे बेट. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यत: कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहेमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे रहात असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानेसा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली.
राम पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही, याची कल्पना पिरमरखानाला होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत, असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटीलाशी स्नेह राहावा म्हणून दारूचे काही पिंपे त्याने भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खूष झाला. पिरमखानाने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरमखान मेढेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असताना पिरमखानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तेथे उतरवून सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला.
पुढे पिरमखानाच्या जागी बुऱ्हाखानाची नेमणूक झाली. त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुऱ्हाणखानाने बांधलेले आहे. पुढे इ.स.१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष समजला जातो.
जंजिऱ्याचे सिद्दी हे मुळचे अबिसीनियामधील असून, हे दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनाही जंजिऱ्यावर स्वामित्व मिळवता आले नाही. इ.स.१६१७ ते इ.स.१९४७ अशी ३३० वर्षे जंजिरा अंजिक्य राहिला. जंजिऱ्याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. होडीने आपण प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो. या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुऱ्हाणखानाची दर्पोक्तीच या चित्रातून दिसून येते. एका वाघाने चारही पायात चार हत्ती पकडले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे, असे ते चित्र आहे. बुऱ्हाखान इतर सत्ताधीशांना सुचवतो आहे की, “तुम्ही हत्ती असाल, मी पण शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका.”
जंजिऱ्याची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडे ही एक दरवाजा आहे. असे एकोणीस बुलंद बुरूज आहेत. दोन बुरुजांमधील अंतर ९० फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत.  किल्ल्याच्या मध्यभागी सुरुलखानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते. यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा असे होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तेथून उठून गेली.
जंजिऱ्याच्या तटबंदीवरुन विस्तृत प्रदेश दिसतो. यात सागरातील कासा उर्फ पद्मदुर्ग व किनाऱ्यावरील सामराजगड हेही येथून दिसतात. ३३० वर्षे अभेद्य आणि अंजिक्य राहिलेल्या जंजिरे मेहरुब पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करुन जंजिर्‍याला भेट दिल्यास ती निश्चितच संस्मरणीय ठरेल.’
जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला.  भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड-जंजिराच्या तटावर ५७२ तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. शिवाजीच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला.

कर्नाळा


कर्नाळा
कर्नाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. ह्या किल्ल्यालगतचा परिसर कर्नाळा अभयारण्य म्हणून ओळखला जातो
रायगड जिल्हातील पनवेल तालुकातील हा किल्ला आहे.
इतिहास  : – 
स्वातंत्र्य सैनिक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते. कर्नाळा हा किल्ला प्राचीन कालखंडापासून प्रसिध्द आहे. किल्ल्याचा उल्लेख यादवकाळात आढळतो.छत्रपती शिवरायांनी इ.स. १६५७ मध्ये हा किल्ला स्वराज्यात सामील केला. पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.सन १६७० साली मराठ्यांनी हा किल्ला परत स्वराज्यात आणला.
कर्नाळा किल्ल्या बद्दल बऱ्याच लोकांना ठोस माहिती नाही व इतर बऱ्याच ऐतिहासिक वाड:मयात देखील कर्नाळा बद्दल पूर्ण उल्लेख नाही. लोकांना कर्नाळाची तोंडओळख आहे ती पक्षी अभयारण्य म्हणून पण ह्या किल्ल्याने देखील ईतिहासात बऱ्याच लढाया पाहिलेल्या आहेत. कर्नाळाचा ईतिहास मी तिथे नमूद केलेल्या फलका वरील मजकुरावरून माझ्या भाषेत लिहितं आहे.
प्राचीन काळी पनवेल व बोर घाटातून (त्यावेळच्या) मुंबई व चौल बंदराकडे होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्नाळा किल्ल्याचा उपयोग होत असे. चौल हे ठिकाण अलिबागच्या पुढे रेवदंडा जवळ मुरूडच्या वाटेवर आहे. तिथून येणारा माल कर्नाळा वरून त्या काळच्या पुणे, ठाणे येथील बाजारपेठेत पोहचवला जायचा. कर्नाळावर देवगिरी यादवांचे १२४८ ते १३१८ पर्यंत राज्य होते, किल्ल्याचे बांधकाम कोणी केले याचा पुरावा दिला नसला तरी देवगिरी यादवांनीच कर्नाळा बांधला असावा. बहुतेक करून महाराष्ट्रातील प्राचीन किल्ल्यां पैकी एक असा बहुमान कर्नाळ्याला आपण देऊ शकतो (चुकीची दुरुस्ती करण्यात यावी.). पुढे सन १३१८ ते १३४७ पर्यंत दौलताबादाच्या मुस्लिम शासकाकडे कर्नाळ्याचा ताबा होता. तेव्हा कर्नाळा उत्तर कोंकण म्हणजेच ठाणे व रायगड ह्यांचे मुख्यालय होते.दौलताबाद कडून कर्नाळाचा ताबा गुजरातच्या फौजे कडे गेला. हा गुजराती शासक कोण होता ह्याचा उल्लेख कुठेच नाही आहे, तसा मला पण ह्या बद्दल कोडे आहे कारण गुजराती शासकाने कर्नाळा पर्यंत मारलेली मजल ह्या बद्दल कुठेच अजून पर्यंत वाचनात आलेले नाही.
