कोणतही शिवकाव्य येथे शोधा

नाशिक जिल्हा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नाशिक जिल्हा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

।। किल्ले हरिहरगड ।।



हरिहर किल्ला

किल्ल्याची उंची : -----
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः .....
जिल्हा : नाशिक
श्रेणी : मध्यम



नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड ऊर्फ हर्षगड आहे. हा किल्ला प्राचीन काळात बांधला गेलेला आहे. 
इतिहास : 
अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात हा गड होता. १६३६ साली शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हाही किल्ला जिंकून घेतला. मात्र नंतर याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली. ८ जानेवारी १६८९ रोजी मोगल सरदार मातब्बरखान याने हा किल्ला जिंकला. शेवटी १८१८ मध्ये हा गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. इतकी मालकी अनुभवणारा हा किल्ला इतिहासकाळात शेजारच्या त्र्यंबकगडा पाठोपाठ या भागातील महत्त्वाचा दुसरा किल्ला आहे. कारण आजही या किल्ल्याच्या पायथ्याच्या वाडयांना टाकेहर्ष, आखली हर्ष अशा नावाने ओळखले जाते.
असा हा त्रिकोणी आकाराचा हरिहरगड त्याचा सरळसोट दगडी जिन्याचा मार्ग, पुढे लागणारा बोगदा व गडावरील सर्व दुर्ग अवशेष वैशिष्टयपूर्ण असेच आहेत. त्याच्यावर पोहोचण्यासाठी दगडात खोदलेल्या खडया जिन्याच्या मार्गामुळे दुर्गयात्रींच्या परिचयाचा आहे. समुद्रसपाटीपासून ११२० मीटर उंचीवर उभा असलेला हा त्रिकोणी आकाराचा किल्ला, त्याचा कातळ कोरीव पाय-यांचा मार्ग, त्याची बोगद्यातून करावी लागणारी अंतिम चढाई हे सारं सारं गिरिप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. १८१८ सालच्या मराठेशाही बुडविण्याच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी हरिहरगड जिंकून घेतांना याच्या पाय-या बघून आश्चर्यचकित झाला व उद्गारला, "या किल्ल्याच्या पाय-यांचे वर्णन शब्दात करणे कठीणच. सुमारे २०० फूट सरळ व तीव्र चढाच्या या पाय-या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारखा वाटतात". खरेतर त्या वेळी इंग्रजांचे धोरण गिरीदुर्गाच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्या धोरणास अनुसरून त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केलेसुद्धा (उदा. अलंग-मदन- कुलंग, सिद्धगड, पदरगड, औंढा इ.) पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पाय-यांनी आपल्या राकट सौंदर्याची मोहिनी अशी काय कॅप्टन ब्रिग्जवर घातली की त्याने हरिहरगड जिंकून घेतला पण त्याच्या सुंदर पाय-यांच्या मार्गाला मात्र हात लावला नाही. यावरूनच लक्षात येते की हरिहर त्याच्या पाय-यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.

किल्ल्यावर पाहण्यासारखे : 
हरिहर किल्ल्याच्या पायथ्यावरून किल्ल्याच्या पाय-यांच्या मार्गाकडे दृष्टी देताच हा अक्षरश: गगनाला भिडलेला मार्ग पुढे आपणास स्वर्गारोहणाचा अद्भुत अनुभव देईल, याबद्दल मनात तिळमात्र शंका उरत नाही. काळ्या कातळात एका पाठोपाठ एक पाय-या कोरलेला हा दगडी जिन्याचा मार्ग एका वेळी एकच व्यक्ती वर चढू शकेल इतका अरुंद आहे. म्हणून काळजीपूर्वक वाटचाल करावी. शेवटी साधारण नव्वद पाय-यांचा सोपान चढल्यावर आपण हरिहर किल्ल्याच्या पहिल्या छोटेखानी पण देखण्या प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो. आपण येथे थोडा वेळ थांबून थंडगार वा-याचा आनंद घ्यायचा व पुढील चढाईस ताजेतवाने व्हायचे.
हरिहर किल्ल्याचे हे पहिले प्रवेशद्वार व त्याच्या दोन्ही बाजूस असणारे दोन लहान बुरूज कातळात खोदून काढलेल्या मार्गाची शोभा वाढवितात.
या  पुढे गेल्यानंतर आपण काही वेळातच किल्ल्याच्या अजस्र अशा काळ्या पहाडासमोर येतो. गडाच्या या प्रवेशद्वारा शेजारीच गणरायाची शेंदूर फासलेली एक छोटी मूर्ती दिसेल. गडावर ठिकाणी डोंगराच्या मध्यभागी शेंदूर फासून ठेवलेले अनगड देव आपणास दिसतील. त्यांच्या मध्यभागी एक त्रिशूळही रोवून ठेवलेला असून हा अनामिक देवतांचा दरबार येथून जाणा-या-येणा-यांचे लक्ष वेधून घेतो.या मार्गाने अंग चोरत पुढे गेल्यानंतर कातळातच खोदलेले दोन दरवाजे पार केल्यावर परत साधारण १३० पाय-यांचा दगडी जिना लागतो. या मार्गाच्या दोन्ही बाजूससुद्धा हाताचा पंजा रुतविण्यासाठी खोबणी असून त्यांची मदत घेत आपण धापा टाकत शेवटी अंतिम प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो. हरिहर किल्ल्याचा हा शेवटचा छोटा दरवाजा पार करून थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला खालच्या बाजूला एक गुहा आहे. पण तिथे उतरण्यासाठी दोराची मदत घेणे गरजेचे ठरते. त्यामुळे वरूनच ही गुहा पाहून पुढे गेल्यावर गडाच्या सदरेचे अवशेष आपणास दिसतात. ते पाहून पुढे गेल्यावर तीन पाण्याची टाकी व एक प्रशस्त तलाव लागेल. पश्चिम बाजूने दगडी भिंत बांधून पाणी अडविलेल्या या तलावाच्या काठावर हनुमंताचे छोटे देऊळ असून येथील बाजूच्या खडकावर उघडयावरच शिवलिंग व नंदी आपणास दिसेल.
पुढे पायवाटेच्या उजव्या हातास ५०-६० फूट उंचीची एक टेकडी आपणास दिसते. हरिहर किल्ल्याचा सर्वोच्च माथा असणारी ही टेकडी आपण शेवटचा कातळटप्पा चढून पार करायची. येथे माथ्यावर पोहोचताच अगदीच छोटया सपाटीवर देवांची दाटी दिसते. या टेकडीच्या माथ्यावरून सभोवारचे दृश्य मात्र फारच छान दिसते. उत्तरेला नजर फेकताच वाघेरा तर दक्षिणेला वैतरणा तलावाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले कावनाई व त्रिंगलवाडी किल्ल्याचे डोंगर फारच आकर्षक दिसतात. पूर्वेला कापडया, ब्रह्मा व त्यांच्या मागे ब्रह्मगिरीचा किल्ला उर्फ त्र्यंबकगड दिसतो.
खाली उतरून समोरील घुमटाकार माथा असलेल्या दगडी ३० फूट लांब व १२ फूट रुंद अशा या दगडी कोठीत जावे. कोठीचा प्रवेशद्वार मात्र अगदी छोट्या खिडकीसारखे असून या कोठीत दिवसासुद्धा काळोख असतो. इतिहास काळातील ही दारूकोठाराची वास्तू गडावरील एकमेव छत शाबूत असलेली इमारत आहे. येथून समोर दिसणारा ब्रह्मा डोंगर फारच सुंदर दिसतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. संपूर्ण गडफेरी व्यवस्थितरीत्या पूर्ण करण्यास दोन तास लागतात. गड पाहून परत उतरताना मात्र आपणास काळजीपूर्वक उतरावे लागते.
 
गडावर कसे जाल :
हरिहरला भेट देण्यासाठी आपण नाशिकच्या बसस्थानकावरून घोटी किंवा खोडाळ्याला जाणारी बस पकडायची. त्या बसने आपण उतरायचे मात्र निरगुडपाडा गावात. बसमधून पायउतार होताच समोरच्या उजव्या हाताला हरिहर ऊर्फ हर्षगडचा वैशिष्टयपूर्ण डोंगर दिसतो. तेथून अगदी मळलेल्या वाटेने आपण तासाभरात हरिहर किल्ल्यासमोरील मोकळ्या पठारावर येऊन पोहोचतो. जे दुर्गप्रेमी त्र्यंबकेश्वरहून इकडे येणार आहेत त्यांना सोईचा असा एक दुसरा मार्गसुद्धा आहे. त्र्यंबकेश्वराहून मोखाडा किंवा जव्हारला जाणा-या बसने त्यांनी साधारण १५ कि.मी. चा प्रवास केल्यावर डाव्या हातास हर्षवाडी फाटयावर उतरावे. येथून कळमुस्ते मार्गे साधारण ४ कि.मी.ची पायपीट केल्यानंतर आपण हर्षवाडीजवळ येऊन पोहोचतो. येथून एका बंधा-याच्या काठाने पुढे साधारण पाऊण तासाची खडी चढाई केल्यानंतर आपण हरिहर किल्ल्यासमोरील मोकळ्या पठारावर येऊन पोहोचतो. या रम्य वाटेवर एक आश्रम, त्याच्या शेजारी प्राचीन दगडी पुष्करिणी व गणेश मंदिरही आपणास पाहता येते. निरगुडपाडयावरून काय किंवा हर्षवाडीकडून काय, दोन्ही वाटा आपणास साधारण तासाभराच्या पायपिटीनंतर हरिहर किल्ल्यासमोरील मोकळ्या पठारावर आणून सोडतात.

राहण्याची सोय : राहण्याची सोय नाही.

पाण्याची सोय : पाण्याची व जेवणाची सोय स्वतः करावी.

गड पाहण्यासाठी लागणारा वेळ : साधारणता २-३ तास लागतात.

।। किल्ले रांजणगिरी ।।


रांजणगिरी किल्ला

किल्ल्याची ऊंची : २७९० मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग.
 डोंगररांग: त्र्यंबकेश्वर.
श्रेणी : मध्यम .
जिल्हा : नाशिक.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर रांगेत रांजणगिरी हा किल्ला आहे. नाशिक शहर हे प्राचिन काळापासून मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिध्द होते. डहाणू बंदरात उतरलेला माल जव्हार - गोंडाघाट - अंबोली घाट या मार्गे नाशिकला येत असे. या व्यापारीमार्गाचे रक्षण करण्यासाठी जव्हार जवळ भूपतगड तर घाटमाथ्यावर त्र्यंबकगड, बसगड(भास्करगड), हर्षगड, रांजणगिरी, अंजनेरी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली.
रांजणगिरीच्या दक्षिण टोकाला असलेल्या सुळक्याचा आकार रांजणासारखा असल्यामुळे या किल्ल्याला "रांजणगिरी" हे नाव पडले असावे.

