कोणतही शिवकाव्य येथे शोधा

ठासणीची बंदूक, खंजिर, चिलखत, ढाल, तलवार, तोफ, तोफगोळा, दांडपट्टा, पट्टा, भाले, वाघनखे,

प्राचीन काळातील युध्दात विविध शस्त्रांचा वापर झालेला आहे.कित्येक शस्त्रे अत्यंत घातक अशी होती.बहूतेक शस्त्रे ही वेगवेगळ्या धातूचा वापर करून बनविलेली होती.तर काहींचा वापर हा शत्रूच्या वारापासून संरक्षण करण्याकरिता होई.प्रस्तुत सदरात अशाच काही शिवकालीन शस्त्रांची माहिती मी दिलेली आहे.आपल्याजवळ यापेक्षा आणखी माहिती असेल तर ती मला आपण पाठवू शकता.


ठासणीची बंदूक:-                                                         शत्रूवर दुरून निशाना साधण्याकरिता ठासणीच्या बंदुकाचा वापर होई.याची रचना अत्यंत वैशिट्यपूर्ण असे.बंदूकावर वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम केलेले आढळून येते.
banduk








खंजिर:-                                 
khanjir
 खंजिर हे छोटेसे पण घातक हत्यार म्हणून इतिहासकालापासून प्रसिध्द आहे.आकारमानाने लहान असल्यामुळे,बेसावध शत्रूवर हल्ला करण्यासाठी याचा वापर केला जाई.खंजिर प्रामुख्याने धातूपासून बनविले जाई,तसेच ते हस्तीदंतापासूनही बनविलेले असत. कित्येक वेळा खंजिराचा वापर भेटवस्तू म्हणून केला जाई ,असे खंजिर मुख्य:त हिरे व रत्नजडित असत.





 कुलूपे:-
lockslocks1
  कुलूपांचा वापर शत्रूपासून,चोरापासून किल्या
चे तसेच घरांचे संरक्षण करण्याकरिता होतो.कुलूपे मुख्य:ता धातूपासून बनविली गेली असल्यामुळे अत्यंत मजबूत असतात.कुलूपे वेगवेगळ्या आकारात आढळतात,प्राचीन काळातील कित्येक कुलूपावर नक्षीकाम आढळून येते.


    चिलखत:-

 चिलखताचा वापर शत्रूच्या वारापासून
संरक्षण करण्याकरिता होई.चिलखत मुख्य:ता धातूपासून बनविले जाई.कित्येक वेळा प्राण्यांच्या कातडीचा चिलखत म्हणून वापर होई.चिलखत हे नेहमी वजनाने हलके परंतू मजबूत असे.
chikhatChilkat










Chilkat4
Chilkat3


ढाल:- ढालीचा वापर प्रामुख्याने शत्रूच्या तलवारीच्या
वारापासून बचाव करण्यासाठी होतो.ढाल प्रामुख्याने वेगवेगळ्या धातूपासून बनविली जाते. त्यामुळे ती टिकाऊ राहते,कित्येक वेळा ढालीचा वापर शस्त्र म्हणून केल्याची इतिहासात नोंद आहे.धातूची ढाल वजनाने जाड असल्यामुळे,प्राण्याच्या कातडीपासून हलकी ढाल बनविली गेली आहे,यात प्रमुख्याने गेंडा, हत्ती व कासवाच्या पाठीपासून केलेल्या ढाली आढळतात.या ढाली मजबूत असल्या तरी तलवारीच्या वारात तुटल्याची इतिहासात उदाहरणे आहेत.नरवीर तानाजीने सिंहगडाच्या लढाईच्या प्रसंगी जेव्हा स्वत: ची ढाल तुटली तेव्हा हाताला कमरेचा शेला गुंडाळून त्यावर शत्रूचे वार झेलले.
Dhal 


 तलवार:-
 प्राचीन काळापासून सर्वाधिक लढाया या तलवारीचा वापर करून खेळल्या गेल्या.वजनाने हलक्या तसेच कमरेच्या म्यानात ठेवणे सोपे असल्यामुळे सर्वच सैनिक याचा वापर करीत,विशषेत घोडेस्वारांना याचा खूप चांगला उपयोग होई.तलवारी या मुख्यत: धातूपासून बनविल्या जातात.तलवारीचे पाते लांब व हलके असल्यामुळे शत्रूवर हल्ला करण्यास सोयीचे जाई.तलवारीचे पाते लांब व हलके असल्यामुळे शत्रूवर हल्ला करण्यास सोयीचे जाई.राजा,सरदार किंवा प्रतिष्ठित लोकांना नजराना म्हणून तलवार देत,या तलवारीची मुठ हिरेजडीत किंवा रत्नजडित,प्रसंगी सोन्याची असे.
talwarTalwar3
 