किल्लाच्या अंगठा सारख्या आकारामुळे किल्ला वेगळा वाटतो.किल्ल्याचा माथा फारच लहान आहे.पक्षी अभयारण्यामुळे हा किल्ला प्रसिद्ध आहे.किल्ल्याची तटबंदी ढासळलेल्या अवस्थेत आहे. किल्ल्यावर भवानी मातेचे मंदिर आहे.भवानी मंदिराच्या जवळच ढासळलेल्या अवस्थेतील एक वाडा आहे.गडावरील अंगठ्याच्या आकारातील सुळक्याच्या पायथ्याशी पाण्याची टाकी आणि धान्य कोठारे आहेत.सुळका चढण्यासाठी अवघड असल्यामुळे प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्याशिवाय चढण्याचा प्रयत्न करू नये.
१५४० मध्ये अहमदनगरच्या निजामाने हा किल्ला जिंकला, पण गुजराती शासकाने पोर्तुगीजांच्या साहाय्याने कर्नाळा परत मिळवला. परत एकदा निजाम चालून आला असता गुजराती शासकाने कर्नाळा पोर्तुगीजांना बहाल केला, वसईच्या कॅप्टनने निजामाच्या सैन्याचा वेढा मोडून काढून स्वतःचा अंमल स्थापन केला आणि किल्ल्याच्या संरक्षणार्थ ३०० युरोपियन सैनिक तैनात केले. पुढे पोर्तुगीज व निजाम यांच्या मध्ये झालेल्या मैत्रीच्या तहात वार्षिक १७५० पौंड ह्या ठराविक खंडणीच्या रकमेवर पोर्तुगीजांनी हा किल्ला निजामशहाकाडे सोपविला. एवढा उहापोह पाहिल्या नंतर त्या काळात कर्नाळाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येते.
निजामशहा कडून मग हा किल्ला मुघलांकडे होता, ह्या बद्दल सविस्तर माहिती मिळाली नाही. सन १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी कर्नाळा मुघलांकडून जिंकून स्वराज्यात समाविष्ट केला. मिर्झाराजा जयसिंग बरोबर झालेल्या पुरंदरा च्या तहात कर्नाळ्याचा देखील बळी गेला होता पण लवकरच इतर किल्ल्यां बरोबर कर्नाळ्याचे स्वराज्यात पुनरागमन झाले. महाराजांच्या मृत्यू नंतर औरंगजेबाने कर्नाळा परत जिंकला आणि कर्नाळा पारतंत्र्याच्या साखळदंडा मध्ये जेरबंद झाला. सन १७४० मध्ये पेशव्यांनी कर्नाळ्याला परत स्वराज्यात आणले. १८०३ मध्ये इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावाच्या वतीने गडाचा ताबा घेतला व १८१८ मध्ये स्वतःचा अंमल जाहीर केला. सन १८१८ पर्यंत क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके ह्यांचे आजोबा कर्नाळ्याचे किल्लेदार होते. ह्याच कर्नाळाच्या बेलाग सुळक्याने तरूण वासुदेव ह्यांच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली आणि ह्या आद्य क्रांतीकाराला एडनच्या तुरंगाची भिंत पण थोपवू नाही शकली.
गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था : –
मुंबई-गोवा महामार्गाने जाताना पनवेल नंतर शिरढोण गाव लागते. गावाच्या जवळच कर्नाळा किल्ल्याचा परिसर आहे.किल्ल्याच्या पायथ्याच्या असलेल्या शासकीय विश्रामगृहात रहाण्याची सोय उपलब्ध आहे.किल्ल्याखालील उपहारगृहात जेवणाची सोय होते.गडावर बारमाही पिण्याच्या पाण्याची सोय आहे .

खांदेरी किल्ला


खांदेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक किल्ला आहे.
भौगोलिक स्थान : –
खांदेरीचा दुर्ग हा काही फार प्रसिद्ध दुर्ग नव्हे; पण हे बेट मुंबईच्या समोरच असल्याने अतिशय मोक्याचे आहे. इ.स.१६७९ च्या ऑगस्ट महिन्यात शिवाजीमहाराजांनी मायनाक भंडार्‍याला येथे पाठवून बेटावर किल्ला बांधावयास काढला. या बेटावर वेताळाचे एक मोठे राऊळ आहे. त्याची पूजा केल्याशिवाय कोणीही कोळी मासेमारीसाठी नावा समुद्रात घालत नाहीत. बेटावर एक टेकडी आहे आणि बेटालाच तटबंदी घातली आहे.