गडावरील पहाण्याची ठिकाणे :
या किल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी, बुरुज आज अस्तित्वात नाहीत. आडव्या पसरलेल्या या गडावर पाण्याची दोन टाकं आहेत. गडावर प्रवेश करण्यापूर्वी रांजणासारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेल्या सुळक्याला वळसा घालून जावे लागते. प्रस्तरारोहणाचे प्राथमिक तंत्र वापरुन हा सुळका सर करता येतो.
 
गडावर पोहोचण्याच्या वाटा:
मुंबई - नाशिक महामार्गावर नाशिकच्या अलिकडे १५ किमी वर मुळेगावकडे जाणारा रस्ता लागतो. मुळेगाव हे रांजणगिरीच्या पायथ्याचे गाव आहे. डोंगराच्या सोंडेवरुन साधारण १ तासात किल्ल्यावर जाता येते.

राहाण्याची सोय : गडावर रहाण्याची सोय नाही.

जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही.


पाण्याची सोय : गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.


गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ : मुळेगावातून गडावर जाण्यास एक तास लागतो.

।। किल्ले भास्करगड ।।



भास्करगड (बसगड) किल्ला
किल्ल्याची उंची : समुद्रसपाटीपासून ३५०० मीटर
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
श्रेणी : मध्यम
जिल्हा :
नाशिक
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि इगतपूरीच्या उत्तरेस एक डोंगररांग पसरलेली आहे, त्यास "त्र्यंबक रांग" असेही म्हणतात. ही रांग दोन भागात विभागली गेली आहे. पहिल्या टप्प्यात बसगड, हरिहर हे गड वसलेले आहेत, तर दुसर्या टप्प्यात ब्रम्हगिरी, अजनेरी हे किल्ले येतात.प्राचिनकाळी नालासोपारा, डहाणू, वसई इ बंदरात उतरणारा माल वेगवेगळ्या घाटमार्गांनी नाशिक या शहराकडे जात असे. यापैकी गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी ‘भास्करगड’ किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती.

इतिहास :
त्र्यंबक डोंगररांगेच्या दक्षिण टोकावर असलेल्या या किल्ल्याचा इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. पण काताळात खोदलेल्या किल्ल्यावर जाण्याचा सर्पिलाकार मार्ग व पाण्याची सातवहान कालीन टाकी किल्ल्याच प्राचिनत्व सिध्द करतात.
इ.स १२७१ ते १३०८ पर्यंत हा किल्ला देवगिरीच्या अधिपत्याखाली होता. नंतर बहामनी पुढे निजामशाही यांच्याकडे किल्ला होता. निजामशाहीच्या अंतकाळात इ.स १६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड केले, तेव्हा भास्करगड त्यांच्या ताब्यात गेला. १६३३ मध्ये शहाजी राजांकडून हा किल्ला मोगलांकडे गेला १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने हा किल्ला जिंकून घेतला.१६८८ मध्ये मोगलांनी भास्करगड जिंकून घेतला. इ.स १७३० मध्ये कोळ्यांनी बंड करुन तो घेतला पूढे १८१८ पर्यंत हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता.

गडावरीलपहाण्याची ठिकाणे :
भास्करगडचा माथा बेसॉल्ट खडकाचा बनलेला आहे. किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे काताळात खोदून काढलेला सर्पिलाकार जिना. असमान उंचीच्या पायर्या असलेल्या या जिन्याच्या दोन्ही बाजूला १० फूट उंचीच्या कातळभिंती आहेत. जिन्याचा मार्ग आपल्याला पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारासमोर घेऊन जातो. प्रवेशद्वार कमानीच्या महिरपीपर्यंत मातीत गाडल गेलेल आहे. प्रवेशद्वारातून रांगत जाऊन किल्ल्यात प्रवेश करावा लागतो. प्रवेशद्वाराच्या आतील रचनेवरुन तेथे पहारेकर्यांसाठी देवड्या असाव्यात. पण आज हा सर्व भाग मातीखाली गाडला गेलेला आहे.

प्रवेशद्वारातून किल्ल्यात शिरल्यावर समोर व उजव्या बाजूला अशा दोन वाटा फूटतात. या दोनही वाटा किल्ल्याच्या पठारावर जातात. पण उजव्याबाजूच्या पायवाटेने १० मिनीटे चढल्यावर आपण किल्ल्याच्या विस्तिर्ण पठारावर पोहचतो. किल्ल्याच्या पठारावर पडक्या वास्तूंचे, मंदीराचे अवशेष, बुजलेली टाक, साचपाण्याचा तलाव त्याच्या कठी असलेला व दगडात कोरलेला हनुमान असे अवशेष पाहायला मिळतात.
गडावर जाण्याच्या वाटा:
खोडाळ्यातून त्र्यंबकेश्वरला जाताना "निरगुडपाडा" या गावाच्या अलिकडे एक कच्चा रस्ता फणीच्या डोंगराला उजव्या बाजूला ठेवत बसगडच्या पायथ्याशी पोहचतो. बसगडच्या पायथ्याशी पोहचण्यापूर्वी एक नाला ओलांडावा लागतो. नाला ओलांडल्यावर भास्करगडच्या चढाइला सुरुवात होते. दिड तास मळलेल्या पायवाटेवरुन केलेल्या चढाइ नंतर आपण कातळकड्याच्या पायथ्याशी येतो. येथून उजव्याबाजूने जाणारी पायवाट कातळकड्याला वळसा घालून कातळात खोदलेल्या पायर्यांपाशी येते. पायर्या चढून गेल्यावर प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश करतो.

"निरगुडपाडा" हे गाव खोडाळा - त्र्यंबकेश्वर मार्गावर आहे. त्र्यंबकेश्वर पासून २० किमी वर निरगुडपाडा गाव आहे. येथे जाण्यासाठी मुंबईहून २ मार्ग आहेत.

१) मुंबई - कल्याण - कसारा - खोडाळा - निरगुडपाडा ( १९४ किमी),

२) मुंबई - कल्याण - भिवंडी - वाडा - खोडाळा - निरगुडपाडा (१९० किमी)

३) कसारा किंवा नाशिक मार्गे :- कसारा किंवा नाशिक मार्गे इगतपूरी गाठावे. इगतपूरीहून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी बस पकडावी. वाटेत असणारे निरगुडपाडा हे भास्करगडाच्या पायथ्याचे गाव आहे. गावातून किल्ल्यावर जाण्यास दोन तास पुरतात. भास्करगडाच्या कातळभिंती जवळ पोहोचल्यावर पुढे किल्ल्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्या आहेत.
तसेच इगतपूरी व नाशिकहून त्र्यंबकेश्वरमार्गे निरगुडपाड्याला जाता येते. हरीहर गड व भास्करगड या दोनही गडांच्या पायथ्याचे गाव निरगुडपाडा आहे.

रहाण्याची सोय : गडावर रहाण्याची सोय नाही, निरगुडपाड्यात होऊ शकते.
जेवणाची सोय व पाण्याची सोय :  गडावर किंवा गावात जेवणाची व पाण्याची सोय नाही. आपण स्वतःच करावी.

किल्ले बितनगड

 


किल्ल्याची उंची : ४०००  मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग.
डोंगररांगः कळसूबाई.
 श्रेणी : मध्यम.
जिल्हा :  नाशिक.
बितनगड हा किल्ला कळसूबाईच्या डोंगर रांगेत पुर्वेला आहे. ह्या पूर्व रांगेत आणखीन असणारे किल्ले म्हणजे औंढा, पट्टा, आड आणि म्हसोबाचा डोंगर. बितनगड किल्ल्याच्या माथ्यावरुन आपल्याला पूर्वेकडे कळसूबाई रांगेतले अलंग, मदन, कुलंग आणि कळसूबाईचा डोंगर दिसतो.

गडावरील पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याचा माथा लहान आहे. ह्या किल्ल्याचा उपयोग टेहाळणीसाठी केला जात असावा. किल्ल्यावर एक गुहा आणि एक पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. काही उध्वस्त वास्तु आहेत. किल्ल्यावरुन दिसणारा आजुबाजुचा परिसर, डोंगररांगा मनाला भुरळ घालतात.

गडावर पोहोचण्याच्या वाटा :
घोटी - भंडारदरा रस्त्यावर टाकेद गावात जाणारा फाटा आहे. या गावातून एकदरा फाटा अंदाजे १२ किमी अंतरावर आहे. एकदरा फाट्यापासून बितनगडाच्या पायथ्याचे बितनवाडी गाव ६ किमीवर आहे.
गडाच्या पायथ्याशी बितंगवाडी हे गाव आहे. या गावातून किल्ल्याकडे जाता येत. शेतातून वाट काढत आपण किल्ला चढायला सुरुवात करतो. किल्ला चढायला कठीण नाही, पण खडकात खोदलेल्या पायर्‍या चढताना नीट चढून जाण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दोरी (रोप) असू द्यावी. पावसाळ्यात शेवाळ्यामुळे पायर्‍या निसरड्या होऊ शकतात. नोव्हंबर ते फेब्रुवारी ही किल्ल्यावर जाण्याची उत्तम वेळ आहे.

गडावर राहाण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. बितंगवाडीत राहता येतं. टाकेद (बितंगवाडी पासून सुमारे १५ किलोमीटर) या गावातील जटायूच्या देवळात राहण्याची सोय होऊ शकते.

जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही.

पाण्याची सोय : गडावर पाण्याची सोय नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ : बितंगवाडीतून १ तास लागतो.

जाण्यासाठी उत्तम कालावधी :
नोव्हंबर ते फेब्रुवारी ही किल्ल्यावर जाण्याची उत्तम वेळ आहे.

किल्ले डुबेरा /देविगड


 

किल्ल्याची उंची : -----  मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग.
डोंगररांगः कळसूबाई.
 श्रेणी : सोपी.
जिल्हा : नाशिक.

नाशकातल्या सिन्नर तालुक्यात ठाणगाव सिन्नर रस्त्यावर सिन्नरच्या थोडेसे अलीकडे, ४ किलोमीटर अंतरावर डूबेरा नावाचे छोटेसे गाव आहे. गावाच्या मागच्या बाजूस देवीच्या देवळाचा कळस घेऊन उभा असलेला डूबेरगड दिसतो. गावाला एक प्रवेशद्वार आणि थोडीफार तटबंदी आहे. डूबेर गडाला देविगड असेही संबोधले जाते.

इतिहास :
डूबेरा हे गाव पहिल्या बाजीरावाचे आजोळ आहे. येथील बर्वे घराण्यातील मुलगी बाळाजी विश्वनाथांची पत्नी झाली व इ.स १७०० मध्ये बाजीरावाचा जन्म इथेच बर्वेंच्या वाड्यात झाला. तिथे आजही त्यांचे वंशज राहतात. पूर्वभिमुख असलेल्या बर्वेंच्या वाड्याला दोन भव्य प्रवेशद्वारे आहेत व गावाला दोन भव्य वेशीही बांधलेल्या आहेत. शिवशाहीत मल्हार अंताजी बर्वे यांना हे गाव सोपवले गेले. त्यानंतर हे घराणे इथेच स्थायिक झाले. तटबुरुजाचा वाडा पाहयचा असल्यास जरूर यावे.

