कोणतही शिवकाव्य येथे शोधा
जाग मराठी मना जाग कविता
जाग मराठी मना जाग
हि साद देतोय छावा !!
लाले लाल माती इथली
लाले लाल इंद्रायणी
कहर झालाय या मातीवर
करतोस तुकाय वावा !!
ओरडून सांगते वढू-तुळापूर
रक्त रंजीत हा पाडवा
स्वराज्याच्या वारसदाराचा
हा अपमान हा पाडवा
कसा गिळू मि या घासातील गोडवा !!
जाग मराठी मना जाग
हि साद देतोय छावा !!
आपशकूनी तो पालथा कलश
हिरमुसली ति आंगनातील तुळस
ओस पडल्या रांगोळी
सुन्न झाले घरदार
स्वराज्याचे मिठ खानारा
निघाला गद्दार
सांग मराठ्यां कुठे हरवलास तुझा मराठी बाणा !!
विचार त्या इंद्रायणला
शौर्य माझ्या शंभू चे
करून साजरा पाडवा
करतोस शंभुराजे चा अपमान गाढवा !!
शिवरायांची शपथ तुला
आठवण कर शंभू बलिदानाची
जाग मराठी मना जाग
हि साद देतोय छावा !!