कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ६२

 राजे संभाजीराजांच्यासह गुंफेच्या गाभाऱ्याजवळ आले. गाभान्यात कैलासपर्वतावर श्रीशंकर आरूढ झाले आहेत. त्यांच्या मांडीवर महादेवी पार्वती बसली आहे. असे देखणे शिल्प होते. तो उभा कैलासच आपल्या आईसाठी उचलून नेण्याच्या खटपटीत असलेल्या रावणाच्या मुखावर कष्टी भाव सुंदर रीतीने उमटविलेले होते.


ते 'शिवरूप' बघताच राजांनी आणि संभाजीराजांनी हात जोडले. डोळे मिटले. थोड्या वेळाने डोळे उघडून ते शिवशिल्प बघू लागले. नकळतच राजांची नजर महादेवी पार्वतीच्या 'सावळ्या' शिल्पावर जखडली गेली आणि त्यांना पटकन जाणवून गेले की त्या शिल्पात 'शिवपुत्र' गणपतीची योजना कारागिरांनी केली नव्हती !!


संभाजीराजे मात्र, कैलास उठविणाच्या खटपटीत असलेल्या रावणाच्या मुद्रेवरचे कष्टी भाव निरखून बघत होते ! त्यांच्या विचाराची लय वाढत होती "कसा असेल रावण ? अफजलखानासारखा ? मिर्झा राजासारखा ? छे! ss छे ! ऽऽ मग ?... कसाही का असेना त्याला 'शिवाचा कैलास' काही उचलता आला नव्हता !!


आवाराबाहेर पडता पडता संभाजीराजांना एका स्तंभावर एकमेकांच्या मिठीत विसावलेल्या एका प्रणयमन युगुलाचे शिल्प दिसले त्यातले भाव त्यांना नीट आकळेनात! त्यातील स्त्रीच्या पायांत तोड्यासारखा अलंकार बघताना मात्र त्यांना आपल्या महालातील मंचकावर बसलेली एक आकृती आठवली आणि झटकन् ते त्या खांबासमोरून पुढे सरकले!-


- त्या वेळी त्यांना कल्पना नव्हती, पण राजगड उतरून एक मेणा शृंगारपूरच्या वाटेला लागला होता. त्याच्या बगलेने पिलाजी शिर्के धिम्या चालीच्या घोड्यावर बसून चालले होते. त्या मेण्यात येसूबाई होत्या. जिजाऊसाहेबांचा आशीर्वाद घेऊन त्या माहेरी शृंगारपुरी चालल्या होत्या.


बुऱ्हाणपूर, इंदौर, गवालेर अशी शहरे मागे टाकीत, गिरणा, तापी, नर्मदा, चंबळा ह्या नद्या पार करीत काफला यमुनेजवळ आला. आम्याची गिर्दनवाई नजर टप्प्यात आली. मशिदींचे सफेद घुमट, ताजमहालाचे आरसपानी मनोरे दिसू लागले..


आग्रा एका मजलेवर ठेवून काफला थांबला. बक्षी बेग आणि तेजसिंह कछवाह राजांना तसलीम करून आम्याच्या रोखाने, मिर्झा राजाचा वडील कुँवर रामसिंग ह्याला वर्दी द्यायला घोडे फेकीत निघून गेले.


मिर्झाने रामसिंगाला वारंवार पत्रे पाठवून राजांच्या सरबराईच्या बारीक-सारीक सूचना दिल्या होत्या. 'त्यांच्या केसालाही धक्का न लागेल अशी कसम आपण घेतल्याचे मिर्झाने रामसिंगाला पुनः पुन्हा कळविले होते. पण रामसिंग राजांच्या स्वागतास येऊ शकला नाही.