गडावर पाहण्यासारखे  ठिकाणे :

डूबेरगडावर जाण्यासाठी अंजनेरी किल्ल्याप्रमाणे सिमेंटच्या पाचशे पायऱ्या बनवलेल्या आहेत. किल्ल्यावर एक तलाव आहे, तलावाच्या बाजूलाच सप्तशृंगी देवीचे एक मंदिर आहे, या मंदिरातील मूर्ती वाणीच्या मूर्तीसारखी असून गडावर बंद पडलेल्या टॉवरची इमारत आणि पाण्याची दोन टाकी आहेत.
गडाच्या माथ्यावरून वायव्य दिशेला वणीचा सप्तश्रुंगगड, मार्कंडेय पर्वत, रावळ्या – जावळ्या हे जोड किल्ले इ. शिखरे दिसतात.
  
गडावर जाण्याचे वाटा : 
सिन्नरच्या पश्चिमेला घोटी गावच्या रस्त्यावर डूबेरा हे गाव आहे. सिन्नर वरून दर तासाला एक एस.टी या गावात जाते. या गावातून गडावर जाण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो.
राहाण्याची सोय : गडावर राहाण्याची सोय नाही.

पाण्याची सोय : गडावर पिण्यास पाणी नाही ते सोबत न्यावे लागते.
जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.

किल्ले गाळणा


किल्ल्याची उंची : २०००  मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग.
 श्रेणी :
मध्यम .
जिल्हा :
नाशिक .
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
किल्ल्याचा परिसर हा किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्या पासूनच सुरु होतो. या दरवाज्याच्या आजुबाजुला पडक्या तटबंदीचे अवशेष दिसतात. या दरवाज्याच्या बाजुला पहारेकर्‍याच्या देवड्या सुध्दा आहेत. येथून आत शिरल्यावर आपण गडाच्या दुसर्‍या दरवाज्यात पोहचतो. दरवाजा पाहूनच आपल्याला त्याच्या मजबूतीची पूर्ण कल्पना येते. दरवाज्याच्या वरच्या भागातील महिरीपी पाहून त्या काळातील कलाकुसरीची कल्पना करता येते. दरवाज्याच्या वरच्या भागात एक पर्शियन शिलालेख कोरलेला आहे. दरवाज्यातून आत गेल्यावर पहारेकर्‍यांच्या देवड्या लागतात. या दरवाज्याला लोखंडी दरवाजा असेही म्हणतात. दरवाज्याच्या आतल्या बाजूने कमानीवर जाता येते.
या दरवाज्यातून थोडे पूढे गेल्यावर दोन वाटा फुटतात, एक वाट उजवीकडे तिसर्‍या दरवाज्याकडे वळते, तर समोरची वाट दिंडी दरवाज्याकडे जाते. दिंडी दरवाज्यातून एक वाट खाली गावात उतरते, पण ही वाट बरीच गैरसोयीची आहे. तिसर्‍या दरवाज्यातून आत शिरल्यावर पुढची वाट काटकोनात वळते. या ठिकाणी एका बाजूला कातळभिंत तर दुसर्‍या बाजुला किल्ल्याची तटबंदी यामधील चिंचोळ्या भागातून आपण पुढे जातो. थोड्याच अंतरावर किल्ल्याचा चौथा दरवाजा लागतो. दरवाज्यातून आत शिरल्यावर तीन वाटा लागतात. समोर जाणारी वाट ही किल्ल्याच्या माथ्यावर जाते. आपण आधी डावीकडची वाट पकडायची. तटबंदीवरुन चालत असतांना गाळण्याची तटबंदी किती मजबूत आहे, याची कल्पना येते. बुरुजांवर तोफा ठेवण्यासाठी असणार्‍या खांबाची व्यवस्था केलेली दिसते. या भागाच्या सर्वात शेवटी एक गुप्त दरवाज्या आहे. पण तिथपर्यंत जाण्याची वाट ढासळलेली आहे. तटबंदी आणि किल्ल्याची कातळभिंत यामध्ये बरीच पाण्याची टाकी सुध्दा आहेत. हे सर्व पाहून चौथ्या दरवाज्यापाशी परतायचे.
आता उजवीकडची वाट धरायची, तटबंदीवर असणारी एक कमान ढासळलेली असल्याने तिथपर्यंत जाता येत नाही. थोडे पुढे गेल्यावर आपण सज्जापाशी येऊन पोहचतो. हाच तो सज्जा जो खालून आपले लक्ष वेधून घेत असतो. इथून किल्ल्याचे चारही दरवाजे व्यवस्थित दिसतात. इथून पुढे गेल्यावर डावीकडच्या कातळात काही गुहा कोरलेल्या दिसतात. यापैकी एका गुहेत महादेवाची पिंड आहे. तिचे दर्शन घेऊन पुढे निघायचे, डावीकडची तटबंदी अचानक खाली काटकोनात वळते. इथेच कोपर्‍यात एक गुप्त दरवाजा आहे. यातून खाली उतरण्याची वाट आपल्याला राजगडाच्या तिहेरी तटबंदीमधून काढलेल्या दरवाज्यातून खाली उतरणार्‍या पायर्‍यांची आठवण करुन देते. खाली उतरल्यावर समोरच एक पाण्याचे टाके दिसते. इथून थोडे अंतर पुढे गेल्यास एक वाट कातळातून खाली उतरत जाऊन किल्ल्याच्या दुसर्‍या दरवाज्याला येऊन मिळते. पण ही वाट बरीच कठीण आहे. हे सर्व पाहून दरवाज्यातून वर यायचे किल्ल्याची तटबंदी बरीच लांब पर्यंत पसरलेली दिसते. वेळ असल्यास या तटबंदीवरुन चालत जाऊन संपूर्ण किल्ल्याला वळसा सुध्दा मारता येतो. अन्यथा माघारी फिरुन चौथ्या दरवाज्यापाशी यायचे आणि माथ्याकडची वाट धरायची. वर पोहचल्यावर समोर एक दर्गा दिसतो. या दर्ग्याची इमारत दुमजली आहे. दर्ग्याच्या आतील खांबावर अरबी मधील कुराणाच्या आयत्या कोरलेल्या आहेत. मागचा जिना चढून दर्ग्याच्या गच्चीवर चढून जायचे. गच्चीवरुन कंक्राळ किल्ला, धुळ्याचा लळींग, भामेर याचे सुंदर दर्शन होते. दर्ग्याच्या मागच्या बाजूस एक बांधीव तळे आहे. हेच काय ते किल्ल्यावरील एकमेव पिण्याच्या पाण्याचे तळे. दर्ग्याच्या समोरुन एक वाट किल्ल्याच्या पूर्व टोकाला जाते. येथे काही वाड्यांचे अवशेष आहेत. दर्ग्या जवळून एक वाट किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याकडे जाते. या वाटेने सर्वोच्च माथा गाठायचा. या माथ्यावर काही कबरी आहेत. एक दोन वाड्यांचे अवशेष सुध्दा आहेत. येथून किल्ल्याचा पूर्ण घेरा नजरेस पडतो. 
संपूर्ण गड फिरण्यास ७ ते ८ तास लागतात. गडफेरी करायची असल्यास ४ तास जास्तीचे हवेत.
गडावर जाण्याच्या वाटा :
गाळणा किल्ल्यावर जाण्यासाठी मालेगाव आणि धुळे या दोंन्ही बाजूंनी रस्ते आहेत. आपल्याला मालेगाव - डोंगराळे मार्गे गाळणा गावात पोहचता येते. मालेगावाहून डोंगराळे पर्यंत येण्यास एसटी बसेस आहेत. मालेगाव - डोंगराळे अंतर साधारणत: ३० किमी आहे. धुळ्याहूनही डोंगराळ्याला बसेस आहेत. हे अंतर साधारणपणे ३५ कि.मी आहे. डोंगराळेहून ४ किमी अंतरावर असलेल्या गाळणा गावात पोहचता येते. गाळणा हेच किल्ल्याच्या पायथ्याच्या गाव. गाळणा गावात गोरक्षनाथाचा एक मठ आहे. या मठाच्याच बाजूने किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. या वाटेने आपण अवघ्या १० मिनीटांतच किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्यात पोहोचतो.
गडावर राहायची सोय :
किल्ल्यावर एक दर्गा आहे. यात २० ते २५ लोकांची राहण्याची सोय होऊ शकते. जेवणाची सोय गाळणा गावात होऊ शकते. किल्ल्यावर राहायचे असल्यास स्वत:चा शिधा असणे उत्तम. दर्ग्याच्या मागील बाजूस पिण्याच्या पाण्याचे तळे आहे.

गडावर पाण्याची सोय : गडावर पिण्यास पाणी नाही ते सोबत न्यावे लागते.

गडावर जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.

