कोणतही शिवकाव्य येथे शोधा

शिवकालीन महाराष्ट्र ( सन १५९९ ते सन १६८० ) भाग ६ :-




भोसले कुळाचा पुर्ववृत्तांत
...
बखरकार म्हणतो, की या उभयतां भावांना खेलकर्ण आणि मालकर्ण ऐवजी खेलोजी आणिमालोजी अशी नावे पडली. याचे कारण बखरकार लढाईच्या निमित्ताने देत असला तरीयाचे मूळ कारण असे असावे- सुलतानी अंमलात, मुसलमान लोक हे एखाद्याहिंदूला, जरी तो बडा सरदार अथवा सेनापती असला तरीही काफर म्हणून तुच्छतेनेचसंबोधत असत. यासाठी पुढील व्यक्तिंची उदाहरणे पाहू. महाराजांच्या पंताजीगोपिनाथ बोकील या वकीलाला अफजलखान ‘पंतू’ म्हणायचा. औरंगजेब नेतोजीपालकराला ‘नेतू’, खुद्द शिवाजी महाराजांना ‘सिवा’ आणि संभाजी महाराजांना ‘संभा’ म्हणायचा हे अस्सल पत्रांतू दिसून येतं. त्यामूळेच इथेही साहजिकच, ‘खेलकर्णजी’ आणि ‘मालकर्णजी’ ही नावे गळून पडून खेलो आणि मालो असेच उल्लेखकेले गेले असावेत. अर्थात, हे दोघेही कितीही झालं तरी निजामशाहाचे सरदारअसल्याने त्यांच्या नावापुढे ‘जी’ हे आदरार्थी विशेषण लावणे भागच होते.म्हणूनच यांची नावे पुढे ‘खेलोजी’ आणि ‘मालोजी’ अशीच रुढ झाली. पुढे खेलोजीहे लढाईत ठार झाले आणि मालोजी हे एके दिवशी चाकणजवळच्या चासकमान (थोरल्याबाजीरावांच्या पत्नीचे माहेरही याच गावचे होते) गावात जलक्रिडा करावयासगेले असता बुडून मृत्यू पावले. त्यांचे पुत्र बाबाजीराजे (जन्म शके १४५५)हे लहान असल्याने निजामशाहाने मालोजींची ईनामदौलत अनामत करवून सरकारात दाखलकेली. मालोजींची पत्नी आपला पुत्र बाबाजीला घेऊन दौलताबादेपासून पाचकोसांवर असणार्‍या वेरूळ जवळच्या घृष्णेश्वरासन्निध जाऊन राहिली. तिच्याजवळअसणार्‍या पिढीजात आसवाबातून आणि मालोजींच्या असणार्‍या थोड्याफार जमिनीतशेती करवून त्यांचा निर्वाह चालला होता. पुढे बाबाजीराजे मोठे झाल्यानंतरभीमा नदीच्या काठावर ‘मौजे देऊळगाव तर्फ पाटस परगणे पुरंदर’ येथे येऊन मौजेदेऊळगाव, मौजे खानवटे आणि मौजे कसबे जिंती (?) या भीमातीरावरच्या तीनगावांच्या पाटीलक्या खरेदी केल्या. पुढे परिधावीनाम संवत्सरे शके १४७४मध्ये बाबाजीराजांची पत्नी प्रसुत होऊन पुत्र झाला. या पुत्राचे नावठेवण्यात बाबाजीराजांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ ठेवले मालोजीराजे !यानंतर बाबाजीराजांना आणखी एक पुत्र झाला, याचे नाव ठेवण्यात आलेविठोजीराजे. पुढे मालोजी आणि विठोजी हे आपल्या तीर्थरूप आणि मातोश्रींसहदेऊळगावास येऊन राहिले. येथून जवळच सातारा-फलटण या भागात शंभू-महादेवाचेपवित्र शिवालय होते. तुळजापूरची भवानीही जवळच होती. ही दोन्ही शिसोदियाम्हणजेच भोसले घराण्याची कुलदैवते !
http://www.kaustubhkasture.in/2013/08/blog-post_9421.html