कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ३८

 तुलादानाचा विधी आटोपला. खासे मेणे महाबळेश्वर सोडून उताराला लागले. जिजाबाईंच्या मेण्यातच बाळराजे बसले होते. जिजाऊ कसल्यातरी विचारात हरवल्यागत दिसत होत्या. काही बोलत नव्हत्या. त्यांनी बोलते व्हावे म्हणून शंभूराजांनी त्यांना विचारले, "थोरल्या आऊ, आपण आमच्याशी काहीच कसं बोलत नाही ? आमचं काही चुकलं. 

"नाही शंभूबाळ, राजांनी आमची तुला जोखली आणि तेव्हापासून आम्हास तुमच्या धोरल्या महाराजसाहेबांनी जोखलेल्या एका तुलेची सारखी याद येते आहे!” जिजाबाई शहाजीराजांच्या आठवणीने कातर झाल्यागत बोलल्या. त्यांचे शांत, लांबट डोळे हरवल्यासारखे झाले.

कसली तुला मासाहेब ?'


'त्याला कैक सालं गुदरली. तुमचे थोरले महाराजसाहेब तेव्हा मोहिमेवर होते. स्वारीचा आणि आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांचा तळ इंद्रायणी आणि भीमा यांच्या काठावर नांगरगावी पडला होता. मुरार जगदेवास आपल्या बैठकीच्या हत्तीच्या बच्च्याची तुला करण्याची इच्छा झाली. पण एवढा थोर बच्चा कसा जोखावा याची उकल मात्र काही केल्या त्यास होईना !' "


"मग?" बाळराजांचे कुतूहल वाढले. 'तुमच्या थोरल्या महाराजसाहेबांनी पुढं होऊन त्याला तोड सांगितली. हत्तीचा बच्चा इंद्रायणी आणि भीमा यांच्या संगमातील डोहाच्या नावेत चढविण्यात आला. त्या वजनाने नाव जेवढी डुबली तेवढ्या जागेवर खूण करून घेतली. मग बच्चा उतरवून त्या खुणेपर्यंत नाव डुबेल एवढे दगड-धोंडे नावेत चढविले. आणि त्या दगडांच्या भाराइतकं सोनं नाणं दान करण्यात आलं! तेव्हापासून सारी रयत त्या नांगरगावास 'तुळापूर' म्हणू लागली. '


शहाजीराजांचे चातुर्य आपल्या नातवाला सांगताना जिजाबाईंचा चेहरा उजळून निघाला होता. हत्तीच्या बच्च्याच्या तुलेची ती अजब कथा ऐकताना शंभूराजांच्या डोळ्यांसमोर एक दृश्य स्पष्ट खडे ठाकले. त्यांना मनोमनी ते फार आवडले. ते चित्र "म्हणजे- " इंद्रायणी आणि भीमा या नद्यांचा संगम. त्या संगमाच्या डोहावर हिंदोळणारी भली थोरली नाव आणि त्या नावेत चढविलेला हत्तीचा भलामोठा बच्चा !'


महाबळेश्वराहून भोसलेमंडळ राजगडी आले. मालवणहून जलदुर्ग पुरा झाल्याची वर्दी आली होती. राजांच्या मनी कर्नाटक प्रांतावर आरमारी स्वारी करण्याचा मनसुबा घर करीत होता. पण ते राजगड सोडू शकत नव्हते. कारण शहाजीराजांचे वर्षश्राद्ध तोंडावर आले होते. प्रभाकरभटांना राजांनी वर्षश्राद्धाची सारी तयारी करण्यास सांगितले. प्रभाकरभटांनी गरुडपुराण आणि रामायणाच्या उत्तरकांडाप्रमाणे वर्षश्राद्धाची सारी तयारी केली.