औंढा / अवंध किल्ला – Aundha Fort

aundha

किल्ल्याची ऊंची: ४४०० फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: कळसूबाई
श्रेणी: कठीण
जिल्हा: नाशिक
तालुका: सिन्नर
सह्याद्रीची उत्तर दक्षिण रांग इगतपूरी परिसरातून थळघाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. या रांगेचे दोन भाग पडतात. एक म्हणजे अलंग, मदन, कुलंग आणि कळसूबाई, तर पूर्वेकडील औंढा, पट्टा, बितनगड, आड, म्हसोबाचा डोंगर. वृक्षतोडी मुळे हा सर्व परिसर उजाड झालेला आहे. मात्र एसटी ची सोय आणि भरपूर पाऊस यामुळे ग्रामीण जीवन बरेच सुखी झालेले आहे. औंढा किल्ल्यावरचा भाग म्हणजे एक सुळकाच आहे. औंढा किल्ला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या नैऋत्येस आणि देवळालीच्या दक्षिणेस १० मैलांवर आहे.
इतिहास
इ.स.१६८८ पर्यंत हा किल्ला मराठ्याच्या राज्यात होता. यानंतर तो मोगलांनी जिंकून घेतला. येथे मोगलांचा सरदार श्यामसिंग यांची किल्लेदार म्हणून नेमणूक झाली होती.
पहाण्याची ठिकाणे
औंढाचा किल्ला म्हणजे एक सुळकाच आहे. यामुळे किल्ल्याचा माथा तसा लहानच आहे. याचा उपयोग टेहळणीसाठी होत असे. गडावर पाण्याच्या चारपाच टाक्या आहेत. एका गुहेत पाणी आहे. खड्‌कात खोदलेला दरवाजा आहे. गडावरुन समोरच पट्टा किल्ला, बितनगड, अलंग,मदन आणि कुलंग, कळसूबाई असा सर्व परिसर दिसतो. गड पाहण्यास अर्धा तास पुरतो.
पोहोचण्याच्या वाटा
औंढा किल्ल्याला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
निनावी मार्गे:
मुंबई मार्गे इगतपुरी गाठावी. इगतपुरी बस स्थानका वरून सकाळी ७.०० वाजता भगूर कडे जाणारी एसटी पकडून साधारणत… दीड तासाच्या अंतरावरील कडवा कॉलनी नाक्यावर उतरावे. या कॉलनी पासूनच आपली पायपीट चालू होते. कॉलनीतून पुढे गेल्यावर कडवा धरण लागते. धरणाच्या भिंतीवरून पुढे गेल्यावर (साधारणत: नाक्या पासून ४५ मिनिटांत) आपण निनावी गावात पोहोचतो. निनावी गावातून औंढा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
पहिली वाट गावातून समोरच दिसणाया उभ्या कड्याच्या घळी मधून जाते. ही वाट मात्र मस्त दमछाक करणारी आहे. दुसरी वाट निनावी गावातील दुसया हनुमान मंदिराजवळून जाते. ही वाट कमी दमछाक करणारी, पण पहिल्या वाटेपेक्षा जास्त वेळ लावणारी आहे. या वाटेने किल्ल्याचे पठार गाठण्यास पाऊण तास लागतो. या पठारावरच औंढा किल्ल्याचा सुळका ठेवल्या सारखा दिसतो. येथून किल्ल्याच्या पायर्‍यांपर्यंत जाण्यास अर्धा तास लागतो. समोरच कातळात कोरलेल्या पायर्‍या लागतात. पायर्‍या चढून गेल्यावर कडा उजवीकडे ठेवून पुढे गेल्यावर शेवट्च्या ट्प्प्यात थोडे प्रस्तरारोहण करुन गडमाथा गाठता येतो.
पट्टा किल्ला मार्गे:
अनेक जण औंढा – पट्टा – बितनगड असा ट्रेक करतात. औंढा किल्ल्याहून पट्टा किल्ल्याला जाण्यासाठी वरील मार्गाने किल्ल्याच्या पायर्‍या असणार्‍या पठारावर परतावे. पठारावरून समोरच एक भगवा झेंडा फडकतांना दिसतो, येथून पुढे जाणारी वाट थेट पट्टा किल्ल्यावर जाते.
aundha

हरगड किल्ला – Hargad Fort



किल्ल्याची ऊंची: ४४२० फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: बागलाण
श्रेणी: मध्यम
जिल्हा: नाशिक
तालुका: सटाणा
साल्हेर – मुल्हेर किल्ले महाराष्ट्रातील गडप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहेत. यातील मुल्हेर गावात गेल्यावर आपल्याला हरगडचे दर्शन होते. मुल्हेर गावातून समोर दिसणारा मुल्हेर, डावीकडे मोरागड आणि उजवीकडचा हरगड किल्ला होय. हरगडाची उंची मुल्हेरपेक्षा थोडी जास्त आहे.
पहाण्याची ठिकाणे
हरगडाचा गडमाथा प्रशस्त आहे. मुल्हेर माचीवरुन येणार्‍या वाटेने गडावर प्रवेश करताना तीन दरवाजे लागतात. सगळ्या दरवाजांची पडझड झालेली आहे. दरवाजा असल्याच्या खुणा केवळ शिल्लक आहेत. सर्वात शेवटच्या दरवाजाने गडावर प्रवेश केल्यावर समोरच महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या समोर चार दगडी तोफगोळे पडलेले आहेत.
मंदिरासमोरुन दोन वाटा फ़ुटतात. डावीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर पाण्याचे एक टाके लागते. तेथेच समोर घरांचे व वाड्याचे अवशेष दिसतात. पाण्याच्या टाक्याच्या खालून एक वाट खाली उतरते. या वाटेने खाली उतरल्यावर आपण एका तळ्याजवळ पोहोचतो. तळ्याच्या मागच्या बाजूला एक गुप्त दरवाजा आहे. हे सर्व पाहून पुन्हा मंदिरापाशी परत यावे. आता उजवीकडची वाट पकडावी आणि गडाच्या दुसर्‍या टोकाला पोहोचावे. गडाच्या या टोकावर भली मोठी १४ फ़ूट लांबीची तोफ़ पडलेली दिसते. एवढी मोठी तोफ़ किल्ल्यावर कशी आणली असेल हे एक कोडेच आहे. गडावरुन मुल्हेर गडाची माची, मोरागड, न्हावीगड, मांगीतुंगी आणि साल्हेर असा सगळा परिसर दिसतो. गडमाथा फ़िरण्यास २ तास पुरतात
पोहोचण्याच्या वाटा
हरगड किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा अस्तित्वात आहेत. या दोन्ही वाटा मुल्हेरवाडी गावातूनच जातात. मुल्हेरवाडी गावात पोहोचण्यासाठी नाशिक मार्गे ९५ किमी वरील सटाणा गाव गाठावे. सटाण्याहून २५ किमी वरील ताहाराबादला जावे. ताहाराबाद गावातून ७.५ किमी वरील मुल्हेरवाडीला जाण्यासाठी एसटी किंवा जीप मिळतात. मुल्हेरवाडी गाव ते किल्ल्याचा पायथा यात २ कि.मी चे अंतर आहे. गावातून २५ मिनिटे चालत गेल्यावर डावीकडे एक घर लागते आणि समोरच वडाचे एक झाड दिसते. झाडापासून सरळ पुढे जावे, दहा मिनिटांतच धनगरवाडी लागते. धनगरवाडी वरून जाणारी वाट पकडावी. साधारण ४५ मिनिटांनी २ वाटा फुटतात, एक वाट सरळ, तर दुसरी उजवीकडे वळते. उजवीकडे जाणार्‍या वाटेने ४५ मिनिटांत मुल्हेर माची आणि हरगड यांच्या मधील खिंडीत पोहोचता येते. या खिंडीतून डावीकडे मुल्हेर तर उजवीकडे हरगड लागतो. या खिंडीत डावीकडून मुल्हेरच्या गणोश मंदिराजवळून येणारी वाट सुध्दा येऊन मिळते. येथून पुढे अर्धा तास चालत गेल्यावर आपण एका घळी पाशी पोहचतो. या घळीतून वर चढल्यावर आपण हरगडाचे पहिले प्रवेशद्वार गाठू शकतो. संपूर्ण घळ पार करण्यास १ तास लागतो.
राहाण्याची सोय: किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय: किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय: किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याचा तलाव आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ: मुल्हेरवाडी गावातून हरगडावर जाण्यास ३ तास लागतात.
hargad

मोरागड – Moragad Fort


किल्ल्याची ऊंची: ४४५० फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: बागलाण
श्रेणी: मध्यम
जिल्हा: नाशिक
तालुका: सटाणा
भौगोलिक दृष्टया पाहिले तर मोरागड हा मुल्हेर किल्ल्याचाच एक भाग आहे. मोरागड म्हणजे मुल्हेर किल्ल्याचा दुसरा बालेकिल्लाच होय. इतिहासात या गडाचा स्वतंत्र असा उल्लेख करणारे एकही कागदपत्र उपलब्ध नाही.
पहाण्याची ठिकाणे
गडमाथ्यावर जाताना दुसर्‍या दरवाजाच्याजवळ एक गुहा आहे. गडमाथा म्हणजे एक पठारच होय. माथ्यावर दोन ते तीन पाण्याची टाकी आहेत. एक सुंदर बांधीव तलाव आहे. दोन तीन वाड्यांचे अवशेष आपले अस्तित्व टिकवून आहेत. बाकी गडावर काही नाही. गडावरून मुल्हेरचे पठार व माची, हरगड, मांगीतुंगी, न्हावीगड, तांबोळ्या, हनुमान टेकडी यांचे विहंगम दृश्य दिसते.
पोहोचण्याच्या वाटा
मोरागडावर जाणारी एकच वाट आहे. ती मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावरून जाते. मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावर भडंगनाथाच्या मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर उजवीकडे वर जाणारी वाट पकडावी. या वाटेने थोडे वर गेल्यावर समोरच खाली मोरागडाकडे जाणारी वाट दिसते. येथून मोरागडावर जाण्यास अर्धा तास पुरतो. मुल्हेरमाचीवर असणार्‍या सोमेश्वर मंदिरापासून वर जाणारी वाटसुद्धा मोरागडावर जाते. पुढे या दोन्ही वाटा एकमेकांना मिळतात. गडावर जातांना तीन दरवाजे लागतात.
moragad

