कोणतही शिवकाव्य येथे शोधा

पुणे जिल्हा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुणे जिल्हा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

।। किल्ले लोहगड ।।



लोहगड किल्ला
किल्ल्याची उंची : ----- 
किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग 
डोंगररांग : लोणावळा 
जिल्हा : पुणे 
श्रेणी : सोपी


इतिहास : 

लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे.गडाची निर्मिती जवळ असलेली भाजे आणि बेडसे हि लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याहि पूर्वी म्हणजे सत्तावीसशे वर्षापूर्वी झाली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव या सर्व राजवटी किल्ल्याने पाहिल्या इ.स.१४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकी लोहगड हा एक. इ.स.१५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुरहण या किल्यावर कैदेत होता. इ.स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड-विसापूर हा सर्व परिसर सुध्दा स्वराज्यात सामील करून घेतला. इ.स.१६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरात लुटेच्या वेळेस आणलेली संपती नेताजी पालकरांनी लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स.१७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला १७२० मध्ये आंगर्यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणविसांचा सरदार जावजी बोंबले याने आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला.इ.स.१७८९ मध्ये नानांनी सोळा कान असलेली एक बाव व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा- शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू- नाना फडणवीस यांनी हि बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट यांचेकडून बंधीवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्यांच्या निगराणीस लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुर्यांचा कैलासवास झाला. १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसर्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रोंथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्वप्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्या दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.   
   

गडावर पाहण्याची ठिकाणे : 
गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते. सर्वप्रथम गणेश १. गणेश दरवाजा:-ह्याच्याच डाव्या आणि उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती. येथे आतील बाजूस शिलालेख आहेत. २. नारायण दरवाजा:- हा दरवाजा नाना फडणीसांनी बांधला. येथे एक भुयार आहे, जिथे भात आणि नाचणी साठवून ठेवण्यात येई. ३. हनुमान दरवाजा:- हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे. ४. महादरवाजा:- हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. या दरवाजाचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जुने १७९४ या कालावधीत केले. महादरवाजातून आत शिरताच एक दर्गा लागतो.दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखानाचे भग्न अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याचा घाना आहे. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच एक तोफ काही हौशी दुर्गप्रेमींनी सिमेंटच्या चौथर्यात बसवलेली आहे. अशीच एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लाक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मीकोठी आढळते.या कोठीत राहण्याची सोय होते. या कोठीत अनेक खोल्या आढळतात. दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचावट्याचा भाग आहे, जिथे एक सुंदर शिवमंदिर आढळते.पुढे सरळ चालत गेल्यास एक छोटेसे तले आहे. हे तळ अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. हि गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते. नाना फडणविसांनी या तळ्याची बांधणी केली आहे. हे तळे सोळाकोणी आहे. मोठ्या तळ्याच्या पुढे विन्चुकाट्याकडे जाताना वाद्यांचे काही अवशेष दिसतात. लक्ष्मीकोठीच्या पश्चिमेस विन्चुकाटा आहे. या विन्चुकाट्यास बघून आठवण येते ती म्हणजे राजगडाच्या संजीवनी माचीची. पंदाराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी हि डोंगराची सोंड आहे. विन्चुकाट्यावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यास विंचूकाटा म्हणतात. या भागात पाण्याची उत्तम सोय आढळते. गडाच्या आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकाट्याचा उपयोग होत असावा. या गडावरून येतांना भाने गावातील भाजे लेण्या आवर्जून पहाव्यात. पावसाळ्यातील लोह्गादाचे रूप पहिले कि मनोन्मनी गुणगुणत ......!   
   

गडावर जाण्याच्या वाटा:-  लोहगडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत.   
१) पुण्यावरून अथवा मुंबईवरून येतांना लोणावळ्याच्या पुढे असलेल्या मळवली स्थानकावर उतरावे. तेथून एक्स्प्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणारी वाट पकडावी.वाट मोठी प्रशस्थ आहे. तिथून दीड तास चालीनंतर 'गायमुख' येऊन पोहचतो. खिंडीच्या अलीकडे एक गाव आहे त्याचे नाव लोह्गाद्वादी. खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास पोहचतो आणि डावीकडे वळले म्हणजे विसापूर किल्यावर पोहचतो. या मार्गेलोहगडावर प्रवेश करतांना चार दरवाजे लागतात.   
२) लोनावल्यावरून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडवाडी पर्यंत जाता येते. पवना धरणाकडे जाणार्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो तेथून ३ ते ४ कि.मी. अंतरावर लोहागाद्वादी आहे. उभा चढ आणि अतिशय धोकादायक वळणे आहेत. साधारण अर्ध्या तासाचा प्रवास आहे. मात्र येथे एसटी महामंडळाची सोय नाही. स्वतःचे वाहन असल्यास उत्तम अथवा लोणावळ्यातून trax ने जाता येते भाडे १००० रु आहे.   
३) काळे कॉलनी हि पवना धरणाजवळ वसलेली आहे. तेथून लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर व्यवस्थित दिसतो. पवना धरणाच्या खालून एक रस्ता गायमुख खिंडीच्या टेकडीवर जातो. तेथून एक मळलेली पायवाट आपणास लोहगडवाडीत घेऊन जाते.या टेकडीवर अग्रवाल नावाच्या इसमाचा बंगला आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास २ तास लागतात.   
   
राहण्याची सोय:- लक्ष्मी कोठी रहायची एकमेव सोय आहे. ३० ते ४० जन आरामात राहू शकतात.   
   
जेवण्याची सोय:- आपण स्वतः जेवणाची सोय करावी अथवा लोहगडवाडी मध्ये जेवणाची सोय होते.   
   
पाण्याची सोय:- बारमाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे.   
   
जाण्यासाठी लागणारा वेळ:- २ तास 

लोहगड


लोहगड हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. लोणावळ्यानजीकच्या मळवली स्टेशन नजीकच दुर्गांची एक जोडगोळी उभी आहे.त्यातील मुख्य दुर्ग आहे लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधला आहे विसापूर अथवा संबळगड. हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
इतिहास :
लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आहे. किल्ल्याची निर्मिती जवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच सत्तावीशसे (२७००) वर्षांपूर्वी झालेली असावी असे अनुमान आहे .लोहगड हा एक इ.स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुऱ्हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता.इ.स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला त्याचवेळेस १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतले आणि लोहगड-विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतले
इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या विरोधात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला.इ.स. १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड किल्ला कान्होजी आंग्रे यांस सोपविले.१७२० मध्ये आगऱ्यांकडून तो पेशव्यांकडे आला.१७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. आणि किल्ल्याचा कारभार नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे सोपविले . किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला.
शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू – नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट यांच्याकडून बांधिवली गेली.१८०० मध्ये नित्सुऱ्यांचा स्वर्गवास झाला .१८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या.१८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी मिळविला पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला.४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
  • हनुमान दरवाजा : हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे.Lohagad
  • महादरवाजा : हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. ह्या दरवाज्यांचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या कालावधीत केले. गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते.
  • गणेश दरवाजा : ह्याच्याच डाव्या – उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती येथे आतील बाजूस शिलालेख आहेत.
  • नारायण दरवाजा : हा दरवाजा नाना फडणीसांनी बांधला. येथे एक भुयार आहे, जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येई.
    महादरवाज्यातून आत शिरताच एक दर्गा लागतो. दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखानाचे भग्न अवशेष आढळतात. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच एक तोफ काही हौशी दुर्गप्रेमींनी सिंमेटच्या चौथऱ्यात बसवलेली आहे. अशीच एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभ उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी आढळते. या कोठीत अनेक खोल्या आढळतात. दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवट्याचा भाग आहे. जिथे एक सुंदर शिवमंदिर आढळते. पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे. ते तळे अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे. ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते. नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली आहे. हे तळं सोळाकोनी आहे.
Sulka,_Lohagad_fortलक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात. या विंचूकाट्यास बघून आपल्याला आठवण येते ती म्हणजे राजगडाच्या संजीवनी माचीची. पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचुकाट्यावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. या भागात पाण्याची उत्तम सोय आढळते. गडाच्या आजुबाजुच्या परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकाट्याचा उपयोग होत असावा. या गडावरून येतांना भाजे गावातील भाजे लेण्या आवर्जून पाहव्यात. पावसाळ्यातील लोहगडाचे रुप पाहिले की मनोमनी गुणगुणतं..
ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी ।
आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी ॥
लोहगडाचा उपदुर्ग असलेल्या विसापूरवर मोठी सपाटी आहे तशीच मोठी दगडी तटबंदी आहे. प्राचीन शिलालेखही आहेत.डोंगराच्या पोटात भाज्याची लेणी आहेत. ती दोन हजार वर्षापूर्वी कोरलेली आहेत.लोहगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कड्याच्या टोकावर बांधलेली चिरेबंदी वाट. अशी रेखीव वाट फार कमी दुर्गांवर पहावयास मिळते.
लोहगडवाडी पार केली की ही सर्पाकार वाट सुरू होते. एकदा का कोणी या वाटेवर पाय टाकला की मग तो माणूस वर येईपर्यंत पहारेकऱ्यांच्या नजरेत असतो. तो व्यवस्थित हेरला जातो.लोहगडाचा हा द्वारसमूह आगळावेगळा आहे आणि विचारान्ती बांधलेला आहे. गडावर गेल्यावर वरच्या बुरजावरून हा सर्व मार्ग न्याहाळता येतो. कड्याच्या टोकावरचे हे बांधकाम खूप सुंदर आहे.
गडावर जाण्याच्या वाटा :
लोहगडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत.
1)लोणावळ्याहून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडवाडी पर्यंत जाता येते. पवना धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो. तेथून ३ ते ४ कि.मी अंतरावर लोहगडवाडी आहे. उभा चढ आणि अतिशय धोकादायक वळणे आहेत. साधारण अर्धा तासाचा प्रवास आहे. मात्र येथे एसटी महामंडळाची सोय नाही. स्वतःचे वाहन असल्यास उत्तम अथवा लोणवळ्यातून ट्रॅक्सीने जाता येते.
2)काळे कॉलनी ही पवना धरणाजवळ वसलेली आहे. तेथून लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर व्यवस्थित दिसतो. पवना धरणाच्या खालून एक रस्ता गायमुख खिंडीच्या डावीकडील टेकडीवर जातो. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास २ तास लागतात.
3) पुण्यावरून अथवा मुंबईवरून येतांना लोणावळ्याच्या पुढे असणाऱ्या मळवली रेल्वे स्थानकावर उतरावे. तेथून एक्स्प्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणारी वाट पकडावी. वाट मोठी आणि प्रशस्त आहे. तिथून दीड तासांच्या चालीनंतर ‘गायमुख’ खिंडीत येऊन पोहचतो. खिंडीच्या अलिकडेच एक गाव आहे. त्याचे नाव लोहगडवाडी. खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास पोहचतो आणि डावीकडे वळले म्हणजे विसापूर किल्ल्यावर पोहचतो. या मार्गे लोहगडावर प्रवेश करतांना चार दरवाजे लागतात.

अनघाई किल्ला – Anghai Fort


किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग
डोंगररांग: लोणावळा
चढाई श्रेणी: मध्यम
जिल्हा: पुणे
तालुका: मावळ
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात, किल्ले कोरलाई शेजारी अनघाई डोंगरावर अनघाई किल्ला आहे त्यास अनघाई देवीचा किल्ला असेही म्हटले जाते.
डोंगर माथा चढून गेल्यावर अनघाईच्या सुळक्याच्या उजवीकडील (दक्षिणेकडील) खिंडीतून सुळक्यावर वाट आहे, खिंडीच्या थोडं आधी कातळात खोदलेली, कोरलेली चौकोनी मेट आहे. पूर्वीच्या काळी गडाच्या थोड्या खालच्या उंचीवर वाटेजवळ टेहेळणीकरता अशी मेटं उभारली जात.
खिंडीच्या पुढे कातळात ५-६ फुट उंचीवर वर चढण्यासाठी खाचा केलेल्या आहेत, थोडेसे कातळारोहण केल्यावर खोदीव पायऱ्या लागतात. समोरच एकावर एक खोदलेल्या दोन टाकी आहेत, डाव्या बाजूला अनघाई देवीचं छोटेखानी मंदिर आहे.
किल्ल्यावर पाण्याचे सलग तीन हौद आहेत, यातील पाणी पिण्यायोग्य आहे. पुढे गेल्यावर काही उखळ, खांब रोवण्याकरता असलेले खड्डे दृष्टीस पडतात. किल्ल्यावर पूर्वीच्या काही वास्तू असाव्यात, आज फक्त पाया शिल्लक आहे. अनघाई किल्ल्याचा वापर टेहळणी साठी होत असावा.
anghai

