रत्नागिरी
जिल्ह्यामधील मुचकुंदी नदीच्या जवळ पूर्णगड किल्ला मोठ्या दिमाखात उभा
आहे.गडाच्या दक्षिणेला मुचकुंदी नदीची खाडी असून पश्चिम बाजूस सागर किनारा
आहे.गड एका लहानश्या टेकडीवर आहे,किल्ल्याच्या पूर्व उतारावर पूर्णगड
नावाचे गाव वसलेले आहे.
|
इतिहास
सदर किल्ला हा छत्रपती शिवरायांच्या कालखंडात बांधला गेला आहे.छत्रपती शिवरायांनी किल्ले बांधणीचे काम येथे थांबवले म्हणून हा पूर्णगड म्हणून ओळखला जातो.काही इतिहासकारांच्या मते किल्ल्याच्या लहान आकारा वरून यास पूर्णगड हे नाव पडले. |
|
किल्ल्यावर
नक्षीकाम केलेला सुंदर असा दरवाजा आहे, दरवाज्यावर गणेश तसेच
चंद्र-सूर्याची शिल्पे आहेत. किल्ल्याच्या दाराजवळ मारुतीचे सुंदर असे
मंदिर आहे.मुख्य प्रवेशद्वाराच्या आत पहारेकऱ्यांच्या देवडय़ा आहेत, येथून
तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. तटबंदीवरुन संपूर्ण गडाची
फेरी मारता येते.
|
|
|
गडावरील
काही तटबंदी ढासळलेली आहे,पण बहुतेक तटबंदी अजूनही भक्कम अशी
आहे.किल्ल्याला पश्चिमेच्या बाजूस एक लहानसा सुंदर असा दिंडी दरवाजा आहे.
|
गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था
गडावर
पाण्याची सोय नाही,गडापासून जवळच्या अंतरावर असलेल्या पावसच्या आश्रमात
जेवणाची तसेच राहण्याची व्यवस्था होऊ सकते.रत्नागिरीपासून पावस ते पूर्णगड
अंतर तीस कि.मी आहे.तर राजापूर पासून पंचेचाळीस कि.मी आहे.