मुल्हेर किल्ला – Mulher Fort

mulher

किल्ल्याची ऊंची: ४२९० फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: बागलाण
चढाई श्रेणी: मध्यम
जिल्हा: नाशिक
तालुका: सटाणा
सह्याद्री पर्वताच्या उत्तरदक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते. उत्तरेकडून सुरू होणार्‍या या सह्याद्रीच्या रांगेला सेलबारी आणि डोलबारी रांग असे म्हणतात. सेलबारी रांगेवर मांगीतुंगी सुळके, न्हावीगड, तांबोळ्या असे गड आहेत. तर दुसर्‍या डोलबारी रांगेवर मुल्हेर, मोरागड, साल्हेर, हरगड, सालोटा हे गडकिल्ले आहेत. पश्चिमेकडील गुजरात मधील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण विभाग यांच्या सीमेवर हे किल्ले वसलेले आहेत.बागुलगेड म्हणजेच बागलाण सुपीक, संपन्न आणि सधन असा प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील हा प्रदेश असल्याने येथील जनजीवनावर गुजराती आणि महाराष्ट्रीय अशा संमिश्र आचारविचारांचा प्रभाव पडलेला आहे. पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने बागायती शेती मोठ्या प्रमाणावर चालते. त्यामुळे लोकांची आर्थिक स्थिती ही फार चांगली आहे. मुल्हेरचा किल्ला हा नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी मुल्हेर नावाचे गाव आहे.
इतिहास: हा किल्ला तसा प्राचीन आहे. पूर्वी किल्ल्यातच गाव वसलेले होते. मात्र कालांतराने गाव खाली उतरले आणि पायथ्यापासून सुमारे २ किमी अंतरावर वसले आहे. हे मुल्हेर गाव महाभारतकालीन आहे, याचे नाव होते. रत्नपूर या भागात मयूरध्वज नावाचा राजा होऊन गेला आणि गावाला मयूरपूर नाव पडले. तर किल्ल्याला मयूरगड हे नाव पडले. औरंगजेबाने किल्ला जिंकला तेव्हा याचे नाव औरंगगड असे ठेवण्यात आले.पुराणात मुल्हेरचा उल्लेख येतो. मात्र खात्रीलायक माहिती चौदाव्या शतकाच्या पहिल्या दशकात मिळते. मुल्हेरचा किल्ला बागुल राजांनी बांधला. इ.स १३०८ ते १६१९ पर्यंत बागुलांनी येथे राज्य केले. या घराण्याच्या नावावरूनच परिसराला बागुलगेड व त्याचा अपभ्रंश बागलाण हे नाव पडले. बागुल राजे हे मुळचे कनोजचे या बागुल घराण्याच्या काळातच जगप्रसिद्ध मुल्हेरी मूठ बनवण्यात आली. या घराण्यात एकूण ११ राजे झाले. या राजांना बहिर्जी ही पदवी होती. विजयनगरमध्ये हिंदू सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वी कितीतरी अगोदर बागलाण मध्ये हिंदूसत्ता प्रस्थापित होती.अकबराने जेव्हा खानदेशाचे राज्य जिंकले तेव्हा प्रतापशहा बहिर्जी बागलाणचा राजा होता. त्याने मोगलांचे सार्वभौमत्व पत्करले पुढे शाहजहानशी या राजाने मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. जुलै १६३६ ला औरंगजेबाची दक्षिणेचा राज्यपाल म्हणून नेमणूक झाली. इ.स १६३८ मध्ये मोगलांनी बागलाणवर हल्ला केला आणि मुल्हेर किल्ला जिंकला व त्याचे नाव औरंगगड असे ठेवले. १५ फेब्रुवारी १६३८ रोजी वैभवशाली हिंदुंचे राज्य संपुष्टात येऊन तेथे मोगलांची सत्ता प्रस्थापित झाली. मुल्हेर ही बागलाणची परंपरागत राजधानी, किल्ल्यावर महंमद ताहिर याची नेमणूक प्रथम किल्लेदार म्हणून झाली या ताहिरने मुल्हेरजवळ ताहीर नावाचे गाव वसवले व त्याचे कालांतराने ताहिराबाद असे नामकरण झाले. इ.स १६६२ मध्ये मुल्हेर किल्ल्यामधील सैनिकांनी अपुर्‍या पगारासाठी बंड केले. दुसर्‍या सुरत लुटीनंतर शिवाजी महाराजांनी बागलाण मोहीम उघडली. यामध्ये त्यांनी साल्हेर, मुल्हेर व इतर किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले. मराठ्यांनी १६७१ मध्ये प्रथम मुल्हेरवर हल्ला केला. पण किल्लेदाराने तो थोपवून धरला. मग मराठ्यांनी त्याचा नाद सोडला. मात्र साल्हेरच्या लढाईनंतर फेब्रुवारी १६७२ मध्ये मराठ्यांनी मुल्हेरगड काबीज केला. त्यानंतर पुन्हा किल्ला मोगलांच्या हातात पडला.पुढे इ.स १७५२ च्या भालकीच्या तहानुसार मुल्हेर सकट खानदेशमधील सर्व प्रदेश मराठ्यांच्या हाती आला. यानंतर त्रिंबक गोविंद मुल्हेरचा किल्लेदार झाला. पुढे १७६५ मध्ये किल्ल्यावर गुप्तधन मिळाल्याच्या नोंदी पेशवे दफ्तरात आहेत. अशा रीतीने १५ जुलै १८१८ रोजी हा किल्ला ब्रिटिशांच्या तावडीत सापडला.
पहाण्याची ठिकाणे: मुल्हेरगडाचे प्रामुख्याने २ भाग पडतात. एक म्हणजे मुल्हेर माची आणि मुल्हेर बालेकिल्ला. गणेशमंदिरा पासून २ वाटा फुटतात. एक वाट वर चढत जाते व दुसर्‍या वाटेला येऊन मिळते. या वाटेने डावीकडे गेल्यावर १० मिनिटांतच सोमेश्वर मंदिर लागते. तर उजवीककडे जाणारी वाट आणि गणेशमंदिरा पासून निघणारी उजवीकडची वाट एकत्र येऊन मिळतात. याच वाटेने थोडे पुढे गेल्यावर एक पठार लागते. पठारापासून दोन वाटा लागतात वर जाणारी वाट मोती तलावापाशी जाते. या टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. पठारापासून समोर जाणारी वाट राजवाड्यांच्या भग्न अवशेषांपाशी घेऊन जाते. येथेच एक गुप्त दरवाजादेखील आहे. राजवाड्यांच्या थोडे खाली आल्यावर रामलक्ष्मण मंदिर लागते. राजवाड्यांच्या वाटेने थोडे अंतर चालून गेल्यावर मुल्हेर व हरगड यांमधील खिंड लागते. सोमेश्वर मंदिराकडे जात असताना वाटेतच डावीकडे ३ मजली चंदनबाव लागते. सध्या येथे प्रचंड झाडी झुडूपे आहेत. सोमेश्वर मंदिर राहण्यासाठी उत्तम जागा आहे. मोती टाक्यांच्या उजवीकडे वर चढत जाणार्‍या वाटेने अर्धा तास चालल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या महाद्वारापाशी येऊन पोहोचतो. आत गेल्यावर डावीकडे गुहा आहेत, तर समोरच पाण्याचं टाकं आहे. मुल्हेरगडाचा बालेकिल्ला म्हणजे मोठे पठार आहे. बालेकिल्ल्यावर पोहोचल्यावर समोरच पाण्याची ९ – १० टाकी आहेत. राजवाड्याचे भग्नावशेष, भडंगनाथांचे मंदिर या सर्व गोष्टी आहेत. भडंगनाथांच्या मंदिराच्या वर असणार्‍या टेकडीवरून खाली उतरलो की मोरागडाकडे जाणारी वाट दिसते. समोरच असणारी मांगीतुंगीची शिखरे, न्हावीगड, तांबोळ्या, हनुमानगड लक्ष वेधून घेतात.
पोहोचण्याच्या वाटा: मुल्हेर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा अस्तित्वात आहेत. या दोन्ही वाटा मुल्हेर गावातूनच जातात. मुल्हेर गाव ते किल्ल्याचा पायथा यात २ किमीचे अंतर आहे. गावातून २५ मिनिटे चालत पुढे गेल्यावर डावीकडे एक घर लागते, आणि समोरच वडाचे एक झाड दिसते. झाडापासून सरळ पुढे जावे. दहा मिनिटांतच धनगरवाडी लागते. धनगरवाडी वरून जाणारी वाट पकडावी. साधारण ४५ मिनिटांनी २ वाटा फुटतात एक वाट सरळ तर दुसरी उजवीकडे वळते.सरळ जाणार्‍या वाटेने २० मिनिटांत मुल्हेर माचीवरील गणेश मंदिरापाशी पोहचतो. या वाटेने गडावर प्रवेश करताना ३ दरवाजे लागतात. ते सर्व ढासळलेल्या अवस्थेत आहेत. वाट साधी व सोपी आहे. या वाटेने गडावर पोहोचण्यास दीड तास लागतो.उजवीकडच्या वाटेने गेल्यावर दोन तासांनी आपण मुल्हेरमाची वरील गणेश मंदिरात पोहचतो. या वाटेनेही गडावर प्रवेश करताना ३ दरवाजे लागतात. ही वाट जरा दूरची आहे ही वाट हरगड व मुल्हेर किल्ला यांच्या खिंडीतून वर चढते. या खिंडीतून डावीकडे मुल्हेर, तर उजवीकडे हरगड लागतो. या वाटेने गडावर पोहचण्यास ३ तास लागतात.
राहाण्याची सोय: मुल्हेरमाची वरील सोमेश्वर आणि गणेश मंदिरात आणि बालेकिल्ल्यावर असणार्‍या गुहेत राहता येते.
जेवणाची सोय: जेवणाची सोय आपण स्वत:… करावी.
पाण्याची सोय: गडावरील मोती टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. मात्र हे पाणी फेब्रुवारी पर्यंतच उपलब्ध असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ: मुल्हेर गावातूनच साधारण २ तास लागतात .खिंडीतल्या वाटेने ३ तास लागतात.
माहिती साभार: ट्रेक क्षितीज संस्था
mulher

रतनगड / न्हावीगड – RATANGAD/ Nhavigad Fort



किल्ल्याची ऊंची: ४१०० फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: बागलाण
श्रेणी: मध्यम
जिल्हा: नाशिक
तालुका: सटाणा
सह्याद्री पर्वताच्या उत्तर-दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते. उत्तरेकडून सुरू होणा-या या सह्याद्रिच्या रांगेला सेलबारी किंवा डोलबारी रांग असे म्हणतात. सेलबारी रांगेवर मांगी-तुंगी सुळके, न्हावीगड, असे गड आहेत तर दुस-या डोलबारी रांगेवर मुल्हेर, मोरागड, साल्हेर, हरगड, सालोटा हे गडकिल्ले आहेत. पश्चिमेकडील गुजरात मधील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण विभाग यांच्या सीमेवर हे किल्ले वसलेले आहेत. या किल्ल्याला रतनगड असे देखील म्हणतात
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
गडावर जाण्याच्या वाटेवर पिण्याच्या पाण्याची टाकी आणि अठरा भुजा असलेल्या देवीची सुंदर मूर्ती असलेले एक मंदिर लागते. गडावर जातांना आपल्याला पाय-या तर लागतात पण दरवाज्याचा मात्र मागमूसही नाही. किल्ल्याचा माथा तसा निमुळताच आहे. गडावर पाण्याची तीन ते चार टाकी आहेत. किल्ल्यावर काही वास्तूंचे अवशेष सापडतात. गडाचा सर्वोध माथा म्हणजे एक सुळकाच आहे. तो चढून जाण्यासाठी प्रस्तरारोहण आवश्यक आहे. गडमाथा फिरण्यास अर्धा तास पुरतो. गडावरुन मांगी तुंगी, मुल्हेर, मोरागड, साल्हेर आणि हरगड हा परिसर दिसतो.
पोहोचण्याच्या वाटा
वडाखेल मार्गे – न्हावीगडावर जाण्यासाठी ताहाराबाद मार्गे मांगी तुंगी गाव गाठावे. मांगीतुंगी गावातून एक तासाच्या चालीने वडाखेल गावात यावे. वडाखेलपर्यंत डांबरी रस्ता नाही, त्यामुळे पायीच जावे लागते. वडाखेलमधून पाताळवाडीकडे कूच करावे. पाताळवाडी हे पायथ्याचे गाव आहे. वडाखेल ते पाताळवाडी हे अंतर अर्ध्या तासाचे आहे. पाताळवाडीतून एक सरळ वाट किल्ल्याच्या पठारावर गेलेली आहे.
या पठारावरुन दोन वाटा फुटतात. एक वाट समोर नाकाडावरुन वर चढते. ही वाट थोडी कठीण आहे. वाटेने वर चढताना सोपे प्रस्तरारोहण करावे लागते. वाटेने वर चढल्यावर आपण पाय-यापाशी पोहोचतो. दुसरी वाट पठारावरुन डावीकडे वळसा घालून पाययापाशी जाते. या वाटेला पाण्याची दोन-तीन टाकी लागतात. गडावर जाणा-या पाय-या मात्र जपूनच चढाव्या लागतात. पाय-यावर माती साचल्याने घसरण्याची शक्यता फार आहे.पाताळवाडीपासून गडावर दीड तासात पोहोचता येते.
राहण्याची सोय: गडावर राहण्याची भोजनाची सोय नाही
पाण्याची सोय: किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ: जाण्यासाठी लागणारा वेळ पाताळवाडी गावातून दीड तास.
जाण्यासाठी उत्तम कालावधी: आक्टोंबर ते एप्रिल पर्यंत.
nhavigad