तोरणा / प्रचंडगड – Torna Fort


किल्ल्याची उंची: ४६०५ फुट
चढाई श्रेणी: कठीण
जिल्हा: पुणे
तालुका: वेल्हे
तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसर्‍या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. इतिहासामध्ये आपले आगळे वेगळे स्थान निर्माण करणारा तोरणा पुणे जिल्ह्यामधील वेल्हा तालुक्यात असून पूर्वी हा परिसर कानंद मावळ म्हणून ओळखला जात असे. या मावळातून कानंदी नावाची नदी वाहत असल्यामुळे या खोर्या ला कानंद मावळ असे नाव मिळाले. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत.
पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच असा तोरणा किल्ला असून त्याच्या ताशीव अशा सरळसोट कातळ कड्यामुळे तो बेलाग झालेला आहे. त्याच्या प्रचंड विस्तारामुळे या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंडगड असे नाव दिले होते.
विजापूरच्या अदिलशहाच्या ताब्यामध्ये तोरणा किल्ला होता. शिवरायांनी तो आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्याची मुहुर्तमेढ येथेच रोवली. या किल्ल्याचा ताबा घेतल्यावर त्याची दुरुस्ती करीत असतांना मोहरांनी भरलेले हंडे शिवाजी महाराजांना मिळाले. या धनाचा वापर त्यांनी तोरण्याची दुरुस्ती आणि राजगड किल्ल्याच्या उभारणीसाठी केला. पुढे हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. औरंगजेब बादशहाला तोरणा किल्ला जिंकून घ्यावा लागला. कुठल्याही भेदनितीला तोरणा बळी पडला नाही. पुढे शाहू महाराजांच्या ताब्यात व नंतर इंग्रजांच्या ताब्यात गेला. इंग्रजांनी हा किल्ला भोर संस्थानाच्या ताब्यात दिला.
वेल्हा गावाच्या पश्चिमेकडे तोरणा किल्ल्याचा एक डोंगरदांड आलेला आहे. या डोंगरदांडावरून गडावर जाणारी वाट आहे. या वाटेने साधारण दीड दोन तासामध्ये आपण तोरणागडावर पोहोचतो. वाटेमध्ये कोठेही पाणी नाही. या डोंगरदांडाने चढून आपण कातळकड्यांना भिडतो. कातळकड्यांमध्येच तोरण्याचा पहिला दरवाजा आपल्याला लागतो. या दरवाजाला बिनीचा दरवाजा म्हणतात. बिनीचा दरवाजा ओलांडून आपण पुढे गेल्यावर कोठीचा दरवाजा लागतो.
कोठीच्या दरवाजातून प्रवेश केल्यावर आपल्याला तोरणाजाईचे मंदीर लागते. येथेच महाराजांना मोहरांचे हंडे सापडल्याच्या नेंदी आहेत. जवळच तोरण टाळे व खोकड टाके आहे. खोकड टाक्यामधील पाणी पिण्या योग्य आहे. या टाक्यापासून थोडे चढल्यावर आपण पोहोचतो ते बालेकिल्ल्यामध्ये. येथे मेंगाईदेवीचे देऊळ आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये उध्वस्त झालेल्या वास्तुंचे अवशेष पहायला मिळतात. दिवाणघर आणि तोरणेश्वर महादेवाचे मंदिर पाहता येते. येथून एक वाट पूर्वेकडील बुरुजावर जाते. या बुरुजावरुन आसमंत उत्तमप्रकारे पाहता येतो. सिंहगड, पुरंदर, वज्रगड, राजगड, राहिडा, रायरेश्वर, महाबळेश्वर, प्रतापगड असा विस्तृत प्रदेश नजरेच्या टप्प्यामध्ये येतो.
बुरुजाच्याखाली निमुळत्या दांडावर बांधलेली झुंझारमाची अप्रतिम आहे. बुरुजाच्या डावीकडून माचीवर जाणारी अवघड वाट आहे. या वाटेवर सध्या एक लोखंडी शिडी बसवलेली आहे.
मेंगाई देवीच्या मंदिरापासून काही अंतरावर कड्यात मेंगाई नावाचे पाण्याचे टाके आहे. मंदिरापासूनच एक वाट कोकण दरवाजाकडे जाते. कोकणाच्या दिशेला असल्यामुळे या दरवाजाला कोकण दरवाजा असे नाव आहे. येथून बुधला माचीचे विलोभनीय असे दर्शन घडते. घसार्यााच्या या वाटेने जाताना कातळात खोदलेली पाण्याची टाकी लागतात. येथून एक वाट भगत दरवाजाकडे जाते, तर उजवीकडील वाट घोडजित टोकाकडे जाते. भगत दरवाजाकडील आणि उजवीकडील वाटेने आपल्याला राजगडाकडे जाता येते. उजवीकडील वाटेने गेल्यावर बुधल्याचा सुळका डावीकडे रहातो. हा सुळका चढण्यासाठी गिर्यारोहण तंत्राचा वापर करणे आवश्यक आहे. खाली डावीकडे बाळणजाई दरवाजा आहे. पुढे चित्ता दरवाजा कापूरलेणे व घोडेजिनचे टोक आहे.
तोरणा किल्ल्याबाबत असलेला महत्त्वाचा उल्लेख म्हणजे हातमखानाचे पत्र. या पत्रातून तोरण्याचे जे वर्णन आले आहे ते मनोरंजक वाटेल. मोगलांनी तोरणा घेतल्यानंतर तोरण्यावर किल्लेदार म्हणून हातमखानाची नेमणूक करण्यात आली. त्याला किल्लेदारखान अशी पदवीही देण्यात आली. हातमखानाने आपला गुरू अताउल्ला याला लिहिले. त्याचा सारांश असा.
आता मी या किल्ल्याची हकीकत सांगतो. मी साहेबजाद्यांचा निरोप घेवून निघालो. मी दुर्गम मार्ग आणि संकटमय घाट पार करून तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी आलो. पायथ्यापासून टोकापर्यंत रस्ता काहीसा घोड्यावर बसून तर काहिसा पायी चालून पार करता येईल. यानंतर स्वारासाठी अगर पायी चालण्यासाठी वाट अशी नाही. किल्ल्याच्या एका बाजूला खोल दरी आहे. ती दरी म्हणजे अलफलुस्साफलीन (सप्त पाताळातील अगदी खालचा असलेला नरक) असे वाटते. किल्ल्यावर पुढे जाण्यास वाट नाही. येथे जाण्यास डोंगरात पायऱ्या काढल्या आहेत. त्याही अतिशय ओबडधोबड आहेत. धडधाकट, तरुण, मजबूत आणि चपळ माणसेही त्या पायऱ्या चढून जाईपर्यंत काकुळतीला येतात. मग माझ्यासारख्या दुबळ्या म्हाताऱ्याची काय कथा! या किल्ल्याची वाट अतिशय वेडीवाकडी आहे. हा किल्ला म्हणजे आकाशाशी स्पर्धा करणारा आहे. अशा अवघड वेड्यावाकड्या वाटेने किल्ल्यावर कोणीही चढून दाखवा म्हणावे.
जॉन डग्लस या इंग्रजाने जेव्हा तोरण पाहिला त्यावेळी त्याने
Sinhgad is Lions Den, then Torana is Eagle’s Nest.
असे उद्गार काढले.

इतिहास
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना अगदी पहिला घेतलेला हा किल्ला. हा घेऊन शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले असे म्हणायची पद्धत आहे. प्रत्यक्षात गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव तोरणा पडले होते. महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून प्रचंडगड असे ठेवले.
तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुन हा शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्‍याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांनंतर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स.१७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला होता.

गडावर जाण्याच्या वाटा
तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी तीन-चार मार्ग आहेत. राजगड किल्ल्याकडून तसेच भट्टी या गावातूनही गड चढता येतो. परंतु वेल्हा येथून जाणे सोयीचे आहे.

गडापर्यंत जाण्याचे मार्ग
पुणे – शिवापूर – नसरापूर – वेल्हा (६० कि.मी.)
सातारा – शिरवळ – नसरापूर – वेल्हा (१०० कि.मी.)
मुंबई – पुणे – शिवापूर – वेल्हा (१९९ कि.मी.)

माहिती साभार :- सचिन शेडगे
Torna

वज्रगड / रुद्रमाळ – Vajragad


चढाई श्रेणी: कठीण
जिल्हा: पुणे
तालुका: पुरंदर
वज्रगडाची समुद्रसपाटीपासूनची उंची १३४८ मीटर एवढी आहे.
पुणे जिल्ह्यातील वज्रगड अथवा रुद्रमाळ या नावाने ओळखला जाणारा हा पुरंदरकिल्ल्या शेजारील गड. एका दंतकथेनुसार गौतम ऋषींच्या शापातून मुक्त होण्यासाठी देवेंद्राने ज्या इंद्रनील पर्वतावर तपःसाधना केली तो इंद्रनील पर्वत म्हणजे आजचा पुरंदर. पुरंदर हे इंद्राचेच एक नाव आहे. इंद्रनील पर्वतरांगांवर बांधलेला हा किल्ला म्हणून त्याचे नाव ‘पुरंदर’ ठेवले गेले अशी एक दंतकथा आहे. तर ‘पुरंदराचे’ म्हणजे ‘इंद्राचे शस्त्र ते वज्र’ म्हणून किल्ले पुरंदरासमोर बांधलेला हा पुरंदराचा जुळा किल्ला म्हणजे ‘वज्रगड’. रुद्रेश्वर उर्फ शिव हा वज्रगडाचा अधिपती म्हणवला जातो. वज्रगडावर या रुद्रेश्वराचे एक मंदीरही आहे. या रुद्रेश्वराच्या अधिवासामुळे ‘वज्रगडाला’ रुद्रमाळही म्हणले जाते. याबद्दल एक पुराणकालीन दंतकथा अशीही सांगितली जाते की राम-रावण युद्धादरम्यान मुर्छीत झालेल्या लक्ष्मणासाठी मारुतीरायाने द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला. तो लंकेकडे जात असताना मध्येच द्रोणागिरीचा एक तुकडा तुटून पडला, तोच हा नारायणपुराजवळील इंद्रनील पर्वतरांगांचा भाग. नंतर इथे यादव राजांनी पुरंदर आणि वज्रगडाचे बांधकाम केले. पायथ्याशी असलेल्या भिवडी गावापासुन, रडतोंडीच्या घाटातुनही किल्ल्यावर जाता येते.
इतिहास
शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंग, दिलेरखानच्या सैन्याने पुरंदर व वज्रगडाला वेढा घातला होता. त्यातील वज्रगड हा पुरंदरपेक्षा काकणभर लहान असल्याने त्यावर आधी तोफांचा भडीमार करायचे ठरले. मुघल सैन्याकडे अब्दुल्लाखान, फतेहलश्कर व माहेली अशी तीन अजस्त्र तोफा होत्या. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वज्रगडाची लढाई चांगलीच रंगली होती.
दिलेरखानला त्या तोफा उंच चढवून वज्रगडाच्या तटावर रोकायच्या होत्या. तीन दिवसाच्या अथक परीश्रमानंतर पहिली तोफ इच्छित स्थळी पोहोचली. त्यानंतर आणखी साडेतीन दिवसांनंतर दुसरी तोफ, फतेहलश्कर तिथे पोहोचली.
त्यानंतर तिसरी तोफ माहेली सुद्धा तिथे पोहोचली. त्या तिन्ही तोफांचा मारा एका बुरुजावर केला जात होता. शेवटी १३ एप्रिल ला त्या बुरुजाने मान टाकली व मुघलांनी गडावर प्रवेश केला. आतील सैन्याने त्यांना प्रतिकार केला पण फार वेळ त्यांना ते थांबवू शकले नाहीत.
दुसऱ्या दिवशी मराठ्यांनी पराभव स्विकारला. त्यांना बंदी बनवून जयसिंहाकडे पाठवले गेले. मुरलेल्या मुत्सद्दीसारखे त्याने सगळ्यांना बिनशर्त सोडून दिले. पुरंदरवरच्या शिबंदीनेही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गड सोडून द्यावा ह्यासाठी त्याने हा मोठेपणा दाखवला होता.
१४ एप्रिल १६६५ ला वज्रगड पडल्यावर आता तोफांचा भडीमार झेलण्याची पुरंदरची पाळी होती. दिलेरखानने तोफखान्याच्या व सैन्यातील वीरांचा सन्मान केला. तोफखान्याच्या अचूक माऱ्यामुळे मुघलांना गडात प्रवेश मिळवता आला होता.
Vajragad

