कोणतही शिवकाव्य येथे शोधा

लासूर किल्ला


लासूर हे जळगाव जिल्हातील चोपडें तालुक्यांतील एक गांव हे चोपडयापासून ८ मैलांवर आहे. लोकसंख्या सुमारे २००० सांप्रत, लासूर गावी सध्या विशेष काही नसून फक्त कुडाच्या झोपडया व अस्ताव्यस्त बांधलेली लहान पडकी घरे मात्र दृष्टीस पडतात. परंतु तेथील किल्ल्याचा अवशेष, एक उत्तम विहीर व एक मशीद ही मात्र गत वैभवाची साक्ष देण्याकरिता केवळ जीव मुठीत धरून अद्याप कशीतरी उभी आहेत. कर्नाटकी लोकांचा उपद्रव या प्रांताला असह्म झाला होता तेव्हा गुलझारखान ठोके याने किल्ला बांधून वर अरबांची शिबंदी ठेविली. त्यांना वेळच्या वेळेला पगार मिळेना म्हणून त्यांनी गुलजार व त्याचा मुलगा यांना मारण्याचा बेत केला. अलफखान नावाचा गुलजारचा दुसरा मुलगा निसटून निंबाळकराच्या आश्रयास गेला. तिकडून निंबाळकराने दिलेले भाडोत्री कर्नाटकी लोक घेऊन तो लासूरला आला कर्नाटकी लोकांनी अरबांना फन्ना उडविला. परंतु निंबाळकरांच्या सांगण्यावरून ते किल्ला वेढून बसले. अलफखान फार निराश झाला. त्यानें भिल्लांच्या मदतीने हल्ला केला. शेवटी १०००० रूपये निंबाळकरांना द्यावे व ते दिल्यावर निंबाळकरांनी किल्ला सोडावा असे ठरले. ही रक्कम इंग्रंजांनी देऊन किल्ल्यावर इंग्रज (घोडेस्वार) ठेवले. ठोके घराण्यांतील एक मनुष्य लासूरचा मुख्य असून आसपासचा प्रदेश व डोंगरपट्टी त्याच्या नजरेत असे.lasur_fort