खांदेरी किल्ल्यास भेट देण्यासाठी प्रथम अलिबागला जावे लागते. तेथून थळला जावे. थळच्या किनारपट्टीवर थळचा भग्न किल्ला आहे. तेथून नावेतून या जलदुर्गावर जाता येते. खांदेरी उंदेरीची बेटे ही मुंबई आणि मुरुडचा जंजिरा यांच्या मधे असल्यामुळे अतिशय महत्त्वाची होती. ही बेटे ताब्यात घेवून त्यावर जलदुर्ग बांधल्यास मुंबईकर इंग्रज आणि जंजिरेकर सिद्यी यांच्यामधे चांगलीच पाचर मारता येईल हे हेरुन शिवाजीराजांनी खांदेरीचा किल्ला बांधायला घेतला महाराजांच्या या बेताचा सुगावा लागताच इंग्रजांनी खांदेरी बेटावर आमचा हक्क असल्याचे कारण पुढे करुन येथे किल्ला बांधण्याला विरोध केला. इंग्रजांना पोर्तृगिजांकडून मुंबई मिळाली होती. त्याच बरोबर खांदेरी आणि उंदेरी म्हणजे हेन्री आणि केनरी ही बेटेही मिळाल्याचा त्यांचा दावा होता. महाराजांनी खांदेरी बांधण्याची महत्त्वाची जोखीम मराठी आरमाराचा अधिकारी असलेल्या मायनाक भंडारीवर सोपवली. मायनाक यांनी आपल्या कडव्या साथीदारांच्या सहाय्याने ती जबाबदारी स्वीकारली. एकशे पन्नास सहकारी आणि चार तोफांसहीत मायनाक खांदेरी बेटावर दाखल झाले. इ.स. १६७९ च्या जुलै मधे ऐन पावसाळ्यात खांदेरीचे बांधकाम सुरु झाले. इंग्रजांनी आपल्या आरमारासहीत येवून त्यांना आडकाठी करण्याचा प्रयत्न केला. मायनाय यांनी इंग्रजांना न जुमानता काम चालू ठेवले. खांदेरीचे बांधकाम करणारे कामकरी इंग्रजांचा हल्ला परतवून लावण्यासाठी प्रसंगी धारकरी होत. इंग्रजांचा विरोध मोडून काढत मायनाक यांनी खांदेरीचा जलदुर्ग उभा करुन स्वराज्यातील जलदुर्गांची मजबूती फळी उभी केली.
देरीला जाण्यासाठी होडीतून निघाल्यावर डावीकडे उंदेरीचा जलदुर्ग दिसतो. साधारण तासाभरात आपण खांदेरीला पोहोचतो. खांदेरी बेटावर दोन उंचवटे आहेत. या दोन उंचवटय़ांच्या बेचक्यामधेच धक्का आहे. या धक्क्यावरच आपल्याला उतरावे लागते. खांदेरीच्या या दोन टेकडय़ा मधली सपाटीची जागा आत घेऊन सभोवताली संपुर्ण तटबंदी बांधण्यात आली आहे. किल्ल्याचा दरवाजा मात्र नष्ट झाला आहे. मधल्या दोन टेकडय़ांमुळे गडाचे दोन भागात विभाजन झाले आहे. आपण डावीकडील वाट चालू लागल्यावर आपल्याला एक खडक लागतो. या खडकावर दगड आपटल्यास यातून धातूसारखा नाद करणारा आवाज येतो. येथून जवळच पीराचे ठाणे आहे. याच मार्गाने पुढे गेल्यावर लहान व मोठा मनोरा लागतो. या भागात आग्या वेताहाचे ठाणे आणि पाण्याचे हौद आहेत. खांदेरीच्या तटबंदीवर गाडय़ावर ठेवलेल्या तोफा आहेत. तटबंदीला जागोजाग बुरुज आहेत. तटबंदीचे काम रचीव पद्धतीने केलेले असल्याने दोन चिर्‍याच्या मधे दर्जा भरलेला नाही. तसेच तटबंदीच्या बाहेरील अंगाला मोकळे चिरे टाकून दिले आहेत. त्यामुळे सागराच्या लाटांचा जोर कमी होतो. त्यामुळे मुख्य तटबंदीला कसलीही इजा पोहोचत नाही. भिंतीबाहेरच्या मोकळ्या चिर्‍यावर नेहेमीच सागराचा मारा चालू असतो त्यामुळे या चिर्‍यावर नेहेमीच सागराचा मारा चालू असतो त्यामुळे या चिर्‍यावर कोरल मोठय़ाप्रमाणावर वाढलेले आहे. पायाला सागराचे खारेपाणी लागताच आग होते. त्यामुळे पोहोचू शकत नाही. हे वेगळे तंत्र येथिल बांधकामामधे पहायला मिळते.खांदेरीच्या गडफेरीमधे वेताळ मंदिर, हनुमान मंदिर बुद्ध मंदिर, क्रॉस, पीर अशी अनेक श्रद्धास्थाने पहायला मिळतात.
शिवरायांचे अजोड तंत्र आणि मायनाक भंडारीचे अजोड साहस आपल्याला चकीत करते. मायनाकाला सलाम करुनच आपण परतीच्या वाटेला लागतो.
