कोणतही शिवकाव्य येथे शोधा

मराठी फक्त नाव पुरेस आहे

मराठी

मराठी फक्त नाव पुरेस आहे कारण,
मराठी म्हणजे पुण्याची वेस
मराठी म्हणजे कोकण आणि
देस मराठी म्हणजे सह्याद्रीचा
घाट मराठी म्हणजे बारा
मावळातील वाट मराठी म्हणजे
जाड मिश्या अन कल्ले मराठी
म्हणजे गडकोट अन किल्ले
मराठी म्हणजे हिँदुस्थानभर
फिरणारी वादळी वार्याची झुळुक
मराठी म्हणजे अहद तंजावर
तहद पेशावरचा मुलुख मराठी
म्हणजे रायगडाचा माथा मराठी
म्हणजे पानिपताची शौर्य गाथा
मराठी म्हणजे पंढरीची वारी
मराठी म्हणजे मल्हारीची जेजुरी
मराठी म्हणजे तलवारीची धार
मराठी म्हणजे छातीवरचा वार
मराठी म्हणजे खंडोबाचा खंडा
मराठी म्हणजे अटकेपारचा झेंडा
मराठी म्हणजे भवानीचा भंडारा
मराठी म्हणजे दख्खनचा वारा
म्हणुनच मराठी म्हणजे मराठीच
फक्त नावच पुरेस आहे."

"मी मराठी हीच माझी ओळख"

॥ जय माहाराष्ट्र ॥

॥ जय शिवराय ॥