पुरंदर किल्ला – Purandar Fort


चढाई श्रेणी: कठीण
जिल्हा: पुणे
तालुका: पुरंदर
सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा पूर्वेकडे अदमासे २४ किलोमीटर धावून भुलेश्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेले आहेत. कात्रज घाट, बापदेव घाट, दिवे घाट हे तीन घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैर्‌ऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे. तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे.
पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.
इतिहास
पुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर. पुराणात या डोंगराचे नाव आहे ‘इंद्रनील पर्वत’. हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला तोच हा इंद्रनील पर्वत. बहामनीकाळी बेदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी निळकंठ याने कसोशीने हे काम पूर्ण केले. येथील शेंदऱ्या बुरूज बंधाताना तो सारखा ढासळत असे. तेव्हा बाहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवाकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली. त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला. हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला.
इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या साहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १२ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला.
पुरंदरचा तह
शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदराला वेढा घातला. या युद्धाचे वर्णन सभासद बखरीमध्ये असे आढळते.
‘तेव्हा पूरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभू म्हणून होता. त्याजबरोबर हजार माणूस होते. याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते. त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले. दिलेरखान तालेदार जोरावर पठान पाच हजार याखेरीज बैईल वगैरे लोक ऐशी गडास चौतरफा चढत होती. त्यात होऊन सरमिसळ जाहले. मोठे धूरंधर युद्ध जहले. मावळे लोकांनी व खासां मुरारबाजी यानी निदान करून भांडण केले. पाचशे पठाण लष्कर ठार जाहले. तसेच बहिले मारले.’
मुरारबाजी देशपांडेचे हे शौर्य पाहून दिलेरखान बोलिला,
‘अरे तू कौल घे. मोठा मर्दाना शिपाई तुज नावाजितो.’ ऐसे बोलीता मुरारबाजी बोलिला, ‘तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?’ म्हणोनि नीट खानावरी चालिला. खानावरी तलवारीचा वार करावा तो खानने आपले तीन तीर मारून पुरा केला. तो पडला. मग खानाने तोंडात आंगोळी घातली, ‘असा शिपाई खुदाने पैदा केला.’
खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहासप्रसिद्ध ‘पुरंदरचा तह’ झाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. त्यांची नावे अशी,
पुरंदर
रुद्रमाळ
कोंढाणा
रोहिडा
लोहगड
विसापूर
तुंग
तिकोना
प्रबळगड
माहुली
मनरंजन
कोहोज
कर्नाळा
सोनगड
पळसगड
भंडारगड
नरदुर्ग
मार्गगड
वसंतगड
नंगगड
अंकोला
खिरदुर्ग (सागरगड)
मानगड
८ मार्च १६७० मध्ये निळोपंत मुजुमदाराने किल्ला स्वराज्यात आणला. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर किल्ला औरंगजेबाने जिंकला व त्याचे नाव ‘आजमगड’ ठेवले. पुढे मराठ्यांच्या वतीने शंकराजी नारायण सचिवांनी मोगलांशी भांडून पुरंदर घेतला. शके १६९५ मध्ये छत्रपती शाहू यांनी किल्ला पेशवे यांस दिला. अनेक दिवस किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती. शके १६९७ मध्ये गंगाबाई पेशवे यांना गडावर मुलगा झाला, त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात आले. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
पुरंदर आणि वज्रगड जरी एकाच डोंगरसोंडेवर वसलेले असले तरी ते दोन स्वतंत्र किल्ले आहेत.
बिनी दरवाजा: पुरंदर माचीवरील हा एकमेव दरवाजा. नारायणपूर गावातून किल्ल्यावर जाताना हा दरवाजा लागतो. दरवाज्यातून आत शिरल्यावर पहारेकर्‍याच्या देवड्या आहेत. समोरच पुरंदरचा खंदकडा आपले लक्ष वेधून घेतो. आत शिरल्यावर दोन रस्ते लागतात, एक सरळ पुढे जातो तर दुसरा डावीकडे मागच्या बाजूस वळतो. आपण सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर उतारावर लष्कराच्या बराकी आणि काही बंगले दिसतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर दिसते. त्याचे नाव ‘पुरंदरेश्वर’.
पुरंदरेश्वर मंदिर: हे मंदिर महादेवाचे आहे. मंदिरात इंद्राची सव्वा ते दीड फुटापर्यंतची मूर्ती आहे. हे साधारणपणे हेमाडपंती धाटणीचे असावे. थोरल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
रामेश्वर मंदिर: पुरंदेश्वर मंदिराच्या मागील कोपऱ्यात पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आहे. हे पेशव्यांचे खाजगी मंदिर होते. या मंदिरापासून थोडे वरती गेल्यावर पेशवांच्या दुमजली वाड्याचे अवशेष दिसतात. पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्वनाथने तो वाडा बांधला होता. या वाड्याच्या मागे विहीर आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाते तर दुसरी खाली भैरवखिंडीच्या दिशेने जाते. बालेकिल्ल्याच्या दिशेने वर गेल्यावर १५ मिनिटातच दिल्ली दरवाजापाशी येतो.
दिल्ली दरवाजा: हा उत्तराभिमुख दरवाजा आहे. दरवाज्याच्या वळणावर श्री लक्ष्मी मातेचे देवालय आहे. आत गेल्यावर उजवीकडे आणखी एक दरवाजा दिसतो. डावीकडची वाट बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाते. या वाटेने पुढे गेल्यावर काही पाण्याची टाकी लागतात.
खंदकडा: दिल्ली दरवज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक कडा थेट पूर्वेकडे गेलेला दिसतो. हाच तो खंदकडा. या कड्याच्या शेवटी एक बुरूज आहे. बुरूज पाहून आल्यावर परत दरवाज्यापाशी यावे. येथून एक वाट पुढे जाते. या वाटेतच आजूबाजूला पाण्याची काही टाकी लागतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक उंचवटा लागतो. त्याच्या मागे पडक्या जोत्यांचे अवशेष आहेत. येथेच अंबरखान्याचे अवशेष दिसतात. थोडे वर चढून पाहिल्यास वाड्याचे अवशेष दिसतात. वाटेवर पुढे गेल्यावर काही पाण्याचे हौद लागतात. या वाटेवरून पुढे जाताना एक वाट डावीकडे खाली गेली आहे. या वाटेने गेल्यावर केदार दरवाजा लागतो.
पद्मावती तळे: मुरारबजींच्या पुतळ्यापासून पुढे गेल्यावर पद्मावती तळे लागते.
शेंदऱ्या बुरूज: पद्मावती तळ्याच्या मागे बालेकिल्ल्याच्या वायव्येस, तटबंदीच्या बरोबरीने एक बुरूज बांधला आहे. त्याचे नाव शेंदऱ्या बुरूज.
केदारेश्‍वर: केदार दरवाजा पाहून मूळ वाटेने १५ मिनिटे चालून गेल्यावर काही पायऱ्या लागतात. त्या आपल्याला थेट केदारेश्‍वर मंदिरापर्यंत घेऊन जातात. पुरंदरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्‍वर. मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. महाशिवरात्रीला हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. मंदिराच्या समोरच एक दगडी दीपमाळ आहे. सभोवती दगडी फरसबंदी आहे. केदारेश्‍वराचे मंदिर म्हणजे किल्ल्यावरील अत्युच्च भाग. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्‍वर, रोहिडा, मल्हारगड, कर्‍हेपठार हा सर्व परिसर दिसतो. या केदार टेकडीच्या मागे एक बुरूज आहे त्याला कोकण्या बुरूज असे नाव आहे.
पुरंदर माची: आल्या वाटेने माघारी फिरून दिल्ली दरवाज्यातून जाणाऱ्या वाटेने थेट पुढे यावे म्हणजे आपण माचीवरील भैरावखिंडीत जाऊन पोहोचतो. वाटेत वाड्याचे अनेक अवशेष दिसतात.
भैरवगड: याच खिंडीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे. खिंडीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या खिंडीपर्यंत गाडी रस्ता आलेला असल्याने त्या रस्त्यावरून गेल्यावर वाटेतच उजवीकडे राजाळे तलाव लागतो. पुरंदरमाचीवर याच तलावाचे पाणी वापरले जाते.
वीर मुरारबाजी: बिनी दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे गेल्यावर समोरच मुरारबाजीचा पुतळा दिसतो. इ.स. १९७० मध्ये हा पुतळा उभा केला आहे.
गडावर जाण्याच्या वाटा
पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.
सासवडहून: सासवडहून सासवड – भोर गाडी पकडावी. या गाडीने नारायणपूर गावाच्या पुढे असणाऱ्या ‘पुरंदर घाटमाथा’ या थांब्यावर उतरावे. हा घाटमाथा म्हणजे पुरंदर किल्ला आणि समोर असणारा सूर्यपर्वत यामधील खिंड होय. या थांब्यावर उतरल्यावर समोरच डोंगरावर एक दोन घरे दिसतात. या घरामागूनच एक पायवाट डावीकडे वर जाते. ही वाट पुढे गाडी रस्त्याला जाऊन मिळते. या वाटेने पाऊण तासात पुरंदर माचीवरील बिनीदरवाजा गाठता येतो.
पुण्याहून: पुण्याहून ३० कि. मी. अंतरावर असणाऱ्या सासवड या गावी यावे. सासवड ते नारायणपूर ही अशी एस्. टी. सेवा देखील आहे. नारायणपूर हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावातूनच गाडीरस्ता थेट किल्ल्यापर्यंत गेलेला आहे. पुणे ते नारायणपूर अशी बस सेवा देखील आहे. नारायणपूर गावातून गडावर जाण्यास दोन मार्ग आहेत. एक म्हणजे गाडीरस्ता. या रस्त्याने चालतचालत गड गाठण्यास २ तास पुरतात. तर दुसरी म्हणजे जंगलातून जाणारी पायवाट. या पायवाटेने एक तासात आपण पुरंदर माचीवरच्या बिनी दरवाज्यापाशी पोहोचतो.
राहण्याची सोय
किल्ल्यावर शासकीय बंगले आहेत. यामध्ये राहण्याची सोय होऊ शकते. मात्र त्यासाठी तेथे असणाऱ्या प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे.

जेवण्याची सोय
जेवण्याची सोय स्वतः करावी. पिण्याचे पाणी मात्र बारमाही उपलब्ध आहे.
Purandar11         


  MURARBAJI     Damodar_purandar
Purandar

मल्हारगड / सोनोरी – Sonori / Malhargad Fort


किल्ल्याची ऊंची: २५० फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: भुलेश्वर
श्रेणी: सोपी
तालुका: पुरंदर
जिल्हा: पुणे
महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून मल्हारगड किल्ला प्रसिद्ध आहे.
पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा आहेत. दुसरी डोंगररांग ही पूर्व-पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड हे किल्ले याच रांगेवर आहेत. पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती इ.स. १७५७ ते १७६० या काळातील आहे. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला ‘सोनोरी’ म्हणूनही ओळखले जाते. मल्हारगड हे नाव किल्ल्याला कसे मिळाले यांच्या खूप साऱ्या दंतकथा ऐकावयास मिळतात.
११०० मीटर लांबी असलेल्या दुहेरी तटबंदीचा हा किल्ला दिवे घाटाच्या पूर्वेस अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून मल्हारगड अंतर सुमारे ३५ किलोमीटर आहे.
मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे.