इतिहास : –
मायनाक भंडारी तटबंदी बांधत असताना ईस्ट इंडिया कंपनीच्या मुंबईतील वखारकरांती थांबवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. कॅप्टन विलियम मिंचिन, रिचर्ड केग्वीन, जॉन ब्रँडबरी, फ्रान्सिस थॉर्प या नाविक अधिकाऱ्यांना खांदेरीवर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले. रिव्हेंज आणि हंटर नावाच्या दोन फ्रीगेटी त्यांनी पाठवल्या होत्या. गेप आडनावाच्या माणसाकडून काही गुराबा भाड्याने घेऊन त्यावर काही तोफा कशातरी बांधून त्यांनी इंग्रजी आरमार पाठवण्याचा प्रयत्न केला. मायनाक भंडार्‍याच्या मदतीला नंतर दौलतखानाचा आरमारी ताफा आला. आलिबाग-थळच्या किनाऱ्यालगत असलेल्या या आरमाराने इंग्रजी आरमारातल्या त्रुटी हेरल्या. मराठ्यांच्या होड्या थळच्या किनाऱ्यावरून सामानसुमान घेऊन खांदेरी बेटावर निघत. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी किनारा आणि बेट यांमध्ये नाविक मोर्चेबंदी उभारण्याचे इंग्रजांनी ठरवले होते; पण त्यांच्या मोठ्या जहाजांना या खाडीमध्ये ठिय्या देऊन राहण्याचे काम जमले नाही. वार्‍यामुळे त्यांच्या होड्या किनाऱ्याकडे फेकल्या जात आणि त्या दगडांवर आपटून फुटण्याची भीती असल्याने इंग्रजांना ती जहाजे खोल पाण्यात न्यावी लागली. छोट्या गुराबा त्यांनी आणल्या असता डव्ह नावाच्या त्यांच्या गुराबेवर पाठीमागे तोफ नसल्याने ती त्रुटी हेरून मराठा आरमाराने पाठीमागून चक्राकार हल्ला चढवून ती गुराब पकडली आणि त्यावरच्या इंग्रजांना कैद करून सागरगडावर डांबले.
या घटनेद्वारे सागराची भरती-ओहोटी, खोल-उथळ पाणी, मतलय वारे, इत्यादींचे स्थानिक ज्ञान मराठ्यांना इंग्रजांपेक्षा अधिक असल्याचे दिसले. संगमेश्वरी नावाच्या वेगळ्या आराखड्याच्या मराठा होड्यांनी या युद्धात कमाल केली. मराठे रातोरात या चिंचोळ्या होड्या वल्हवत बेटावर सामान पोहचते करीत. इंग्रजी जहाजे पूर्णपणे वार्‍यावर अवलंबून असत. खास मराठा बनावटीच्या या होड्यांनी इंग्रज आरमाराला आश्चर्यकारकरित्या चकवले.

अवचितगड


अवचितगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. कोकणात कुंडलिका नदीच्या तीरावर रोहा गावाच्या आजूबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये गर्द रानाने वेढलेला किल्ला म्हणजे अवचितगड. महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होते. रोह्यापासून ५ कि.मी. वर असलेल्या या गडाची उंची तळापासून ३०५ मीटर किंवा १००० फ़ूट आहे. घनदाट जंगलामुळे जाण्याचा मार्ग दुर्गम झाला आहे. सर्व बाजूंनी तटांनी आणि बुरुजांनी वेढलेला असल्याने हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. उपरांगेच्या उत्तरेकडे श्रीबाग व पेण आहे तर दक्षिणेकडे रोहा व मुरुड तालुका आहे. रोह्यावरुन कुंडलिकेवरचा एक पुल आपल्याला पिंगळसाई गावी नेतो. तिथून तासाभराच्या चालीनंतर आपण गडावर पोहोचू शकतो.
अवचितगडाचा किल्ला हा शिलाहारांच्या काळात लष्करी ठाणे म्हणून बांधला गेला असावा असे दिसते. पुढे निजामशाहीच्या राजवटीमध्ये हे सुभ्याचे ठिकाण म्हणून वापरले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अवचितपणे येवून हा किल्ला ताब्यात घेतला. म्हणून याला अवचितगड असे नाव मिळाले असे म्हणतात. पण याचे पूर्वीचे नाव काय होते ते मात्र कळत नाही. मोसे खोर्‍यातील बाजी पासलकर यांचा संबंध या किल्ल्याशी होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला ताब्यात आल्यावर याची लष्करीदृष्ट्या पुर्नबांधणी केली. इंग्रजांबरोबर झालेल्या मराठ्यांच्या युद्धामध्ये कर्नल प्रॉथर याने याने हा किल्ला इ. स. १८१८ मध्ये जिंकून घेतला.
लांबुळक्या आकाराचा अवचितगड तटबंदी आणि बुरुजांनी परिवेष्टीत आहे. या भक्कम तटबंदीच्या आत पाण्याच्या टाक्यांचा समुह असून, एक उत्तम बांधणीचा तलाव आहे. गडावर पासलकरांची घुमटी आहे. गडावर महादेव मंदिर, दिपमाळ, गणपती, पार्वती, विष्णू यांच्या स्थानांबरोबर दक्षिणेकडील बुरुजावर शिलालेख ही पहायला मिळतो.