स्नान करून पेहराव चढविलेले, मनात शहाजीराजांच्या ठसठशीत आणि ओझरत्या आठवणी घोळवणारे राजे शंभूबाळांना संगती घेऊन जिजाबाईंच्या खासेमहालात दर्शनासाठी आले. जिजाऊसाहेब फरसबंदीवरच्या बिछायतीवर बसल्या होत्या! उदास आणि अचल, स्वत:तच हरवून गेलेल्या. त्यांच्या मनी शहाजीराजांच्या तडफदार वारेजोड आठवणींनी दाटी केली होती. त्यांचे राजमन झाकाळून गेले होते. मन मनाशीच जाबसाल करीत होते. हाताशी काहीच आले नाही की सुन आणि निसूर होत होते...


राजांनी पुढे होत आऊसाहेबांचे पाय शिवले. जिजाऊसाहेबांनी आपली मान वर उठविली. त्यांचे डोळे भरून आले होते. दाटल्या कंठात शब्द अडकून पडले होते. समोर शंभूराजे बघताच त्यांचे दाटले मन तर गलबलून उठले.


पुढे होत थोरल्या आऊसाहेबांच्या पायांवर मस्तक ठेवण्यासाठी वाकणाऱ्या शंभूराजांचे, गडबडीने उठून खांदे पकडीत त्यांना दूर सारीत जिजाऊ स्वतःशीच बोलल्यागत म्हणाल्या – “नको SS बाळराजे, आज तरी नको!!' " - खालच्या मानेने गोंधळलेले राजे पडल्या आवाजात म्हणाले, "पिंडदानासाठी आम्ही गड उतरतो आहोत मासाहेब... कानंद नदीच्या तीरावर जात आहोत.. “या.” म्हणत जिजाबाई पाठमोऱ्या झाल्या आणि महालाच्या गवाक्षाच्या रोखाने संघ चालू लागल्या. त्यांच्या महालाच्या बाहेर पडणारे राजे शंभूबाळांच्या खांद्यावर एक हात ठेवून विचार करीत होते की, आज आऊसाहेबांनी बाळराजांना मुजन्यासाठी का झुकू दिले नाही ? बाळराजांचे काही चुकले तर नाही ना ? राजांना उत्तर सापडत नव्हते.


गवाक्षाच्या महिरपीतून दिसणाऱ्या कानंद नदीच्या वळणदार पात्राकडे बघत जिजाऊ मात्र आपल्या हरवलेल्या सौभाग्याच्या पायवाटा आठवीत स्वतःला म्हणत होत्या, “शंभूबाळ ऽ, तुम्ही - तुम्ही थेट तुमच्या थोरल्या महाराजसाहेबांच्यासारखे दिसता !! थेट आमच्या स्वारीसारखे!' "


राजांनी शहाजीराजांच्या वर्षश्राद्धाचे पिंड कानंदीच्या धुकटलेल्या पात्रात विसर्जित केले. शेजारी उभ्या असलेल्या शंभूराजांना पिंड पात्रार्पण करण्याची नजरेनेच इशार केली. जमलेल्या ब्रह्मवृंदाला गोदाने देण्यात आली आणि ते भोसलाई पितापुत्र कानंदीचा काठ सोडून राजगडाच्या पायथ्याच्या रोखाने पायीच परत निघाले.


“ आबासाहेब, पिंड कशासाठी सोडायचे असतात नदीत ?" शंभूराजांच्या अचानक प्रश्नाने राजांची विचारसाखळी तुटली. कपाळीचे शिवगंध आक्रशीत राजांनी बाळराजांच्याकडे पाहिले आणि ते बोलून गेले, " गेल्या पिढ्या त्याने उद्धरून जातात बाळराजे! त्यांनी घालून दिलेल्या वाटांची जिम्मेदारी उजळून निघते.' राजांनी " शांतपणाने बाळराजांचा खांदा थोपटला. बाळराजांना फारसे काही समजले नव्हते.


