कोणतही शिवकाव्य येथे शोधा

शिवचरित्रमाला भाग क्र ११२ ( ब )

��⛳नवीन लिहलेला भाग ⛳�� शिवचरित्रमाला भाग क्र ११२ ( ब ).....

“बहलोल खानास गर्दीस मेळविल्याविना
आम्हास रायगडी तोंड दाखवू नका.
हाच आदेश मस्तकात घेउन सरनौबत प्रतापराव गुजर
जगत होते. नेसरीजवळच महागाव येथे छावणी पडली असताना एक दिवस उगवला – बळीचा दिवस.
(दि.२४ फेब्रुवारी १६७४) या दिवशी महाशिवरात्र होती प्रतापराव आपल्या ६ शिलेदारांनिशी सहज फिरायला म्हणून बाहेर पडले होते. मुख्य छावणी पासून पुष्कळ दूर असताना त्यांना हरकार्याकडून बातमी समजली की बहलोल खान ४०,००० फौजेनिशी
स्वराज्यावर चालून येतोय. काही दिवसांतच महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक होणार होता. तेव्हा महाराजांना
अष्टप्रधानांपैकी ७ प्रधानांचा मुजरा झडणार होता. मात्र सरसेनापतीचा मुजरा झडणार नव्हता ! का ? तर “बहलोल खानास गर्दीस मेळविल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका.” असा प्रत्यक्ष महाराजांचाच हुकूम होता. बहलोल खानाच नाव ऐकून प्रतापरावांच्या अंतरात धुमसत असलेल्या सुरूंगावर जणू शिलगावणीच पडली. रावांच्या
डोळ्यातून संतापाच्या ठिणग्या उडू लागल्या. विजेच्या चपळाईने प्रतापरावांनी घोड्यावर मांड टाकली व घोड्याला टाच मारली. ते सहा शिलेदारही प्रतापरावांच्या मागे सुसाट दौडत निघाले.
फक्त सात. फक्त सात, सात घोडेस्वारांची मात चालली होती काळावर. जणू सुर्यरथाचे
सात अश्वच पृथ्वी गिळंकृत करण्या करता सुसाट वेगाने निघालेले होते. बहलोल
खानाने मलप्रभा नदी ओलांडली. नदी ओलांडल्यावर त्याला व त्याच्या फौजेला
अपरंपार आनंद झाला. कारण ते आता शिवाजीच्या मुलखात घुसत होते. शिवाजीच्या मुलखात त्यांच्या घोड्याची
टाप पडत होती. त्यांचे नगारे वाजत होते.कर्णे थरारत होते. बारा ईमामचे शाही झेंडे आघाडीला फडकत होते. उंटांचा व घोड्यांचा निसारा दोन्ही बाजूंनी दौडत सुटला होता.
स्वतः बहलोल खान हत्तीवर बसला होता.आपल्या फौजेला तो जोश देत होता.अन् अचानक हत्तीवरचा माहूत ओरडला हूजूर वो देखीये।बहलोल ने दूरवर नजर लावून पाहील,समोरून धूळ ऊसळताना दिसली.पण त्याच्या हे ही लक्षात आल की जास्तीत जास्त १० लोक असतील....तेव्हड्यात हरकारा दौडत येऊन म्हणाला खानसाहेब स्वतः प्रतापराव फक्त ६ शिलेदारांबरोबर चाल करून येतोय.....बहलोल खानाचा विश्वासच बसेना....पण खात्री करून घेतल्यावर त्याने आनंदाने टाळीच वाजवली. आणी हूकूम सोडला कत्ले आम करो,कत्ले आम करो। प्रतापराव बहलोलखानाच्या ४०००० फौजेवर तूटून पडत होते आपल्या 
६ जणांच्या “प्रचंड सैन्यानिशी.
“इंद्रधनू विस्कटले ग्रासत, रंग उधळले नभा ।
सात रंग उधळले दिगंती, प्रलयभैरवी प्रभा ।।
विलयंकर उस्कटल्या रेषा
मोक्षदायिनींच्या, तुफान उठले मनात जैसे
सात समुद्रांच्या।
खलनिर्दालन देव कार्य!मग कसला त्यास उशीर ?
अधीर वेडे वीर निघाले सात शिवाचे तीर !
सात शिवाचे तीर !!!
रावांनी नेसरी येथे अवघ्या सहा शिलेदारांनिशी बहलोलखान पठाणाच्या सेनेवर हल्ला चढवला आणी मग........
क्रमश