गडाच्या माथ्यावरुन कुंडलिका खोर्‍याचे तसेच कोकण रेल्वेचे दृष्य उत्तम दिसते. सूरगडाचेही दर्शन होते. अवचितगडावरुन पिंगळसईच्या मार्गाने उतरुन गावातील गणेश मंदिर पाहून रोहेकडे जाता येते. गडाची वाट सोपी आहे. गडावर जाण्यास तीन मार्ग आहेत. सर्वप्रथम मुंबईहून कोकण रेल्वेने रोह्याला पोचावे आणि तिथून पिंगळसई गावापर्यंत २० रुपये दराने शेअर रिक्षा मिळते. गावात शिरताच एक गणपतीचे सुंदर मंदिर आहे, पण आम्ही गेलो तेव्हा तिथे प्रचंड गर्दी होती. काही उत्सव किंवा पूजा असावी. जर गाडी घेऊन जात असाल तर पिंगळसई पर्यंत जाण्याची गरज नाही, रोह्याच्या आधी ६-७ किलोमीटर अंतरावर मेढा नावाचे गाव आहे. गावाची तंटामुक्ती गाव म्हणून मोठी कमान डाव्या बाजूला दिसते. तिथून शंकराच्या मंदिराकडे जावे. वाटेत एक मोठी पुष्करणीदेखील आहे. मंदिरासमोरून एक छोटं रेल्वेचे फाटक ओलांडून पुढे निघालो की थोड्या अंतरावर एक भलीमोठी विहीर आहे आणि तिथून उजव्या बाजूने जंगलातून वाट आहे. तिसरा मार्ग नागोठणे पासून पुढे रोह्याच्या दिशेने निघाल्यावर आहे. तिथे एक बंद कागद कारखाना आहे. कारखान्याच्या मागून गडावर जाण्यास मार्ग आहे. तिसऱ्या मार्गाबद्दल जास्त माहिती नव्हती. पिंगळसई मार्गाने गड माथ्यावर पोचायला किमान एक-दीड तास लागतो.
साक्षात रायगड भोवतालच्या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी ह्या किल्ल्यावर होती. किल्ला जास्त मोठा नाही, पण तिथे प्रचंड महसूल ठेवला जात असे. राजधानी जवळ असल्याने ही व्यवस्था केली होती. त्यामुळे महाराजांच्या श्रीमंत किल्ल्यांमध्ये अवचितगडाचेसुद्धा नाव येते. गडाचे स्थान हे त्याच्या जमेची बाजू आहे. गर्द रानात एका उंच डोंगरावर किल्ला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवणे सहज सोप्पे जाते.
गडावरील ठिकाणे: –
किल्ले अवचितगडाच्या मुख्य प्रवेश दरवाजातून डाव्या हातास “शरभ” हे शिल्प दिसेल. हे शिल्प सातवाहन किंवा शिलाहारांच्या काळातले, म्हणजे इसवी सनापूर्वीच्या ८०० ते १००० वर्षे इतके जुने असू शकते. यावरून या “किल्ले अवचितगड”चा भूतपूर्व इतिहास किती जुना आहे हे समजते. गडाच्या दोन्ही टोकास गोपुराप्रमाणे दिसणारे दोन बुरूज आहेत. गडाच्या दक्षिण बुरुजाकडील दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. त्या बुरुजाच्या भिंतीत एक शिलालेख आहे. त्यांतील मजकूर असा : “श्री गणेशाय नमः श्री जयदेव शके १७१८ नलनाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा.” दुसऱ्या दरवाज्यात पाण्याने भरलेले कुंड आहे. त्या कुंडातील पाणी पिण्यायोग्य आहे. जवळच खंडोबाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. उत्तरेकडील बुरुजावर एक उध्वस्त वाडा आहे. वाड्याच्या ईशान्येस आणखी एक बुरूज असून दक्षिणेकडील भिंतीत एक दरवाजा आहे. किल्ल्यात काही तोफा पडलेल्या आहेत.
दक्षिण दिशेस एक बालेकिल्ला आहे. त्याची लांबी-रुंदी अनुक्रमे ९०० फूट आणि ३०० फूट आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरेस दोन्ही टोकांना दोन दरवाजे आहेत. आत पाण्याचा एक द्वादशकोनी हौद आहे. पश्चिमेच्या अंगास खडकात कोरलेली पाण्याची सात टाकी आहेत. टाक्यांच्या मध्यभागी एक समाधी असून तिच्यापुढे एक दीपमाळ आहे.
पावसाळ्यानंतरचे येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे असते. इथल्या रानात रानडुकरे, माकड, बिबळ्या, कोल्हे, इ. प्राणी आढळतात. गडावरून समोरच तैलबैलाच्या दोन प्रस्तरभिंती, सुधागड, सरसगड, धनगड, रायगड, सवाष्णीचा घाट इ. परिसर न्याहळता येतो.