पालखी गड चढून पद्यावती माचीवर आली आणि तटसरनोबत सिदोजीरावांनी पायउतार होणाऱ्या राजांना मुजरा घालीत वर्दी दिली, “खबरगीर बहिर्जी नाईक आत्ताच गडदाखल झाले आहेत. पेश होण्याची आज्ञा मागतात.” सिदोजींच्या वर्दीबरोबर राजांच्या कपाळी आठ्यांचे जाळे दाटले. धीरगंभीर आवाजात ते म्हणाले, " माचीच्या सदरेवर पेश करा बहिजींना. "


बाळराजांच्यासह राजे सदरमाचीकडे आले. सदरकऱ्यांचे मुजरे आपलेसे करीत राजे आणि शंभूराजे सदरबैठकीवर बसले. बसता बसताच हातखूण करून त्यांनी सदरकन्यांना निरोप दिला. एकेक सदरकरी मुजरा भरत बाहेर पडला. सदर रिकामी झाली. बहिर्जीना पेश करून सिदोजी थोपटेही सदरचौकाबाहेर पडले. राजांच्यासमोर खबरगिरांचा नाईक बहिर्जी मुजरा करून खाली मान घालून उभा होता. " बोला नाईक. 'राजांनी बहिर्जीला धीर दिला. शंभूबाळांच्या पायांवर नजर "जोडून बहिर्जन कापऱ्या आवाजात खबर पेश केली- "धनी, जयसिंग मिरजा राजा तीस हजार स्वार, बराबर दिलेरखान, पाच हजार पठाण अशी मातबर फौज चालून येतीया. गनिमांचा तळ बुऱ्हाणपुरावर ठाण झालाय. जागजागच्या जमेती येऊन जयसिंगाच्या फौजेत दाखल व्हायला लागल्या!" बहिजींचा ऊर कोंदाटला.


ती खबर ऐकताच राजे सदरबैठकीवरून तडक उठले. त्यांच्या हाताची बोटे छातीवरच्या कवड्यांवरून सरासर फिरू लागली. मनात विचारांची घोडी धावू लागली. आपल्या सालगिराला वाढदिवसाला शिवाजीच्या मरणाची स्वप्ने पाहणाऱ्या औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग या राजपूत सरदाराला राजांच्यावर नामजाद केले होते. एका राजपुताकडून दुसऱ्या राजपुताला उखडून काढण्याचा, काट्याने काटा काढू बघणारा राजकीय डाव औरंगजेबाने टाकला होता. हे काम बरोबर होते आहे की नाही यावर सख्त नजर ठेवण्यासाठी दिलेरखान पठाणाचा लोढणा मिर्झा राजाच्या गळ्यात अडकवून टाकला होता.


बहिर्जीची खबर ऐकून राजे क्षणभर सुन्न झाले खरे, पण लागलीच स्वतःला सावरून ते म्हणाले, "बहिर्जी, दूरची धावणी झाली. काही खाऊन घ्या. या." बहिर्जी मुजरा करून निघून गेला.


विचारात हरवलेले राजे संगती शंभूराजांना घेऊन पद्मावतीच्या सदरेमागून बालेकिल्ल्यावर बाहेर निघणान्या भुयाराच्या तोंडाशी आले. भुयारावर पहारा देणाऱ्या धारकऱ्यांनी मुजरे करून भुयारावरची थोराड आडधोंड बाजूला हटती केली.


मेसाच्या वाकावर चकमकीच्या दगडाच्या ठिणग्या टाकून दोन मावळ्यांनी त्या वाकानं आगटी तयार केली. आगटीवर करंजेल सोडलेले पलोते त्यांनी पेटते केले. आणि राजांना भुयारवाट दाखविण्यासाठी ते मावळे भुयारात उतरले. त्यांया मागून राजे भुयारात उतरले. मागे तोंडाशी उभ्या असलेल्या शंभूराजांना त्यांनी आपला हात देऊन भुयारात घेतले !! पलोत्याच्या धूसरमंद प्रकाशात एकामागून एक उतरत्या दगडी पायऱ्या मागे पडू लागल्या.