⛳ नवीन लिहलेला भाग ⛳शिवचरित्रमाला भाग क्र ११२ ( क )
.....प्रतापराव बंदुकीच्या गोळीप्रमाणे सणाणून सुटले होते.बिथरलेले प्रतापराव समशेर घेऊन ऊसळले आणी सह्याद्रिचा कडा कोसळावा तद्वत बहलोलखानाच्या सैन्यावर येऊन कोसळले.प्रतापरावांच्या आणी सहा शिलेदारांच्या समशेरी मुंडकी छाटत छाटत बहलोलखानाच्या दिशेन सरकत होत्या.प्रतापरावांनी तर स्वतःभोवती विजेचे जणू वलयच निर्माण केले होते.पण चाळीस हजार फौजेसमोर होते फक्त सातच...कसे टिकणार! बहलोलखानाच्या सैन्याच्या हजारो तलवारी ऊठल्या होत्या या सात मराठ्यांच्या जिवावर,तेव्हड्यात ऐकाचा घोडा पडला,दूसर्याचा घोडा पडला,ऐका शिलेदाराच्या कंठात बाण घूसला,दूसर्याचा हात ऊडाला अन् ....प्रत्यक्ष प्रतापरावांचच मस्तक उडालं,प्रतापराव पडले,ठार झाले....बहलोलखानाची फौज या सात मराठ्यांच्या रक्तमासाचा चिखल तुडवत निघून गेली.
महाशिवरात्रीच्या दिवशी सात मराठ्यांनी जिवाच बिल्वपत्र नेसरीच्या खिंडीत आपल्या शिवाच्या चरणी वाहिलं.स्वराज्यातील अजून ऐक खिंड पावन झाली.नेसरीचे रुपांतर तिर्थक्षेत्रात झाले.
ईकडे महागावजवळ असलेल्या बारा हजाराच्या छावणीमद्ध्ये सरसेनापती प्रतापरावांचे दय्यम सरदार आनंदराव मकाजी भोसले लढाईसाठी छावणी जय्यत तयार करीत होते इतक्यात प्रतापरावांच्या मृत्यूची बातमी छावणीत येऊन दाखल झाली.प्रत्येकजण हळहळला.आनंदरावांनी तर ठरवलच की निदान करोन भांडण करायच.प्रतापरावांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी भगवे झेंडे दौडत निघाले.आनंदराव आघाडीवर नेतृत्व करित होते.आता गनिमांची फौज चाळीस हजार असो अथवा चार लाख चेंदायचीच हाच निश्चय प्रत्येकाचा होता......
आनंदरावांनी बहलोलखानाची फौज गाठली अन् मराठ्यांची बारा हजाराची फौज पेटली.प्रत्येक जण त्वेशाने लढत होता मराठ्यांच्या बारा हजार समशेरी आणी ढाली पेटून ऊठल्या होत्या सूड घेण्यासाठी.
बहलोलखानाने लढाईचा रागरंग ओळखला अन् तो स्वतः पळून गेला बहलोलखानाची फौज उधळली गेली. आनंदरावांची अस्मानी फत्ते झाली.
रायगडावर राज्यभिषेकाची तयारी जोरदार चालू होती आणि प्रतापरावांच्या मृत्युची कडूजहर बातमी राजवाडयात महाराजांसमोर येवून दाखल झाली. प्रतापरावाच्या मृत्यूच्या बातमीने महाराजांना अतोनात दु:ख झालें. "याचसाठी बोललो होतों का मी हे ? राज्य सांभाळत असताना प्रजेच्या हितासाठीं काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यासाठी जर बोल लावला म्हणून आत्महत्या करावी का रावांनी ? आपण केलेली चूक पोटतिडकिन् लवकरात लवकर दुरुस्त करून रायगडावर यावं म्हणून मी बोललो होतो राव! महाराजांचे मस्तक दुःखवेगान भणाणल आणि बोलिले "माझा राव पडिला आता सैन्याचा बंद कैसा राहतो."
महाराजांच्या काळजाला कायमचाच चटका लावून प्रतापराव नेसरीच्या खिंडीत दिव्य करून कायमचेच निघोन गेले.
⛳शिवचरणी तत्पर ⛳