गडावर जाण्याच्या तीन वाटा : –
  • पिंगळसई मार्गः  अवचितगडावर जाण्यासाठी मुंबईकरांनी / पुणेकरांनी प्रथम रोह्याला यावे. येथून दीड तासाची पायी रपेट केल्यावर गडाच्या पायथ्याशी पिंगळसई गावात आपण पोहोचतो. हे अंतर अंदाजे ५ कि.मी. आहे. येथून गडावर जाणारी वाट सरळ आणि मळलेली असल्याने तासाभरात गडावर पोहोचता येते. या वाटेवर एक युद्धशिळा(वीरगळ) आहे.
  • मेढे मार्गे:  मुंबई – रोहा मार्गावर रोह्याच्या अगोदर ७.५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मेढे या गावी उतरावे. गावातून विठोबा मंदिराच्या मागूनच गडावर जाण्यासाठी वाट आहे. या वाटेने आपण एका तासात गडावर पोहोचतो. ही वाट दाट झाडीमधून जात असल्याने वाट चुकण्याची शक्यता आहे. या वाटेने आपण पडक्या बुरुजावरून गडावर पोहोचतो. बुरुजावरून डाव्या बाजूला कुंडलिका नदीच्या खोऱ्यायातील मेढे व पिंगळसई ही गावे दिसतात.
  • पडम मार्गे:  गडावर जाण्याचा तिसरा मार्ग पडम गावातून येतो. रोहा मार्गे पिंगळसई गावाला येतांना, रोहा-नागोठणे मार्गावर एक बंद पडलेला कागद कारखाना आहे. या कारखान्याच्या मागून जाणारी वाट गडाच्या दक्षिण प्रवेशद्वारापाशी घेऊन जाते. या वाटेने गडावर जाण्यास दोन तास पुरतात.

रायगड किल्ला


२९०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील पुणे डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
सह्याद्रीतील किल्ल्यांच्या रांगांतील हा एक दुवा आहे. रायगड हा निसर्गतःच डोंगरांनी वेढलेला असल्यामुळे ( तसेच) शत्रूच्या हल्ल्यापासून बचाव व्हावा यासाठी पुणे सोडून पश्चिम डोंगरात रायगड ही राजधानी महाराजांनी निवडली.
हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात रायगडाचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. महाडच्या उत्तरेस २५ कि.मी. वर हा किल्ला असून याची समुदसपाटी पासूनची उंची २८५१ फूट आहे. रायगड हा चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. याच्या उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे पसरलेले आहे. तर पश्चिमेला गांधारी नदी वाहते. याच्या पूर्वेला लिंगाणा, आग्नेयाला आकाश स्वच्छ असेल तर राजगड, तोरणा; दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा; उत्तरेला कोकणदिवा असा मुलूख दिसतो. रायगडपासून मुंबई, पुणे, सातारा ही शहरे सारख्याच अंतरावर आहेत. सह्याद्रीतील किल्ल्यांच्या रांगांतील हा एक दुवा आहे. रायगड हा निसर्गतःच डोंगरांनी वेढलेला असल्यामुळे ( तसेच) शत्रूच्या हल्ल्यापासून बचाव व्हावा यासाठी पुणे सोडून पश्चिम डोंगरात रायगड ही राजधानी महाराजांनी निवडली.
इतिहास :
रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य, दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी जेव्हा त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापूरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूर कडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला.
रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महारांजानी राजधानीसाठी या गडाची निवड केली. सभासद बखर म्हणते, ‘राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे द्शगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले. तक्तास जागा हाच गड करावा’. याच दुर्गदुर्गेश्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे. १. रायगड, २. रायरी, ३. इस्लामगड, ४. नंदादीप, ५. जंबुद्विप, ६. तणस, ७. राशिवटा, ८. बदेनूर, ९. रायगिरी, ११. भिवगड, १२ रेड्डी, १३. शिवलंका, १४. राहीर, १५. पूर्वेकडील जिब्राल्टर शिवराज्याभिषेक. शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना. ता. १९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकादि विधीपूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. तीन मण सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राजसभेत ता. ६ जून १६७४ ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक संपन्न झाला. ता. २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी अश्विन शु. ५ आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता.
हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते पार पडला. कवी भूषण रायगडाचे वर्णन करतो की, ‘शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वस्तीस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की, त्यात तीनही लोकींचे वैभव साठवले आहे. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले.’ इ.स. १६७५ फेब्रुवारी ४ शके १५९६ आनंद सवत्सर मागह व ५ गुरुवार या दिवशी संभाजी राजांची मुंज रायगडावर झाली. शके १६०१ सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व २, १६८० मार्च ७ या दिवशी राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली. लगेच आठ दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले. रायगडाने अनुभवलेला अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन शके १६०२ रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, दि. ३ एप्रिल १६८० या दिवशी महाराजांचे निधन झाले. सभासद बखर म्हणते, ‘ते दिवशी पृथ्वीकंप जाहला. अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्रीशंभुमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले.’ पुढे शके १६०२ रौद्र संवत्सर माघ शु. ७ इ.स. १६८१ १६ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महाराजांचे विधिपूर्वक राज्यारोहण झाले.
