कोणतही शिवकाव्य येथे शोधा

शिवकालीन महाराष्ट्र ( सन १५९९ ते सन १६८० ) भाग ३ :-


घृष्णेश्वराचे मंदिर:-सुमारे चारशे वर्षापूर्वीची गोष्ट .वेरुळच्या
लेण्याजवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते.त्यांच्या
भिंतीना भेगा पडल्या होत्या.मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून
गेला होता.एवढे महान दैवत ! पण कोण अवकळा आली होती.त्या
मंदिरावर.त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे.येणारे जाणारे ही
हळहळत,उसासे सोडत,पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो?
त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे.
शिवाच्या पिंडीवर बेलफुल वाहत असे.हात जोडून आपल्या मनातले
श्रीशिवाला सांगत असे.एक दिवस त्याने गडीमानसे आणली.मंदिराच्या
पडक्या भिंती नीट केल्या.मंदिराची सारी व्यवस्था लावली.घृष्णेश्वराचा
जीर्णोद्धार केला.मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले.घृष्णेश्वराचे गेलेले
वैभव परतले .हे कोणी केले ? कोण होते हे शिवभक्त ? ते होते
मोलोजी भोसले