⛳⛳नविन लिहलेले भाग ⛳⛳शिवचरित्रमाला भाग क्र ११२ ( अ ).....
आणि मग बहलोल खानाने मराठयांवर निकराचा हल्ला चढवला. संतापलेली, पिसाळलेली आणि पाणी न मिळाल्यामळे तहानलेली बहलोल खानाची फौज ताज्या दमाच्या मावळ्यांशी लढू लागली. मराठयांच्या तलवारी,भाले गरागरा फिरू लागले. सटासट बाण सुटू लागले. मुंडकी छाटली जाऊ लागली. बहलोल खानाने फळी फोडण्याची शर्थ केली पण व्यर्थ. . . . बहलोल समोर पठाणांची कत्तल स्पष्ट दिसू लागली. आता एकच उपाय - गुडघे टेकायचे. पदर पसरायचा,धर्मवाट मागायची.... बहलोल खानाने ताबडतोब आपला वकील प्रतापरावांकडे पाठवला. वकील आला. त्याने प्रतापरावांसमोर पदर पसरला. धर्मवाट मागितली. बहलोल खान शरण आला.सरसेनापती प्रतापरावांनी सुद्धा त्याला धर्मवाट दिली,पाणी पाजले व संपूर्ण युद्धसाहित्य,खाजिना जप्त करून जाऊ दिले.
परंतु हा अपमान बहलोल खानाच्या जिव्हारी लागला होता. तो तिकोटयाला गेला आणि तिथेच थांबला. प्रतापरावांनी बहलोल खानाला चिमटीत सापडला असतानाही तसाच सोडला ही बातमी महाराजांना पन्हाळगडावर समजली अन् महाराज संतापले. एक वेळ संपूर्ण फौज सोडली असती तरी चाललं असत पण हा बहलोल खान चिमटीत सापडला असता सोडायला नको होता. हा बहलोल बहुत वळवळ करतो,त्यास पकडला असता तर सबंध हिदूस्तानच्या राजकारणावर सलाबत बैेसली असती. प्रतापरावांनी सरदारी केलीच नाही,नुसति शिपाईगीरीच केली. . .
अन् असा जाब विचारणारा खालिता पन्हाळगडाकडून प्रातापरावांच्या छावणीकडे सुटला.
इकडे प्रतापरावांच्या छावणीत आनंदीआनंद होता.कापशीजवळ छावणी पडली होती. विजयाची खबर महाराजांना आनंद देईल आणि साखरथैली घेवून सांडणीस्वार येतच असेल असे प्रतापरावांना आणि फौजेला वाटत होते. अन् खलीता घेवून सांडणीस्वार छावणीत दाखल झाला.
प्रतापरावांनी महाराजांकडून आलेली थैलि आनंदाने मस्तकी लावली . ती उघडली. थैलीतला मजकूर वाचत असताना प्रतापरावांचा आनंद खाडकन उडून गेला आणि ती जागा दूःखान घेतली. थैलीत महाराजानी जाब विचारला होता प्रतापरावांना .. .!
सला काय निमित्य केला? हा बहलोल खान घरघडी येतो,रयतेला त्रास देतो.बहहोलखनास पकड़ा किवा ठेचा हा आमचा खास हुकुम असताना सला काय म्हणून केला ? हुकुम नसतनाही त्यास तुम्ही सोडलत,हा पुन्हा फौज गोळा करील. पुन्हा चालून येईल,शेतिवाड़ी ख़राब करील.बायका पोर पळावतील. याची जिम्मेदारी कोणावर? राव ही जिम्मेदारी तुमच्यावर! बहलोल खानास गर्दीस मिळविल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका.
प्रतापरावंच काळीज करचळत करचळत गेल.छावणीवरची आनंदाची कबूतर अचानक उडून गेली,.स्मशानशांतता पसरली. एक माहिना गेला,दोन माहिने गेले अन् प्रतापरावांना उमगल, महाराज म्हणतात तेच खरं, बातम्या येवू लागल्या.
बहलोल खान तिकोटयाला सैन्य जमवतोय.चाळीस हजाराची फौज जमवलीं आहे.सूडानं पेटलेले प्रतापराव सरहद्दीवरच आप्पाची वाडी,मूरगुंड,निप्पाणी,कागल या भागात विमनस्क अवस्थेत स्वराज्याच्या सरहददीवर भिरभिरू लागले....
क्रमश.