हंबीरराव मोहिते
१६७४ - छत्रपति शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणुन नेमणुक केली.छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्यभिषेका नंतरचे प्रमुख सेनापती. शिवाजीराजांचा राज्याभिषेक झाला असता, हंबीरराव मोहित्यांना हिंदवी स्वराज्याचा सेनापती घोषित करण्यात आले. महाराजांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या.हंबीररावांच्या कन्यका महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या.
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदीरातील भवानी मातेच्या समोर ठेवलेली आहे. या तलवारीला येथे ठेवायचे कारण म्हणजे अफझलखानाशी झालेल्या लढाईत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी केलेला पराक्रमामुळे त्या तलवारीला मंदिरात ठेवले आहे. या लढाईत त्यांनी ६तासात ६०० शत्रूंना मारले.म्हणजे 360 मिनीटात 600 शत्रू मारले. ह्या तलवारीवर सहा चांदणीच्या आकाराचे शिक्के दिसून येतात. त्या काळात शिवाजी महाराजांनी प्रथा चालू केली होती. एखाद्या मावळयांने १०० शत्रू एकाच लढाईत मारले तर त्या मावळयांच्या तलवारीवर शिक्का उमटवला जायचा. सरसेनापती हंबीरराव मोहितेच्या तलवारीवर ६ शिक्के आहेत. असा पराक्रम कोणीही गाजवू शकला नाही. ही तलवार भवानी मातेच्या समोर ठेवलेली आहे. भवानी मातेसोबत या तलवारीची पूजा केली जाते.