तेजसिंह आणि बक्षी आणखी चार-सहा माणसांनिशी राजांच्या तळाकडे येताना दिसू लागले. त्यांतील रामसिंग कुठला ? याचा राजे अंदाज घेऊ लागले. येणारे घोडापथक तळापासून थोड्या अंतरावर थांबले. राजपुती पद्धतीचा साफा बांधलेला, खांद्यावर उपरणे टाकलेला, कपाळी टिळा असलेला एक मध्यमवयीन माणूस राजांच्या आणि संभाजीराजांच्या समोर आला. गर्दन झुकवून त्याने कुर्निसात केला. " कुंवरजीके तरफसे हम बडी खुशीसे मेहमान साहबानकी आगवानी करते हैं!" तो अदबीने म्हणाला.


" आपकी तारीफ ? " त्याचा कुर्निसात स्वीकारीत भुवई चढवून राजांनी त्याला विचारले. राजे गोंधळून गेले होते. आलेल्या असामीत रामसिंग नव्हता! " चाकरको गिरधरलाल कहते हैं. कुँवरजीके हवेलीपर मुन्शीगिरी करता गिरधरलाल राजांच्या भगव्या मोजड्यांवर नजर जोडून उत्तरला.


मुन्शी! राजांच्या काळजात कसलीतरी कळ उठली. एक मामुली कारकून त्यांच्या स्वागतासाठी समोर उभा होता !


" कुंवर रामसिंग किधर है ?” राजांचा करडा आवाज साऱ्यांनाच जाणवला.


" गुस्ताखी माफ हो मालिक कुँवरजी किलेमें आला हजरतके महेलपर पेहरे लगा रहे हैं! वहाँसे नहीं छूट पायेगे ! आप चलिये ! "


राजांनी सर्वांना जाणवेल असा निःश्वास सोडला.


औरंगजेबाच्या पन्नासाव्या सालगिराचा दिवस आग्रा शहरावर रोषण झाला. आपल्य उजळलेल्या मनोऱ्यांचे डोळे लाल किल्ल्याच्या रोखाने ताजमहालाने जोडले. सालगिर बघायला !!


मुलुखचंदाच्या सराईत राजांनी आणि संभाजीराजांनी स्नान करून खासे पेहराव घातले. राजे आपल्या डेऱ्यात स्फटिक शिवलिंगाच्या पूजेला बसले.


तिकडे लाल किल्ल्यात औरंगजेबाने आपल्या महालात 'सब्रकी नमाज पढून घेतली होती. दिवस अर्धा कासरा वर आला तरी तो मकेकडे तोंड करून कुराणाचे कलमे पढतच होता. संभाजीराजे सराईतून दिसणारे यमुनेचे पात्र बघत होते. औरंगजेबाच्या महालाबाहेर रामसिंगाचा पहारा चालूच होता.


राजांचा सरंजाम सराईत सिद्ध झाला. अंगी जरीबुंदक्याचे सफेद झगमगीत जामे, डोक्यांवर लखलखीत केशरी टोप, त्याखाली द्विदली, रेखीव शिवगंध, गळ्यात कंठे-भवानीच्या माळा, कानांत सोनचौकडे असा वेष परिधान केलेले राजे-संभाजीराजे सिद्ध ठेवलेल्या सजल्या घोड्यांजवळ उभे होते. त्यांच्या भोवतीने त्र्यंबकपंत डबीर, रखनाथपंत कोरडे, सर्जेराव जेधे, हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर, राघो मित्र, दावलजी घाटगे अशी मंडळी ठेवणीचे आसवाब चढवून हारीने उभी होती.


राजे वाट बघत होते रामसिंगाची. तोच त्यांना दरबारी नेऊन पेश करणार होता. पण अद्याप रामसिंगाचा पत्ता नव्हता! त्याची प्रत्यक्ष भेट अद्याप झालीच नव्हती. शेवटी मुन्शी गिरधरलाल सराईत आला. चेहऱ्यावरचे ओशाळेपण लपवीत राजांना तसलीम करून तो म्हणाला, "अभी तक राणाजी नहीं आये किलेपरसे' आप हवेलीपर चलिये राजासाब, मैंने हारकारा भेजा है किलेपर. राणाजी आतेही होगे." त्या रजपुती कारकुनाला समोरच्या 'दख्खनी मावळ्याची' 'किरत ' ऐकून चांगलीच माहीत होती. तीन वेळा तो कमरेत वाकत होता. खांद्यावरचे उपरणे ठाकठीक करीत 'जी' म्हणत होता.

