नांदेड रेल्वेस्थानकापासून ४ कि.मी. अंतरावर कळंबच्या राजाने बांधलेला नांदेडचा नंदगिरी किल्ला आहे.संथ वाहणार्या गोदावरीच्या विस्तीर्ण पात्राच्या शेजारी दिमाखदार तटबंदीचे कवच अंगावर घेऊन तीनशे वर्षांपूर्वींचा इतिहास सांगणारा नंदगिरी किल्ला कात टाकत आहे.गोदावरी नदीच्या काठावर शहराच्या दक्षिणेला जुन्या नांदेडात उत्तर दिशेला किल्ल्याचे प्रवेशद्वार असून, नदीच्या मोठय़ा वळणावर असलेला हा किल्ला लांबूनच आपली ओळख सांगतो. या किल्ल्याने सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादवांचा कालखंड पाहिला आहे. सुभेदारी महाल, नियोजनबद्ध उद्यान, कारंजे, वॉटरटँक ही या किल्ल्याची वैशिष्ट्ये होती. परंतु, त्यांच्या खुणाही पाहण्यास मिळत नाहीत. किल्ल्याला सहा बुरूज असून, तीन बुरूज गोदावरी नदीच्या दिशेने तोंड करून उभे आहेत. दक्षिणेकडचा बुरूज सर्वांत उंच असून, त्याला टेहळणी बुरूज म्हणून संबोधले जात असे.तीनशे वर्षांपूर्वी उमदतुल्ला खान, फिरोज जंग हे सुभेदार येथे वास्तव्यास होते. सय्यद अब्दुला, शादुल्लाह खान, अलिमोद्दीन खान व शाहिस्ते खान यांचा मुलगा खुदाबंद खान यांचेही किल्ल्यात सुभेदार म्हणून वास्तव्य होते. तेलंगणा सुभ्याचे सुभेदारही येथे राहत असत.सन १९३६ मध्ये या ऐतिहासिक वास्तूत मराठवाड्यातील पहिले पाणीपुरवठा पंपहाउस शुद्धीकरण केंद्रासह सुरू करण्यात आले.
कोणतही शिवकाव्य येथे शोधा
नंदगिरी किल्ला