कोणतही शिवकाव्य येथे शोधा

शिवकालीन महाराष्ट्र ( सन १५९९ ते सन १६८० ) भाग ७ :-




भोसले कुळाचा पुर्ववृत्तांत
शेडगावकरांचा बखरकार म्हणतो, मालोजीराजे घृष्णेश्वरास आल्यानंतर शंभूघृष्णेश्वर आणि श्री जगदंबा तुळजाभवानीने मालोजीराजांना स्वप्नात येऊनदृष्टांत दिला, ‘तुम्हांस आश्विन शुद्ध ८ मंगळवार (शके १५१६ जयनामसंवत्सरे) रोजी रात्रीस तुम्हांस शेतात द्रव्यलाभ होईल’ आणि खरंच द्रव्यलाभझाला. मालोजीराजांची पत्नी दीपाबाईसाहेब या फलटणच्या वणगोजी नाईक निंबाळकरयांची कन्या. दीपाबाई आणि मालोजीराजांना पुढे नगरच्या शहा-शरिफ पीराच्याप्रसादाने पुत्र झाले अशी त्यांची समजूत होऊन आपल्या पुत्रांची नावेहीशहाजी (जन्म, शके १५१६ जयनाम संवत्सर) आणि शरिफजी (जन्म, शके १५१७ मन्मथसंवत्सर) अशीच ठेवली. अर्थात इतिहासाचार्य वि. का. राजवाड्यांच्या मतेशहाजीराजांचे मूळ नाव सिंहजीत्‍ आणि शरिफ़जीराजांचे मूळ नाव शरभजीत्‍ असावे.सिंहजीत्‍ या शब्दाचा अपभ्रंश सिंहजी, सिंहाजी, सिहाँजी, स्याहाजी आणिशहाजी असा होत गेला तर शरभजीत्‍ या शब्दाचा अपभ्रंश शरभजी, शरफजी, शरिफजीअसा झाला असावा. मालोजीराजे भोसले हे अहमदनगरच्या निजामशहाचे सरदारअसल्याने निजामशहाच्या मखलाशीकरता त्यांनी सिंह आणि शरभ या पुरातन संस्कृतनावांच्या जवळ जाणारी शाह आणि शरिफ ही नावे नगरच्या शाह्शरिफ पीरावरूनठेवली असे निजामशहाला भासवले. मार्गशिर्ष शुद्ध ५ शके ५१२७ विश्ववसुनामसंवत्सरे या दिवशी शहाजीराजांचे, निजामशाहीतील बडी असामी असलेल्या, वर्‍हाडच्या लखुजी जाधवरावांच्या कन्येशी, जिजाबाईंशी लग्न झाले. यानंतरशहाजीराजे आणि जिजाबाईंना एकूण सहा पूत्र झाले त्यात सर्वात पहीलासंभाजीराजे आणि सर्वात शेवटचे शिवाजीराजे वगळता सारी मुले लहानपणीच मृत्यूपावली.
http://www.kaustubhkasture.in/2013/08/blog-post_9421.html