कोणतही शिवकाव्य येथे शोधा

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १८२


आदिलशाही फौजा पन्हाळगडाजवळ पराभूत
शिवरायांनी पन्हाळगड जिंकला तोवर प्रतापगडावरुन पळालेले आदिलशाही सरदार विजापुरास पोहोचले. आदिलशाहने लगेच रुस्तुमेजमानला शिवरायांना रोखण्यासाठी पाठवले. विजापूर सोडल्यावर रुस्तुमेजमानला पन्हाळा पडल्याचे कळले.
रुस्तुमेजमानबद्दल कळल्यावर शिवाजी राजा पन्हाळ्याहून निघाले व २८ डिसेंबर १६५९ रोजी कोल्हापूरजवळ दोन्ही सैन्य समोरासमोर आली. जेधे शकावली सांगते की शिवरायांना ह्या युद्धात बारा हत्ती व दोन हजार घोडे मिळाले. आदिलशाही सैन्याला पळ काढून विजापुरास जावे लागले. दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दहा हजाराचे सैन्य असावे असे अनुमान आहे.
शिवाजीसाठी आदिलशाहीविरुद्ध खुल्या मैदानात झालेल्या युद्धात हा अत्यंत महत्वाचा विजय होता. ह्या विजयानंतर शिवरायांनी नेताजीला आदिलशाही भागात कर वसूल करायला धाडले व राजे परत पन्हाळगडावर गेले .
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९४९-९६०
Image may contain: one or more people