इ.स. १६८४ च्या सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडाच्या मोहिमेस सुरुवात केली. ता २१ रोजी शहाबुद्दीन खान यास चाळीस हजार सैन्यासह बादशाहने रायगडाच्या पायथ्याशी धाडले. १५ जानेवारी १६८५ च्या सुमारास शहाबुद्दीने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालुट चालू केली. पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो १६८५ च्या मार्चमध्ये परतला. औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा इतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. शके १६१० विभव संवत्सर फाल्गुन शु. ३.१२ फेब्रुवारी१६८९ रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि २५ मार्च १६८९ रोजी खानाने गडास वेढा घातला. दि. a title=”५ एप्रिल” href=”/April-5/”>५ एप्रिल१६८९ रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ आठ महिने वेढा चालू होता. पण दि. ३ नोव्हेंबर १६८९ रोजी सुर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितुर केले. झुल्फिकारखान हा बादशाहने इतिकादखानला दिलेला किताब आहे. पुढे रायगडाचे नामांतर ‘इस्लामगड’ असे झाले. ५ जून १७३३ या दिवशी शाहूमहाराजांच्या कारकिर्दीत रायगड पुन्हा मराठ्यांनी घेतला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
  • पाचाडचा जिजाबाईचा वाडा : उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नस, म्हणून महराजांनी त्यांच्यसाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेल दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.
  • खुबलढा बुरूज : गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज, बुरुजाशेजारी एक दरवाजा होता, त्यास ‘चित्‌ दरवाजा ’ म्हणत पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.
  • नाना दरवाजा : या दरवाजाश ‘नाणे दरवाजा’ असेही म्हणत. या दरवाजाचा संबंध नाना फडाणिसांशी लावला जातो ही पूर्णपणे गैरसमजूत आहे. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा. इ.स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाज्यास दोन कमानी आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यांस ‘देवड्या’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठीइ खोबणी दिसतात.
  • मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा : चित दरवाज्याने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकऱ्यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाच्या साधूचे थडगे आहे. येथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.
  • महादरवाजा : महादरवाजाच्या बाहेरील अम्गास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाज्यावर असणाऱ्या या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत ‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ‘श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ‘विद्या व लक्ष्मी’ होय. महादरवाज्याला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास ‘जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात तसेच सरंक्षकासाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.
  • पाचाडचा जिजाबाईचा वाडा : उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नस, म्हणून महराजांनी त्यांच्यसाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेल दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.
  • चोरदिंडी : महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते,त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाला आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत.
  • हत्ती तलाव : महादरवाज्यातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तीच्या स्नानासाठी आनि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.
  • गंगासागर तलाव : हत्तीतलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५०-६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्त्सागर व महानद्यांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगासागर असे नाव पडले. शिवकाळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई.
  • स्तंभ : गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात. त्यासच स्तंभ म्हणतात. जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभाचा उल्लेख केला आहे. ते हेच असावेत. ते पूर्वी पाच मजले होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते.
  • पालखी दरवाजा : स्तंभांच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१ पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्याव्र जोदरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाज्यातून आपल्या बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.
  • मेणा दरवाजा : पालखी दरवाज्याने वर प्रवेश केला की, चढ-उताअ असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो.
  • राजभवन : राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब ३३ फूट रुंद आहे.
  • रत्नशाळा : राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबनखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.
  • राजसभा : महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला, तीच ही राजसभा. राजसभा २२० फूट लांबव १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखर म्हणते, ‘तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले. नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती. त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली.’
  • नगारखाना : सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हानगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की आपण किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो.
  • बाजारपेठ : नगारखान्याकडून आपण डावीकडे उतरून आलो की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ‘होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवकाळातील बाजारपेठ. पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत. मधून जवळजवळ चाळीस फुट रुंद रस्ता आहे.
  • शिर्काई देऊळ : महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिर्काईचे देउळ. शिर्काई ही गडावरील मुख्य देवता.
  • जगदीश्वर मंदिर : बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्नावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढीलप्रमाणे, ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटळकर’ या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणे : श्री गणपतये नमः । प्रासादो जगदीश्वरम्य जगतामानं ददोनुज्ञया श्रीमच्छत्रपतेः शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः ।
    शाके षण्णवबाणभूमिगणनादान्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ॥१॥
    वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वितिकौ स्तभेःकुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते ।
    श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो यावच्चन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ॥२॥
    याचा थोडक्यात अर्थ पुढीलप्रमाणे : ‘सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमद छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे आशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असे तोवर खुशाल नांदो.’