    तोफ:-
 तोफेचा वापर प्रामुख्याने शत्रूचे आक्रमण थोपवून धरण्याकरिता होई.ज्यांचा तोफखाना अधिक मजबूत त्यांचे गडावर,समुद्रावर राज्य, असे पूर्वीचे सूत्र होते.छत्रपति शिवप्रभूंनी आपले स्वतंत्र तोफदल निर्माण केले होते,तसेच आपल्या राज्यात तोफा निर्मिताचे कारखाने उभे केले होते.परंतू मोठ्या लांब पल्याच्या तोफांसाठी त्यांना इंग्रजांवर अवलंबून राहावे लागे.तोफा प्रामुख्याने किल्याच्या बुरूजावर ठेवल्या जाई,तेथून त्यांचा मारा करून शत्रूचे आक्रमण परतवून लावले जाई.तोफा या मुख्यत: धातूपासून बनविल्या जा
Tof4Khanderi15
TofTof3
         तोफगोळा:-

तोफगोळ्याचा वापर हा तोफेसाठी होई.तोफेच्या तोंडातून तोफगोळा आत सरकवून वरून बत्ती देत.छत्रपति शिवप्रभूंनी तसेच छत्रपति संभाजीराजेनी स्वराज्यात ठिकठिकाणी तोफगोळे बनविण्याचे कारखाने उभे केले होते,जेणेकरून परकियावर तोफगोळ्यासाठी अवलंबून राहता येऊ नये.




bomb 













दस्तान :- दस्तानचा वापर शत्रूच्या वारापासून हाताचे संरक्षण करण्याकरिता होई.दस्तान मुख्य:ता धातूपासून बनविले जाई.कित्येक वेळा ते चामड्यापासून बनविलेले असे.
dastan

दांडपट्टा :- पट्टा ही वजनाने हलकी परंतू घातक अशी तलवार होती.एकापेक्षा जास्त शत्रूंशी झुंजण्यास याचा खुप चांगला वापर होई.पट्टा तलवार ही मुख्यत: धातूपासून बनविली जाई.तलवारीचे पाते लांब व हलके असल्यामुळे शत्रूवर हल्ला करण्यास सोयीचे जाई.याची मुठ मोठी असे जेणेकरून ती हातात पकडून चारी दिशेला फिरविणे सोपे जाई.
dandpatta

दारू ठेवण्याचे भांडे :- ठासणीच्या बंदुकातील दारू ठेवण्याकरिता याचा वापर होई.याची रचना अत्यंत कलात्मक असे.भांड्यावर वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम केलेले आढळून येते.
pot

    पट्टा :-
पट्टा ही वजनाने हलकी परंतू घातक अशी तलवार होती.एकापेक्षा जास्त शत्रूंशी झुंजण्यास याचा खुप चांगला वापर होई.पट्टा तलवार ही मुख्यत: धातूपासून बनविली जाई.तलवारीचे पाते लांब व हलके असल्यामुळे शत्रूवर हल्ला करण्यास सोयीचे जाई.
Patta


   परसू :-
प्राचीन काळापासून मनुष्यप्राणी कुऱ्हाडीचा वापर शिकारीसाठी करत आला आहे,याचा वापर प्रामुख्याने लाकडे तोडण्यासाठी,शिकारीसाठी तसेच शत्रूवर हल्ला करण्यासाठी करत.कुऱ्हाडीचे टोक धातूचे असते,तर पाठीमागील बाजूस लाकडी काठी असते,त्यामुळे भाला वजनाने त्या अत्यंत हलका असल्यामुळे शत्रूवर वार करणे सोयीचे जाई.

parshu


  भाले :- प्राचीन काळापासून मनुष्यप्राणी भाल्याचा वापर शिकारीसाठी करत आला आहे,लढाईमध्ये तर याचे महत्व अधिकच होते.लांब पल्याहून शत्रूवर हल्ला करण्यासाठी याचा वापर करत.भाल्याचे टोक धातूचे असते,तर पाठीमागील बाजूस लाकडी काठी असते,त्यामुळे भाला वजनाने अत्यंत हलका बनल्यामुळे शत्रूवर लांब हून फेकणे सोयीचे जाई.
bhale

वाघनखे:- वाघनखांचा वापर गुप्त हत्यार म्हणून केला जाई,अत्यंत छोटे परंतू घातक असे हे हत्यार आहे.अफजलखानाबरोबर जेव्हा छत्रपति शिवरायांची प्रतापगडाच्या पायथ्याला भेट झाली, त्यावेळी जेव्हा खानाने, छत्रपति शिवरायांना मारण्याचा प्रयत्न केला,तेव्हा वाघनखांचा वापर करून छत्रपति शिवप्रभूंनी, खानांस ठार मारले.
wagh_nakh

अंकूश :- अंकुशाचा वापर प्रामुख्याने हत्तीला आवरण्या करिता होतो.अंकुश मुख्य:ता धातूपासून बनविली जातात.याचा दांडा लाकडी किंवा धातूचा आढळतो,कित्येक अंकुशावर नक्षीकाम आढळून येते.
ankush