कोणतही शिवकाव्य येथे शोधा
बुलंद आवाज रुंद छाती घेई विर तख्ताशी खेटे..
जय भवानी
जय शिवराय
बुलंद आवाज रुंद छाती घेई विर तख्ताशी खेटे..
वाघाची जात ऐसी म्हणती त्यास मराठे..
मराठे ललकारती गगनाला..
काळीज बांधुनी तलवारीला..
ना विचार नात्यागोत्याचा. .
मोह तलवारीच्या पात्याचा..
जागती वचनाला..
शोभती ईतिहासाला..
नजरेत भरती अंगार..
ढाल तलवारीचा श्रृंगार..
विर देहाने दणकट..
ताकत हत्तीची बाहुपरी मनगट..
पुजतो शिवछत्रपतिला..
कपाळी लावितो मातीला..
शोभतो हातात भगवा झेंडा..
पाहता ज्यास ज्वालामुखी पडे थंडा..
राखली मराठ्यांनी शिवशाही..
३३ कोटी देव स्वर्गातुन कुतुहलाने पाही..
फाडली छाती हिमालयाची दिला दणका..
वाजला मराठ्यांचा दाही दिशा डंका..
जय भवानी जय शिवराय…
$uha$
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