इतिहास
मल्हारगड किल्ल्याची बांधणी पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख भीमराव पानसे आणि कृष्णराव पानसे यांनी केली. सन १७६३ ते १७६५ च्या कालावधीमध्ये किल्ल्याचे बांधकाम झाले. सन १७७१-७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. इंग्रजांच्या विरुद्ध बंडात उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी या गडाचा आश्रय घेतला होता. किल्ल्याच्या पायथ्याला असेलेल्या सोनोरी गावात सरदार पानसेंचा एक चिरेबंदी वाडा सुद्धा आहे. याच सोनोरी गावात श्रीकृष्णाची अत्यंत सुंदर मूर्ती असलेले सुबक मंदिर आहे. या किल्ल्याचा उपयोग दिवेघाटावर आणि आजुबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी होत असे.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
सोनोरी गावातून थोडी चढाई नंतर आपण पूर्व दिशेच्या मुख्य प्रवेशद्वारा पर्यंत पोहोचतो. प्रवेशद्वार सुस्थितीत असून एका विशाल दगडालाच बुरुजात बांधून तयार केलेली रचना दिसते. आतील बाजूस मोठ्या देवड्या आणि पुढे जाण्यासाठी निमुळती वाट आहे. आत शिरल्यावर डाव्या बाजूने पुढे गेले असता बालेकिल्ल्याच्या तटाआधी आपल्याला एका वाड्याचे अवशेष दिसतात. बाजूलाच एक विहीर आहे. साधारण त्रिकोणी आकाराची तटबंदी असलेल्या मल्हारगडात चौकोनी आकाराचा विशेष रचना असलेला बालेकिल्ला आहे. संपूर्ण तटबंदीत वैशिष्ट्यपूर्ण जंग्या आहेत.
बालेकिल्ल्यात प्रवेश न करता तटाच्या बाजूने पुढे गेल्यावर समोरच एक तळे लागते. किल्ल्याच्या दक्षिणेला असणारे हे तळे तटाला लागूनच असून पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याने भरलेले असते. सह्याद्री प्रतिष्ठानने घेतलेल्या काही मोहिमांमध्ये यातील सर्व गाळ काढून टाकण्यात आला असून येत्या पावसाळ्यात यातील पाणी पिण्यायोग्य असेल. तसेच पुढे किल्ल्याच्या टोकावर असणाऱ्या बुरुजाकडे जाताना अजून एक विहीर लागते. या बुरुजाच्या खाली एक बुजलेला दरवाजा दिसतो. बुरुजाकडून उजवीकडे पुढे गेल्यावर आपल्याला आणखी एक लहान दरवाजा दिसतो. झेंडेवाडीकडून आल्यास आपण या दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश करतो.
गडाचा सर्वात प्रेक्षणीय भाग बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्यातील वास्तू पडल्या असून देखरेखे अभावी त्या नष्ट होण्याचा धोका आहे. बालेकिल्ल्यात दोन मंदिरे आहेत. आकाराने मोठे मंदिर रेखीव शिवलिंग असलेले सावळेश्वराचे आहे. तर लहान मंदिरात अश्वारूढ मल्हारीची म्हल्सासोबतची मूर्ती लक्षवेधक आहे या मंदिरातील मूर्ती पाहून जेजुरीची आठवण नक्कीच येते, कदाचित यामुळेच किल्ल्याचे नाव मल्हारगड पडले असावे. खंडोबाच्या मूर्ती शेजारी खूप साऱ्या छोट्या मुर्त्या आपल्याला पहावयास मिळतात. कळसासकट संपूर्ण दगडात बांधलेली हि दोन्ही मंदिरे मनमोहक आहेत. गावकरी आणि काही सामाजित संस्थांनी मिळून दोनही मंदिरांच्या रंग रंगोटीचे काम नुकतेच पूर्ण केले आहे. पिवळा आणि नारंगी रंग दिलेली हि मंदिरे सहज लक्ष वेधून घेतात. बालेकिल्ल्याच्या उत्तरेला प्रवेशद्वार आहे. महादेव मंदिराच्या समोरील भिंतीच्या मागील बाजूस उत्तम स्थितीतील विहीर आहे, जिचे पाणी पुण्यायोग्य आहे. पाणी काढण्यासाठी दोर सोबत असणे आवश्यक आहे.
पूर्व दिशेच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूला डोंगराच्या टोकावर आल्यावर समोरच्या डोंगरावर डाव्याबाजूला असलेल्या विजेच्या टॉवर शेजारी आणि उजव्या बाजूला खाली कातळात खोदलेले दोन टाके पहावयास मिळतात. दोन्ही टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. गडाची फेरी पूर्ण करण्यासाठी एक तास पुरतो.
किल्ल्यावरून कर्‍हा नदी, जेजुरीचा डोंगर, कडेपठार वगैरे दिसतात.
गडाकडे जाण्याआधी सोनोरी गावात असणारा पानसे यांचा ६ बुरुजांचा वाडा पाहण्यासारखा आहे. वाड्यामध्ये चोरवाटा, भुयारे, पोलादी, सुळे मारलेले लाकडी दरवाजे, कलापूर्ण खिडक्या, वैशिष्ट्यपूर्ण विहीर, अष्टकोनी हत्ती तलाव. एखाद्या गढीप्रमाणे असणाऱ्या या वाड्यात गजाननाचे व लक्ष्मी-नारायणाचे मंदिर आहे. सोनोरी गावात चुकवून चालणार नाही असे ठिकाण म्हणजे मुरलीधराचे सुबक मंदिर व मंदिरातील अत्यंत देखणी अशी काळ्या पाषाणात घडवलेली श्रीकृष्णाची मूर्ती.

गडावर जाण्याच्या वाटा
१. पुण्याहून सासवडला निघाल्यावर दिवे घाट संपल्यावर ४ किलोमीटर पुढे जाऊन काळेवाडी फाटा लागतो, स्वतःचे वाहन असल्यास थेट गडाच्या दक्षिणेकडील पडलेल्या बुरूजा पर्यंत पोहोचण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. काळेवाडी गावातून जाणारा हा रस्ता फारसा परिचित नसला तरीही अतिशय सोपा आहे. रस्ता थोडा कच्चा आहे; चार चाकी वाहन देखील सहज किल्ल्याच्या बुरुजापर्यंत जाते. तेथून ५ मिनिटांच्या चढाईने किल्ल्यात प्रवेश करता येतो.
२. पुण्याहून सासवड मार्गावर दिवे घाट संपल्या नंतर २ किलोमीटरवर झेंडेवाडी गावाचा फाटा लागतो. येथून २ कि.मी. वर झेंडेवाडी हे गाव आहे. गाव पार करून आपल्याला समोरच्या डोंगररांगामध्ये दिसणाऱ्या ‘ण’ आकाराच्या खिंडीत जावे लागते. गावात विचारल्यावर गावकरीही आपल्याला ती खिंड दाखवतात. या खिंडीत पोहोचल्याशिवाय मल्हारगडाचे दर्शन होत नाही. या खिंडीत गेल्यावर समोरच याच डोंगररांगमध्ये असणारा मल्हारगड आपल्याला दिसतो. तटबंदींनी सजलेल्या मल्हारगडावर जायला आपल्याला पुन्हा डोंगर उतरावा लागत नाही. खिंडीतून किल्ल्यावर जाण्यास अर्धातास तर आपण उतरलेल्या झेंडेवाडीफाट्या पासून खिंडपार करून किल्ल्यावर जाण्यास साधारणपणे दीड तास लागतो.
३. सासवड पासून ६ कि.मी. वर सोनोरी हे गाव आहे. या गावाला एस.टी. सासवडहून निघून दिवसातून तीन वेळा म्हणजे स. १०, दु. २, आणि संध्या. ५ या वेळेत भेट देते. सोनोरी गावातून समोरच दिसणारा मल्हारगड आपले लक्ष वेधून घेतो. गडाकडे कूच करण्याआधी सोनोरी गावात असणारा सहा बुरुजांनी युक्त असा पानसे यांचा वाडा पाहण्यासारखा आहे. सोनोरी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी अर्धा-पाऊण तास लागतो. डोंगराच्या सोंडेवरूनही गडामध्ये प्रवेश करता येत असला तरी टॉवरच्या बाजूने गेल्यास आपल्याला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार लागते.
राहण्याची सोय
फक्त ५-६ माणसे महादेवाच्या मंदिरात दाटीवाटीने राहू शकतात. गडावर अन्यत्र रहाण्याची सोय नाही. मात्र पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावात किंवा झेंडेवाडीत शाळेच्या आवारात राहता येते. जेवणाची सोय गडावर नाही. गडावर विहिरीतील पाणी पिण्यायोग्य आहे. किल्ल्यात एक बांधीव तळे व तीन विहिरी आहेत मात्र इतर दोन विहिरींना अजिबात पाणी नाही व तळ्यातील पाणी फक्त वापरण्यासाठी उपयुक्त आहे, पिण्यासाठी नाही.

माहिती साभार :- गणेश रघुवीर
Malhargad

दौलतमंगळ किल्ला – Daulatmanagal Fort


किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग
चढाई श्रेणी: सोपी
जिल्हा: पुणे
पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यामध्ये दौलतमंगळ नावाचा लहानसा किल्ला आहे. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध शिवमंदिरामधील शिल्पकलेने नटलेले भुलेश्वरचे प्रख्यात शिवमंदिर हे दौलतमंगळ किल्ल्यामध्ये आहे. अनेक भाविकांची नित्यनियमाने भुलेश्वर मंदिराला भेट असते. प्रामुख्याने श्रावण महिन्यात तसेच महाशिवरात्रीला भाविकांचा प्रचंड ओघ भुलेश्वरला असतो.
भुलेश्वर मंदिर हे किल्ल्यामध्ये आहे याची अनेकांना कल्पनाही नाही. शिवपूर्वकालातील इतिहासामधे फलटणचा फतेहमंगळ, शिरवळचा सुभानमंगळ आणि भुलेश्वरचा दौलतमंगळ यांचे उल्लेख आहेत.

भौगोलिक स्थान
पुणे शहराच्या दक्षिणेकडे भुलेश्वर रांग म्हणून ओळखली जाणारी सह्याद्रीची उपरांग आहे. ही रांग पूर्व पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेत इतिहासप्रसिद्ध सिंहगड असून दिवे घाटाजवळ सोनोरी ऊर्फ मल्हारगड हा किल्ला आहे. याच रांगेत यवत जवळ दौलतमंगळचा किल्ला आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
किल्ल्याच्या तटबंदीचे, बुरुजांचे अवशेष आजही आपले अस्तित्व कसेबसे टिकवून उभे राहीलेले दिसतात. किल्ल्याचा दरवाजा, पायऱ्यांचा मार्ग, पाण्याची टाकी असे वास्तूविशेषही पहायला मिळतात.
किल्ल्याचे भग्नावशेष पाहून आपण निश्चितच खिन्न होतो. खिन्न मनाने आपण भुलेश्वरच्या मंदिरात प्रवेश करतो. मंदिर पाहिल्यावर मनाची उदासिनता कुठल्या कोठे पळून जाते आणि आपण प्रसन्न मनाने मंदिराचे शिल्पकाम न्याहळू लागतो.
मुख्य मंदिराच्या बाहेरुन भिंत बांधून मंदिराची सुरक्षितता वाढवल्याचे दिसून येते. मंदिरामधील अनेक मुर्त्यांची तोडफोड केल्याचे दिसते. वरच्या भागातील गिलाव्यामधील मूर्ती मात्र शाबुत असल्याचे पहायला मिळते.कलाकारांची सौंदर्यवृष्टी आणि कलाकारी मनाला भावते तसेच शिल्पांची अदाकारी ही आपल्याला थक्क करते.
जाण्यासाठी मार्ग
दौलतमंगळ किल्ल्याला जाण्यासाठी पुण्यातून दोन मार्ग सोयीचे आहेत. पुणे-दिवे घाटातून सासवड-आंबळे-माळशिरस मार्गे भुलेश्वर असा गाडीरस्ता आहे. माळशिरस हे लहानसे गाव किल्ल्याच्या दक्षिण पायथ्याला आहे. दुसरा मार्ग पुणे-सोलापूर रस्त्यावरील यवत गावाकडून आहे. यवतच्या दक्षिणेला दौलतमंगळ आहे.दौलतमंगळ किल्ल्यामधील भुलेश्वर मंदिरापर्यंत गाडीरस्ता आलेला आहे. किल्ल्याची काही तटबंदी तोडून हा रस्ता केलेला आहे.
किल्ल्याचा परीसर
भुलेश्वर परिसरातून वज्रगड, पुरंदर, सिंहगड किल्ले दिसतात तसेच जेजुरी, ढवळेश्वर आणि सपाटीवरचा विस्तृत प्रदेशही पहाता येतो. दौलतमंगळाच्या भेटीत आपण जेजुरी अथवा ढवळेश्वरालाही भेट देवू शकतो.
daulatmangal

कोरीगड / कोराईगड – Korigad / Koraigad Fort

korigad

किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग
किल्ल्याची उंची: ३०५० फुट
चढाई श्रेणी: मधम
जिल्हा: पुणे
तालुका: मावळ
पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या दक्षिणेला साधारण २२ किलोमीटर अंतरावर असलेला आणि चढण्यासाठी सोपा असा हा किल्ला कोरीगड. घाटमाथ्यावर असल्यामुळे एकाच वेळी कोकण व देशावरील परिसराने विस्तृत दर्शन घडते. तीन हजार फूट उंचीच्या किल्ल्यावर कोराईदेवीचे मंदिर व मोठे तळे पहाण्यासारखे आहे. गडाला चहूबाजूंनी तटबंदी आहे. दक्षिणेकडे बुरुजांची चिलखती तटबंदी आहे. बुरुजावरुन कोकणातील मुलुखाचे विहंगम दृश्य दिसते.
मुळशी धरणाच्या पश्चिमेकडे एक मावळ आहे त्याचे नाव आहे कोरबारस मावळ. याच मावळ प्रांतात कोरीगड आणि घनगड हे किल्ले येतात. लोणावळा आणि पाली यांच्याकडे असणाऱ्या सव्वाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरीगड आहे. हा किल्ला प्रसिद्ध आहे त्याच्या सद्यःस्थितीला असलेल्या अखंड तटबंदीमुळे या भागातील किल्ले पहावयाचे असल्यास तीन ते चार दिवसांची सवड हवी. कोरीगड, घनगड, सुधागड आणि सरसगड या सारखा सुंदर टेकही या भागात आपल्याला करता येतो.

इतिहास
इ.स. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कोराईगड लोहगड, विसापुर, तुंग, तिकोना या किल्ल्याबरोबर स्वराज्यात सामील करून घेतला.
११ मार्च इ.स. १८१८ रोजी कर्नल प्रार्थरने या किल्ल्यावर चढाई केली. तीन दिवस लढून यश येईना. शेवटी गडाच्या दारुकोठारावर तोफेचा गोळा पडला. प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले. नष्ट झालेल्या दारुकोठारामुळे व गडावरील प्राणहानीमुळे मराठ्यांनी शरणागती पत्करली. या किल्ल्याबरोबर दक्षिणेकडील घनगडही ही इंग्रजांना मिळाला.

गडावरील पाहण्याजोगी ठिकाणे
कोराई देवीचे मंदिर गडाची देवता कोराई प्रसन्नवदनी, चतुर्भुज व शस्त्रसज्ज आहे. ही देवीची मूर्ती दीड मीटर उंच आहे.
गडावरील एकूण सहा तोफ़ांपैकी सगळ्यात मोठी तोफ लक्ष्मी मंदिराजवळ आहे.
गणेश टाके गडावर दोन मोठी तळी आहेत. गडाच्या पश्चिम कड्याच्या उत्तर भागात काही छोट्या गुहा आहेत. ह्यालाच गणेश टाके म्हणतात.

