कोणतही शिवकाव्य येथे शोधा

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ९१



भोर संस्थान : रघुनाथ चिमणाजी (१८२७-१८३६)

याच्या कारकीर्दीत सचिवाचा कोंकणांतील पसरलेला कांहीं भाग एकत्र करण्याकरिता १८३० सालीं इंग्रजांनीं सचिवाबरोबर तह करून त्यांच्या मुलुखाचा मोबदला करून दिला. याला पुत्रसंतान नव्हतें म्हणून त्यानें दत्तक घेऊन त्याचें नांव चिमणाजी ठेविलें. रघुनाथपंत अज्ञान असतां त्याचें व त्याच्या आईचें भांडण लागलें. तें सातारच्या प्रतापसिंहानें मोडून भवानीबाईस नेमणूक करून दिली. ही बाई अखेरपर्यंत सात-यास होती.