कोणतही शिवकाव्य येथे शोधा

शिवकालीन महाराष्ट्र सन १६६० भाग १८६


शाहिस्तेखानची मोहिम

सांभार : मराठा साम्राज्यकोश

शाहिस्तेखान औरंगाबाद सोडतो
२८ जानेवारी १६६० ला शाहिस्तेखान औरंगाबादेहून निघाला. त्याच्याकडे भले मोठे मुघल सैन्य दिले होते. शिवाजीने जिंकलेला मुलुख पुन्हा जिंकून घेणे हे त्याचे मुख्य काम होते. शमसखान पठाण, नामदारखान, घियासुद्दीन खान, हसन मुनीम, सुल्तान मिर्जा, कारतलबखान, भावसिंह, किशोरसिंह, शामसिंह, राजसिंह गौड असे इतर अनेक सरदार त्याच्या सैन्यात होते.
सुरजी गायकवाड, दिनकरराव काकडे, रंभाजी पवार, सर्जेराव घाटगे, कमळोजीराव कोकाटे असे मराठा सरदारही त्याच्याबरोबर होते. ह्या सैन्यात आणखी एक असामी होती ती म्हणजे सरदार पण्डिता रायबाघन नावाची एक बाई. तिचे खरे नाव सावित्रीबाई देशमुख असे होते व औरंगजेबने तिला पण्डिता रायबाघन ही पदवी दिली होती. वऱ्हाड प्रांतातील उदाराम देशमुखची ही विधवा होती.
मुघल सैन्यात सत्तर हजार घोडदळ, तीस हजार पायदळ, चारशे हत्ती व असंख्य दारुगोळा होता. ह्या लवाजम्यात मुदपाकखान्याचे सामान वाहून नेण्यासाठी शंभर उंट होते ह्यावरुन ह्या मोहिमेची भव्यता समजू शकते. मुघलांच्या किंवा आदिलशाहीच्याही तुलनेने शिवाजीकडे अगदी छोटा भाग होता तरीही औरंगजेबाने शिवरायांना कमी लेखले नव्हते. त्याने शिवरायांच्या हालचालींवर पायबंद घालण्यासाठीच इतकी मोठी मोहीम खुद्द त्याचा मामा, शाहिस्तेखानच्या हाती दिली होती.
संदर्भग्रंथ
राजा शिवछत्रपती, पृष्ठ ३०३-३२०
Image may contain: 1 person, beard