गडावर जाण्याच्या वाटा
गडावर जाण्यासाठी दोन वाटा अस्तित्वात आहेत. तिसरी वाट खाजगी आहे एम्बी व्ह्यालीतून खाजगी डांबरी रस्ता थेट पायऱ्यापर्यंत जातो. किल्ला चढण्यासाठी साधारण ६०८ पायऱ्या असून गडचढाई सोपी करतात.
१. पेठ-शहापूर: कोरीगडला जाण्यासाठी लोणावळ्याला यावे. येथून आय.एन.एस. शिवाजीमार्गे आंबवणे किंवा भांबुर्डेला जाणारी बस पकडावी, किंवा सहारा प्रकल्पाकडे जाणारी बस पकडावी आणि भुशी धरणाच्या पुढे, आय.एन.एस. शिवाजीच्या पुढे २२ कि.मी वरील पेठ-शहापूर गावात उतरावे. या गावातून सरळ जाणारी पायवाट आपल्याला पायऱ्यांशी घेऊन जाते. पायऱ्यांच्या सहाय्याने वीस मिनिटांत गडावर पोहचता येते.
२. आंबवणे गाव: कोरीगडला जाण्यासाठी आंबवणे गावातूनही जाता येते. ही वाट मात्र जरा अवघड आहे. या वाटेने जाण्यासाठी लोणावळ्याहून भांबुर्डेकडे अथवा थेट आंबवणेकडे जाणारी बस पकडावी. गावातून अर्ध्या तासात गडावर जाता येते.
कोराई गडावरील मंदिरात राहण्याची सोय होते. किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वतःच करावी. गडावर पाण्याची सोय नाही, गडावर दोन तळी असली तरी त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. पेठशहापूर मार्गे गडावर येणाऱ्या वाटेवर दरवाजाच्या अलीकडे एक टाके आहे. पिण्याच्या पाण्यासाठी हे वापरावे. गडावर जाण्यासाठी पेठशहापूर मार्गे अर्धा तास लागतो.
टीप: स्वतःचे वाहन असल्यास घनगड, कोरीगड, तुंग आणि तिकोना असे चार किल्ले एकाच दिवशी करता येतात.
माहिती साभार: विकी सोनपेठकर

कैलासगड


प्रकार: गिरिदुर्ग
श्रेणी: सोपी
पायथ्याशेजारील गाव: वडूस्ते / वंद्रे
कैलासगडाविषयी ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याला भेट दिली होती. किल्ला व मुळशी धरण परिसर पाहण्याजोगा आहे. पावसाळ्याच्या दिवसात किल्ल्यावर जपून भ्रमंती करावी.
कसे जाल?
१) ताम्हिणी घाट मार्गे : पुणे – ताम्हिणी घाट मार्गे पिंपरी गावा पर्यंत जावे तेथून वडूस्ते गाव मार्गे वंद्रे या पायथ्याच्या गावी पोहोचावे. नजीकच्या काळात रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.
२)लोणावळा मार्गे (१०० किमी) : लोणावळ्याला पोहोचल्यावर आंबवणे गाव रस्त्याने साधारण ६ किमी आंतरने वंद्रे या पायथ्याच्या गावी पोहोचावे.
जेवणाची सोय: किल्ल्यावर नाही, स्वतः करावी.
पाणी: किल्ल्यावर फक्त पावसाळ्यात पाणी असते.
वेळ: पायथ्यापासून किल्ल्यावर जाण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो.
kailasgad

घनगड – Ghangad



मुळशीच्या पश्चिमेला एक मावळ भाग आहे यालाच ‘कोरसबारस’ मावळ म्हणतात.याच मावळात येणारा हा घनगड. आड बाजूला असलेला हा किल्ला मात्र उत्साही ट्रेकर्सला नेहमीच खुणावत राहतो. येथील जनजीवन शहरी सुखसोयींपासून फारच दुरावलेले आहे.

इतिहास
किल्ल्याच्याबद्दल इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. मात्र किल्ला कोळी सामंताकडून निजामशहाकडे आणि पुढे आदिलशहाकडे आणि नंतर मराठ्यांकडे आला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
किल्ल्यावर प्रवेश केल्यावर डाव्या हाताला असणारी टेकडीवर जाणारी वाट पकडावी. या वाटेने वर जातांना एका पडक्या दरवाजातून आपण गडमाथ्यावर प्रवेश करतो. गडावर पडक्या घरांचे अवशेष आहेत. पाण्याची एक ते दोन टाकी आहेत आजमितिस मात्र ती फुटलेली आहेत. बाकी किल्ल्यावर फारसे अवशेष नाहीत. किल्ल्यावरून सुधागड, सरसगड अणि तैलबैलाची भिंत हा परिसर दिसतो. तसेच नाणदांड घाट, सव्वष्णीचा घाट, भोरप्याची नाळ या कोकणातील घाटवाटा सुध्दा दिसतात.

गडावर जाण्याच्या वाटा
ऐकोले मार्गे किल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट आहे अणि ती ऐकोले गावातूनच वर जाते. मुंबईकरानी अणि पुणेकरांनी लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भाबुर्डेकडे जाणारी एस. टी. पकडावी लोणावळा ते भांबुर्डेहे अंतर ४० कि.मी चे आहे.भांबुर्डेगावातून थेट ऐकोले गावात यावे. भांबुर्डेते ऐकोले हे साधारणतः अंतर २० मिनिटाचे आहे.ऐकोले गावातूनच किल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे.गावातून बाहेर पडल्यावर डावीकडची वाट पकडावी. ही वाट थेट किल्ल्यावर जाते. यावाटेने पुढे जातांना गारजाई देवीचे मंदिर लागते. या मंदिरात “श्री गारआई महाराजाची व किले घनगडाची” असा शिलालेख कोरलेला आहे. मंदिराच्या समोरच एक तोफगोळा पडलेला आहे. या मंदिराच्या डाव्या बाजूनेच किल्ल्यावर जाणारी वाट आहे. येथून थोडाच वेळात आपण एका कातळकडापाशी येऊन पोहचतो. गडावर जाणारी वाट इग्रजांनी सुरुंग लावून चिणून काढली आहे.१५ फुटाच्या ह्या कड्यावर थोडे प्रस्तरारोहण करून चढून जावे लागते. आवश्यक असल्यास १५ फुटाचा दोर लावावा. हा कडा पार केला की आपण थेट किल्ल्यातच प्रवेश करतो.
राहण्याची सोय: वर राहण्याची सोय नाही मात्र गारजाई च्या मंदिरात १५-२० लोकांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय: स्वतः करावी.
पाण्याची सोय: किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ: ऐकोले गावातून अर्धातास.
ghangad

चाकण किल्ला / संग्रामदुर्ग


किल्ल्याचा प्रकार: भुईकोट
चढाई श्रेणी: सोपी
जिल्हा: पुणे
तालुका: खेड
पुण्यापासून २० मैलावर वसलेले चाकण पूर्वीचे खेडेगाव तर सध्याचे वाहन उद्योगाने प्रचंड विस्तारते शहर. चाकण मध्ये दोन्ही पैकी कुठल्याही वेशीतून प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही अंतरावर जुन्या पुणे नाशिक रस्त्यावरून चालत आल्यास भग्नावस्थेतील तटबंदी दिसू लागते. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या चाकण गावात संग्रामदुर्ग किल्ल्याचा कोट फक्त शिल्लक राहिला आहे. इतिहासाची पाने डोळयासमोर फडफडविनारा चाकणचा भुईकोट संग्रामदुर्ग किल्ला आणखी काही वर्षांनी येथे होता असे सांगण्याची वेळ येणार हे निश्चित आहे.
याबाबत शासनाने योग्य उपाय योजना करून संवर्धनासाठी खरेखुरे प्रयत्न करावेत अशी माफक अपेक्षा दुर्गप्रेमी, इतिहास संशोधक व येथील नागरिक करीत आहेत.

इतिहास

शिवरायांच्या फक्त एका शब्दाखातर, आदिलशाही नोकरी सोडुन स्वराज्यात सामिल झालेले किल्लेदार फिरंगोजी नरसाळा; स्वराज्यात येताना ते एकटेच नाही आले, तर चाकण सारखा अतिशय देखणा आणि मजबुत किल्ला त्यांनी शिवरायांना हसत हसत नजर केला. शिवरायांसारखा रत्नपारखी राजा, त्यांनी ह्या अलौकिक रत्नाला नुसते स्वराज्यात सामिलच करुन घेतले नाही तर फिरंगोजींना चाकणची किल्लेदारीपण बहाल केली. स्वराज्यात आलेले फिरंगोजी, परत जाताना स्वराज्याचा नेक, विश्वासू सहकारी हि पदवी, किल्लेदारीची वस्त्रे आणि प्रेमानी उचंबळुन भरुन आलेला ऊर संगाती घेऊन शिवरायांकडून चाकणकडे परतले. स्वराज्यावर एकापेक्षा एक भीषण संकटे येऊनसुद्धा फिरंगोजीनी चाकण आपल्या लेकराप्रमाणे संभाळला, सजवला आणि अतिशय मेहेनतीने राखला.
मुघल बादशाह औरंगजेबाचा मामा अमीर उल उमरा शाहिस्तेखान हा मोठ्ठ्या फौजेनिशी स्वराज्यात आला. या भुईकोट दुर्गाला २१ जून १६६० रोजी किल्ल्याला मुघलांचा वेढा पडला. खरं तर फार फार उमेदीने आणि प्रचंड सैन्यानिशी हा खान दख्खनेत आला होता. संग्रामदुर्गात फिरंगोजी नरसाळा यांनी किल्ला लढवण्याची पूर्ण तयारी केली होती. संग्रामदुर्ग म्हणजे खूप भक्कम दुर्ग नव्हे. आधीच तो स्थलदुर्ग; पण खांद्काने वेढलेला. त्यामुळे थोडी बळकटी आलेला. खडकात पाणीही होते, शिवाय दिवस पावसाचे होते.
हा वेढा तब्बल ५६ दिवस चालला; तोफा – बंदुकांचा काही उपयोग होत नाही, हे पाहिल्यावर शाहिस्ते खानाने भुयार खणून सुरुंग ठासण्याची आज्ञा केली. ताबडतोब कामाला सुरवात झाली. हे भुयार खंदकाखालून खणण्यात येत होते. आतल्या मराठ्यांना जर या भुयाराची कल्पना आली असती, तर कदाचित खंदकातील पाणी त्यात सोडून सुरुंग निकामी करता आले असते. ३००-३५० मावळ्यांनिशी फिरंगोजी नरसाळ्याने चाकण झुंजवत ठेवला होता.
अखेर १४ ऑगस्ट १६६० या दिवशी मुघलांनी सुरुंगाला बत्ती दिली. पूर्वेकडील कोपऱ्याचा बुरुज अस्मानात उडाला. त्यावरचे मराठेही हवेत उडाले. आरोळ्या ठोकत मुघल त्या खिंडाराकडे धावले. फिरांगोजीनीही वाट न पाहता ते खिंडार लढवण्याची तयारी केली. तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली. दुसऱ्या दिवशी राव भावसिन्हामार्फत मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मोघलीसैन्याने चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला. मावळ्यांचे साहस पर्व कडू घोट घेत संपले.
चाकणच्या किल्ल्याचा एक टवका उडवायला एवढा संघर्ष करावा लागल्याने खानाच्या तोफांचा प्रचंड मारा सहन करतानाही, संग्रामदुर्ग किल्लाही खाना कडे पाहून तेंव्हा खदाखदा हसला असेल, पण आता मात्र शासनाच्या अनास्थेने ढसाढसा रडत असेल.

