कोणतही शिवकाव्य येथे शोधा

मकरंदगड / मधू-मकरंद गड


किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग
डोंगर रांग: महाबळेश्वर
चढाई श्रेणी: मध्यम
जिल्हा: सातारा
तालुका: जावळी
वाई महाबळेश्वरच्या मार्गे आंबेनळीच्या घाटातून, शिरवली-हातलोट रस्त्याने हातलोट आणि घोणसपूर या पायथ्याच्या गावातून मधू-मकरंद गड असे हे जोडकिल्ले दिसतात. परंतु आज मधुगडावर जाण्यासाठीचा रस्ता शिल्लक नाही.घोणसपूर गावात पोहोचल्यावर गडाच्या माथ्यावर मल्लिकार्जुनाचं देऊळ लागते. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले मल्लिकार्जुन शंकराचे मंदीर आहे, मुक्कामासाठी हे मंदिर चांगले ठिकाण आहे. येथे दरसाली यात्राही भरते.मकरंदगड याला सॅडल बँक असेही म्हणतात कारण याचा आकार तट्टूच्या पाठीसारखा आहे. गडावर आता काही बांधकाम शिल्लक नाही. गडावर कातळात खोदलेले पिण्यायोग्य पाण्याच्या टाकी आहेत.वासोटा आणि प्रतापगड यांना जोडणारा हा किल्ला शिवाजी महाराजांनी इ.स.च्या १६५६ च्या सुमारास बांधला. या गडाचे वैशिष्ठ म्हणजे या गडाच्या एका बाजूने महाबळेश्वर दिसते तर दुसर्या बाजुने कोकण प्रांताचे आणि समुद्र किनार्याचे विलोभणीय दर्शन दुर्बिणीच्या साहय्याने घेता येते. या गडाभोवती जवळचे घनदाट अरण्य पसरलेले असून त्यात हिंस्र श्वापदांची वस्ती आहे.makarandgad