सांभार : मराठा साम्राज्यकोश
अफझलखान शिवरायांना मारण्याचा विडा उचलतो
तारीख-ए-अली ह्या आदिलशाहीच्या समकालीन साधनात अफजलखानला स्वारीसाठी पाठवितानाच्या परिस्थतीचे वर्णन केले आहे. त्यातील महत्वाच्या भागाचे मराठी भाषांतर खाली दिले आहे.
स्वर्गवासी बादशाह आजारी पडला तेव्हा लबाडीत व कपटविद्येत सैतानाचा गुरू असलेला बहिष्कृत काफिर सीवा भोसले याने तळकोकणचा संपूर्ण मुलूख लुटीच्या झाडूने साफ करून त्या मुलूखातील राहीरचा किल्ला काबीज केला. स्वर्गवासी बादशाह निधन पावला तेव्हा ती बातमी त्या दुष्ट काफिराने विजयवार्तेपेक्षा आनंददायी मानून त्या मुलूखातील किल्ले हस्तगत केले. अधाशी व भुकेलेल्या कुत्र्याने प्रेताच्या हाडाने तृप्त न होता वारंवार अधिकाची अपेक्षा करीत असावे त्याप्रमाणे तो जुलमाचा व अन्यायाचा हात लांबवून लूट करीत होता आणि ईशचिंतनात निमग्र असलेल्या धर्मश्रद्ध लोंकांवर अन्याय करीत होता.
ही बातमी समजल्यावर बादशाहाने मुहम्मदी धर्माच्या पालनाला बादशाहाच्या रक्तपिपासू तलवारीच्या पाण्याशिवाय टवटवी येणार नाही आणि काफिरत्वाचे व अनेकेश्वरोपासनेचे काटवण शत्रूला जाळणा-या तलवारीच्या आगीशिवाय जळणार नाही म्हणून त्या दुष्ट बहिष्कृतास मुळापासून उखडून टाकण्याकरिता अफझलखानाची दहा हजार स्वारांसह नेमणूक केली की क्रोधाग्नी तीव्र करून त्याच्या आयुष्याची शिल्लक रक्कम विनाशाच्या मुशीत वितळवावी आणि त्याच्या आयुष्याचे शेत घोड्यांच्या टापांखाली तुडवावे
अफझलखानची रवानगी करताना बादशाहाने त्याला अशी सूचना दिली होती की त्या काळतोंड्या काफिराने लबाडीचे पत्र पाठविले तरी त्याचे लबाडीचे व तोंडपुजेपणाचे म्हणणे न ऐकता त्याच्या आयुष्याच्या पिकावर मृत्यूचा अग्नी फेकण्याशिवाय आणि त्याच्या जीविताची गढी पाडण्याशिवाय दुसरे काहीही करू नये
शिवरायांना मारण्यासाठीच अफजलखानाला पाठविले होते हे वरील उल्लेखातून स्पष्ट होते. अली आदिलशाह तेव्हा केवळ वीस वर्षांचा होता. त्यामुळे हा निर्णय व त्याची तयारी बहुदा बडी बेगमने केली असावी. ह्यात अफजलखानाबरोबर दहा हजाराचे सैन्य होते असेही म्हटले आहे.
आदिलशाही सैन्यात अंबरखान, याकुतखान, मुसाखान, रणदुल्लाखान (दुसरा), सिद्दी हिलाल, घोरपडे, नाईकजी पांढरे, नाईकजी खराडे, मंबाजी भोसले व इतर नामांकित सरदार होते. उत्रवळी तरफेतील केदारजी व खंडोजी खोपडेही ह्या सैन्यात सामिल होते. शिवरायांच्या मुलुखातील हे दोघेच अफजलखानाला मिळाले होते.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ८८५-८९०