माहिती

  २०१२ च्या अर्थसंकल्पात राज्य शासनाने या किल्ल्याच्या संवर्धनासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात यास एक वर्षाचा कालावधी लोटूनही किल्ल्याच्या संवर्धनाच्या कामास सुरुवात झालेली नाही.
chakan fort

भोरगिरी किल्ला


पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका आहे. पुण्याच्या उत्तर भागात असलेल्या खेड तालुक्याचे मुख्य गाव म्हणजे राजगुरूनगर. क्रांतिकारक राजगुरू यांचा जन्म येथे झाल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ खेडचे नाव बदलून राजगुरूनगर असे ठेवण्यात आले.
राजगुरूनगर हे तालुक्याचे गाव असून ते पुणे-नाशिक या महामार्गावार वसलेले आहे. भिमा नदीच्या उत्तरतीरावर वसलेले राजगुरूनगर आजूबाजूच्या महत्वाच्या गावांशी गाडीमार्गाने उत्तमपैकी जोडले गेले आहे.
शिवकालामध्ये मोगलांची सरहद भिमा नदी पर्यंत भिडलेली होती. भिमा नदीचा उगम सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील भिमाशंकर जवळ होतो. तेथून ती वहात राजगुरूनगर येथे येते. या भिमा नदीच्या खोर्याुमध्ये एक दुर्गरत्न विसावलेले आहे. हे दुर्गरत्न म्हणजे किल्ले भंवरगिरी उर्फ भोरगिरी.
भोरगिरी नावानेच परिचित असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्याला भोरगिरी नावाचे लहानसे गाव आहे. राजगुरूनगर पासून साधारण ५५ कि.मी. अंतरावर भोरगिरी आहे. भोरगिरीला जाण्यासाठी राजगुरूनगर वरून एस.टी. बसेसची सोय आहे.
राजगुरूनगर-भोरगिरी हे साधारण अंतराला दीड एक तास लागतो. या भिमानदीच्या खोर्यायत चास-कमानचे धरण आहे. या धरणा जवळूनच भोरगिरीचा मार्ग जातो. या खोर्यारत आपण जसे जसे आत जातो तसा तसा निसर्ग बदलत जातो. पावसाळ्यानंतरच्या कालावधीत खळाळणारे ओढे आणि धबधबे म्हणजे नेत्रसुखाला पर्वणीच असते.
भोरगिरी गावात पायउतार झाल्यावर प्रथम परतीच्या बसची चौकशी करून घ्यावी. भोरगिरी किल्ला समुद्र सपाटीपासून ६८६ मी. उंच असला तरी पायथ्यापासून जेमतेम दिडशे मी. उंच आहे. गावातून अर्ध्या तासात आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचतो. डोंगर डावीकडे ठेवून वळता मारूत गडाची वाट जाते. या वाटेने गडावर जाता येते. गडावर गडपणाचे अवशेष तुरळक आहेत. गडाच्या दक्षिण अंगाला लेणी कोरलेली आहेत. गडाच्या माथ्यावर पाण्याची टाकी आहेत. मात्र येथून खाली असलेल्या कोरीव गुहाकडे उतरण्यास वाट नाही. माथ्यावरून थोडे खाली उतरून आडवे चालत आल्यावर या कोरीव गुहापाशी पोहोचता येते. गडाचा आकार लहान असल्याने गडफेरीला तासाभराचा अवधी पुरेसा आहे.
आल्यावाटेने उतरून भोरगिरी गावाजवळ असलेले भिमेचे पात्र गाठावे. या काठावर कोटीश्वराचे मंदिर आहे. मंदिर प्राचीन असल्याचे तेथील अवशेषांवरून दिसते. हा परिसर अतिशय रम्य आहे. येथून राजगुरूनगरला परतता येईल. अथवा दोन तास चालत गेल्यास भिमाशंकरचे मंदिरही पहाता येईल. भिमाशंकर वरूनही घोडेगाव मंचर मार्गे पुन्हा राजगुरूनगरला येता येते.
11

सिंदोळा किल्ला


पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुका किल्ले आणि लेणींसाठी समृध्द आहे. पुण्याच्या उत्तरेकडे असणार्यात जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी, चावंड हडसर, निमगिरी, नारायणग, जिवधन आणि सिंदोळा हे किल्ले आहेत.
सिंदोळा किल्ला जुन्नरच्या वायव्येला आहे. मढनेर म्हणून ओळखला जाणाऱ्या खोप्यात असलेला सिंदोळा किल्ला माळशेज घाटाच्या माथ्यावर आहे. अहमदनगर-कल्याण हा गाडीमार्ग माळशेज घाटामधून जातो. या गाडीमार्गावर मढ गावाच्या पश्चिमेला ४ कि.मी. अंतरावर खुबी फाटा आहे. या खुबी फाट्यावर जुन्नर कडूनही येता येते. खुबी फाट्यावर उतरुन येथून उत्तरेकडील हरिश्चंद्रगडाकडे जाणारी वाट आहे.
खुबी फाट्याच्या नैऋत्येला सिंदोळा किल्ला उढावलेला दिसतो. सिंदोळा किल्ल्याच्या माथ्यापासून पुर्वेकडे एक डोंगर धार गेलेली आहे. या डोंगर धारे मधे एक खिंड दिसते. या खिंडीमधून गडावर जाणारा मार्ग आहे. अर्ध्या पाऊण तासात आपण या खिंडीमधे पोहोचतो. खिंडीतून पुढे न जाता डावीकडे डोंगरदांडावर चढणारी वाट पकडून डोंगर दांडावर यावे लागते. या दांडावर आल्यावर डावीकडे खोप्याच्या पलिकडे निमगिरीचा किल्ला दिसतो. समोर सिंदोळ्यामागे उधळ्या पर्वत दिसतो तर उत्तरेकडे टोलारखिंड आणि हरिश्चंद्रगड पसरलेला दिसतो. समोरच्या सिंदोळ्या दिशेने चढाई केल्यावर आपण माथ्याच्या खाली येवून पोहोचतो. आता माथ्याच्या वरुन आलेली मोठी घळही दिसते. ही घळ उजवीकडे ठेवून तसेच आडवे चालत गेल्यावर आपण सिंदोळ्याच्या पश्चिम अंगाला येतो. पश्चिमेकडील घळीमधूनच गडावर जाणारा मार्ग आहे. वाटेमधे तुटलेल्या पायर्याम लागतात. या पायर्यां च्या मार्गाने चढताना उधळ्या डोंगर आपल्या पाठीमागे रहातो. दरवाजाचे नाममात्र अवशेष आणि तटबंदीचे थोडेसे अवशेष आपल्याला दिसतात.
गडाच्या माथ्यावर पाण्याची काही टाकी आहेत. पाणी बारामहीने टिकत नाही. एक उघड्यावरचे मंदिर आहे. एका खडकातील खड्यामधे अनेक त्रिशुळ उभे केलेले दिसतात. गडाच्या माथ्यावरुन हडसर, चावंड, शिवनेरी तसेच माळशेज घाटाखालील प्रदेश न्याहाळता येतो. गडफेरी करण्यास अर्धातास पुरतो. पुन्हा आल्यावाटेने खाली उतरावे लागते. कड्यात कोरलेल्या गणेशाला नमन करुन आपण परतीच्या वाटेवर निघतो. सिंदोळा किल्ल्याचा परिसर निसर्ग सौंदर्याने संपन्न आहे. मात्र हे सौंदर्य पावसाळ्यानंतर शतपटीने वाढते. सिंदोळ्याची भ्रमंती म्हणजे एक दुर्लक्षीत किल्ला पाहिल्याचे समाधान देउन जाते हे निश्चित.
12