राजांच्या कपाळीचे शिवगंध आठ्यांत आक्रसून उठले. पण ते काही बोलले नाहीत. गिरधरलालच्या सोबतीने राजे आणि संभाजीराजे सरंजामासह आम्यातील मिर्झा राजाच्या हवेलीजवळ आले. रजपुती माटाच्या गच्चीदार अशा त्या हवेलीसमोर राजांच्या मुक्कामाची सारी तयारी रामसिंगाने करवून घेतली होती. प्रशस्त आवारात लहान-मोठ्या राहुट्या, सायवान डेरे शामियाने उठविले होते. राजांचा सरंजाम त्या आवारात ठाण झाला. 

दिक्स दीड कासरा वर आला. डाव्या हातात धूपदाने आणि उजव्या हातात मोरपिसाचे जुडगे घेतलेले फकिरांचे तांडे आम्याच्या मोहल्ल्या मोहल्ल्यांतून खैरात गोळा करून लाल किल्ल्याच्या तटाजवळ गोळा झाले. ठिकठिकाणी डेरे टाकलेले औरंगजेबाचे सरदार, अमीर, उमराव, सुभेदार वाजत गाजत सरंजामात लाल किल्ला जवळ करू लागले.


अस्वस्थ झालेले राजे संभाजीराजांना घेऊन शामियान्याच्या दारात रामसिंगाची वाट बघत उभे होते. त्या दोघांनाही कल्पना नव्हती की, समोरच्या मिर्झा राजाच्या हवेलीतून गच्चीला लागून असलेल्या दालनात चिकाच्या पडद्याआड मिर्झाचा आणि रामसिंगाचा 'जनाना' उभा होता. त्या जनान्यातील बायका मेहंदी रंगल्या बोटांनी एकमेकींना खुणा करून राजे आणि संभाजीराजे दाखवीत होत्या! नाजूक कलकलाट करीत होत्या- " शेर दख्खन 'सेवा' और उसका बच्चा 'संभा'!"

दिवसाने दोन कासऱ्यांचा पल्ला मागे टाकला. लाल किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यावरचा नौबत-नगारा एकसारखा दुडदुडू लागला. सरदारामागून सरदार लाल किल्ल्यात प्रवेशू लागले. संगमरवरी खांबाचा ' दिवाण-इ-आम' चा देखणा, आईनेबंद दरवार तमाम झाला. कनोजी धूपाची वळी दरबारात उठू लागली.


जरीबुंदीचा हिरवाशार जामा अंगी घातलेला, डोक्यावर पिसांच्या तुऱ्याचा बाकदार किमॉश घेतलेला औरंगजेब आसवाबखान्यातून बाहेर पडला. त्याच्या कैदमबरहुकूम फरास रुजाम्यांच्या तलम पायघड्या अंथरत चालले.


अल्काबांच्या खड्या ललकाऱ्या उठल्या- " बा अदब ऽ बा मुलाहिजा ऽ तहे दिल होशीयाँ ऽऽ अबुल मुजप्फर मुईउद्दीन मुहम्मद, औरंगजेब, बहादूर, अलमगीर बादशहा. गाझी ऽऽ मालिके तख्ते ताऊस ऽऽ शहेनशाहे हिंदोस्ती ऽऽ तशरीफ ला रहे हैंऽऽ होशीयाँ !" त्या ललकाऱ्या ऐकताना तोंडात तोबरे भरल्यासारखे रामसिंगाचे राजपुती मन घुसमटून गेले होते..

औरंगजेबाने 'दिवाण-इ-आमच्या दरबारात कदम टाकताच, वाऱ्याच्या एकाच झोताबरोबर गवताळू कुरणाचा पट्टाचपट्टा लपकन लवावा तसा दरबारीयांचा जमाव ताजीम देण्यासाठी कमरेत लवला.


