इतिहास
भरतगड
किल्ल्याचे बांधकाम सावंतवाडीकर फोंड सावंत यांनी इ.स. १६८० मध्ये
केली.वाडीकर फोंड सावंत यांनी किल्ल्यावर पाणी लागल्यानंतर किल्ल्याची
बांधणी केली.पुढे तुळाजी आंग्रे यांनी भरतगड किल्ला जिंकला.पुढे इ.स.१८१८
मध्ये इंग्रजांच्या ताब्यात किल्ला गेला.
|
भरतगडाचे
दार भग्नावस्थेत आहे. तटबंदीची सुद्धा खूप प्रमाणात पडझड झालेली आहे.
गडावर घनदाट वनराई आहे.गडावर मुख्यत: काजू व आंब्याच्या बागा आढळतात.
|
|
|
भरतगडावर
२०० फूट खोल विहीर आहे.या विहीरीच्या तळाशी असलेल्या गुप्त दरवाजातून थेट
सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाता येते. भरतगडाचे वैशिट्य म्हणजे गडावर मंदीर
आणि मशीद शेजारी आहे.गड पाहावयास एक तास पुरेसा आहे.
|
गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था
भरतगडाला
भेट देण्यासाठी गडाजवळचे मसूरे गाव गाठावे लागते.मालवण ते मसूरे अंतर १५
कि.मी. आहे. गडावर राहण्याची तसेच खाण्याची व्यवस्था नाही.पिण्याचे पाणी
सोबत घ्यावे.