चावंड उर्फ प्रसन्नगड


जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी. यांपैकी चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या प्रवासावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे.
जुन्नर तालुक्यामधून कुकडीनदी वाहते म्हणून याला पूर्वी कुकडनेर असेही नाव होते. या कुकडीनदीच्या उगमाजवळ चावंडचा किल्ला आहे. यालाच चावंडगड उर्फ प्रसन्नगड असेही नाव आहे. या किल्ल्याचा उल्लेख जुंड म्हणूनही आलेला आहे.
माहिती
चामुंडा अपभ्रंशे चावंड। जयावरी सप्तकुंड॥
गिरी ते खोदूनी अश्मखंड। प्रसन्नगडा मार्ग निर्मिला॥
इतिहास
१) सन १४८५ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणाऱ्या मलिक अहमदला पुणे प्रांतातले जे किल्ले मिळाले त्यामधे चावंडचे नाव आहे. बहमनी साम्राज्याचे जे तुकडे झाले त्यात त्याला उत्तर कोकण व पुणे प्रांत मिळाले.
२) दुसरा बुर्‍हाण निजामशाह (इ.स. १५९०-१५९४) हा सातवा निजाम. याचा नातु बहादुरशाह १५९४ साली चावंडला कैदेत होता.
३) १६३६ मध्ये निजामशाहीचा आदिलशाह आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी जो तह केला, त्यानुसार चावंड मोगलांना मिळाला.
४) मे १६७२ पर्णाल पर्वत ग्रहणाख्यानात कवी जयराम पिंडे म्हणतो की त्याचप्रमाणे चामुंडगड, हरिश्चंद्रगड, महिषगड आणि अडसरगड हे किल्ले महाराजांच्या मावळ्यांनी जिकिरीने लढून घेतले. महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड असे ठेवले.
५) या गडाची अनेक नावे अशाप्रकारे आहेत. चामुंड, चाऊंड, चावंड- ही नावे चामुंडा या शब्दाचा अपभ्रंश आहेत. चुंड- हे निजामशाही आमदानीतील नाव आहे. प्रसन्नगड-हे शिवाजी महाराजांनी ठेवलेले नाव. मलिक अहमदने शिवनेरी जिंकल्यावर आपल्या एका सरदाराच्या हाती हा किल्ला दिला. या किल्ल्यातही भरपूर लुट त्याच्या हाती आली. जोंड किल्ल्याचीही व्यवस्था आपल्या एका सरदाराच्या हाती सोपवून त्याने लोहगडाकडे आपला मोर्चा वळवला. संदर्भ – अहमदनगरची निजामशाही मलिक अहमदच्या अधिकारापुढे नमूद केलेल्या किल्ल्यांच्या अधिकाऱ्यांनी मान झुकवली नव्हती. त्यांचा पाडाव करण्यासाठी त्याने कूच केले. ते किल्ले म्हणजे- चावंड, लोहगड, तुंग, कोआरी, तिकोणा, कोंढाणा, पुरंदर, भोरप, जीवधन, मुरंजन, महोली आणि पाली. हे सर्व किल्ले त्याने बळाचा वापर करून आपल्या ताब्यात घेतले. संदर्भ – गुलशने इब्राहिमी आदिलशाहच्या सैन्याशी लढताना इब्राहीम निजामशाहच्या मस्तकात गोळी लागून तो ठार झाला. निजामशाही वकील मिया मंजू याने अहमद नावाच्या मुलाला दौलताबादच्या कैदेतून सोडवून गादीवर बसवले. त्याचवेळी त्यांने इब्राहीमच्या अल्पवयीन मुलाची म्हणजे बहादूरशाहची चावंडला बंदिवासासाठी रवानगी केली. चांदबीबी ही बहादूरशाहची आत्या. मिया मंजूने बहादूरशाहवर असलेले चांदबीबीचे पालकत्व हिरावून घेतले. पुढे निजामशाही गादीवर तोतया आहे हे सिद्ध झाले. निजामशाही सरदार इख्लासखान याने चावंड किल्ल्याच्या सुभेदाराला राजपुत्र बहादूर याला आपल्या हवाली करण्यास हुकुम पाठवला. या हुकुमाचे पालन मिया मंजू याच्या लेखी आज्ञेशिवाय होणार नाही असे सुभेदाराने कळवले. इख्लासखानाने तोतया बहादूरशहा निर्माण केला. मिया मंजूने अकबराचा राजपुत्र मुराद यास मदतीस बोलावले. मुराद अहमदनगरच्या किल्ल्यावर चालून आला. आता मिया मंजूला पश्चात्ताप झाला. त्याने अहमदनगरच्या संरक्षणासाठी सरदार अन्सारखान व राज्यप्रतिनिधी म्हणून चांदबीबीला नेमले. मिया मंजू आदिलशाह व कुतुबशहा यांना मदतीस बोलावण्यास अहमदनगरच्या बाहेर पडला. चांदबीबीने याचा फायदा उठवीत त्याचा हस्तक अन्सारखान याचा खून करवला. आणि चावंडच्या अटकेतून बहादूरशाहची मुक्तता करत त्याची सुलतान म्हणून ग्वाही दिली.
१) जे किल्ले ऋषी नावांशी संबंधित आहेत ते अतिप्राचीन.
२) जे किल्ले बौद्ध, जैन लेण्यांनी अलंकृत आहेत ते प्राचीन.
३) जे किल्ले शैव, शाक्त, नाथ सांप्रदायाशी निगडित आहेत ते म्हणजे मध्यमयुगीन.
४) चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने व त्यावर पाणयाची सात टाकी एकाच ठिकाणी असल्याने तो सप्त मातृकांशी संबंधित आहे. म्हणून तो शाक्त पंथाशी निगडित आहे. चावंड निजामशाहीत जाण्याअगोदर तेथील किल्लेदार महादेवकोळी जमातीतला असावा असे तेथील स्थानिक महादेवकोळी वस्तीवरून प्रतीत होते. येथील अवशेषांना पाहता आणि राजमार्ग अभ्यासता चावंड सातवाहनकालीन असल्याची चिन्हे दिसतात. निजामशाही वारसदाराला येथे ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला गेला. यावरून त्याची दुर्गमता दिसून येते. त्याचा इतिहास बखरींच्या पानांत नसला तरी मौलिक लोकसाहित्यात नक्की सापडेल.
५) चामुंडा हे देवीचे क्रूर रूप. या रुपात सर्व काही भयानक, अमंगल. ही देवी बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान येथील आहे. हाडकुळी, जीभ बाहेर, उभे केस, मुंडांच्या माळा, हाडांचे दागिने, व्याघ्रचर्म नेसलेली. स्मशानात पिंपळाखाली हिचे वास्तव्य. हिचे वाहन गाढव, प्रेत, घुबड, गिधाड. ध्वजावर अग्रीपुराणाप्रमाणे चार हात. शक्ती, मुंड, शूळ ही हिची आयुधे.
६) सप्त मातृका म्हणजे- ब्राम्ही, महेश्र्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इन्द्राणि आणि चामुंडा. या सर्वांमध्ये चामुंडा श्रेष्ठ. संदर्भ – देवी भागवत
गडावरील ठिकाणे
दरवाजातून आत जाताच दहा पायऱ्या चढून गेल्यावर दोन वाटा लागतात. वरची उजवीकडची वाट उद्ध्वस्त अवशेषांकडे घेऊन जाते, तर डावीकडे तटबंदीच्या बाजूने जाणारी वाट आहे. उजव्या बाजूस कातळात कोरलेल्या १५-२० पायऱ्या चढून गेल्यावर काही वास्तू नजरेत येतात. एका वास्तूचा चौथरा अजून व्यवस्थित आहे. इथे आपल्याला अशा बऱ्याच वास्तू दिसतात म्हणून असा निष्कर्ष काढता येईल की इथेच सारा कारभार चालत असावा. जवळ जवळ १५ ते २० वास्तू इथे आहेत. जेथे चौथरा शिल्लक आहे तेथेच मोठे गोल उखळ आहे. मात्र त्यास खालच्या बाजूला एक छिद्र आहे. बाजूलाच २ संलग्र अशी टाकी आहेत येथून उत्तरेस थोडे पुढे गेलो की एक खचत चाललेली वास्तू नजरेस पडते. हिच्या बांधकामावरून असे प्रतीत होते की हे एक मंदिर असावे. पण बरीच खचल्यामुळे जास्त काही अंदाज बांधता येत नाही. येथून आजूलाबाजूला साधारण ३०० मी. च्या परिसरात १०-१५ उद्ध्वस्त बांधकामे तशीच ७-८ टाकी आढळून येतात. गडाच्या वायव्य भागात आपल्याला एकमेकांना लागून अशी सात टाकी आहेत. ही टाकी सप्त मातृकांशी निगडित आहेत. गडाच्या याच भागात बऱ्यापैकी तटबंदी असून आग्रेय भाग कडांनी व्यापला आहे. यावरून कळून येतं की गड किती दुर्गम आहे. म्हणूनच बहादूरशाह निजामाला येथे ठेवण्यात आले होते. ज्या भागात तटबंदी आहे त्या भागात या तटबंदीच्या बाजूने फिरण्यास जागा आहे. ही बहुदा गस्त घालण्यासाठी असावी. या ठिकाणी बराच उतार असून काही ठिकाणी हौद आहेत. थोडे पुढे उजवीकडे गेल्यावर एका मंदिराचे अवशेष आढळतात. येथेही बरेच शिल्पकाम आढळते. ज्या ठिकाणी तटबंदी ढासळलेली आहे, तिथे चिर्‍याचे दगड गाडग्यासारखे रचून ठेवले आहेत. हे कोणाचे काम असावे हे कळत नाही. ईशान्य भागात ज्या ठिकाणी तटबंदी संपते त्या ठिकाणी कातळकोरीव गुहा आहेत. या पहारेकर्‍यांच्या चौक्या असाव्यात. एक गुहा अगदी सुस्थितीत आहे. गुहेत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला हौदसदृश साधारण ५ फूट खोलीचे बांधकाम आढळते. या गुहेलगत असलेल्या तटबंदीच्या खाली भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार आहे असे ग्रामस्त सांगतात. येथे रॅपलिंग करून जाता येते.यापुढे आपण गडाच्या पूर्वेस येतो. या भागात कोणतेही अवशेष नाहीत. बेलाग कडांनी हा भाग व्यापला असल्यामुळे इथे तटबंदी नाही. हा भाग बराच विस्तीर्ण असूनही निर्जन आणि ओसाड आहे. जवळ जवळ अर्ध्या कि.मी.च्या परिसरात एकही बांधकाम आढळत नाही. गडाच्या दक्षिण बाजूला आणि नैऋत्येस आपल्याला तुरळक अशी तटबंदी आढळते. इथेच पाण्याची दोन टाकी आहेत. इथून पुन्हा पश्चिमेकडे निघाल्यावर आपल्याला मजबूत अशा तटबंदीचे दर्शन घडते. दोन बुरूजही आढळतात. इथून आपण टेकडी कडे निघतो, मंदिर पाहायला.गडाच्या सर्वात उंच भागात चामुंडा देवीचे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती प्राचीन असून बांधकाम मात्र नवीन आहे. आजुबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात. एक तुटलेली मूर्ती आढळते जी एखाा ऋषीचे प्रतीक असावी. तसेच एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या चामुंडा देवीच्या मंदिरासमोर आढळणारा नंदी. जुन्या अवशेषांमध्येही नंदीची मूर्ती आढळते. याचा अर्थ हा होतो की जवळच कुठेतरी शिवलिंग असावे आणि काळाच्या ओघात हरवले असावे. ग्रामस्थांनी श्रमदानाने जसे नवीन देऊळ बांधले तशी शेजारी असलेली दीपमाळही बांधण्याचा प्रयत्न केला आहे. ही दीपमाळ असे सुचवते की इथे एक शिवमंदिर असावे.एकंदरीत पाहता, गडाचा घेरा विस्तीर्ण आहे. साधारण ५-६ कि.मी.चा व्यास असावा. गडाच्या ईशान्येस असणाऱ्या गुहांचा अभ्यास होणे महत्त्वाचे आहे. या वास्तूंविषयी बऱ्याच दंतकथा ऐकण्यात आहेत. गडावर सातवाहन संस्कृतीचा प्रभाव आहे. सातवाहनांचा इतिहास फार भव्य आहे, पण त्यांच्या किल्ल्यांचे अजून संशोधन झाले तरच या भव्य इतिहासावर जास्त प्रकाश पडेल. या किल्ल्यांचा इंग्रजांनी पूर्ण नायनाट करण्याचा प्रयत्न केला, पण ते सफल झाले नाहीत. आज हेच किल्ले आपल्याला आवाहन करीत आहेत, त्यांना भेट ायला, तर का आपण जाऊ नये? इथल्या स्थानिक महादेवकोळ्यांकडून जसे आपण दंतकथा ऐकतो, तसे इतिहासही जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. गडावर जाण्याच्या वाटा : गडमाथा गाठण्यासाठी गडाच्या पश्चिमेकडूनच वाट आहे. चावंड वाडीतील आश्रमशाळेपासून गड चढण्यास चांगली मळलेली पायवाट आहे. या वाटेने साधारण अर्धातास चढल्यानंतर आपण खडकात खोदलेल्या पायऱ्यांच्या समांतर रेषेत चालतो. ( प्रचलित दंतकथेनुसार ते गडावर पोहोचवणारे गुप्त भुयार असावे.) साधारण १५ पायऱ्या चढून गेल्यावर आपणास एक मन खिन्न करणारी गोष्ट जाणवते. पूर्वी कोणा अनामिकाने या पायऱ्या चढण्यासाठी आधार म्हणून एका छोटा तोफेची नळी जमिनीत पुरली आहे. साधारण २ इंच अंतर्गत व्यास असलेली ही तोफ २ ते २ १/२ फूट लांबीची आहे.जमिनीच्या वर असलेला हा भाग साधारण दोन तृतियांश आहे. या तोफेची लांबी साधारण ३ ते ३ १/४ फूट असावी. या तोफेला जंबुरका म्हणतात.या पायऱ्या अगदीच छोटा आहेत. इंग्रजांनी १ मे १८१८ रोजी चावंडवर हल्ला करून येथील पायऱ्या उद्ध्वस्त करून टाकण्याचा प्रयत्न केला. तशा सुरुंग लावल्याच्या खुणाही आपल्याला पायऱ्या चढताना दिसतात. यानंतर २०-२५ पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला प्रवेशद्वाराची तटबंदी पूर्णपणे सामोरी येते. येथे ३ मी. लांबीच्या प्रशस्त पायऱ्या आहेत, ज्यावर आज रानगवत माजलेले आहे. वर चढून गेल्यावर प्रथमदर्शनी नजरेस पडते ती कातळकोरीव गणेशप्रतिमा, आणि नैऋत्यमुखी प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारावरही एक गणपती कोरलेला आहे. यावरून असे कळते की पेशवे काळातही या गडावर बराच राबता असावा. दरवाजाची उजवी बाजू एक अखंड कातळ आहे. उजवा स्तंभही याच कातळातून कोरलेला आहे. गडावरची हीच वास्तू अबाधित राहिली आहे. दरवाजाजवळच एक उखळ पडले आहे.
गडावर जाण्याच्या वाटा
चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या प्रवासावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे. गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. नाणेघाटापासून जुन्नरच्या दिशेने १५ कि.मी. च्या आसपास चावंड वसलेला आहे. चावंड गावात आणि आजुबाजूच्या गावांमध्ये महादेवकोळ्यांची वस्ती आहे.
राहण्याची सोय: गडावरील कोठारांमध्ये १५ ते २० जण राहू शकतात, तर चामुंडा मातेच्या मंदिरात २ जण. चावंडवाडीत रहाण्याची उत्तम सोय होते.
जेवणाची सोय: गडावर जेवणाची सोय नाही. मात्र चावंड गावात जेवणाची सोय होऊ शकते.
पाण्याची सोय: गडावर अनेक टाकी आहेत ज्यामध्ये बारामही पिण्याचे पाणी आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ: १ तास चावंड गावापासून.
13

निमगिरी किल्ला


किल्ल्याची ऊंची: २९००
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: नाणेघाट
जिल्हा: पुणे
श्रेणी: मध्यम
सह्याद्रीची बालाघाट रांग ही पश्चिम पूर्व पसरलेली आहे. ती नाशिक, नगर आणि पूणे या जिल्ह्यांना छेदत पुढे जाते. या रांगेत अनेक दुर्गपुष्प आहेत, अनेक घाट वाटा आहेत. माळशेज, दर्‍याघाट, नाणेघाट, साकुर्डीघाट असे अनेक घाट आहेत तर हरिश्चंद्रगड, कुंजरगड, पाबर, कलाड, निमगिरी, हडसर आणि भैरव सारखे किल्ले आहेत. यातील हरिश्चंद्रगड एकच उजवा बाकी सर्व डावेच असे म्हणावे लागेल. हरिश्चंद्रगडाच्या एकदम समोर निमगिरी किल्ला आहे.
पहाण्याची ठिकाणे:
किल्ल्याच्या पायर्‍या प्रथम उजवीकडच्या डोंगरावर घेऊन जातात. दरवाजाच्याच बाजूला पहारेकर्‍यांच्या खोल्या आहेत. गडमाथ्यावर ४ ते ५ पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. यापैकी काही टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. ही टाकी पाहून किल्ल्याचा फेरफटका मारायला निघायचे. थोडे चालून गेल्यावर उत्तर टोकाला काही गुहा आहेत. आतमध्ये एक खोली आहे. यात ५ त ६ जणांना मुक्काम करता येतो. हे पाहून गडाची सर्वात वरची टेकडी चढायला लागायचे. वाटेत पुन्हा खराब पाण्याची दोन टाकी लागतात. समोरच एक महादेवाचे मंदिर आहे. यात शिवाच्या डोक्यावर सोंड उगारलेल्या हत्तीचे शिल्प आहे. सर्वात वरच्या भागात काही घरांचे व वाड्र्‍यांचे अवशेष आहेत. येथून हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला आणि टोलारखिंड दिसते. समोर चावंडचा किल्लाही दिसतो. किल्ल्याच्या समोरच्या डोंगरावर २ पाण्याच्या टाक्र्‍यांशिवाय आणि गाडल्या गेलेल्या दरवाज्याशिवाय काहीच नाही. संपूर्ण किल्ला एक तासात फिरून होतो..
पोहोचण्याच्या वाटा:
निमगिरीला जायचे असल्यास कल्याण – मुरबाड मार्गे नगर; आळेफाटा किंवा जुन्नर अशी कुठलीही एसटी पकडावी. पुण्याहून येणार्‍यांना जुन्नरशिवाय पर्याय नाही. माळशेज घाट पार केल्यावर दोन किमी वर खुबी फाटा आहे. त्याच्या पुढे ४ किमी वर वेळखिंड लागते. वेळखिंड संपली की पारगाव नावाचे गाव आहे. या पारगाव वरुन एक रस्ता उजवीकडे जातो. तो बोरवाडी – मढ मार्गे खांडेपाड्यार्पंत जातो. हाच रस्ता पुढे हडसरला पण जातो. पारगाव पासून खांडेपाडा ७ किमी वर आहे. हेच किल्ल्याच्या पायथ्याचे गाव रस्ता खूपच खराब असल्याने इथपर्यंत येण्यास कोणते वाहनही नाही. एसटी ची एक बस बोरवाडीला दुपारी २ वाजता येते. त्यानंतर मात्र कोणतेच वाहन येत नाही.
निमगिरी किल्ल्याचे दोन डोंगर आहेत. आपली चढाई दोन्ही डोंगरांच्या मधून आहे. पाड्याच्या मागील बाजूला बाहेर पडल्यावर वाट एक छोट्याश्या पठारावर जाते. इथे मंदिराचे काही अवशेष दिसतात. त्र्‍यांच्या समोरच एक मोठे पाण्याचे टाकेही दिसते काही शिल्प इथं पडलेली आहेत. याच्याच वरच्या भागात काळूबाईचे मंदिर आहे. मंदिर मुक्कामासाठी एकदम योग्य जागा आहे. मंदिराच्या समोरच्या झाडांमध्ये तीन समाध्याही पडलेल्या दिसतात. हे पाहून खिंडीच्या दिशेने निघायचे अर्धातास चढून गेल्यावर उजवीकडच्या डोंगराच्या कातळात गुहा दिसतात. यालाच घोड्याच्या पागा असेही म्हणतात. इथून पुढे जाणारी वाट कातळात खोदलेल्या पायर्‍र्‍यांची आहे. पण पायर्‍या तुटल्या असल्यामुळे वाट बरीच अडचणीची झाली आहे. या वाटेच्याच खाली एक वाट वळणा वळणाने खिंडीत जाऊन वरच्या पायर्‍यांपाशी जाते. या पायर्‍यांच्या साह्याने १० मिनिटात गडमाथा गाठता येतो.
राहाण्याची सोय: किल्ल्यावर राहण्यास गुहा आहेत. यात ५ ते ६ लोक राहू शकतात.
जेवणाची सोय: जेवणाची सोय स्वत: करावी.
पाण्याची सोय: किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ: खांदेपाड्यापासून गडावर पोहोच्ण्यार १ तास लागतो.
14

