कोणतही शिवकाव्य येथे शोधा

शिवकालीन महाराष्ट्र सन १६६० भाग १८८


सिद्दी विजापूरहून कूच करतो
सांभार : मराठा साम्राज्यकोश

सिद्दी जोहरने उत्साहात व धूमधडाक्यात विजापूर सोडले. जंजिरेकर सिद्दींसारखा किंवा निजामशाहीतील मलिक अंबर सारखा हा देखील हबशी होता. त्याला सलाबतखान ही पदवी दिली गेली व आदिलशाही दरबारात त्याचा मोठा सत्कार झाला. त्याच्या सैन्यात घोडदळ व पायदळ मिळून सुमारे पसतीस हजार लोक होते. त्याच्या हाताखाली बरेच नावाजलेले सरदारही होते. आदिलशाहने रुस्तुमेजमान, सादतखान, सिद्दी मसूद, बाजी घोरपडे, मुधोळकर, भाईखान व इतर अनेकांना सिद्दीला सामिल होण्याचा आदेश दिला होता.
सिद्दीने शिवरायांना पकडण्याचा निश्चय केला होता. विजापूरहून तो आधी मिरजेकडे निघाला. तो तिथे पोहोचतो तोवर शिवरायांनी मिरजेचा वेढा उठवून पन्हाळगडाकडे कूच केले होते. सिद्दीने तोच मार्ग घेत पन्हाळगड गाठला. त्याच्या लक्षात आले की पन्हाळगड काही आक्रमण करुन एका दमात जिंकता येणार नाही.
त्याने वेढा घालून गडाचा पुरवठा बंद करायचा विचार केला होता. सिद्दी ज्या दिवशी पायथ्यापाशी पोहोचला त्याच दिवशी गडाभोवती पहारे लावण्यात आले. शिवरायांना जखडण्याची त्याने पूर्ण योजना केला होता.
आदिलशाहने कोकातल्या व मावळ्यातल्या वतनदारांना सिद्दीला मदत करण्याचे आदेश दिले होते. मोसे खोऱ्यातील गोंडाजी पासलकरने आदिलशाही सैन्याला मदत केल्याबद्दल त्याला काही भागातली जमीन दिली गेली. केदारजी खोपडेनेही आदिलशाहकडे अशीच विनंती केली. आदिलशाहनेही ती लगेच मान्य केली.
इथे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की रुस्तुमेजमानने वतनाची देखभाल करायची आहे ह्या निमित्ताखाली सिद्दीला मदत करण्याचे टाळले. कदाचित त्याने शिवरायांना अप्रत्यक्ष मदत केली असावी. राजापूरहून सुरतच्या वखारीला पाठवलेल्या काही इंग्रज पत्रांमधेही असा उल्लेख आहे. पण ही पत्रे सोडली तर इतर साधनांमधे त्याची पुष्टी होत नाही.
संदर्भग्रंथ
राजा शिवछत्रपती, पृष्ठ २७५-२७८
No automatic alt text available.