कोणतही शिवकाव्य येथे शोधा
आग्रा भेटीच्या वेळी ताजमहाल बघत असताना शिवाजी महाराज म्हणाले "अलौकिक,
नेत्राचे सार्थक व्हावे अशी सुंदर इमारत आहे" तेव्हा राजांच्या शेजारी उभे
असलेले संभाजी राजे म्हणाले " आबासाहेब आपणही अशी इमारत बांधू ना". त्यावर
शिवाजी महाराज बोलले. " बाळराजे तुम्ही अजून लहान आहात तरी पण लक्षात ठेवा -
गादीवर येणारा प्रत्येक सम्राट आपल भव्य थडग उभारण्यात आपली निम्मी ह्यात
खर्ची घालत असतो. आपल्या मागे आपल नाव रहाव, हीच त्यामागे उत्कट इच्छा
असते. बाळराजे, माणसाने जगात येऊन असा काही कार्य कराव की, त्याला आपल नाव
राहण्यासाठी, थडग बांधण्याची पाळी येऊ नये. जीवन अस जगाव, की उज्वल
कीर्तीचा दरवळ सदैव मागे रहावा". II जय शिवराय II