डेरमाळ किल्ला – Dermal Fort



किल्ल्याची ऊंची: ३७०० फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: गाळणा टेकड्या
श्रेणी: मध्यम
जिल्हा: नाशिक
तालुका: सटाणा
टिंघरी गावातून किल्ल्यावर आल्यावर उजवीकडे खाली माचीवरची तटबंदी दिसते आणि वर बालेकिल्ला दिसतो. एक वाट माचीवर डावीकडे गेलेली दिसते. त्या वाटेने पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या उत्तर बाजूला पोहचतो. इथे खराब पाण्याचे टाके दिसते. माचीच्या या भागात पाण्याचे एका टाक्या शिवाय काही नाही आहे, म्हणून पुन्हा दरवाज्यापाशी परतायचे. आता तटबंदी आपल्या उजवीकडे रहाते आणि टेकडी डावीकडे. पुढे ही वाट उजवीकडे तटबंदीच्या बाजूने पुढे जाते, तर एक वाट डावीकडे वर चढते.डावीकडच्या वाटेने गेल्यावर माचीचा पडझड झालेला दरवाजा लागतो. तो पाहून वर चढून गेल्यावर डावीकडे किल्ल्याच्या वक्राकार आकाराचा कडा लागतो, याला ‘भैरवकडा’ म्हणतात. हा कडा आपल्याला हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्याची आठवण करुन देतो. या कड्याच्या मधोमध पठारावर एक बांधकाम दिसते, हे एका वाड्याचे अवशेष आहेत. याच्या तिन्ही भिंती पूर्णपणे ढासळलेल्या आहेत. याच्या थोडे खाली पाण्याचे एक खराब टाके आहे. वाडा पाहून उजवीकडे थोडे वर जायंच तिथे सात टाक्यांचा समूह आहे. यातील पाण्यावर शेवाळे साचलेले आहे. या टाक्यांच्या खालच्या, वरच्या, आणि मागच्या बाजूसही काही टाकी आहेत. हे अवशेष पाहून थोडे आणखी वर चढायचे, इथे एके ठिकाणी उघड्यावर हनुमानाची आणि गणेशाची मूर्ती पडलेली आहे. या मूर्तीच्या बरोबर डावीकडून एक वाट खाली उतरते. इथेच एक भूमीगत गुहा खोदलेली आहे. ही गुहा १० ते १५ लोकांच्या मुक्कामा करीता योग्य आहे. गुहेच्या समोरुनच एक वाट खाली माचीवर जाते. इथेच वाटेत एक भलेमोठे टाके लागते. याचे नाव आहे ‘समुद्री’ टाके. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्यांच्या पुढून एक वाट जाते, तीच बिलपूरीला जाणारी वाट आहे. गुहेच्या वरुन एक वाट बालेकिल्ल्यावर जाते. बालेकिल्ल्यावर एक दोन वाड्यांचे अवशेष आहेत. इथून पिसोळच्या पश्चिमकड्याचे छान दर्शन होते. संपूर्ण गड फिरण्यास ३ तास लागतात.
पोहोचण्याच्या वाटा :टिंघरी गावातून नामपूर मार्गे टिंघरी हे १२ किमी चे अंतर आहे. पिसोळवरुन डेरमाळला जाणारी वाट टिंघरीत उतरुनच जाते. टिंघरीमध्ये डेरमाळची डोंगरसोंड उतरलेली आहे. ही डोंगरसोंड चढून अर्ध्यातासात आपण डेरमाळच्या पायथ्याच्या सपाटी पर्यंत पोहोचतो, पण डेरमाळच्या पायथ्या पर्यंत जाण्यासाठी दरीला वळसा घालून जावे लागते. वाटेत पठारावर एके ठिकाणी तळे आहे, पण ते पूर्णपणे सुकलेले आहे. या सपाटीवर एक हनुमानाची मुर्ती आहे. या मूर्तीच्या बरोबर समोरची एक पायवाट किल्ल्यावर जाते. लक्षात ठेवण्याची खूण म्हणजे वाट नेहमी किल्ल्याची तटबंदी डावीकडे ठेवत जावे आणि मध्येच कातळात खोदलेल्या पायर्‍या सुध्दा लागतात. ही वाट किल्ल्याच्या पडझड झालेल्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचते. टिंघरीतून किल्ल्यावर जाण्यास दोन तास लागतात.बिलपूरी मार्गे नाशिक – सटाणा – नामपूर मार्गे बिलपूरी गावात पोहचता येते नामपूर पासून बिलपूर हे गाव साधारणपणे १५ किमी वर आहे. गावात सटाण्याहून नामपूर मार्गे मुक्कामाची एसटी सुध्दा येते. जर एसटी नाही मिळाली तर नामपूर साक्री मार्गावर ‘चिराई’ नावाचे गाव आहे, तिथून ८ किमी वर चालत बिलपूरीला जाता येते किंवा नामपूर तळवडे अशा सहा आसनी गाड्या चालू असतात. तळवडे ते बिलपूरी अंतर ३ किमी पायी गाठता येते. बिलपूरी गावातून डेरमाळ दिसतो, पण तिथपर्यंत जाण्यासाठी सरळ वाट नाही. वाट जरा वाकडी करुनच जावे लागते. डेरमाळच्या समोर असणार्‍या डोंगराची सोंड बिलपूरी मध्ये उतरलेली आहे. ही डोंगरसोंड चढून गेल्यावर आपण पठारावर पोहचतो. आता डेरमाळचा किल्ला आपल्या डाव्या हाताला असतो. किल्ला आणि आपण चालत असणारे पठार यात एक दरी असते. पठारावरुन अर्धा तास चालत गेल्यावर आपण दरी जिथे संपते त्या ठिकाणी इंग्रजी ‘यू’ आकाराचे वळण घ्यायचे आणि समोरच्या पठारावरच्या जंगलात शिरावे. आता डेरमाळचा डोंगर आणि समोरचा डोंगर यांना जोडणारी खिंड आपल्या मागे रहाते. आता डेरमाळची तटबंदी आपल्या डोक्यावर उजवीकडच्या कड्यावर असते. आता वाट चढणीला लागते, वाटेत किल्ल्याच्या तीन पडझड झालेल्या दरवाज्यांचे अवशेष दिसतात. शेवटच्या दरवाज्या जवळून वाट पून्हा ‘यू’ आकाराचे वळण घेऊन डेरमाळच्या माचीवर जाते.
राहाण्याची सोय: डेरमाळ वरील गुहेत १०-१५ जणांना राहता येते.
जेवणाची सोय: गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय: डेरमाळ वरील समुद्री टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ: टिंघरी मार्गे २ तास आणि बिलपूरी मार्गे २ तास लागतात.
छायाचित्र साभार : विनीत दाते
डेरमाळ किल्ला (Dermal fort) : ऊंची : 3700 ft डोंगररांग: गाळणा टेकड्या जिल्हा : नाशिक

चौल्हेर / चाल्हेरीचा किल्ला / चौरगड किल्ला / तिळवणचा किल्ला – Chaulher / Chalheri Fort


किल्ल्याची ऊंची: ३७०० फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: बागलाण
श्रेणी : मध्यम
जिल्हा: नाशिक
तालुका: सटाणा
किल्ले चौल्हेर हा चौरगड उर्फ तिळवणचा किल्ला अथवा चाल्हेरीचा किल्ला य़ा नावाने देखील ओळखला जातो. किल्ले चौल्हेर हा साल्हेरचा जुळा भाऊ आहे. साल्हेर महाराष्ट्रातील सर्वात उंच गड आहे. चौरगड चौल्हेरचा आकार हा साधारणपणे साल्हेरशी साधर्म्य दाखविणारा आहे.
येथे दरवर्षी पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे पिठुरी अमावस्येला जत्रा भरते. गडावर मोती टाके, शेवाळ्या टाके, हत्यार्‍या टाके, खेकड्या टाके आहे या गावाला आधी मोठा कोट होता येथे गवळी राजा राज्य करीत असे त्याच काळातील एक घोडपागा वाडीचौल्हेर मध्ये आजही पहावयास मिळते या राजाच्या हाताखाली काही हजारी मनसबदार होते, यातील एक मनसबदार पुढे या परिसराची देखभाल करत असत.
पहाण्याची ठिकाणे
गडावर शिरतांनाच एक भुयारी दरवाजांची रांगची रांग लागते. गडावर शिरण्यासाठी ३ दरवाज्यातून आत जावे लागते. हे दरवाजे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुनाच होय. गडावर शिरल्यावर समोरच बालेकिल्ला आहे. तर डावीकडे गडाची छोटीशी माची आहे. गडाच्या माचीवर पाण्याचे एक मोठे तळे आहे. तर शेवटच्या टोकाला तटबंदीचे काही अवशेष आहेत. माचीवर फेरफटका मारुन बालेकिल्याची वाट धरावी. बालेकिल्ल्याला जाण्यासाठी दोन्ही बाजुंनी वाटा आहेत.
उजवीकडच्या वाटेने १० मिनिटात पायर्‍यांच्या साह्याने गडावर पोहचता येते. वाटेत मोतीटाके, आणि अनेक पाण्याची कातळात खोदलेली टाकी आढळतात. मोती टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. बालेकिल्यावर सुध्दा पाण्याची ४ जोड टाकी आढळतात. याशिवाय पडक्या वाड्यांचे काही अवशेष आहेत. बालेकिल्यावरुन संपूर्ण गडाचा घेरा लक्षात येतो. गडावरुन सातमाळ रांग व सेलबारी – डोलबारी रांगेचे मोहक दर्शन होते. बालेकिल्याकडे जाणार्‍या डावीकडच्या वाटेवर चौरंगनाथाची व हनुमाना्ची मुर्ती आहे. त्यावर सध्या गावकर्‍यांनी एक पत्र्याची शेड उभारली आहे. येथे दरवर्षी पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे पिठुरी अमावस्येला जत्रा भरते.
पोहोचण्याच्या वाटा:
नाशिक मार्गे ९५ किमी वरील सटाणा गाठावे. सटाण्यावरुन तिळवणला जाणारी एसटी पकडावी. तिळवण पासून २० मिनिटांवर असणार्‍या वाडी चौल्हेर गावात पोहचावे. वाडी चौल्हेर हे पायथ्याचे गाव. गावातच किल्ल्यावरुन उतरणारी एक डोंगरसोंड आहे. याच डोंगरसोंडेवरुन चालत दीड तासात गडमाथा गाठता येतो.
राहाण्याची सोय: गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय: गडावर जेवणाची व्यवस्था नाही., आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय: मोती टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ: वाडी चौल्हेर वरुन दीड तास लागतो.
haulher chaulher