रामसिंगाने आपल्या हवेलीकडे स्वार धाडले. त्यांनी मुन्शी गिरधरलालसाठी निरोप आणला - " दर्बार शुरू हुआ। राजासाबको ले आना। मैं आ रहा हूँ।" आता गिरधरवर नापसंदी दाखवायलाही राजांना वेळ नव्हता. राजे-संभाजीराजे शामियान्याबाहेर आले. राजांनी आपल्या उजव्या हाताची जोड देऊन संभाजीराजांना घोडाबैठक दिली. खुद्द राजांनी एका सजल्या कुम्मैत घोड्यावर मांड जमविली कुँवरसिंग, तेजसिंह, गिरधर, बक्षी बेग यांच्या सोबतीने राजे लाउ किल्ल्याकडे चालले. त्यांच्यामागून त्यांचा सरंजाम चालला. राजांच्या आणि संभाजीराजांच्या तर्फेने अब्दागिरे अब्दागिन्या ढाळत होते. मार्गावर भेटणाऱ्या फकिरांना राजे आणि संभाजीराजे मुठींनी खैरात देत होते. आता आम्याच्या हमरस्त्यावर दुसरा कुठलाच सरदार दरकदार जाणारा येणारा नसल्यामुळे "दख्खनी सेवा आ रहा है !" ही खबर भिंगरीसारखी गच्ची-हवेल्यांत पसरली. सगळे मर्दानी लाल किल्ल्यात रुजू झाल्यामुळे आम्यातील बायका-बच्चे-बुढे गच्च्यांत झरोक्यांत गोळा झाले होते.

औरंगजेबाने दुर्लक्षिले होते, रामसिंगाला इच्छा असून जमले नव्हते, पण इंतजाम ठेवून होणार नाही असे त्या 'थोरल्या आणि धाकल्या मावळ्यांचे इतमामात आग्रा आणि शहाजहानची रियाया यांच्याकडून स्वागत होत होते!

तसा राजांचा सरंजाम 'बघण्यासारखा' मोठा मुळीच नव्हता. उलट तो नजरेत न येईल एवढा 'छोटा होता. पण 'सेवा' या दोन अक्षरी नावाला आता असल्या सरंजामाची गरज राहिली नव्हती! उभी झाडे फटाफट फोडत जाणारा 'वणवा' आणि उभ्या हिंदोस्ताँची दौड घेणारा मावळी' रानवारा' हाच राजांचा ' सरंजाम' झाला होता! 'दहारआरा' बागेच्या रोखाने राजे-संभाजीराजे गिरधरसह चालले होते. ते ज्या ज्या हवेलीसमोरून पुढे सरकत होते त्या त्या हवेलीतील गच्ची-झरोक्यात काळ्या बुरख्यांच्या झडी, मेहंदीच्या गोऱ्या हातांनी उचलल्या जात होत्या! त्या मागे टाकण्यासाठी वर चढलेले काही हात क्षणभरच तसेच थांबत होते! " या अल्ला 5, सुरूर 5, सूरते मर्द ! " असे जनानी नाजूक चीत्कार बुरख्यांतून उठत होते !


राजे-संभाजीराजे आम्याच्या रस्त्यांत खैरात वाटत चालले होते आणि लाल किल्ल्यात 'दिवाण-इ-आम' च्या दरबारात औरंगजेब नजराण्याची तबके स्वीकारीत होता! एकाएकी राजांच्या सरंजामाच्या रस्त्याला येऊन मिळणाऱ्या आडवाटेने दोन रजपुती घोडाइतांनी आपली घोडी पुढे काढली. त्यांच्या पिकल्या दाढ्यांतून घामाच्या धारा उतरल्या होत्या. ते होते रामसिंगाचे चाकर डुंगरमल चौधरी आणि रामदास राजांना आदब कुर्निस करून त्यांनी आपली घोड़ी थेट गिरधरलालच्या घोड्याला भिडविली.

दबक्या आवाजात ते गिरधरशी राजपुती भाषेत काहीतरी बोलत होते. “राणाजी. दर्बार... रास्ता ... नूरगंज...' असे शब्द ऐकू येत होते.


