कोणतही शिवकाव्य येथे शोधा

शिवकालीन महाराष्ट्र ( सन १५९९ ते सन १६८० ) भाग ८ :-




भोसले कुळाचा पुर्ववृत्तांत
कृष्णाजी अनंत सभासदानेही महाराज क्षत्रिय राजपूत होते असं आपल्या बखरीतनमुद केलं आहे. एके ठिकाणी तो महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यातीलसंभाषणाबद्दल लिहीतो, त्यात मिर्झाराजे म्हणतात, “ ... हीच गोष्ट खरी. आपणराजपूत. तुम्ही (शिवाजी महाराज) व आम्ही एकजाती आहोत. अगोदर आपले शिर जाईलमग तुम्हांस काय होणे ते होईल... ”. या कृष्णाजी अनंताची बखर तर सर्वमान्यचआहे !
शहाजीराजांच्या दरबारात असणार्‍या कवी जयराम गंभीरराव पिंड्येयाने सुद्धा भोसल्यांच्या कुळाविषयी लिहून ठेवल आहे. ‘ उपनाम भोसले, वंशशिसोदे, वर्ण क्षत्रिय (राजपूत), गोत्र कुशिक (कौशिक) ’ असल्याचं जयरामसांगतो. निदान, शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाच्या आधी जयरामाने हे लिहूनठेवलं आहे हे नक्की, त्यामूळे, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्यावेळेस महाराजांचं गोत्र ठावूक नव्हतं म्हणून गागाभट्टांनी ‘शिसोदिया’वंशियराजपूत असं क्षत्रियपण चिकटवलं हा सध्या होत असणारा आरोप पूर्णतः चूकीचाचनसून तो निराधारही आहे ! शहाजीराजांच्या जिवनचरित्राविषयी जयराम लिहितो :
महिच्या महेंद्रामधे मुख्य राणा । बलिपास(दिलिपसिंह) त्याचे कुळी जन्म जाणा ।
तयाचे कुळी मालभूपाल झाला । जयानेजले शंभू संपूर्ण केला ॥८५॥
एकूणच हा सारा प्रपंच मांडला तो केवळ शिवाजी महाराजांचा कुलवृत्तांतसमजण्याकरीता ! महाराष्ट्रात आज कित्येक मतप्रवाह आहेत. काही इतिहासकारांचाअसा आक्षेप आहे, की भोसले हे आडनाव पूर्वीपासून ९६ कुळी मराठ्यांत आहे.परंतू इ.स. १७०० च्या पूर्वीची ९६ कुळांची यादी अजून खात्रीलायक सापडलेली नाही.
भारत इतिहास संशोधक मंडळाचे माजी ज्येष्ठ संशोधक सी.व्ही. वैद्ययांच्या Shivaji, the founder of Maratha Swarajया ग्रंथात त्यांनी उदयपूरसंस्थानचे तत्कालीन राजे पंडित सुखदेव प्रसाद यांचा अभिप्राय नोंदवला आहे, ज्यात प्रसाद म्हणतात, ‘the name of Bhosaji does not occur in their genealogical tables nor it is common among Rajputs’. परंतू आपल्याकडच्याबखरींमध्ये मात्र भोसले यांच्या नावाबद्दल सर्व बखरकारांत एकवाक्यता आहे.याव्यतिरिक्त इतिहासकारांचा आक्षेप असा आहे, की भोसल्यांचं गोत्रं आहेकौशिक. आणि राजपुत शिसोदियांचं गोत्रं आहे बैजावप. परंतू आपल्याकडे हीगोष्ट कधीही लक्षात घेतली जात नाही की क्षत्रियांना पुराणकाळापासूनचस्वतःचं असं गोत्रं नसे. क्षत्रिय घराण्याचा जो गुरू (Preceptor) असे, त्यागुरूचंच गोत्र क्षत्रिय लावत असत. यामुळेच, अल्लाउद्दिनच्या आक्रमणानंतरअजयसिंहाचे वंशज जेव्हा दक्षिणेत आले, तेव्हा दक्षिणेतीलच एका कौशिक गोत्रीब्राह्मणाला गुरू मानून त्यांनी त्या गुरुचे गोत्रं मान्य केले असेल. आजहीआपण पाहिलं तर सातारा गादी आणि कोल्हापूर गादी ही एकाच भोसले घराण्याचीआहे. परंतू या दोन्ही ठिकाणच्या भोसल्यांचं गोत्रं निराळंच आहे. शिवाजीमहाराजांच्या काळात त्यांच्या घराण्याचं उपाध्येपण चालवत होते प्रभाकरभट्टआर्विकर पुढे त्यांच्या पुत्राला, बाळंभट्ट आर्विकरांना महाराजांनीउपाध्येपण बहाल केले. भीमा नदीच्या काठावर पेडगावच्या उत्तरेला असणार्‍याआर्वि गावच्या कौशिक गोत्री ब्राह्मणाला मालोजीराजे आणि विठोजीराजे यांनीगुरूस्थानी मानुन, भोसल्यांचे उपाध्येपण बहाल केल्यांचं दानपत्र आज उपलब्धआहे. राज्याभिषेकाच्या आधी खुद्द महाराजांनी राजस्थानात, राजपुतान्यातमाणसे पाठवून आपला कुलवृत्तांत गोळा करण्यास सांगितले होते. शिवाय आजही, बिआवर, बिकानेरच्या राजसंग्रहात शिवाजी महाराजांच्या कुंडल्या आहेत. यासार्‍यावरून, जोपर्यंत नवीन विश्वसनिय पहिल्या दर्जाचे पुरावे सापडत नाहीततोपर्यंत आज ठामपणे असे विधान करता येते की, महाराज हे मेवाडच्या महाराणालक्ष्मणसिंहाच्या वंशातले, शिसोदिया वंशिय क्षत्रियकुलोत्पन्न होते हेनिश्चित !
http://www.kaustubhkasture.in/2013/08/blog-post_9421.html