कोणतही शिवकाव्य येथे शोधा

विलासगड


किल्ल्याची उंची: २४०० फूट
किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग
डोंगररांग: येडेनिपाणी
चढाईची श्रेणी: सोपी
जिल्हा: सांगली
तालुका: वाळवा
विलासगड हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असणारा एक दुर्लक्षित किल्ला असून, विलासगड पेक्षा मल्लिकर्जुन देवाचा डोंगर म्हणून ओळखला जातो.गडपायथ्यापासून प्राचीनत्वाची साक्ष देतात. इथे एकूण सहा लेण्या आहेत. त्यातील एक अर्धवट सोडून दिलेली आहे. उर्वरित लेण्यांपैकी एकात मल्लिकार्जुनाचे मंदिर आहे, तर इतरांचे ओवऱ्यात रूपांतर झाले आहे.गडावर जाण्यासाठी कातळात खोदून तयार केलेल्या पायऱ्यांची वाट आहे, या वाटेने वीस मिनिटे चालत गेल्यावर आपण मल्लिकर्जुन मंदिरापाशी येऊन पोहोचतो. हे मंदीर कातळाच्या पोटातील गुहेत असून त्याच्या समोर यादवकालिन बांधणीचा छोटासा मंडप आहे. या मंडपातून मूळ गुहा मंदिराच्या आत पोहोचायचे, गुहेच्या आत भीमाशंकर, उमाशंकर, सोरटीसोमनाथ, कार्तिकस्वामी यांची वेगवेगळी गुहा दालने आहेत. मल्लिकर्जुनाचे मुख्य स्थान येथील उजव्या बाजूच्या गुहा दालनात असून तेथे एक शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या समोरील गुहेत वाकड्या तोंडाचा नंदी आहे, पार्वती देवीने मारल्याने नंदीचे तोंड वाकडे झाल्याचे येथील पुजारी सांगतात.हा मंदिर परिसर पाहुन येथुनच वर चढणाऱ्या पायवाटेने गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे चालू लागायचं, थोडी चढाई केल्यानंतर आपण गड्माथ्यावर येऊन पोहोचतो. गडमाथ्यावर विठ्ठ्ल रखुमाइचे व श्रीकृष्णाचे मंदिर आहे, या मंदिराला तळघर आहे. बाजूलाच आदिलशाही काळातील काझाकबीर चांद्साहेब दर्गा आहे.हा दर्गा परिसर पाहून येथे शेजारीच उभ्या असणाऱ्या आदिलशाही बांधणीचा दगडी वास्तूत पोहोचायच, गडाचे गडपण शाबूत करणारी ही एकमेव वास्तू आहे, येथून समोरच एक तलाव आहे, हा तलाव पाहून गडाच्या टोकावर गेल्यावर समोर आपणास एक सपाट पठार दिसते. या ठिकाणास घोडेतळ म्हणतात.विलासगडाची संपूर्ण गडफेरी करण्यास २-३ तास पुरतात, किल्ल्याच्या खुणा सांगणारे वस्तू व्यतिरिक्त कोठेही तटबंदी व बुरुज आज शिल्लक नाहीत.vilasgad