बिष्टा किल्ला


किल्ल्याची उंची: ३३७७ फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: बागलाण, सालबारी-डोलबारी
श्रेणी: मध्यम
जिल्हा: नाशिक
तालुका: सटाणा
मालेगांव-सट्याण्याकडे सालबारी-डोलबारी म्हणून एक डोंगर रांग आहे. अगदी सपाट अशा या भागात एकदम उठावलेले गगनचुंबी पर्वत दिसतात. यातच भिलाई किल्ल्यापासून थोड्याच अंतरावर बिजोटा उर्फ बिष्टा किल्ला आहे.
बिष्टा किल्ल्यावर अतिशय सुंदर अशी खोदीव लेणी आहेत.बिष्टा, भिलाई, अजमेरा, मेसण्या, जातेगांव, प्रेमगिरी, पिंपळागड, डुबेरगड, मोरधन व सोनगिरी हे कुठल्याही गॅझेटियर किंवा पुस्तकांत उल्लेख नसणारे किल्ले १९८५ साली इतिहास अभ्यासक गिरीश टकले यांनी वैनतेय गिर्यारोहण – गिरिभ्रमण संस्थेच्या माध्यमातून प्रकाशात आणले, तर रांजणगड व दुंधा हे किल्ले गिर्यारोहकांच्या यादीत सामाविष्ट करण्याचे काम प्रसिद्ध गिर्यारोहक आनंद पाळंदे यांनी केले.
bishta

भिलाई किल्ला – Bhilai Fort


किल्ल्याची उंची: ३४७८ फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: बागलाण, सालबारी-डोलबारी
श्रेणी: मध्यम
जिल्हा: नाशिक
तालुका: सटाणा
मालेगांव-सट्याण्याकडे सालबारी-डोलबारी म्हणून एक रांग सुटलेली आहे. अगदी सपाट अशा या भागात एकदम उठावलेले गगनचुंबी पर्वत दिसतात.सटाणा साल्हेर किल्ला रस्त्यावरील साकोडे दगडाचे या गावतून भिलाई गावातून किल्ल्याकडे जाणारी वाट आहे.भिलाई किल्ल्यावर काही पाण्याची टाकी व सुंदर असे भिलाई देवीचे मंदिर आहे.बिष्टा, भिलाई, अजमेरा, मेसण्या, जातेगांव, प्रेमगिरी, पिंपळागड, डुबेरगड, मोरधन व सोनगिरी हे कुठल्याही गॅझेटियर किंवा पुस्तकांत उल्लेख नसणारे किल्ले १९८५ साली इतिहास अभ्यासक गिरीश टकले यांनी वैनतेय गिर्यारोहण – गिरिभ्रमण संस्थेच्या माध्यमातून प्रकाशात आणले, तर रांजणगड व दुंधा हे किल्ले गिर्यारोहकांच्या यादीत सामाविष्ट करण्याचे काम प्रसिद्ध गिर्यारोहक आनंद पाळंदे यांनी केले.

अजमेरा किल्ला / अजमेर किल्ला – Ajmera Fort

Ajamera Fort
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: बागलाण
श्रेणी: मध्यम
जिल्हा: नाशिक
तालुका: सटाणा
नाशिक जिल्ह्यातील बागलाणात कर्‍हा, बिष्टा, अजमेरा, दुंधा असे कमी उंचीचे किल्ले आहेत. या किल्ल्यांबद्दल इतिहासात फारशी माहिती नाही. हे किल्ले सुटेसुटे उभे असल्यामुळे या किल्ल्यावरुन आजूबाजूचा विस्तृत प्रदेश दिसतो. त्यामुळे या किल्ल्यांचा उपयोग टेहाळणीसाठी करण्यात आला असावा. या किल्ल्यांचा आकार व रचना पाहाता यावर फारच थोडी शिबंदी रहात असावी असे वाटते.१९८५ साली नाशिकला वैनतेय गिर्यारोहण – गिरिभ्रमण या संस्थेने केलेल्या भ्रमंती आणि कागदपत्रांच्या आधारे अशा बऱ्याचश्या किल्ल्यांची माहिती जनसामान्यांसमोर आणली

दुंधागड / दुंधा किल्ला – Dundhagad

dundhagad

किल्ल्याची ऊंची: २२८० फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: बागलाण
चढाई श्रेणी: मध्यम
जिल्हा: नाशिक
तालुका: सटाणा
कागदपत्रांमधील माहितीच्या आधारे सटाणा तालुक्यात १९८७ साली घेतलेल्या एका शोध मोहिमेमध्ये कर्हेगड, दुंधागड आणि अजमेर या किल्ल्यांचे स्थान निश्चित करण्यात आले.  नाशिक जिल्ह्यातील बागलाणात (सटाणा) कर्‍हा, बिष्टा, अजमेरा, दुंधा असे कमी उंचीचे किल्ले आहेत. या किल्ल्यांबद्दल इतिहासात फारशी माहिती नाही. हे किल्ले सुटेसुटे उभे असल्यामुळे या किल्ल्यावरुन आजूबाजूचा विस्तृत प्रदेश दिसतो. त्यामुळे या किल्ल्यांचा उपयोग टेहाळणीसाठी करण्यात आला असावा. या किल्ल्यांचा आकार व रचना पाहाता यावर फारच थोडी शिबंदी रहात असावी असे वाटते. दुंधा किल्ल्याला स्थानिक लोक किल्ला म्हणून न ओळखता दुंधेश्वर महाराजांचा डोंगर म्हणून ओळखतात. श्रावणी सोमवारी गडावर यात्रा भरते.
पहाण्याची ठिकाणे: दुंधा किल्ल्याच्या पायथ्याशी दुंधेश्वर महाराजांचे देऊळ आहे. या देवळांच्या बाजूला पाण्याची विहीर आहे. देवळाच्या बाजूने गडावर चढायची पायवाट आहे. ही पायवाट गर्द झाडीतून जाते. १० मिनीटात आपण दगडात खोदलेल्या पायर्‍यांपाशी येतो. या पायर्‍या चढून गेल्यावर शंकर मंदिराजवळ येतो. २ डेरेदार वृक्षांच्या सावलीत हे छोटेखानी मंदिर उभे आहे. मंदिराच्या मागे पाण्याचे छोट कुंड आहे, पण या पाण्याला कुबट वास येत असल्यामुळे त्याचे पाणी केवळ भांडी घासण्यासाठी वापरतात.  मंदिराकडे तोंड करुन उभ राहील्यावर उजव्या हाताला सध्या गडावर राहणार्‍या रामदास महाराजांचे घर दिसते. घरावरुन जाणारी पायवाट पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांकडे जाते. पायवाटेच्या थोड्या खालच्या अंगाला कातळात खोदलेली दोन पाण्याची टाकी आहेत. त्यातील पाणी थंडगार व चवदार आहे. टाक्यातील पाणी पिऊन पुन्हा पायवाटेवर आल्यावर सरळ चालत, किल्ल्याच्या अर्ध्या डोंगराला वळसा घालून गेल्यावर दगडात खोदलेले पाण्याच टाक दिसत, १० फूट x ५ फूट टाक्यातील पाण्यावर हिरव्यागार शेवाळ्याचा थर जमलेला असतो. येथून पुढे जाण्यासाठी पायवाट नसल्यामुळे आल्या वाटेने परत मंदिराजवळ यावे. मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर डाव्या हाताची पायवाट ५ मिनिटात दगडात खोदलेल्या टाक्यापाशी जाते, याला आंघोळीचे टाकं म्हणतात, येथून पुढे जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे पुन्हा शंकर मंदीरापाशी यावं लागतं या मंदिराच्या मागून जाणारी पायवाट किल्ल्याचा माथ्यावर जाते तिथून आजूबाजूचा सर्व प्रदेश दृष्टीक्षेपात येतो,
पोहोचण्याच्या वाटा: नाशिक जिल्ह्यातील सटाणा गावातून दुंध्याला जाता येते. सटाणा – मालेगाव रस्त्यावर, सटाण्यापासून ३कि.मी अंतरावर सौंदाणे फाटा आहे. या फाट्यावरुन अजमेरसौंदाणे – तळवडे मार्गे दुंधा २० कि.मी वर आहे. दुंधा गावाच्या पुढे १ कि.मी वर दूंधेश्वर मंदीराला जाणारा कच्चा रस्ता आहे. तो थेट किल्ल्याच्या पायथ्याशी जातो.  सटाणा – मालेगाव रस्त्यावर सटाण्यापासून १७ कि.मी व मालेगाव पासून २२ कि.मी वर लखमापूर गाव आहे. या गावापासून दुंधा किल्ला ७ कि मी अंतरावर आहे.
राहाण्याची सोय: गडाच्या पायथ्याशी दुंधेश्वर मंदिरात १५ माणसांची रहाण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय: गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय: गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याची सोय आहे .
जाण्यासाठी लागणारा वेळ: गडाच्या पायथ्यापासून ३० मिनीटे लागतात.
सूचना: अजमेरा, बिष्टा, कर्‍हा, दुंधा हे छोटे किल्ले दोन दिवसांच्या मुक्कामात पाहाता येतात.
dundhagad

किल्ला – Karhegad

karhegadकर्हेगड
किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी: मध्यम
ठिकाण: नाशिक, नामपूर, कर्हेगाव
तालुका: सटाणा
कर्हेगड हा महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील किल्ला आहे. नाशिक सटाणा तालुका हा भाग पूर्वी बागलाण म्हणून ओळखला जात असे. आजही अनेकदा याचा उल्लेख बागलाण असा केला जातो.सटाणा या तालुक्याच्या गावाच्या ईशान्येकडे नामपूर हे गाव आहे. या नामपूरच्या वाटेवर कर्हे नावाचे लहानसे गाव आहे. या गावाजवळच कर्हेगडाचा किल्ला आहे. हा किल्ला स्थानिक लोकांना अपरिचित आहे. स्थानिक लोक याला भवानीचा डोंगर म्हणून ओळखतात. कागदपत्रांमधील माहितीच्या आधारे १९८७ साली घेतलेल्या एका शोध मोहिमेमध्ये कर्हेगडाचे स्थान निश्चित करण्यात यश मिळाले. याच मोहिमेदरम्यान या भागात दुंधागड आणि अजमेर हेसुद्धा किल्ले असल्याचे समजले.गडावरील पहाण्यासारखी ठिकाणेकर्हेगडाच्या माथ्याखाली कातळामध्ये खोदलेल्या काही पायऱ्यांवरून आपण माथ्यावर दाखल होतो. कर्हेगडाचा माथा लहानसा आहे. माथ्यावर घरांच्या जोत्याचे अवशेष आढळतात. कातळात कोरलेली पाण्याची टाकी आहेत. या टाक्यांमध्ये शेवाळे वाढलेले असते. काही वेळेस ती कोरडीही पडलेली असतात. माथ्याच्या पश्चिम अंगाला कातळात गुहा आहेत. कर्हेगडाच्या माथ्यावरून साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड, रतनगड, तांबोळ्या, मांगी – तुंगीचे सुळके, सिष्ठा, देरमाळ, पिसोळ, अजमेर तसेच दुंधागड दिसतात. स्वच्छ हवेत अंजठा-सातमाळा रांगेचेही येथून दर्शन होते.कर्हेगडाच्या पायथ्यापासून देवळाणे हे गाव सात-आठ कि.मी. अंतरावर आहे. देवळाणे गावामध्ये प्राचीन असे शिवमंदिर आहे. या शिवमंदिरावरील काही शिल्पे प्रेक्षणीय आहेतकसे जालसटाणाहून मुलाणेमार्गे दोधेश्वर येथील मंदिराजवळ पोहोचता येते. सटाणापासून १२ ते १३ कि.मी. अंतरावर दोधेश्वराचे मंदिर डोंगराच्या सानिध्यात उभे आहे. या निसर्गरम्य परिसरापासून २-३ किलोमीटरवर कर्हेगडाचा पायथा आहे. कर्हेगडाच्या उत्तरेकडे उतरलेल्या डोंगरदांड्यावरुनच किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे.