नारायणगड

15

नारायणगड हा किल्ला नारायणगाव शहर, जुन्नर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ५०च्या पुर्वेला आणि नारायण गावाच्या उत्तर दिशेला आहे.
या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते असे सांगितले जाते. नारायणगड हा एक ऐतिहासिक गड आहे, गडावर जिवंत पाण्याच्या टाक्या आहेत. हा किल्ला टेहळनीचा गड म्हणून प्रसिद्ध होता. या गडावर दसरा व नागपंचमी सणानिमित्त गावकरी मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरे करतात.

जुन्नर किल्ला / गढी


छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला जुन्नर किल्ला गढी स्वरूपाचा असून शिवकालीन व्यापारपेठ आणि मूळ शहर यांना संरक्षण देण्यासाठी बनवण्यात आला होता. जुन्नर शहरात एसटी स्थानका समोरच जुन्नर किल्ला असून देखील फारसा प्रचलित नाही.
सरकारी कचेऱ्या, न्यायालय, व्यापारी दुकाने यांच्या अतिक्रमणात किल्ल्याचे वास्तव्य दडून गेले आहे. किल्ल्याचा परिसर मोठा असून बहुंतांश भाग पडलेला आहे पण बुरुज चांगल्या स्थितीत आहेत.
शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी जाणार्या दुर्ग प्रेमींनी या किल्ल्याला अवश्य भेट द्यावी.
16

जीवधन किल्ला


३७५४ फुट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
पुणे जिल्ह्यातील नाणेघाट डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने कठीण समजला जातो.
घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ‘जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. जीवधन किल्ला नाणेघाटापासून अगदी सादेच्या अंतरावर आहे.
इतिहास:
शिवजन्माच्या वेळी निजामशाही अस्ताला जात होती. पण याची साक्ष देणारा एकमेव किल्ला म्हणजे जीवधन होय. १७ जून १६६३ रोजी निजामशाही बुडाली. शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज ‘मूर्तिजा निजाम’ याला जीवधन या गडावर कैदेत असताना त्याला सोडवून संगनेरजवळ असणाऱ्या पेमगिरी किल्ल्यावर घेऊन गेले. त्याला निजामशहा म्हणून घोषित केले आणि स्वतः वजीर बनले. घाटघर हे जीवधनच्या पायथ्याचे गाव. येथील जमिनीचे वैशिष्ट्य म्हणजे बांबूची बने. सारे जंगले हे बांबूच्या बनांचे आहे. गोरक्षगडाप्रमाणे या गडांचा दरवाजादेखील कातळकड्यामध्ये कोरलेला आहे.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे: पश्चिम दरवाज्याने वर गडावर पोहोचल्यावर समोरच गजलक्ष्मीचं शिल्प आहे. गावकरी याला ‘कोठी’ असे संबोधितात. जवळच पाण्याची टाके आहेत. दक्षिणेस जीवाईदेवीचे पडझड झालेले मंदिर आहे. तसेच गडावर अंतर्भागात एकात एक अशी पाच धान्यकोठारं आहेत. आत कमलपुष्पे कोरलेली आहेत. शेवटच्या इंग्रज-मराठे युद्धात १८१८ मध्ये या कोठारांना आग लागली होती. ती राख आजही या कोठड्यांमध्ये आढळते. गडाच्या एका टोकाला गेल्यावर समोरच दोन हजार फूटांचा वांदरलिंगी सुळका लक्ष वेधून घेतो. गडाचा आकार आयताकृती आहे. वांदरलिंगीच्या कड्यापासून कोकणचे निसर्गरम्य दर्शन होते. समोरच नानाचा अंगठा, हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड, कुकडेश्वराचे मंदिर, धसईचे छोटेसे धरण, माळशेज घाटातील काळे तुकतुकीत रस्ते न्याहाळता येतात. अशाप्रकारे हा जीवधन किल्ला चार ते पाच तासांत पाहून होतो.
गडावर जाण्याच्या वाटा:
१) कल्याण–नगर मार्गात नाणेघाट चढून गेल्यावर पठार लागते. या पठारावरून उजवीकडे जंगलात एक वाट जाते. या वाटेने दोन ओढे लागतात. हे ओढे पार केल्यावर एक कातळभिंत लागते. या भिंतीला चिकटून उजवीकडे जाणारी वाट वांदरलिंगी सुळक्यापाशी घेऊन जाते. तर डावीकडे जाणारी वाट एका किंडीपाशी पोहोचते. जीव मुठीत धरून त्या उभ्या कातळभिंती पार केल्यावर पुन्हा कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. सन १८१८ नंतर सुरुंग लावून इंग्रजांनी हा मारग चिणून काढला व पश्चिम दरवाज्याची वाट बुजवून टाकली. या दरवाज्याने वर जाण्यास अनेक वानरयुक्त्या योजाव्या लागतात. वाट जरा अवघडच असल्याने जपूनच जावे.
२) जुन्नर–घाटघर मार्गे गडावर जाणारी दुसरी वाट राजदरवाज्याची आहे. ही वाट घाटघरहून सरळ गडावर जाते. वाट अत्यंत सोपी आहे.
गडावर रहाण्याची सोय नाही.
येथे जेवणाची सोय आपण स्वतःच करावी.
गडावर बारमाही पाण्याची टाकी आहेत.
गडावर जाण्यासाठी २ तास लागतात.
17

ढाकोबा किल्ला


किल्ल्याची उंची: ३९०० फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
चढाई श्रेणी: मध्यम
डोंगररांग: भीमाशंकर
जिल्हा: पुणे
पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर डोंगररांगेतील ढाकोबा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.
जुन्नर परिसरातील घाटाच्या अगदी कडेवर मीना मावळ आंणि कुकड मावळातील अणे-माळशेज डोंगररांगेतील हा सर्वोच्च जुळा किल्ला. दुर्ग आणि ढाकोबा या जुळ्या किल्ल्यांच्या उभारणीमागे घाटवाटांवर लक्ष ठेवणे हा उद्देश असे.
जुन्नर आपटाळे रस्त्यावर एक उच्छल नावाचे लहानसे खेडे आहे. १९३४ ते १९४४ या स्वातंत्र्यपूर्व काळात या गावात कोंडाजी नवले नावाचा भारतीय रॉबिनहूड राहत असे. तो आणि त्याचे साथीदार अन्यायी श्रीमंत जमीनदारांना लुटून त्यांची संपती गरीब जनतेत वितरित करत असत. त्याची तक्रार जमीनदारांनी ब्रिटिश राजवटीकडे केली होती. पण सामान्य जनतेच्या पाठिंब्यामुळे तो पकडला गेला नाही. आजही स्थानिक जनतेत त्याची स्तुतिपर कवने गायली जातात. ढाकोबाच्या वाटेवर या गावातील त्याच्या घरीदेखील भेट देता येते.
नाणेघाट आणि जीवधनच्या दक्षिणेकडे एक उत्तुंग पर्वत रांग दिसून येते. त्यामध्येच एक डोंगर म्हणजे ‘ढाकोबा’ किल्ल्याची एक बाजू म्हणजे सरळसोट सुटलेला कडा. तो सरळ खाली कोकणातच उतरतो. याच ढाकोबाच्या सरळ रेषेत असणारा दुसरा किल्ला म्हणजे ‘दुर्ग’ दुर्गमता आणि विरळवस्ती हे या भागाचे वैशिष्ट्य. येथे ग्रामस्थांची आपल्या प्राथमिक गरजा भागवतांनाच मारामार होते तर वीज-शिक्षण तर दूरच येथील मुख्य व्यवसाय शेती काही ठिकाणी दुधाचा व्यवसाय पण केला जातो.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
या गडावर गड किल्ला असण्याचे कोणतेही अवशेष नाहीत मात्र टेहळणीसाठी यांचा उपयोग केला जात असावा. ढाकोबा किल्ल्यावरून नाणेघाट जीवधनची मागची बाजू, दाऱ्याघाट असे कोकणचे विहंगम दृश्य दिसते.
दुर्ग: दुर्गादेवीच्या मंदिरापासून किल्ल्यावर पोहचण्यास २० मिनिटे लागतात. येथून गोरखगड, सिद्धगड आणि मच्छिंद्रगड असा सर्व परिसर दिसतो.
गडावर जाण्याच्या वाटा
जुन्नर – आपटाळे- आंबोली मार्गे येणाऱ्या वाटेने प्रथम ढाकोबा आणि नंतर दुर्ग करता येतो. भीमाशंकर-अहुपे मार्गे येणाऱ्या वाटेने प्रथम दुर्ग आणि नंतर ढाकोबा करता येतो.
१) जुन्नर–आपटाळे आंबोली मार्गे
जुन्नर वरून आंबोली गावात येण्यासाठी थेट बस आहे हे अंतर साधारण दीड तासाचे आहे. आंबोली गावातूनच ढाकोबाचे दर्शन होते. गावातून एक वाट सरळ समोरच्या पठारावर जाते. वर जातांना वाटेत तीन गुहा लागतात. गावापासून पठारावर येण्यास दीड तास पुरतो या वाटेतूनच एक वाट मध्ये उजवीकडे दुभागते ती दाऱ्याघाटा कडे जाते. एकदा पठारावर पोहचल्यावर अनेक ढोरवाटा लागतात. पण त्यामध्ये ठळक मात्र दोनच वाटा आहेत त्यातील दोनच वाटा आहेत. त्यातील एक वाट डावीकडे जाते तर दुसरीवाटा उजवीकडे थेट धाकोबाच्या पायथ्यालगत पुढे जाते आणि पुन्हा ५ मिनिटांनी डावीकडे डोंगरधारेवरून खाली उतरते हीच वाट पुढे दुर्गकडे जाते. ही वाट ज्या ठिकाणाहून खाली वळते तेथूनच एक वाट सरळ डोंगरावर म्हणजेच धाकोबावर जाते. येथून गडमाथा गाठण्यास अर्धा तास पुरतो.
२) भीमाशंकर–अहुपे मार्गे वर सांगितलेल्या दुर्गकडे जाणाऱ्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर एक वाट डावीकडे जंगलात वळते. ती धाकोबाच्या मंदिराकडे जाते तर सरळ जाणारी वाट पुढे अर्ध्या तासात एका ओढ्यापाशी येऊन थांबते. या ओढ्याला बारामही पाणी असते. याच वाटेने पुढे हातवीज च्या मार्गे निघायचे. थोडे फार चढ‍उतार आहेत वाटेला अनेक उपवाटा फुटलेल्या आहेत पण आपण ठळक वाट सोडायची न्ही. पुढे एक तासाच्या चालीनंतर दुर्ग किल्ल्याचे दर्शन होते. पुढे एका पठारावर येऊन वाट दुभागते. डावीकडे जाणारी वाट हातवीज आणि दुर्गवाडीकडे जाते तर उजवीकडे जाणारी वाट दुर्गादेवीच्या मंदिरात जाते. येथून दुर्गादेवीच्या मंदिरात जाण्यास अर्धा तास पुरतो. दुर्गादेवीच्या मंदिरापासून किल्ल्यावर जाण्यास ठळक वाट नाही. वाट आपणच आपली शोधून काढायची.
राहण्याची सोय: किल्ल्यावर नाही. धाकोबाच्या पायथ्याशी असणाऱ्या मंदिरात १५ जणांची राहण्याची सोय होते. दुर्गच्या पायथ्याशी असणाऱ्या दुर्गामंदिराच्या मंदिरात ५ जणांची राहण्याची सोय.
जेवणाची सोय: स्वतः करावी.
पाण्याची सोय: ढाकोबा आणि दुर्गादेवीच्या मंदिरात बाजूलाच पिण्याच्या पाण्याची तळी आहेत.
18