कोणतही शिवकाव्य येथे शोधा

शिवकालीन महाराष्ट्र ( सन १५९९ ते सन १६८० ) भाग ९ :-




सन १५९९ चा शिवकालीन महाराष्ट्र
शाहजी राजे यांचा जन्म
बाबाजी भोसलेचा पुत्र मालोजी भोसले याचा विवाह फलटणच्या निंबाळकरघराण्यातील उमाबाई हिच्याशी झाला होता. उमाबाईचा भाऊ वंगोजी नाईक निंबाळकरहा आदिलशाही दरबारातील मान मरातब असलेला सरदार होता. लग्नानंतर काही वर्षेझाली तरी मालोजी व उमाबाई यांना मुलबाळ नव्हते. उमाबाई अतिशय धार्मिक वश्रध्दाळू असल्याने मुल व्हावे म्हणून तिने अनेक मंदिरात नवस-प्रार्थनाकेली होती.
त्यांनी अहमदनगर येथील शाहशरीफ दर्ग्यात देखील नवस केलाहोता. त्यानंतर लवकरच त्यांच्या पोटी एक मुलगा जन्माला आला (इसवी सन १३मार्च १५९९). त्याचे नाव शाहजी असे ठेवण्यात आले. पुढे काही वर्षांनी दुसरामुलगा जन्मला. त्याचे नाव शरीफजी असे ठेवले. अर्थातच दोघांची नावेअहमदनगरच्या पीर शाहशरीफ यांच्या नावावरुन ठेवली होती. मालोजी व त्याचा भाऊविठोजी अहमदनगरच्या निजामशाही दरबारात काम करत. निजामशहाने त्यांना वेरुळ, देर्‍हाडी, कानडी मुलूख व इतर काही परगण्यांची जहागिरी दिली होती.
सांभार :www.marathaempire.in