भोसले कुळाचा पुर्ववृत्तांत
शिवाजी महाराजांबद्दल आज ज्या अनेक गैरसमजुती पसरलेल्या आहेत त्यांपैकीचएक म्हणजे महाराज नक्की कोण होते याविषयी आहे ! काही लोकांचं म्हणणं आहे की महाराज राजपूत होते, काहींचं म्हणणं आहे की महाराज धनगर होते, काहींचंम्हणणं आहे की महाराज कानडी होते तर काही म्हणतात ते मूळचेमहाराष्ट्रातीलच, मराठा होते. परंतू अस्सल ऐतिहासिक साधनांचा उहापोह केलाअसता, त्यात दिलेली माहितीच ग्राह्य धरून चालले पाहिजे. आणि म्हणूनच, सर्वप्रथम, पूर्विच्या बखरी अथवा इतर साधनांतून शिवाजी महाराजांचं, अथवा, पूर्ण भोसले घराण्याचंच कुळ नेमकं कुठलं आहे हे तपासायला हवं !
शिवचरित्राचा अभ्यास करताना जे काही पुरावे तपासले जातात त्यात बखर हेवाङ्मय दुय्यम दर्जाचं असलं तरीही त्याचं महत्व हे कमी होत नाही. शिवाय, महाराजांच्या कुलवृत्तांताविषयी अस्सल पत्रांमध्ये अतिशय नगण्य माहितीमिळते, जो काही भरवसा ठेवावा लागतो तो बहुतांशी बखरींवरच ! उपलब्ध असलेल्याबखरींपैकी, जो अतिशय विश्वसनिय असा पुरावा मानला जातो, ती कृष्णाजी अनंतमजालसी उर्फ सभासद याने लिहीलेली ‘सभासद बखर’ आहे, परंतू सभासदाने शिवाजीमहाराजांच्या पूर्वजांबद्दल फारशी माहिती दिलेली नाही. त्याने थेटमालोजीराजे आणि विठोजीराजांवर केवळ एक परिच्छेद लिहीला आहे. श्री विनायकलक्ष्मण भावे यांनी ‘मराठी दफ्तर रुमाल पहिला’ मध्ये छापून प्रसिद्ध केलेली ‘शेडगावची बखर’ हीचा या प्रकरणासाठी संदर्भ म्हणून विचार केला आहे.
शेडगावकरांच्या बखरीत सुरुवातीलाच, “ सिसोदे महाराणा याची वौशावळ मारवाडदेशाचे ठाई उदेपुरानजिक चितोडे शहर आहे तेथे एकलिंग माहाराज शंभू माहादेव वश्री जगदंबा देवी आहे तेच कुळस्वामी तेथील संवस्थानी सिसोदे माहाराणेआहेत. त्यांतिल एक पुरुष सजणसिव्हजी माहाराणे याजपासून संततीचा विस्तार: ” असे म्हणून त्यातील एकेक करून चौदा पुरुषांचे फक्त नाव नमुद केलेले आहे.त्यावरून कोण नेमका कोणाचा पुत्र अथवा कोणाचा भाऊ हे समजून येत नाही. तीसर्व नावे पुढीलप्रमाणे-
१. सजणसिव्हजी माहाराणा २. दिलिपसिव्हजी माहाराणा ३. सिव्हाजी माहाराणा
४. भोसाजी माहाराणा ५. देवराजजी माहाराज ६. इंद्रसेनजी माहाराज
७. शुभकृष्णजी माहाराज ८. स्वरूपसिव्हजी माहाराज ९. भुमिंद्रजी माहाराज
१०. यादजी माहाराज ११. धापजी माहाराज १२. बर्हाटजी माहाराज
१३. खेलकर्णजी माहाराज १४. मालकर्णजी माहाराज.
इथे बखरीत असं नमुद केलं आहे की, चितोडगडाच्या जवळच भोशी किल्ला आहे, त्याकिल्ल्याच्या जवळच असणार्या भोसावत या गावी रहायला आल्यापासून याराजवंशाचे शिसोदे हे आडनाव मागे राहून ‘भोसले’ असं झालं. तर्क असा आहे, कीअल्लाउद्दीन खलजीने चितोडगडावर आक्रमण केल्यानंतर चितोडचा महाराणालक्ष्मणसिंह शिसोदिया हा आपल्या सात मुलांसह लढता लढता मारला गेला, आणित्याच्या आठव्या पुत्राला, अजयसिंहाला राजपुतांनी खलजीपासून वाचवूनसुरक्षित ठिकाणी लपवून ठेवले. कदाचित अजयसिंहांचेच हे पुढचे वंशज खलजीपासूनबचाव करण्यासाठी, आपला शिसोदिया म्हणून निर्वंश होवू नये म्हणून ‘भोसावत’ या नावाने राहू लागले असावेत. पण या गोष्टीला हवा तसा पुरावा आजुन सापडलेलानाही.
या शिसोदिया कुळातल्या राजांच्या दक्षिणेतल्या प्रवेशाबद्दलशेडगावकरांचा बखरकार म्हणतो, “ येकंदर पुरुष चौदा त्यांपैकी खेलकर्णजीमाहाराज व मालकर्णजी माहाराज असे दोघे बंधू हे दक्षणदेशी आलें ते आमेदशापातशहा दौलताबादकर ( दौलताबादचा अहमदशहा निजामशहा) यास येऊन भेटले. त्यानीत्यांचा मोठा सन्मान करून नंतर दर असामीस प्रथक प्रथक (?) पंधरा पंधराशेस्वारांच्या सरदार्या मणसब देऊन हे (भोसले बंधू) पातशाही उमराव म्हणवीतहोते. त्या उभयता बंधूंच्या नावे सरंजाम चाकरीबद्दल चाकण चौर्यासी (चाकणआणि भवतालची चौर्यांशी खेडी) परगणा व पुरंधेरचे खाली परगणा व सुपे माहालअसे तीन माहाल तैनातीबद्दल त्याजकडे लाऊन दिल्हे त्याप्रमाणे ते उभयेताबंधू चाकरी करीत होते ”.
सांभार
:http://www.kaustubhkasture.in/2013/08/blog-post_9421.html