" क्या है मुन्शी ?” राजांनी गिरधरलालचा अंदाज घेत विचारले. " कुछ नही सरकार राणाजी राह भूल गये। दूसरे रास्तेसे सिधे हवेलीपर पहुँच गये। उनका हुक्म है आपको नूरगंज बगिचेके पास ले आनेका।" गिरधर उत्तरला. - किल्ल्यावरून मुखलिसखानासह निघालेल्या रामसिंगांची वाट चुकली होती! तो एका वेगळ्याच वाटेने राजांना भेटण्यासाठी आपल्या हवेलीजवळ जाऊन पोचला होता.- दक्षिणेत भीमेच्या खोऱ्यात मंजियाला मुक्काम टाकून बसलेल्या मिर्झा राजाला आणि लाल किल्ल्यात 'तख्तेताऊस' वर बसलेल्या औरंजेबाला माहीत नव्हते की, कधी कधी अशा अनेकांच्या वाटा चुकतात! मग कुणाच्या तरी चुकलेल्या वाटांबरोबर कुणाच्या तरी युगायुगांच्या वाटा बेमालूम जुळून जातात !!


गिरधर आणि कुँवरसिंग यांनी राजांचा सरंजाम नूरगंजबागेच्या रोखाने वळविला. सरंजामाने त्या वाटेवरची 'फिरोझबाग' मागे टाकली आणि तिकडे लाल किल्ल्यात 'दिवाण-इ-आम' चा दरबार बरखास्त झाला !


राजे-संभाजीराजे नूरगंज बागेजवळ येऊन थांबले. राजांना 'नजर' म्हणून सात-आठ झूलबाज हत्तींचा तांडा बरोबर घेऊन रामसिंग मुखलिसखानासह घाईगर्दीने नूरगंज बागजवळ आला.


कुँवरसिंगाने पुढे होत राजांचा रामसिंगाशी परिचय करून दिला. घोड्यावर मांड घेतलेल्या, गोऱ्यापान रामसिंगाचे कपाळ घामेजून आले होते. राजांचे तरतरीत बाके नाक बघताना त्या घामाचे टपोरे थेंब त्याच्या कपाळावर टपकन जमून आले. खांद्यावरच्या उपरण्याने त्याने अगोदर कपाळ टिपले, तेवढे करताना झालेल्या सगळ्या गफलती निवळून जातील अशी अदब राजांना कशी द्यावी याचा विचार करून घेतला.


" कायदे खेचून रामसिंगाने घेतल्या मांडेनिशी कदमबाज चालीत आपले जनावर थेट राजांच्या घोड्याजवळ आणले.


"राजासाब 5 एवढेच तो कसेबसे म्हणाला आणि त्याने ऊरभेट देण्यासाठी हात पसरले. राजांनी उभ्या घोड्यावरून रामसिंगाची ऊरभेट घेतली. आपल्या हयातीत राजांनी अशी भेट कधी कुणाला दिली नव्हती. संभाजीराजांना ती भेट जाणवली. त्यांनी मनोमन ठरवून टाकले, “रामसिंग ही इतमामाची असामी आहे.' रामसिंगाने आपला घोडा संभाजीराजांच्या घोड्यांजवळ घेतला. संभाजीराजांच्या खांदेपट्टीवर हात चढवीत तो म्हणाला, “कुँवर संभूराजा ! " सगळे हत्ती राजांच्या तळाच्या वाटेला लावून रामसिंग निघाला. दोन मावळे सरदार औरंगजेबाच्या दरबारी पेश करायला.


लाल किल्ल्याचा मुख्य दरवाजा आला. बराच वेळ निसूर बसलेले नीबतवाले राजे रामसिंग आणि संभाजीराजे यांच्याकडे चमत्कारिक नजरेने बघत आगवानीची नौबत झडवू लागले. या वेळी लाल किल्ल्यात औरंगजेबाचा 'दिवाण-इ-आम हा दुसरा दरबारही बरखास्त झाला होता !