सोनगीरीचा किल्ला – Songiri Fort

songiri

किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग
चढाई श्रेणी: मध्यम
ठिकाण: नाशिक
तालुका: पेठा
दगडांचा देश असणा-या महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या काही रांगा या खान्देशापर्यंत जातात. परंतु या तुरळक रांगांना कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील किल्ल्यांइतकी उंची नाही. तरीही या भागात अनेक गडकोट वसलेले आहेत. यात गिरीदुर्गांची संख्या कमी व भुईकोट किल्ल्यांची अधिक आहे.
महाराष्ट्रात सोनगीर या नावाचे तीन चार किल्ले आहेत. त्यातील एक रायगड जिल्ह्यात नागोठणेजवळ, तर दुसरा पुणे जिल्ह्यात कर्जतजवळ आहे. त्यामुळे या सोनगीरला ‘खान्देशचा सोनगीर’ म्हणतात! त्याची निर्मिती कोणी व केव्हा केली, याची माहिती आज उपलब्ध नाही. इ.स. १३७०मध्ये फारुकी सुलतानांनी हा किल्ला स्वत:च्या अधिपत्याखाली आणला. लळिंग किल्ल्यापासून केवळ ३० किलोमीटरवर असल्याने सोनगीरला महत्त्व प्राप्त झाले. मुघल बादशहा अकबराने आपला साम्राज्य विस्तार खान्देशापर्यंत आणल्याने सोनगीरही त्याच्या ताब्यात गेला. औरंगजेब हा सोनगीरवर सत्ता प्रस्थापित करणारा शेवटचा मुघल सम्राट होता. मराठेशाहीत पेशव्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. इ.स. १८१८ मध्ये पेशव्यांचा पराभव करून ब्रिटिशांनी त्याच्यावर सत्ता स्थापन केली.
किल्ल्याच्या पाय-यांची सुरुवात एका नव्यानेच बांधलेल्या कमानीने होते. पर्यटन विकासाच्या नावाखाली या कमानीचे बांधकाम झाले आहे. सुरुवातीच्या काही पाय-याही नजीकच्या काळातच सिमेंटने बांधलेल्या दिसून येतात. परंतु त्यांची सध्याची अवस्था पाहता स्थानिकांना किल्ल्याच्या महत्त्वाचे सोयरसुतक नसल्याचे दिसते. थोडे पायी चालत जाईपर्यंत येथील दुर्गंधी आपली पाठ सोडत नाही. चालत असतानाच किल्ल्याची नक्की ठेवण ध्यानात येते. एखाद्या राजस्थानी वास्तुपद्धतीचा हा किल्ला भासतो. किल्ल्याची खरी सुरुवात त्याच्या उद्ध्वस्त प्रवेशद्वाराने होते. सध्या हा दरवाजा कसाबसा तग धरून उभा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्याची बरीचशी मोडतोड झाली असल्याचे दिसते. पायथ्यापासून दरवाजापर्यंत येण्यास दहा मिनिटे पुरतात. अन्य किल्ल्यांप्रमाणे याच्या दरवाज्यावर कोरीव काम वा नक्षीकाम दिसून येत नाही. कदाचित, कालानुरूप तेही नष्ट झाले असावे. काही वर्षांपूर्वी या दरवाजावर एक संस्कृत शिलालेख लावलेला होता. परंतु तो प्रवेशद्वारावरून खाली निखळून पडला. २७ x ५ इंचांचा हा शिलालेख आज धुळ्याच्या वि. का. राजवाडे संशोधन मंडळात नेऊन ठेवलेला आहे. त्यावर देवनागरी लिपीत काही श्लोक कोरलेले आहेत.
मुख्य दरवाजातून आत प्रवेश केल्यावर कातळात कोरलेल्या पाय-या दिसून येतात. कातळात कोरलेल्या असल्याने त्यांची फारशी मोडतोड झालेली नाही. परंतु आजूबाजूला अनेक खांबांचे अवशेष पडल्याचे दिसून येतात. एकेकाळी या प्रवेशद्वाराची अतिशय सुंदर रचना केलेली असावी. पाय-यांच्या सुरुवातीला दरवाजाच्या शेजारी एक कबर आहे. त्याचा संदर्भ मात्र कुठे सापडत नाही. कातळातील पंधरा-वीस पाय-या चढून गेले की, आपण थेट गडाच्या माथ्यावर पोहोचतो. येथून संपूर्ण सोनगीर गावाचे एकाच दृष्टिक्षेपात दर्शन घेता येते. शिवाय धुळे, आग्रा मार्गावरील वाहतूक ब-याच अंतरापर्यंत न्याहाळताही येते. गडमाथ्यावर जाण्याकरता येथून दोन मार्ग आहेत. डाव्या बाजूने चालत जाऊन सोनगीरची माची पाहता येते. तर उजव्या बाजूने गडाचा मुख बुरूज पाहता येतो. किल्ल्याचा गडमाथा समुद्रसपाटीपासून सुमारे तीनशे मीटर उंचीवर आहे. तो रुंदीला कमी असून लांबीला जास्त असल्याचे दिसते. सद्यस्थितीत पठार हे सपाट आहे. परंतु या गडमाथ्यावरील काही गोष्टींचे निरीक्षण केल्यास या किल्ल्याच्या एकेकाळच्या वैभवाची जाणीव होते. सोनगीरच्या डावीकडील माचीकडे जाताना ती निमुळती होत गेल्याचे दिसते. तिच्या टोकावरून खाली फारसे अंतर नाही. परंतु तिथून कोणी सहज वरती येऊही शकत नाही. गडमाथ्यावरील तटबंदी ही पूर्णपणे ढासळून गेली आहे. परंतु गडाच्या बाजूंची तटबंदी ही लाल रेखीव दगडांची असल्याचे दिसते. तीही अधूनमधून ढासळलेली आहे. माचीच्या दोन्ही कडांनी चालत गेल्यास येथील ढासळलेले अवशेष दृष्टीस पडतात. किल्ल्याचा मध्यभाग तसा प्रशस्त आहे. त्याच्या उजवीकडील बाजूस किल्ल्याचा मुख्य बुरूज पाहता येतो.
मुख्य बुरुजाकडे जाताना दोन, तीन ठिकाणी हौदासारख्या वास्तू नजरेस पडतात. त्यात तेल व तूप साठवत असल्याचे दिसून येते. त्यांची मोडतोड आज झालेली आहे. या वास्तूला तेलटाके व तूपटाके असेही म्हटले जाते. थोडे पुढे गेल्यावर एक मोठी विहीर लागते. गडावरील ही चौकोनी विहीर खूप खोल आहे. वरून पाहता तिचा तळ ध्यानात येत नाही. पाण्याचा साठा मात्र या विहिरीत सदैव असतो. त्यात दगड टाकून पाण्याच्या सद्य:स्थितीचा अंदाज घेता येतो. या विहिरीची खोली दहामजली इमारतीएवढी असावी, असे म्हटले जाते. तिच्याभोवती सध्या झाडाझुडपांचे साम्राज्य झाले आहे. विहिरीच्या समोरच पुष्करणीचा हौद लागतो. त्याचेही अवशेषच पाहायला मिळतात. सध्या त्याचे चौदा कोनाडे राहिल्याचे दिसतात. याच्याच वर नव्यानेच काही शिवप्रेमी संस्थांनी हवनस्तंभ उभारला आहे. मोक्याच्या ठिकाणी असल्याने तिथून किल्ला दिसतो. तिथून हा ध्वजस्तंभही नजरेस पडतो. मुख्य बुरुजाकडे जाताना पडीक घरांचे अवशेष दिसून येतात. या बुरुजावरील तटबंदीही ढासळलेली आहे. येथून ब-याच लांबपर्यंतचा प्रदेश दृष्टिक्षेपात येतो. बुरुजावरील भग्न अवशेष मात्र खान्देशच्या या किल्ल्याच्या एकेकाळच्या वैभवाची कल्पना देऊन जातात. अगदी मोक्याच्या ठिकाणी असणा-या सोनगीरच्या या किल्ल्याची रचना फार भव्यदिव्य नाही. तरीही गतइतिहासात हरवलेल्या वैभवाची साक्ष देत तो अस्तित्वाशी झुंजत उभा आहे.

खैराई किल्ला – Khairai Fort

khairai
किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग
डोंगररांग: कळसुबाई
चढाईची श्रेणी: मध्यम
जिल्हा: नाशिक
तालुका: पेठा
खैराई किल्ला हा नाशिक जिल्ह्यातील पेठा तालुक्यातील एक ऐतिहासिक किल्ला असून, नाशिक – हरसू – थानपाडा – खैराईपाली या मार्गावर नाशिक पासून साधारण ६५ किलोमीटरवर पश्चिमेला आहे.
खैराई गडाला बऱ्यापैकी तटबंदी आहे. माचीपाड्याकडला बुरुज नाक्‍यासमोर ठेवून गड चढत राहावे. अर्ध्या तासाने आपण एका टेपावर येऊन पोहोचतो. इथून बुरुजाकडे तुटलेल्या तटावरून गडावर प्रवेश करता येतो. अथवा बुरूज व गडमाथा उजव्या अंगाला ठेवून गडमाथ्याला वळसा घालून गडाच्या पश्‍चिमेकडून गडावर सोप्या वाटेने प्रवेश करता येतो. खैराईचा गडमाथा छोटेखानीच पण मन प्रसन्न करणारा आहे. गडावर पाण्याची टाकी आहेत. त्यातलं पाणी पावसाळ्यात पिण्यास हरकत नाही. गडाच्या तटावरून गड-प्रदक्षिणा करता येते. गडावर उघड्या मंदिराकडे दोन लहान तोफा पडलेल्या आहेत. मावळतीच्या रंगात गड फारच सुंदर भासतो.
खैराई किल्यावरील खोदीव पायर्‍या, पाण्याचे टाके, मंदिर, तोफा, या गोष्टी पर्यटकांच्या आकर्षणाच्या ठरल्या आहेत.