  • महाराजांची समाधी : मंदिराच्या पूर्वदरवाजापासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी. सभासद बखर म्हणते ‘क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२ चैत्र ते शुद्ध १५ दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्यानी बांधिले असून वरून फरसबंदीच्या खाली पोकळी आहे. तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षामित्र मृत्तिकरुपाने सापडतो.’ दहनभूमी पलीकडे भग्न इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे. ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ.स. १६७४ मध्ये इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते. महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे ,बारा टाकी दिसतात.
  • कुशावर्त तलाव : होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशवर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेत नंदी दिसतो.
  • वाघ दरवाजा : कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की, ‘किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, यांकरिता गड पाहून एक दोन -तीन दरवाजे, तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्या.’ हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेऊनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाज्याने वर येणे जवळजवळ अशक्यच असते तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानचा वेढा फोडून याच दरवाज्याने निसटली होती.
  • टकमक टोक : बाजार पेठेच्या समोरिल टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे आपण टोकाकडे जातो तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी.
  • हिरकणी टोक : गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड खुबलढा बुरुज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेच्या माऱ्यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राच्या तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे.
गडावर जाण्याच्या वाटा :
  • मुंबई-गोवा मार्गावरील महाड या बस स्थानकापासून : मुंबई-गोवा मार्गावरील महाड या बस स्थानकामधून रायगडासाठी बसेस सुटतात. तसेच बस स्थानकात बाहेरून जीपगाड्याही जातात. बसने आल्यावर चित दरवाज्यापाशी, (जो आता अस्तित्वात नाही) जिथे पायऱ्या सुरू होतात तेथे उतरून पायऱ्यांनी गडावर जाता येते. जवळ जवळ १५०० पायऱ्या चढून गेल्यावर महादरवाजातून आपला गडात प्रवेश होतो.
  • नाना दरवाजाकडून : नाना दरवाजाकडूनही आपण गड चढू शकतो. पायऱ्यांकडून जो डांबरी रस्ता पुढे जातो त्या रस्त्याने थोडे पुढे जाऊन उजवीकडे एक पायवाट जाते. त्या वाटेने गेल्यास नानादरवाजाने आपण गड चढू शकतो.
  • रोप-वे : आता गडावर जाण्यासाठी रोप-वेची व्यवस्था झाल्याने पायथ्यापासून १० ते १५ मिनिटांत आपण गडावर पोहचू शकतो.
राहण्याची सोय : रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेमध्ये राहण्यासाठी खोल्या उपलब्ध आहेत. तसेच एम.टी.डी.सी. च्या बंगाल्यांमध्ये किंवा डॉरमिटरी हॉलमध्ये राहण्याची सोय होऊ शकते. रायगड जिल्हा परिषद, तालुका महाड, जिल्हा रायगड अथवा ‘महाराष्ट्र राज्य पर्यटन केंद्र, एक्सप्रेस टॉवर, नरिमन पॉइंट, मुंबई-२१’ यांच्याशी संपर्क केल्यास राहण्याची सोय होऊ शकेल. पायथ्याच्या पाचाड गावी व गडावर श्री देशमुख यांचे उपहारगृह आहे. पाचाडचा फोन - (९५२१४५) ७४८४८, ७४८८८. गडावर हॉटेल्स आहेत तेथे जेवणाची सोय होते. बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
गडावर जाण्यासाठी २ तास लागतात. पुण्याहून रायगडाला जाण्यासाठी दुपारी १.३० वाजता बस आहे. ती आपल्याला थेट किल्ल्याच्या पायथ्याशी खूबलढा बुरुजापाशी घेऊन जाते. महाडहूनदेखील रायगडासाठी दिवसातून तीन वेळा बस आहे.
खूबलढा बुरुजापासून पायऱ्या चढावयास सुरवात करुन रमत गमत गेले तरी दोन तासात आपण गडावर पोहोचतो. ज्यांना चालण्याने श्रम नको आहेत, अशांसाठी “जोग कन्स्ट्रक्शन” ने सोपी केलेली आहे.
किल्ल्यावर मुक्कामासाठी जिल्हा परिषदेच्या खोल्या आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने बंगले आहेत. भोजनाची व्यवस्था देशमुखांचे उपाहारगृह आणि म.प.वि.मं. चे कँटीन येथे होऊ शकते.
जिल्हा परिषदेच्या खोल्यांपाशीच एका मोठ्या फलकावर गडाचे मानचित्र चितारलेले आहे. त्याचा संदर्भ घेऊन संपूर्ण गड फिरणे अवघड नाही अथवा गो. नी. दांडेकराचे “शीवतीर्थ रायगड” हे माहिती पुस्तक देशमुखांच्या उपहारगृहात उपलब्ध आहे. राजसभाम टकमक टोक, बाजारपेठ, जगदीश्वराचे मंदिर, महाराजांची समाधी, हिरकणी बुरुज अशा नामवंत ठिकाणांव्यतिरिक्त वाघ दरवाजा, भवानी टोक अशी ठिकाणेही बघण्यास विसरु नका.

रायगड किल्ला | Raigad Fort