कोणतही शिवकाव्य येथे शोधा

बहादूरवाडी किल्ला


किल्ल्याचा प्रकार: भुईकोट
जिल्हा: सांगली
तालुका: वाळवायेडे
निपाणी येथील विलासगड किल्ल्यापासून कोल्हापूरच्या रस्त्याने पुढे गेल्यावर बहादूरवाडी फाटा आहे. या गावात अपरिचित भुईकोट आहे. या कोटाची अवस्था पाहता खुद्द गावातल्यांनाही त्याबद्दलची आत्मीयता वाटत नाही हे सहज लक्षात येते. पण प्रथमदर्शनीच हा कोट मोहात पाडतो.बहादुरवाडी किल्ला माधवराव पेशव्यांनी बांधला. नंतर तो पटवर्धनांच्या ताब्यात देऊन कोल्हापूरकरांवर वचक बसवण्यासाठी याचा उपयोग केला गेला. या कोटाची बांधणी खणखणीत आहे. तटबंदीच्या बाहेर खंदक खोदलेला आहे. कोटाला चार तटबंद्या आहेत. खंदकाला जोडून असलेल्या तटबंदीला १२ बुरुज आहेत. त्याआतील दुसरी तटबंदी पाच मीटर आहे. ती गोलाकार असून, त्याला आठ बुरुज आहेत. अशा एकात एक चार तटबंद्या असून, चौथी मात्र आयताकृती आहे. किल्ल्यामध्ये एक विहीर आणि वाडय़ाचे काही अवशेष आहेत. कोटालगत वेतोबाचे छोटेखानी मंदिर आहे.bahadurwadi